Skip to main content

एका डॉक्टरच्या कविता-४: व्यथा

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी बुधवार, 12/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा फिनेल स्पिरिटच्या वासांनी नाकाला घेराव केले वेदनेच्या आकान्तांनी कान सुद्धा बधीर झाले रो़ज रोज मरण बघून डोळे सुद्धा कोरडे झाले मित्रांचं तर जावूच द्या अश्रू सुद्धा गद्दार झाले! - अशोक
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2350
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फिनेल स्पिरिटच्या वासांनी नाकाला घेराव केले वेदनेच्या आकान्तांनी कान सुद्धा बधीर झाले वास्तववादी चित्रण. मस्त. !!

चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !! मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्‍या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

@ टारझन.... भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी? -अशोक