Skip to main content

परिक्रमा!

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 22/07/2012 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
परिक्रमा ही एक थोर अध्यात्मिक साधना आहे याची बालंबाल खात्री झाल्यानं नवग्रह ती करायला निघाले. आत्मझिरो हा `परिक्रमाकिंग' खरं तर लीडर होणार होता पण त्याची आता अशी परिस्थिती झाली होती की `आपण प्रदक्षिणा करतोय का दोन परिक्रमांच्यामधे कुठे तरी थांबलोय' हेच त्याला कळायचं नाही, त्यात तो एकटा मधेच सटकून भलत्याच मार्गानं जाण्याची शक्यता होती. पुन्हा बर्‍याचदा त्याला काय म्हणायचय ते कुणालाच नक्की समजायचं नाही, तर असा लिडार काय कामाचा? त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला आणि मतदान घेणं क्रमप्राप्त झालं.

सुट्टी आणि मी

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख दुबई महारष्ट्र मंडळाच्या नवरंग या ई-मासिकात प्रकाशमान झाला आहे. तो इथे माझ्या मि.पा. मित्रांसाठी परत प्रकाशमान करत आहे ... चायला लेख आहे का बल्ब?? ;) ] मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे "धिंगाणा" घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते.

सुवर्णक्षण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 17/07/2012 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अ‍ॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला. 'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.' "प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला?

हे सगळे गेले कुठे?

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 16/07/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्‍या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे.

घरचा आहेर

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
घरचा आहेर पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटी दरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात.

गँग्ज ऑफ वासेपुर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 04/07/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.

गुरु पौर्णिमा

लेखक jaypal यांनी मंगळवार, 03/07/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसको लागुं पाय । बलिहारी गुरु आपने, गोविंद दिया बताय ॥" गुरु पौर्णिमेचा हा धागा माझ्या आयुष्यात आलेल्या तमाम गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणुन समर्पीत. मला असंख्य गुरु लाभले पैकी १) माझे वडील , २) माझा मित्र/गुरु सर्वकाही आणि ३) माझे ज्युडोचे शिक्षक यांचा माझ्या आयुष्यावरील प्रभाव मला वाटत मी जिवंत असे पर्यंत कायम राहणार. त्यांच्या शिकवणींची परतफेड कोणत्याही रुपाने या जन्मी शक्य नाही. १) वडिलांकडुन या व्यवहारी जगात व्यवहारी राहुनही परोपकारी कस जगाव हे शिकलो.

गेले करायचे राहूनी...

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते?