Skip to main content

मतदानात अग्रक्रम पद्धति अवलंबावी काय

बुधवार, 28/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मतदानात अग्रक्रम पद्धती अवलंबावी सध्या मतदानात first passing the post ही प्रणाली अंगिकारलि जाते. याचा अर्थ जास्त मते पडेल तो निवडून येतो.पण यामदधये अनेक वेळेला विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्था इ.त फक्त १०/१५ टक्के सारखी मते पडून उमेदवार विजयी होतो . मतदान जर ५०/६०टक्के झाले असेल तर विजयी उमेदवार जास्तीत जास्त ९ टक्के मतदारांचं प्रतिनिधीत्व करतो. सुध्रु ढ व सशक्त लोकशाहीत हे उचित नाही. यासाठी प्रेफरनशिअल मतदान पद्धती अंगिकारावी असे मला वाटते.देशाच्या राष्‍ट्र्पतींच्या निवडणुकीत हीच पद्धती अवलंबिली जाते . यामध्ये जरी एकच उमेदवार निवडून द्यायचा असला तरी ,उभे राहिलेल्या सर्वच उमेदवाराना आपल्या पसंती नुसार आपण क्रमांक द्यायचे असतात. या पद्धतीत सर्वात जास्त मते, पडलेला उमेदवार निवडून येइलच असे सांगता येत नाही. जोपर्यंत ५० टक्क्याहून अधिक मते (अग्रक्रम १,मध्ये नसल्यास अग्रक्रम २,इ. ची मते,विचारात घेउन वगैरे) मिळत नाहीत ,तो पर्यंत कोणीहि विजयी होता नाही. अद्यापीहि बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या जनतेला ही पद्धती किचकट वाटेल, त्याना पचनी पडणार नाही असा आक्षेप कांही जण घेतील , परंतु निवडणूक प्रक्रीयेत अनेक आमूलाग्र बदल उदा. उमेदवारागणित पेट्या ते शिक्के ते बटण दाबणे आणि अनेक ,आपण पचनी पाडलेले आहेत, त्यामुळे यातहि कांही अडचण येउ नये.तरीही सध्या फक्त क्र.१ व २ व ३ अग्रक्रम पर्याय सुरू करावेत. यामुळे खालील गोष्टी साध्य होण्यास मदत होइल. १) निदान ५०टक्क्यांच्या इच्छेचा उमेदवार निवडून येइल. २) निवडणुकीतील भ्रष्टाचाराला कांहीसा आळा बसेल. ३) कोणीहि उठावे निवडणूकीला उभे राहावे हेही कमी होइल. ४)मतदान अधिक होइल. ५) निवणुकितिल पैशाचा प्रभाव कमी होइल. ६)बर्‍यापैकी चांगल्या माणसांचा ,उमेदवार म्हणून सहभाग वाढेल. ७)कदाचित एकास एक लढती होतील. यावर चर्चा व्हावी.मिपा वर अनेक प्रकांड पंडित आहेत. म्हणून हा धागा काढला आहे. निवडणूक आयोग रि.अॅंड.डे. कीती करता माहीत नाही. नगरपालिका व महानगरपालिका मध्ये असं नेहमी घडतं कि first passing the post वाल्या उमेदवाराला जेमतेम एक सप्तमांश मत पडतात आणि तो निवडून येतो,डीपॉझिट राखायला एक षष्ठांश मत लागतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे असं मला वाटतं. जनहित याचिका यावर होउ शकते काय?

वाचने 4266
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मला व्यक्तिशः अग्रक्रम पद्धत पटत नाही. समजा, मला माझा प्रतिनिधी म्हणून "अ" हा व्यक्ती "ब" पेक्षा योग्य वाटतो. अ आणि ब मध्ये स्पर्धा झाली तर मी अ ला निवडेन. याचा अर्थ ब ही माझी दुसरी पसंती आहे असा होत नाही.

१. मतदानाच्या दोन फेर्‍या असलेली निवडणूक पद्धत वापरली तरी एकूण मतदानाची संख्या (किंवा टक्केवारी) वाढेलच याची खात्री नाही, कारण भारतात मतदान करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे व मतदान न करणे हा गुन्हा नाही. थोड्याफार फरकाने पहिल्या फेरीत मतदान केलेल्याच मतदारांनी परत मतदान केले असे होण्याची जास्त शक्यता आहे. २. गेल्या भारतीय लोकसभा निवडणूकीचा खर्च = ३६०० कोटी. म्हणजे, दर उमेदवार निवडायला दोन फेर्‍यांची गरज पडली तर हा खर्च ७२०० कोटी पर्यंत जाईल. ३. दोन फेर्‍यांमध्ये मतदान करून निवड करणे हे तंत्र जगात इतरत्रही केवळ राष्ट्रप्रमुखाच्या निवडणूकीपुरते वापरले जाते, सर्वसाधारण निवडणूकीसाठी नाही. या तंत्राने निवडून येणार्‍या राष्ट्रप्रमुखाला सर्वसाधारणपणे व्हेटोसकट बरेच एकहाती शासकिय अधिकार असतात. असे अधिकार भारतात पंतप्रधानांना नसतात, त्यामुळे हे तंत्र वापरून पंतप्रधानांची निवड झाली तरी त्यामुळे शासनात काही फरक पडेल असे नाही. तसा फरक पडायला भारतीय शासकिय (एक्झेक्युटिव्ह) व्यवस्था आमुलाग्र बदलावी लागेल... त्यासाठी घटनेत काही मूलभूत बदल करावे लागतील. हे कितपत शक्य आहे हे सांगायची गरज आहे असे नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गेल्या भारतीय लोकसभा निवडणूकीचा खर्च = ३६०० कोटी. म्हणजे, दर उमेदवार निवडायला दोन फेर्‍यांची गरज पडली तर हा खर्च ७२०० कोटी पर्यंत जाईल.
या एकाच मुद्द्याबद्दल - जर लोकांनी एकाच फेरीत त्यांचा क्र. १, २ आणि ३ (इ. इ.) चा पर्याय निवडला तर..? खर्च आणि वेळ वाचेल ना. (अग्रक्रम मतदान पद्धतीबद्दल मत राखून ठेवतोय सध्या)

बाकी काही असो, क्र. १ सोडल्यास इतर उद्दिष्टे साध्य होतील असे वाटत नाही.

अग्रक्रम पद्धत प्रथमदर्शनी तरी पटत नाही. अधिक विचार करून काही वेगळे सुचते का पाहतो. मी मागे एका प्रतिसादात मतदान प्रक्रीयेत सुधारणा सुचवल्या होत्या त्यांची या निमित्ताने आठवण झाली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ही पध्दत अवलंबणे अत्यंत गैरसोयीचे ठरेल.त्याची कारणे: १. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत किंवा राज्यसभा-विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक मतदाराला उमेदवारांना प्राधान्यक्रम द्यायचे असतात. सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम दिलेच पाहिजेत अशी सक्ती नाही. त्यामुळे बरेच उमेदवार केवळ पहिला प्राधान्यक्रम देऊन इतर सर्व उमेदवारांना कोणताच प्राधान्यक्रम न द्यायची शक्यता जास्त. तसे झाल्यास ही पध्दती निवडणुकांसाठी ठेवायच्या मूळ कारणाचाच पराभव होईल. २. अगदी प्रत्येक मतदाराने पहिले दोन प्राधान्यक्रम दिले असे गृहित धरले तरी गुंतागुंत आणखी वाढू शकते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी २-३ पेक्षा जास्त उमेदवार नसतात त्यामुळे मतदारांना आपले प्राधान्यक्रम देणे तितकेसे कठिण नाही. अनेकदा लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ४०-५० उमेदवार असतात. सध्याच्या पध्दतीत मत देताना केवळ एकदाच त्या मशीनवरील लीस्टमधून आपला उमेदवार बघावा लागतो. पण तोच प्रकार दोनदा करावा लागला तर मतदानाला वेळ किमान दुप्पट लागेल. म्हणजे मुळात जर ६०% मतदान होत असेल ते अगदी ३०% खाली नाही आले तरी ४०% तरी येईलच. तसे होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येक मतदानकेंद्रात कमी मतदार ठेऊन मतदानकेंद्रे वाढवावी लागतील. मुळात देशात ९ लाख मतदानकेंद्रे असतात. त्यापेक्षा आणखी जास्त मतदानकेंद्रे वाढविणे म्हणजे अधिक खर्च येईल. एकाच मतदाराकडून किमान दोन (कदाचित ४०-५० सुध्दा) प्राधान्यक्रमांक स्विकारण्यासाठी मतदानयंत्रांमध्ये कदाचित बदल करावे लागतील. इतर मुद्दे आठवतील तसे लिहितोच. बाकी तुम्ही लिहिलेल्या फायद्याच्या ७ मुद्द्यांपैकी गोष्टी या पध्दतीतून कशा साध्य होतील हे समजले नाही.

मतदान सोपे करता आले तर करावे , ही पद्धत तर अवघड व किचकट वाटते आहे . रच्याकने ५०-६० उमेदवार असतील मतमोजणी किती किचकट होईल अशा प्रकारे ?

एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा जनतेला लोकशाही समजावून सांगा, मतदानाचा टक्का वाढवा, आपोआप हव्या असलेल्या घटना घडू लागतील. (तर्राट -निर्मलबाबा- जोकर)

दोनंच व्यक्ति उमेदवार असतील तर ,(पूर्णांकाने)२ टक्के फरक म्हणजे ५१व४९टक्के मते पाडून ५१ टक्के वाला निवडून येऊ शकतो, ही आदर्श केस झाली ,असंच म्हणजे २ चं ऊमेदवारानी निवडणूकलढवणं नेहमी व्हायला हवं, पण ते दोनंच का , ते कोण कसे ठरवणार असे अनेक फाटे, त्यास फुटतात आणि मग ३ ते कितिही व्यक्ति निवडणूक लढवतात आणि मतांची विभागणी सुरू होते ,७ उमेदवार उभे राहिल्यास , ६ जणाना एक सप्तमांशापेक्षा किंचित कमी पडली ,व एकाला एक सप्तमाशांपेक्षा किचित जास्त पडली तरी झालेल्या मतदानाच्या जेमतेम १४,१५ टक्के मतं पडून ऊमेदवार निवडून येतो,व तो इतर राहिलेल्या ८५ टक्के लोकांचहि प्रतिनिधि त्व करतो. हा अ उमेदवार १५ टक्के हवा आहे ,पण इतर१४ , १३ ,१२ इ.टक्के लोकाना ब,किंवा क किंवा ड हवा आहे पण कोणत्याहि परीस्थीतित अ नको आहे आणि त्याचवेळा अ ला मतदान केलेल्या १५टक्के लोकाना कांहीना अ नाही निवडून येत असेल तर ब चालेल ,कांहीना क चालेल वगैरे ,या स्थितीत अ च्या गळ्यात विजयाची माळ घालणे हे खरंतर लोक शाही ला धरून नाही, जिथ अनेक उमेदवार उभे राहतात तिथं हे नेहमी घडत, १खा द्या टक्कयानं एखादा निवडून येतो, इथं प्रेफेरन्शिअल व्होटिंग ची गरज निर्माण होते,याची सोपी सुटसुटीत व्हर्जन निघू शकते

रविवारी १ नोव्हे.ला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूका आहेत २ किवा ३ ला मत मोजणी आहे, त्या निकालाला अनुसरून मी पुन्हा लिहीन