Skip to main content

सांग सांग भोलानाथ...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/04/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा मा

फायनल ड्राफ्ट : एक नितांत सुंदर नाटक.

लेखक तर्री यांनी शनिवार, 21/04/2012 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे नाटक खूप दिवस हातास लागत नव्हते. एका मित्राने “जरूर बघ “ अशी शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी रंगायतनला प्रयोग होता. हल्ली फोन करून तिकीट मिळवता येते. त्यामुळे दूरच्या नाट्यगृहातही “एकाच” खेपेत नाटक पहाणे शक्य होते. नाटक सुरु होण्यापूर्वी तिकीट खिडकीशी प्लान वरून गर्दीचा अंदाज घेण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. “प्लान तर रिकामाच दिसत होता”. अर्थात नाटकाचा दर्जा आणि होणारी गर्दी ह्यांचा काही सम्बंध नसतो . हाच अनुभव चारचौघी ( सुरवातीला) , किरवंत , आत्मकथा , लग्न हया नाटकांना आला होता. फायनल ड्राफ्ट हे एका साध्या कथेवर बेतलेले नाटक आहे .

कलsssssssssर्क

लेखक अन्या दातार यांनी शनिवार, 21/04/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम तुम्ही माझे अभिनंदन करावे अशी मी विनंती करतो. स्वतःच आरती ओवाळून घेतोय, कारण हा पराक्रमच असा आहे. मी चक्क मनोज कुमार कृत चित्रपट ‘क्लर्क’ (उच्चार: कलर्क) पूर्ण पहिला. ज्याचा एकतरी पुरावा म्हणजे हे रसग्रहण! दचकू नका. माझ्या भुताने लिहिले नाहीये. खुद्द मी; एक मर्त्य मानव या चित्रपटाचे रसग्रहण लिहीत आहे. आणि मी चक्क जिवंत आहे हे विशेषत्वाने लक्षात घ्या मंडळी! हं, तर या चित्रपटातील पात्रांचा(या शब्दाला खरोखर जागलेत सगळेच!) परिचय करून घेऊ.

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला. गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.

मनाचे श्लोक एम.पि.थ्री मध्ये हवे आहे...

लेखक चिम् चिम् मामा यांनी मंगळवार, 17/04/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे श्लोक एम.पि.थ्री मध्ये हवे आहे... मला कुठल्या संकेत स्थळावरुन डाउनलोड करता येइल?