Skip to main content

इच्छा मरण

लेखक रघु सावंत यांनी बुधवार, 11/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला मरण यावे ते समुद्रात यावे एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे. कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट किंमत कमी करून मी दिली सारात सोडून त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे खोबरं लाल तिखट धण

चित्रपट ओळख - द लास्ट सामुराई

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते. *** They say Japan was made by a sword. They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea. And those drops became the islands of Japan.

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्य

सेवाभावातील मानसिकता

लेखक हरिकथा यांनी मंगळवार, 10/01/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही. एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.

तुम गगन के चंद्रमा हो

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 09/01/2012 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले या गोष्टीला. तेव्हा ज्या घरात मी रहायचे त्या घराला एक छानशी गच्ची होती. रात्री जेवण झाल्यावर त्या गच्चीत अगदी मस्त शतपावली करता यायची. ती सवयच झाली होती. आणि मग बरेचदा त्यावेळी काही काही विचार चालू असायचे मनात. असंच एकदा शतपावली चालू होती. आजूबाजूला अगदी शांत वातावरण होतं. कानात हेडफोनवर मंद आवाजात रेडिओ चालू होता. रात्रीची विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते. निवेदक कामापुरतंच बोलतात. गाण्यांचा मूड जात नाही त्यामुळं.

गिरनार पर्वतावर चितळेबाबांची - गुरूंशी भेट

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/01/2012 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, नवनाथांच्या धाग्यावरील रंजक माहिती वाचून एका जागृत नाथपंथियाची एक आठवण सादर करत आहे. आमचे चितळे बाबा या ब्लॉगवर त्यांची आणखी माहिती मिळेल. गिरनार पर्वतावर चितळेबाबांची - गुरूंशी भेट
गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग ‘मला आदेश आलाय 'भेटायला गि