"आय विल ऑल्वेज लव यू, व्हिटनी ह्यूस्टन"
१९९२ सालच्या एप्रिल महिन्यात मी एका मोठ्या संकटातून पार झालो. अनेक दिवसांचा माझ्यावरचा 'पालकीय' पहारा त्यावेळी उठला. मी त्यावेळेपूर्वी हवा तेवढा झोपू शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो, इतकंच काय तर अगदी हवं ते पुस्तकही वाचू शकत नव्हतो. माझ्या या सगळ्या आवडत्या गोष्टींवर बंधनं टाकण्यात आली होती. माझ्यावर तोपर्यंत शेजार्यापाजार्यांपासून सतत कुणी ना कुणी लक्ष ठेऊन आहे असंच वाटायचं. बारावीची परीक्षा देत होतो ना मी त्या वर्षी! एप्रिल महिन्यात ती संपली आणि मी एका स्थानबद्धतेतून मला हवं तसं वागण्यासाठी मुक्त झालो.
ताल-बेताल!
आज बरेच दिवसांनी चेस्.कॉमवर जरा निवांत भटकत होतो. मला परमप्रिय असलेल्या मिखाईल तालचा एक डाव नजरेस पडला. मग तिथून जरा तंद्री लागली आणि थोडी शोधाशोध करुन तालचाच आणखी एक प्रसिद्ध डाव हाती लागला. पेश करतोय मिखाईल ताल वि. बेंट लार्सन.
"सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माईन!" मिखाईल ताल!!
बुद्धिबळाच्या इतिहासात अतिशय कमीकाळ तेजाने तळपून जे तारे लुप्त झाले त्यात तालचा क्रमांक अतिशय वरचा लागेल. हा माणूस प्रतिस्पर्ध्याला कधीही स्वस्थ होऊ देत नसे. कधी एकदा बलिदान करायला मिळतंय याची त्याला जणू घाईच लागलेली असे!
फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे
मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते..
गोळाबेरीज
गोळाबेरीज या चित्रपटाबद्दल समजल्यापसूनच प्रचंड कुतुहल मनात होतं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु. लं. नी अक्षरश। (विसर्ग कसा लिहितात प्लीज सांगा कोणीतरी) जिवंत करून सोडलेल्या व्यक्ती आणी वल्ली कशा रेखाटल्या असतील? हे सर्व विविध पात्रे एका कथानकात कशी गुंफली असतील? मातब्बर कलालारांचे सैन्य आपल्या मनातल्या या व्यक्तिरेखांना कितपत न्याय देऊ शकतील? असे प्रचंड औत्सुक्य मनात घेऊनच सिनेमाग्रुहात पाय ठेवला.
संपूर्ण महाराष्ट्राला मुखोद्गत असलेले पु. लं. चे लिखाण पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच.
छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर
**** चांडाळ चौकडी ****
परवा, राजश्री मराठीच्या तुनळीवरील पोतडीत ढुंकुन पाहताना, चित्रपटाची लिंक गवसली.
म्हटले चेपु-चेपु करण्याऐवजी, क्लासिक सिनेमा आहे बघावे दोनेक तास खर्ची घालुन.
_____________________________________________________________
तर मंडळी चित्रपट आहे चांडाळ चौकडी....
चित्र : आंतरजालावरुन साभार...
या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते.
चित्र : आंतरजालावरुन साभार...
या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते.भावगीते..
असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे.
ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल.
खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला.
मिसळपाव
