विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्
नमस्कार,
या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे.
मिसळपाव
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.