Skip to main content

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..

बार बार देखो हजार बार देखो !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/03/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं. संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच रवी यांचे काल मुंबईत निधन झालं. पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत. हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल याउलट आहे रवी यांचे जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया दिल की थी आरजू की कोइ ये

एकात एक...

लेखक गवि यांनी बुधवार, 07/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..

"क्रांती" - कर ले घडी दो घडी!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 05/03/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट.

एक संध्याकाळ "संतूर"लेली

लेखक जयवी यांनी गुरुवार, 01/03/2012 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ..... कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !! संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर.... ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल ..... ? मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ..... आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात.