Skip to main content

वाघ्या हौश्या (एक आठवण)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 03/01/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो. गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता.

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षीत आहे)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 20/12/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे *************************************************************** तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती.

शासकीय नितीमत्ता

लेखक जानु यांनी मंगळवार, 18/12/2012 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले. आटपाट नगरात एक अधिकारी रुजु झाले. यापुर्वीचा त्यांचा अनुभव व तेथील लोकांच्या माहितीनुसार साहेब अतिशय कडक. शिक्षण आणि आरोग्य हे त्यांचे अति जिव्हा़ळ्याचे विषय आहेत हे त्यांनी आल्या आल्या सांगून टाकले. कारण काय तर तिर्थरुप शिक्षक. मंडळी धास्तावली. मागील अनुभव पाहता अशी सुरुवात ही धोक्याची घंटा. आल्या आल्या साहेबांनी भराभर भेटीचा धडाका सुरु केला. प्राथमिक शब्दाला फारच महत्व मग ती शाळा असो की आरोग्य केंद्र. दोन महिन्यात जवळ जवळ सर्व तालुका पिंजला गेला.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 13/12/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम  वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ?  उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत.

अपने होने पे मुझको यकीन आ गया...

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/12/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
********************************************************************************* सदरचा लेख मिपावर प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सुचेता कडेठाणकर यांचे खास आभार. "महा अनुभव" या मासिकामधून साभार. ********************************************************************************* चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं.

वसंताच्या उंबरठ्यावर..

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 04/12/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या मालीकेचा पहीला धागा http://www.misalpav.com/node/23312) हा सारा अद्भुत स्वप्नांचा प्रदेश आहे. धुक्याने वेढलेल्या गर्द पर्वतराजींचा. धूसर. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरचा. स्वप्नाळू डोळ्यांनी स्वतःलाच न्याहाळणारा मुग्ध आसमंत. काळ वसंताच्या पहिल्या चाहुलीचा. वेळ रात्र व दिवस ह्यांच्या मधली. स्थळ-काळाप्रमाणे ‘ती’ देखील कौमार्य-यौवन, निरागसता-आत्मभान ह्यांच्या संधिप्रदेशात उभी. वसंतातल्या तांबुस पिंपळपानाइतकी नाजुक अन् कोवळी.