`स्नायपर शिंदे शुद्धीवर आलाय ताबडतोब हेड ऑफिसला पोहोचणे'
हातातल्या त्या तारेचा आशय नक्की मला कळतोय तोच असल्याची मी चार-चारदा खात्री करून घेतली. अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसणं सोपं वाटत नव्हतं.
गेल्या दशकातलीच गोष्ट आहे ही,
आसामच्या जंगलात नाईलाजास्तव सैन्य तैनात करावं लागलं होतं, एकमेव कारण बोडो अतिरेकी.
सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा जास्त उपद्रव द्यायला त्यांनी एव्हाना सुरुवात केली होती, भले भले ऑफिसर्स त्यांच्या घातपाती कारवायांना बळी पडत होते. आसामच जंगल म्हणजे काळ बनलं होतं आणि अश्यावेळेस मी माझ्या साथीदारांसह तिथे तैनात केल्या गेलो होतो.