Skip to main content

अखेरचा पर्याय

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 30/03/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय बहीण अनामिका, या आधी तुला बरीच पत्र लिहिली पण एकाही पत्राचं तू उत्तर पाठवलं नाहीस, कदाचित तू ती वाचलीच नसशील तुझं वय नक्कीच पत्र वाचण्याइतकं नसणार तेव्हा, म्हणूनच इतक्या उशीरा तुला हे पत्र लिहीत आहे. तुला कदाचित माहीतही नसेल की तुला एक मोठा दादा आहे. खरंतर मलाही माहीत नव्हतं की मला लहान भाऊ झालाय की बहीण, पण एकदा आत्याला माझ्या आईबद्दल बोलताना मुलगी बद्दल काहीसं बोललेलं ऐकलं, तेव्हा मला कळलं आणि मी माझ्यातर्फे तुला अनामिका हे नाव देऊन टाकलं. आईबाबांनी तुझं नाव काय ठेवलंय? कमीतकमी हे तरी सांगितलंय का की तुला एक मोठा भाऊ आहे म्हणून ? का कुणास ठाऊक पण त्यांना मी कधी आवडलोच नाही.

चंद्रकोर आणि चांदणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/03/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्‍यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते. moon1 lr moon2 lr

गप्पा युजींशी

लेखक यकु यांनी रविवार, 25/03/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

काहीतरी नवीन..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 23/03/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे! मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली.

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/03/2012 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकांनो, आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे. गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल. १ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.

कंदमूळ-उन्हा़ळ्याचं फळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 22/03/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला कंदमुळ या नावावरुन सामान्यतः सुरण/रताळी इ.इ. कंद जमातीची अठवण होते...पण आज मी एक वेगळाच कंद प्रथम पाहिला... म्हणजे खाऊनही पाहिला.आणी तोही मिळावा कुठे..? तर आमच्या त्या अजब दुनियेत...मार्केटयार्ड मधे...! उद्या पाडवा असल्यानी फुलं आणायला मुद्दामच यार्डात ११:३० ला गेलो होतो,कारण सगळीकडचा मालही आलेला असतो,आणी बाजारही जरा बरा मिळतो,म्हणुन. आधी उन्हानी फुल्लं तापलेलो होतो.तेंव्हा आधी जरा एक शहाळं मारावं,आणी मग आत गाळ्यात उकडुन निघायला घुसावं अश्या विचारात होतो... तर कडेनीच जाणार्‍या एका हार वाल्यानी...

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

लेखक यकु यांनी गुरुवार, 22/03/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 19/03/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-) एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती... मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या... तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा...

नर्मदे हर!

लेखक पैसा यांनी रविवार, 18/03/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक मिपाकर आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा ही सुंदर लेखमालिका लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं.

वाह उस्ताद!

लेखक अक्षया यांनी शनिवार, 17/03/2012 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार.