एंड्युरो ३
जिममधे विकास सरांनी विचारेपर्यन्त "एन्ड्युरो३" स्पर्धेमधे भाग घेइन असं कधी वाटलच नव्हतं. एन्ड्युरो३ विषयी खूप ऐकुन होतो. गेले ८-१० महिने निखिल शहा आणि पुणे रनिंग ग्रुपमुळे धावण्याची आवड निर्माण झाली होती. स्टॅमिनाही बर्यापैकी वाढला होता. या ग्रुपची ओळखही विकासनीच करुन दिली होती. तेव्हापासुन १० वेळातरी अर्धमॅरॅथॉन (२१किमी) धावलो होतो. एकदा मॅरॅथॉन आयोजनाचा अनुभवही घेतला होता.
निखिल सायकलिंग्,रनिंग, ट्रेकींगमध्ये खूपच माहीर आहे. बर्याच स्पर्धा त्याने जिंकल्याही आहेत. पण त्याचे खरे वेड आहे ते या सगळ्या गोष्टींच इतरांना वेड लावण्यात.
मिसळपाव