विस्टिरिया लॉज - २ - होम्सकथा
3
आस्वाद — साहित्य, संगीत, चित्रपट आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणारे मराठी लेखन. रसिक मनाला भिडणारे आस्वादपर मराठी लेख येथे वाचा.
पफ द मॅजिक ड्रॅगन नावाचे लहान मुलांचे धमाल सुश्राव्य गाणे मध्यंतरी ऐकले. गाणे खूप आवडले. लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी चाल आणि शब्द आहेत. या गाण्यात पफ नावाचा अक्राळ-विक्राळ ड्रॅगन आहे ज्याचे हृदय मात्र लोण्याहूनही मऊ आहे :). मैत्रीमधील निष्ठा आणि कोमल हृदय हे गुण या शक्तीशाली ड्रॅगनमध्ये आहेत. ज्याला मोठे मोठे राजे महाराजे वाकून कुर्नीसात करतात, ज्याच्या गगनभेदी गर्जनेपुढे , थरथर कापून खुद्द समुद्री चाचे आपल्या जहाजाचा झेंडा उतरवतात अशा या ड्रॅगनचा एक लहान मुलगा जिगरी दोस्त आहे. त्याचे नाव "जॅकी पेपर". पफचे, जॅकीवर खूप प्रेम आहे.
दि. 6 मे 2012
काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती.
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट पाहायची हिंमत आज केली.
निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..!
मध्यंतरी 'सकाळ' मध्ये सौमित्र ची 'तू कुठे आहेस गालिब?' ही कविता वाचली होती. खूपच आवडली होती. पण कात्रणं वगैरे करून ठेवायचा आळस आणि रद्दी टाकायची घाई या नादात ती पुरवणी गेली कुठेतरी. पुरवणी तर गेली पण कविता मनात घर करून बसली होती. युट्युब वर सौमित्र चे कविता वाचनाचे व्हिडिओ वगैरे धुंडाळले पण नाही सापडली. आणि परवा नकळत पणे हातात आली. झालं असं की घराजवळंच पुस्तक प्रदर्शन लागलं होतं, तिथे पुस्तकं बघता बघता सौमित्रचंच एक पुस्तक हाती आलं. अधाश्यासारखी झडप घातली आणि त्यात ही कविता कुठे आहे आहे का ते शोधायला लागलो. आणि काय सांगू महाराजा...चक्कं सापडली.
खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो.
सह्याद्रि वाहिनीवर अमित वैद्य या पुणे स्थित कलाकाराची अॅकॉर्डियन वादनाची झलक दाखविणारी मुलाखत पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात अशाच कार्यकमाची जाहिरात ही पहायला मिळाली.व कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे चिंचवड ते पुणे असे अंतर काटण्यास मन लगेचच तयार झाले. मोदक पुण्यातून आपले काम आटपून कार्यक्रमाच्या जागी भेटणार होता. मी दुपारी साडेतीनच्या सुमारास निघालो. रविवार

इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे.
'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...