निसर्गाच्या कुंचल्यातून...
की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी...
सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव...
गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली..
मिसळपाव
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.