तू आणि मी

अशी एक फक्त कल्पना असावी. सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...! गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावी...! जसे एखाद्या पाखराची, गोड ड्रीम डेट असावी...! तू मात्र,,, आवडत्या आकाशी रंगाच्या, पोशाखात असावी...! आकाशालाही हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी...! निरोप घेतांना डोळ्यांमध्ये, अश्रूची एक झलक असावी...! डोळ्यामधले भाव जाणूनी, नाजुकशी ती मिठी असावी...! जीव ओतला तुझिया पायी, आशा तुझीही हीच असावी...! एकमेकांची साथ अशी ही, दरवेळी रम्य असावी...!

फक्त तुझ्यासाठी...! 2

तु गेलीस पण हा मावळता सुर्य पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या तेथेच स्तब्ध राहिल्या फक्त तुझ्यासाठी मनामध्ये प्राजक्तांच्या फक्त तुझ्यासाठी एकदा वादळ ही सुटले पण ते ही शांत झाले फक्त तुझ्यासाठी येत्या पावसाळ्यात आनंदाचे झरे वाहणारे फक्त तुझ्यासाठी शेवटी-शेवटी या फुलांमधील गंध ही सुगंधीत होणार फक्त तुझ्यासाठी आकाशातील तार्यांचा शितल गारवाही मंदावणार फक्त तुझ्यासाठी तो रोजचा वारा आहे पण तो रोजचा आहे पण तो तुला विसरणारा आहे फक्त तुझ्यासाठी माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!

फक्त तुझ्यासाठी...!

लेखनविषय:
काव्यरस
तुझी खुप आठवण आली तर काय करु? तुलाही माझी आठवण करुण देऊ की एकटीच तुझ्या आठवणीत झरु तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु? स्वत:शीच गप्पा मारु की अबोल राहुन मौन व्रत धरु तुला बघावस वाटलं तर काय करु? तुला शोधत राहू की स्वत:ला एकांतात नेऊ तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु? तुझा पहिला स्पर्श आठवू की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ तुझी आठवण घेऊन जाऊ की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!

तू ........

लेखनविषय:
काव्यरस
अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। तू साद दे मी ऐकतो... बघता तुला मी हरवितो... ही स्पंदने.....तुझीच आता.....।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।। शोधत होतो तुला, चारही दिशा जरी । कळले ना कधी, होते जवळी तरी ।। शब्द जेव्हा तुझे, येती कानावरी । प्रेमळ दवबिंदू जणू, बनती पानावरी ।। श्रावण सरीनीं मला भिजु दे आता । भेटल्याचा तू आनंद कळू दे जगा ।। परी समान स्पर्श तुझा जाहला मना । परीस स्पर्श ऐकून होतो मिळाला पुरावा ।। अवखळ अवखळ या भावना...। तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।

मला गरज आहे तुझी

लेखनविषय:
काव्यरस
गरज आहे मला आज त्या तुझ्या आधाराची अडखळणारे पाऊल माझे सावरणार्या तुझ्या हातांची गरज आहे मला तुझ्या त्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वत:ला सामावून टाकणार्या त्या बाहूंची गरज आहे आज मला त्या तुझ्या कोमल प्रितीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजही मला माझ्यावरच्या त्या तुझ्या नि:स्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटतांना तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे....

तू नाहीस ...

लेखनविषय:
काव्यरस
तू येणार नाहीस हे माहित असताना, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून, जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१! संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती, धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो, न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून, तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!! सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता, तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो, जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की, मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!! त्या रात्री झोप वैरी झाली होती, उघड्या डोळ्यांनी तुझ्या आठवणींच्या स्वप्नात बुडालो होतो, रात्रभर चमचमणाऱ्या तारे प

त्या एका पावसात...

लेखनविषय:
काव्यरस
ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात, अन भावनांचा बांध फुटला माझा...त्या एका पावसात... लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात, नशिबान वेगळे झालो...अशाच एका पावसात... तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात, भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा...त्या हर-एक पावसात... आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात, न बोलताही मन भिडली...त्या एका पावसात... भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात, थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला...त्या एका पावसात... ती जवळ आहे माझ्या इतकी, कि विरघळलीय ती माझ्यात, अन माझे अश्रू विरघळताना दिसताहेत मला...त्या एका पावसात....

तू...

लेखनविषय:
काव्यरस
आठवलीस तू धुसर धुसर, वेळ असे ती कातर कातर, स्मरता तुझ्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! तव नयनांचे घाव उराशी, अदा तुझी ती कातील कातील, स्तुती करावी काय सौंदर्याची, शब्द अपुरे पडतील पडतील !!२!! रूप तुझे भरपूर देखणे, त्यात लाजणे सुंदर सुंदर, तुझे हृदय जिंकण्यासाठी, हरून गेले बहु धुरंधर !!३!! पाहून तुझे लावण्य साजरे, माझी अवस्था मंतर मंतर, पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

राया...

राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी
Subscribe to प्रेम कविता