Skip to main content

वैष्णवेर क्रियामुद्रा....*

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 16/12/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या ईशान्य भागातील त्रिपुरा प्रदेशामध्ये अनेक वर्ष राजेशाही होती. गेल्या शतकामध्ये तिथे श्रीवीरचन्द्र माणिक्य यांचं राज्य होतं. महाराज वीरचन्द्र हे एक निराळंच व्यक्तिमत्व होतं. महाराज आचार-विचाराने वैष्णव होते. त्यांच्या घराण्यामध्ये गौर संप्रदायी भक्तीची परंपरा होती. राजकार्य करत असूनही ते यथाशक्ति यथासंभव भगवत् भजन करायचे. त्यांच्या राज्यकारभारावरही वैष्णव पद्धतीचा पगडा होता. ते स्वतःला विष्णुंचा प्रतिनिधी मानून कारभार करायचे. प्रजेवर पुत्रवत् प्रेम करायचे आणि कायम तिच्या क्षेमकुशलाची चिंता वाहायचे. त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूप प्रेम करायची.

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १.

प्राचीन भारतः पाताळेश्वर लेणी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 12/12/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच. पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत.

पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 12/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकूण पृष्ठसंख्या: ६४ किंमतः ६० रू. फक्त. नवता प्रकाशन मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे.

गाणारं वायोलिन!!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 12/12/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

ब्रजवासी जगन्नाथ

लेखक हरिकथा यांनी रविवार, 11/12/2011 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर जगात जितकी म्हणून ठिकाणं आहेत ती सगळी त्रिलोकपति भगवंतांचीच आहेत आणि आपल्या परमात्मस्वरूपात तेच सर्वत्र विराजमान असतात. असं असलं तरीही त्यांना जितकी ब्रजभूमी प्रिय आहे तितकी बाकी कोणतीही जागा नाही. ते स्वतः जगभरात त्यांच्या निरनिराळ्या रुपात उपस्थित असतात पण त्यांच्या अशाच एका ब्रजभूमीपासून दूर असलेल्या विग्रहरुपामध्ये ब्रजवासाची तीव्र इच्छा जागृत झाल्यास ती काही आश्चर्याची बाब म्हणताच येणार नाही. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी यमुनानदीकाठच्या ब्रजवासाची - ब्रजभूमीमध्ये निवास करण्याची इच्छा झाली पुरीच्या जगन्नाथांना!