उडालं गेऽऽ धर!!! (एका विस्कळीत लेखाचे विच्छेदन)
मूळ कलाकृती इथे वाचा: http://www.aisiakshare.com/node/451
आपण आपल्यासाठी सोपे नसलेले प्रश्न स्वत:लाच कशाला बरे विचारतो? कारण आपला आजूबाजूला जे घडतंय, घडत आलं आहे
त्यावर, आपल्या आधीच्या किंवा सोबतच्या माणसांवर, अनुभवांवर, कश्शा-कश्शावरही, अगदी स्वत:चा स्वत:वरही विश्वास
नसतो. त्यामुळं या सोप्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या लोकांच्या विचारपद्धतीतून आलेल्या धारणांपेक्षा वेगळीच असतात. कुठेही
गेल्यावर कशा प्रतिक्रिया याव्यात ते आपल्याला अपेक्षित असतं. एकदम वेगळेच प्रतिसाद आले तर मग डोकं सुन्न होतं. कालच
एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहिसा अनुभव आला. खिशातून चपटी काढताना पाहून, ''इथे चपटीची गरज नाहीच,
उलट चखणासुद्धा आम्हीच देतो, मनसोक्त प्या!'' मग काऊंटरवरच्या माणसानं संपूर्ण भागाचा नकाशा दाखवला. पेन्सिलीने खुणा
करुन ''बाकी कुठेही पिऊन पडलात तरी चालेल, इथे मात्र मॅनहोल आहेत, तेव्हा काळजी घ्या'' असं सांगतानाच, ''तिथे खाली
जाणारच असाल तर या ठिकाणी मात्र जाऊ नका.. तिथून धुलाई केंद्राचा मस्त देखावा दिसतो पण तुम्ही शुद्धीत नसाल,
तेव्हा तुम्हाला काही दिसणार नाही.. हा ही सल्ला दिला. (ते धुलाई केंद्र आपल्याला माहितच आहे, तेव्हा कशाला उगाच फोटो
देऊ) संपूर्ण परिसर फिरताना आम्ही थोडीथोडी घेतली होतीच, त्यामुळं ''इथे ती आपल्याला वॉर्निंग दिलेली मॅनहोल कुठे आहेत
''असा प्रश्न आम्हाला पडला होता. नसती लफडी टाळण्यासाठी म्हणा किंवा एखादा तडमडला तर उगाच पुन्हा डाक्टरला बोलवावं
लागेल म्हणून त्या माणसानं काळजी घ्या हे सांगितलं. आमच्या मागून आलेल्या व्हीलचेअरवरच्या बाईंना ''तुम्ही इथे आलातच
कशाला? घरीच घेऊन बसायचे ना?'' असं विचारुन त्या आल्याबद्दल संतापही व्यक्त केला. ते ऐकून मला तर पुण्यातल्या
एखाद्या कौंटरसमोरच उभं राहिल्यासारखं वाटलं.
एकूण परिसर रम्य असायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं, आणि आम्ही तो ठेवलाही आहे. आम्ही अमेरिकेत, भारतात अशा
राहून दोन्हीकडे घातलेला गोंधळ पहाता या स्थळाला किंचीत ऐतिहासिक महत्त्व आहे. पण काय सांगू बाई, तिथे फारसे लोकच
येत नाहीत. ''असा रम्य, शांत, फक्त आपलाच घोडा दामटवता येणारा परिसर मिळाला तर काय बहार येईल'' असा माझा विचार
सुरु असतानाच माझा भ्रमनिरास झाला.. तरी बरं एवढ्या वर्षांच्या वावरातून सगळीकडेच मित्र आहेत ते. चंबुगबाळे आवरण्याची
वेळ आलीच, तर सोय आहे.
----
''तुम्हा चोरांना काय किंमत कळणार आहे या गोष्टींची? हातावर फटके पडल्याशिवाय बाटलीची काय मजा'' वगैरे ड्वायलाक
माझ्या पिढीला नवे नाहीत. आणि हे का, तर भिकार लेख, गोडगोड शब्दात एकमेकांना दिलेल्या झापडा गाजताना काही भामटे
वापरले म्हणून! असं कोणी काही बोलंल की मला एकदम ती ''कुवैत'' ची जाहिरातच आठवते. वाळवंटातल्या रस्त्यावर रहाणारे
बाप-लेक.. बाप कोंबडी उलटी टांगून ती भाजत असतो आणि ती कोंबडी केकाटत असते. कोंबडीची कॉक् कॉक् ऐकून पोरगा
उठतो. कुठलंतरी वायर लांबवून तो ते बापाला जोडतो. बाप अतिशय संतापाने पोराकडे पाहून डोळे मिटतो. सगळ्यांनाच ही
जाहिरात आवडते, पण म्हणून कोणी कोंबडी न भाजताच खात असेल की, ''यात खरी मजा नाही'' अशी वाक्यं हुकल्या मनांमध्ये
येतातच.
खरोखर चेष्टेतून काही करणार्या लोकांचं कौतुक जास्त होतं हे रास्तच आहे. पण चेष्टा टाळण्यासाठीच आपापली स्थळं निर्माण
केलेली आहेत. ती वापरणार्यांना कमी का लेखावं. मिपावर येण्यासाठी काही कार लागत नाही. कंपूत रहाणार्यांना लेख चांगले
कळतात आणि काहीच माहिती नसताना सरळ लॉगिन करणार्यांना लेखांबद्दल काहीच कळत नाही असं थोडीच आहे? तरीही
कंपूत रहाणारे अनेकदा काही माहिती नसताना लॉगिन करणार्यांना कमी का लेखतात? आणि त्यावर कडी म्हणजे अशा लोकांनी
स्वत:ला कमी लेखून घेणं.
मी अनेकदा मिपाच्या गडावर गेले होते, थेट माझ्या स्कुटरवरुन उतरुन. नेहमीच स्कुटर गडावर घुसवणं शक्यच नव्हतं. एकदा
आमच्या स्कूटरमागे दोन मध्यमवयीन बाया होत्या. दोघीच फिरायला निघाल्या होत्या. त्यांची छाती अभिमानानं फुगली होती,
हिरकणी ज्या कड्यावरुन खाली उतरली त्याच कड्यावरुन आपण फरफटत का होईना वर चढणार आहोत म्हणून. रोज
लोकलमधून प्रवास करताना रात्री करायच्या भाज्या निसत स्त्री मुक्तीवर गप्पा मारणं, पन्नाशीला आलेलं वय यामुळे ट्रेकींग
करणार्या काही पुरुषांना मिळणारी सूट पाहुन त्या दोघींना प्रचंड चूक वाटत होतं. मला तर त्यांच्या उत्साहाचंच एवढं आश्चर्य
वाटत होतं. त्या दोघी दिवसभर भाज्या निसून, टवाळक्या करुन दमल्या तरीही रात्री उशीरापर्यंत आमच्याबरोबर नाचून अंगात
वारे खेळवत होत्या तेव्हातर मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं. काळ बदलला, हिरकणीचा जमाना आता राहिला नाही; तरुणवयात
एकेकाळी नवर्याच्या पैशावर हात मारुन पै-न-पै जमवलेल्या पिढीतले लोक असे भटकायला निघतात तेव्हा त्यांचंही कौतुकच
करायचं. आणि त्यांच्या वयाच्या लोकांसाठी स्पेशल ब्रॅण्ड डीझाइन करणार्यांचंही कौतुकच करायचं.
(मूड आला तर क्रमश:)
वाचने
5414
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अर्धवट
___/\___ य कु, तिकीटं बूक
ठाण्ण करून टोले हाणलेस रे
छान कल्पना!
अवघड आहे...
(No subject)
काय यश दा ?? स्कोर सेटलमेंट
याची इथे गरज नव्हती हे
In reply to याची इथे गरज नव्हती हे by रेवती
असहमती
मस्त.. भावना आणि लेख दोन्ही
हे हे हे हे
In reply to हे हे हे हे by रामपुरी
>>>विस्कळीत लेखाचे विच्छेदन
विच्छेदन म्हणण्यापेक्षा कंदन
मित्रा, दुर्लक्ष या सारखा उपाय नाही.
या लेखाची काही गरज नव्हती, हे
पुढे लिहायला हवे होते