Skip to main content

स्टोरी सलील ची ...

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 25/10/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं... ३० वर्षांपूर्वीची गोष्ट .सलील ,माझ्या भावाचा एक मित्र .याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर. पण स्वभाव लहरी. घरी बायको आणि एक मुलगा.पण त्या काळात सुमारे ३० हजार रुपये महिना पगार असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले. नोकरी सोडून हॉटेल काढलेही ,पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे!

मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 15/10/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग) ‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार. ‘या. बसा तिथं.’ उमेदवार बसतो. ‘नाव ?’ ‘सुमित अरुण नार्वेकर ‘ ‘शिक्षण ?’ ‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’ ‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी. ‘अं..C किंवा जावा..’ ‘ते languagesआहेत.

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

एका मुलाखतीतील मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 08/10/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : हापिसातील बॉस क्र. १ ची प्रशस्त वातानुकूलित केबिन. वेळ : हापिस सुरु होऊन १ तासानंतर. काळ : लवकर पुढे सरकत नसलेला कंटाळवाणा . प्रसंग : अकौंटस क्लार्कच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी (तब्बल) ६५ उमेदवारांच्या मुलाखतीचा. पात्रे : मुलाखतकार : १. बॉस क्र. १ २. सदस्य , लेखा विभाग ३. सदस्य , प्रशासन विभाग ४. मी , महिला सदस्य उमेदवार : ५८ मुली व ७ मुले १७ ते २० वयोगटातील. बॉस क्र. १ समोरच्या फायलीतली उमेदवारांची माहिती चाळून पाहत आहेत. बॉस प्रशासन सदस्यांकडे पाहून विचारतात.

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर

बाप माणूस

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 21/09/2012 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज हे एक बाप म्हणून लिहितोय तुला स्वतःला मूल होईपर्यंत कळणार नाही, आनंदापलिकडची अनुभुती, प्रेमापल्याडची प्रीती जी बापाच्या हृदयात उचंबळते पोराकडे पाहून नाही कळणार तुला, कसला अभिमान असतो तो एका पुरुषाला आपण आहोत त्यापेक्षा खूप मोठं होण्याचा आणि ते परंपरेने चालू ठेवण्याचा काहीतरी चांगलं आणि आशादायी पोराच्या हाती ठेवण्याचा आणि नाही कळणार तुला त्या वडिलांचा आक्रोश जेंव्हा कधी त्यांच्या मनातले दैत्य त्यांना 'ते पुरूष' बनू देत नाहीत जे त्यांच्या मुलाने पहावेत असं त्यांना मनापासून वाटतं तुला फक्त दिसतोय तो तुझ्यासमोरचा माणूस जो तुझ्यावर सामर्थ्य गाजवतोय, भल्यासाठी वा बुर्‍यासाठी ते सामर्थ्य जे

धोबीपछाड

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 20/09/2012 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
बोधकथा. तृतीयेला सकाळी सकाळी घरात चौघडा झडला. कारण कन्येन हरतालिकेच व्रत करण्याच . नवं रक्त ते. रगा रगात नुसता बालिशपणा अन आई पप्पा सांगतील त्याला विरोध भरलेला . नुसता आंधळा विरोध ! "अग आत्तापासून करशील तर जरा चांगला नवरा मिळेल" इत्यादी मी. "but why should I pray to God to get a good one? Can't I search it myself?" "अरे ! ऐक जरा आईंच. त्यांना बघा कसा छान नवरा मिळाला ?" सांगायला हव का? अर्थात पतीदेव. छाती चांगली दोन इंच फुगलेली (तरीही पोटाच्या घेराला माग न टाकू शकलेली .) नजरेत खट्याळपणा नुसता उतू चाललेला. "हे बघ असली उदाहरण देऊन तू तीला discourage करतोयस." मी "काय discourage ?