Skip to main content

दर्शनेच्छा बलियसि!

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 23/12/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं.

अखेरचा पाठ

लेखक प्रास यांनी मंगळवार, 20/12/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जायला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढत चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार आणी कदाचित मारही, हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते.

पुन्हा एकदा लोहगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 20/12/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली. १. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड २.

मुला मुलींची नावे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 18/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/12/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स. हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.

MI 4 Ghost Protocol

लेखक snowy यांनी शुक्रवार, 16/12/2011 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिशन इम्पॉसिबल 4 हा ह्या सिरीजमधला चवथा चित्रपट. इथन हंट ( टॉम क्रूज ) व त्याचे सहकारी एका महत्वाच्या कागदपत्रास हस्तगत करण्यासाठी क्रेमलिन ला जातात पण तिथे विस्फोट होतो . त्याचा ठपका IMF वर ठेवला जातो. संपूर्ण IMF वर बंदी लादन्यात येते. त्यात सेक्रेटरी चा मृत्यू होतो.