महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत . ते माझे कार्यक्षेत्र ,अनुभव , ज्ञान यानुसार असल्याने तपशीलात चुका असतील तर सांभाळून घावे
----------------------------
महाराष्ट्र --> भारत ( जास्त करून उप्र,बिहार, राजस्थान ) --> गवंडी, शेतात मजुरी करणारे , हॉटेल आधील कामगार रिक्षावाले, भाजीवाले थोडक्यात कामगार वर्ग
अमेरिका --> सारे विश्व ( जास्त करून भारत,चीन, फिलिपिन्स ) --> सोफ्टवेअर मधील बरीच कामे करणारे लोक
-----------------------
रोजगार : अमेरिकेमधील कंपनी ला नफा वाढवणे महत्वाचे असते त्यामुळे स्वस्ता मध्ये कोणी काम करत असेल तर ते लगेच घेतात. महाराष्ट्र मध्ये पण शरीरकष्टाची कामे जर कोणी स्वस्ता मध्ये करत असेल तर लगेच काम दिले जाते . या अश्या गोष्टीमूळे स्थानिक लोकांचा रोजगार जातो पण शेवटी नफा महत्वाचा असल्याने कंपनी/मालक आणि पर्यायाने सरकार दोघेही गप्पा बसतात.
राजकारण : दोन्ही ठिकाणी परप्रांतीयाचे आक्रमण हा निवडणुकीचा मुद्दा आहे
कामाची वेळ/मिळणारा पैसा : अमेरिकेमध्ये आईटि मधील बरेच परप्रांतीय लोक ऑफिस मध्ये, घरातून, शनिवार रविवार , ओंन काल कायम काम करायला /सपोर्ट करायला तयार असतात .महाराष्ट्र मध्ये पण बाहेरचे कामगार सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत पण काम करतात. या गोष्टी स्थानिक लोकांना अजिबात शक्य नसतात . परप्रांतीय लोक लोकल माणसापेक्षा काम स्वतामध्ये करतात . लोकल माणूस आधी तेच काम निवांत आणि जास्त पैसे घेवून करत असतो .पण अचानक त्याचा रोजगार जावून तो रस्त्यावर येतो
इतर टाइमपास मुद्दे
राहणे : परप्रांतीय कायम एकत्र राहून पैसे वाचवायचा प्रयत्न करतात . अमेरिकेमध्ये जाणारी बरीच आईटी मधील मंडळी बेचलर असतात किव्वा फेमिली ला इंडिया मध्ये सोडून गेलेली असतात . महाराष्ट्र मध्ये सुद्धा बाहेरून येणारे लोक असेच राहतात . त्यामुळे सुरक्षितताहि मिळते
जेवणे : बरेच परप्रांतीय स्वताचे जेवण स्वत बनवतात . अमेरिकेमध्ये रोज बाहेर जेवण झेपत/आवडत नसल्याने आणि परवडत नसल्याने घरी जेवण करणे आणि ऑफिस मध्ये डब्बा घेवून जाणे असे बरेच लोक करतात . महाराष्ट्र मध्ये पण सेम.प्रत्तेक कामगार डब्बा आणतो
सणसमारंभ : परप्रांतीय हे त्यांचे सण समारंभ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा प्रयत्न करतात . त्यामधून ते लोकल समाजाला एक संदेश पण देत असतात कि आम्ही एक आहोत. जसे कि अमेरीकेमधली दिवाळी, १५ ऑगस्त . महाराष्ट्र मधील छटपूजा , होळी .. या दोन्ही स्थानिक लोकांना खुपतात .
अजून तुम्हाला काही मुद्दे मांडता येतील का ?
वाचने
3986
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकेमध्ये परप्रांतीयांना
परप्रांतीय व परराष्ट्रिय !
थोडे वेगळे...
हो खरय...
तरा-जू छान आहे.अता वजन
आऊटसोर्सिंग ?
साम्य
वा!!!
In reply to साम्य by चिरोटा
+१
In reply to साम्य by चिरोटा
कैक उत्तर भारतीय/दक्षिण
In reply to साम्य by चिरोटा
दक्षिण भारतियांमध्येही तमिळ
In reply to कैक उत्तर भारतीय/दक्षिण by बॅटमॅन
तमिऴ लोक एक नंबरला असतील तर
In reply to दक्षिण भारतियांमध्येही तमिळ by रेवती
तमिऴ लोक एक नंबरला असतील>>>
In reply to तमिऴ लोक एक नंबरला असतील तर by बॅटमॅन