Skip to main content

बडबड

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 12/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव." "हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी." "आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10372
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

In reply to by यकु

शुभ बोल नार्‍या तर म्हणे मांडवाला आग लागली! काय हे यकु! आँ? हॅलोविन जवळ येतोय एवढाच बोध घ्यायचा, बाकी काही नाही.

In reply to by रेवती

मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय. बाकी तशीही बिकांना गाडी नीट चालवता येत नाहीच ! ;-)

In reply to by यकु

मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय.
"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"
! हे राम!!! वय काय, बोलतंय काय... छ्या...खातंय आता मार बिकाचा.

लेखु आवडला. मला आधी वाटलं लोकं कशी बडबड करतात, मग काय गमतीजमती होतात असं कैतरी लिहिलंय की काय ! ही एक्दम भुताची स्टोरीच लिहिली की तुम्ही.

बाईने बडबड केली नसती तर त्याचे चित्त विचलीत होऊन दोघे गचकले नसते. डाण्या न सांगता परदेशी गेल्याचे बिकाने फारच मनाला लाऊन घेतलेले दिसतेय.


तरी सांगत होते, जास्त वेळ माणसांच्या जगात राहू नको म्हणून!

भयकथांना सुरुवात म्हणायची का ? ष्टोरी मस्त जमली आहे. -दिलीप बिरुटे

अपेक्षित, सोपे पण छान. वरील सर्वाम्शी( यकु, आदिजोशी,नंदन ह्यांच्याशी विशेष करुन) सहमत.

गोष्ट एकदम आवडली पण त्यामुळे आपण अंधश्रद्धा प्रसार तर करत नाही आहात ना असा प्रश्न पडला आहे. ;)

अनुभव कथन आवडले.

In reply to by निखिल देशपांडे

तरी बिकांना सांगत होतो की भारतात दुबईसारखी बाजुला अरबी मुली घेऊन फास्ट गाडी / बाइक चालवत जाऊ नका, पण ऐकतील ते बिका कसले.

ही गोष्ट नाई आवडली! काका, दुसरी गोष्ट सांगा ना.... :) (हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही)

In reply to by कवितानागेश

ही गोष्ट लई आवडली! बिका, दुसरी गोष्ट सांगा ना.... (हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही) पण आधीचा संवाद जरा अजून फुलवला असता तर ...... ;)

त्याच असं आहे.. बाइकवर जर बसायच असेल, त्यातही डबल्सीट, त्यातही मागे किलबिलती मैना असेल, तर मागच्या मैनेने आपल्या हाताचा उपयोग करुन पुढच्या राघुला घट्ट सीट्बेल्ट घालावा.. अस केलं की वेगावर नियंत्रण आपसुक येत.. उगा जोरात पळवुन ब्रेका मारायची गरज पडत नाही.. :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!! विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच.. दुसर्यांच्या "टाकलेल्या" पंच वर काय हीही करत बसला हात ?

In reply to by स्पा

विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच..
वैयक्तिक आणि अवांतर प्रतिसाद. संपादक मंडळ श्री. स्पा यांना समज देईल काय? - (उगाच) कावणे.

१. घ्या २. आय्ला ३.खरच काय ४. आम्ही बघतोय हं ५. काय तरीच काय ? ६. कोण म्हणे ७. संदेश का.. बरं बरं कोणता ? ८. काही कळलं असेल तर शपथ. ९.ह्यांच आपलं वेगळंच. १०. आवडला/नाय आवडला इति समर्पित.

मस्त कथा. 'भयकथा' म्हणणे योग्य वाटत नाही. बिका, अजून जरा खुलवा ना कथा. वाचे-वाचेपर्यंत संपली !

भावना पोचल्या. वळणावर सांभाळू

शेवट आल्यावरच भयकथा असल्याचे कळ्ळे. मला तर बॉ सुरुवातीला वेगळेच वाटले.

च्यामारी, विडंबन करायच्या उत्साहात अभिप्राय द्यायचा राहूनच गेला की!!!! उत्तम लघुभयकथा! साधी, सोपी, उगाच फापटपसारा नाही!!! पण कितीहि परिश्रम करून रिपोर्ट पुढ्यात ठेवला तरी आमचे खवचट प्रोफेसर जसं म्हणायचे त्याप्रमाणे, "इट्स अ गुड स्टार्ट!" नाही म्हणजे या वर्षी भयालीताईची शिव-ब्रूम उचलायचीये तुम्हाला!!! :)