मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टू जी

मूखदूर्बळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज-काल मला तुझी 'करुणा' वाटायला लागली आहे... टूजीचा अमंगळ गजर आता पाठलाग करायला लागला आहे... उगाच वोट्स मागायला, कितींदा रे येतोस? डीबीच्या रीआलिटी शो मध्ये बलवा मात्र 'शहीद' होऊन जातो बोलयचं असतं मला, बरच काही नजर सांगून जाते, मिडीयासमोर येताच, का मग माझी कणी मोळी होऊन जाते? 'दया' उरली नाही उरली 'करुणा'ही नाही एअर सेलच्या हवाबंद डब्यात पुरेसा 'निधी' जमला नाही बंधू- भगीनी नकोत मला, भ्रष्टाचारात रमतो मी... म्हणूनच देशप्रेमाच्या भावना स्वस्तातच विकल्यात मी! घोटाळ्यात गुंतून जाण्याचा माझा स्वभाव नाही.. अडकलोच जरी मी सुटण्यास प्रतीबंध नाही

वाचने 962 वाचनखूण प्रतिक्रिया 1

विकास 06/06/2011 - 20:22
बंधू- भगीनी नकोत मला, भ्रष्टाचारात रमतो मी... म्हणूनच देशप्रेमाच्या भावना स्वस्तातच विकल्यात मी! :(