Skip to main content

प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 04/02/2013 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे drsanjayhonkalse@gmail.com भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे.

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 02/02/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे.

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

क्या बात है इस जादूगरकी ? अर्थात ओ पी नय्यर -एक शापित गंधर्व -२

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/01/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा पूर्वार्ध इथे ओपी नय्यर व निरनिराळी वाधे यांचे अफेअर - ओपीनी कोणकोणती वाद्य प्रामुख्याने वापरली याचा उल्लेख वर आलाच आहे. तंतू वाद्यांचा उपयोग तालवाद्ये म्हणून करणे ही ओपींची खास विशेषता. ओपी व हार्मोनियम- ओपीनी हारमोनियम हे वाद्य ज्या पातळी वर वापरले त्याला तोड नाही. बाबु सिंग हे बिनीचे वादक हारमोनियम हा संयोग हे नय्यर साहेबांच्या ऑर्केस्ट्रातील महत्वाचे बलस्थान आहे.

लिंकन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/01/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी हॉलिवूड मधील सर्वात जास्त अ‍ॅकॅडमी अर्थात ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स कुणाला मिळणार याचे उत्तर स्पिलबर्गचा "लिंकन" हा महीना-दिड महीन्यापूर्वी प्रकाशीत झालेला चित्रपट बघताना सहज मिळाले! मध्यंतरी वाचल्याप्रमाणे, डॅनिअल डे लुईस या ब्रिटीश नटास (खाली डावीकडील) स्पिलबर्गने लिंकनचे काम करशील का म्हणून विचारले. त्याने स्पिलबर्गला एक वर्षे थांबण्यास सांगितले. नाराजीने का होईना पण स्पिलबर्ग स्वतःच्या निवडची खात्री असल्याने थांबला. नंतर जो आला तो डॅनिअल डे लुईस नव्हताच....

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

जामखंडीचे उप्पीट

लेखक पंचम यांनी शनिवार, 19/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
शक्यतो मी हिवाळ्याचा रात्रीचा प्रवास टाळतो. त्यात सोलापूर-बेळ्गाव म्हणजे खाच-खळग्यांचा.. पण आमचे काका नुकतेच बेळ्गाव शहरी Shift झाल्याने आणि माझ्या दैवाने एक अत्यंत खडूस प्रजातीचा बॉस मला लाभल्याने हा प्रवास क्रमप्राप्त होता..म्हणतात ना 'जर नशीबच असेल पाजी तर काय करेल काजी?' त्या टिकीट देण्यार्या माणसाला पण काय हुक्की कोणास ठाऊक? त्याने बरोबर विंडोव्ह सीट दिली. बर म्हटल की शेजारील सहप्रवाश्याला विनंती करुन त्याच्या जागेवर बसावे तर त्या सहप्रवाश्याने मी काही बोलायच्या आत पिशवीतून पांघरुन काढले आणि पांढरा झेंडा दाखविला.

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.