शाळेचा पहिला दिवस...
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.
एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.
काव्यरस
मिसळपाव