Skip to main content

आस्वाद

शिवरात्र-नरहर कुरुंदकर...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 21/02/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..? झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....

बारवीचे जंगल व आक्षीचा समुद्र..

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 20/02/2012 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी अचानक एखादा छंद आपला ताबा घेतो. वेळात वेळ काढुन, कधी महत्वाच्या कामांनाही टांग मारुन आपण त्या दुनीयेत हरवायला बघतो. जे आपण करायला बघतो ते कितपत जमतय, याबाबत उत्सुकता तर असतेच. अशीच काही मी काढलेली छायाचित्र, आपल्या सुचनांसाठी आणी माझ्या सुधारणांसाठी... सुरवात आक्षीच्या किणार्‍यावरचे काही वेडर्स.. सॅन्ड प्लोव्हर्स.. कळपाने फिरणारे, कळपाने उडणारे...

रांगोळ्या

लेखक पैसा यांनी शनिवार, 18/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
amit हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो? यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली. नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली.

व्हॉट वीमेन वाँट

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/02/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
मेल गिबसन या नटाची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याच्या सदाबहार अभिनयाने तारून नेलेला सिनेमा - "What Women Want" मी काल डीव्हीडी वरती पाहीला.

बाजु बंद खुल खुल जाय .

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवार, 17/02/2012 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अने़क मित्राना शास्त्रीय संगीता मध्ये रूची नाही असे नाही , पण मुद्दाम म्हणून ऐकत नाहीत. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गायक -गायिका ख्याल गाताना शब्द / बोल व त्यामधील "भाव" ह्या कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्या अर्थाने ही स्वरप्रधान गायकीच आहे. त्यामुळे स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही. ह्या वर ऊपाय म्हणून ऊपशास्रीय संगीत ( नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ) ऐकावे. थोड्या दिवसात मध्ये अपोआप गोडी निर्माण होईल. मिपा वर जर कोणी शा.

ब्युटी अँड द बीस्ट

लेखक शुचि यांनी बुधवार, 15/02/2012 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा व्हॅलेन्टाइन डे , " ब्युटी अँड द बीस्ट" हा कार्टून सिनेमांमधील माझा सर्वात लाडका सिनेमा पाहून मी साजरा केला. लहानपणी बाबांबरोबर हा सिनेमा पाहील्याचे आठवते. तेव्हा खूप म्हणजे खूपच आवडला होता. स्नो व्हाईट , लेडी अँड द ट्रँप वगैरे सिनेमे तर या सिनेमापुढे कुछ भी नही असे तेव्हा वाटले होते. याचे मुख्य कारण स्नोव्हाईट इतकी गोरीपान, फुलासारखी छान आहे की तिच्याशी स्वतःला "आयडेंटीफाय" करताच येत नाही. याउलट ब्युटी अतिशय "प्लेन" आणि पुस्तकी कीडा आहे. लहानपणी मी सहज ब्युटीशी स्वतःला आयडेंटीफाय करू शकले असावे. ते असो.

"आय विल ऑल्वेज लव यू, व्हिटनी ह्यूस्टन"

लेखक प्रास यांनी सोमवार, 13/02/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या एप्रिल महिन्यात मी एका मोठ्या संकटातून पार झालो. अनेक दिवसांचा माझ्यावरचा 'पालकीय' पहारा त्यावेळी उठला. मी त्यावेळेपूर्वी हवा तेवढा झोपू शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो, इतकंच काय तर अगदी हवं ते पुस्तकही वाचू शकत नव्हतो. माझ्या या सगळ्या आवडत्या गोष्टींवर बंधनं टाकण्यात आली होती. माझ्यावर तोपर्यंत शेजार्‍यापाजार्‍यांपासून सतत कुणी ना कुणी लक्ष ठेऊन आहे असंच वाटायचं. बारावीची परीक्षा देत होतो ना मी त्या वर्षी! एप्रिल महिन्यात ती संपली आणि मी एका स्थानबद्धतेतून मला हवं तसं वागण्यासाठी मुक्त झालो.

ताल-बेताल!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 12/02/2012 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच दिवसांनी चेस्.कॉमवर जरा निवांत भटकत होतो. मला परमप्रिय असलेल्या मिखाईल तालचा एक डाव नजरेस पडला. मग तिथून जरा तंद्री लागली आणि थोडी शोधाशोध करुन तालचाच आणखी एक प्रसिद्ध डाव हाती लागला. पेश करतोय मिखाईल ताल वि. बेंट लार्सन. "सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माईन!" मिखाईल ताल!! बुद्धिबळाच्या इतिहासात अतिशय कमीकाळ तेजाने तळपून जे तारे लुप्त झाले त्यात तालचा क्रमांक अतिशय वरचा लागेल. हा माणूस प्रतिस्पर्ध्याला कधीही स्वस्थ होऊ देत नसे. कधी एकदा बलिदान करायला मिळतंय याची त्याला जणू घाईच लागलेली असे!