Skip to main content

पाककृती

बंगाली (बेगानी) शादीमे "खुर्शीद" दिवाना

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 11/08/2024 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
बांगलादेशातील "बंधूनी" बांगला बंधू चा पुतळा पडून जो उन्माद चालवला आहे , देशाचं पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांचे ( ते सुद्धा स्त्री चे) अंत्वस्त्र फडकवणे ( बंगाल संस्कृतीचे हे घृणास्पद दृश्य ) असे "चाळे " केले ते बघून काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली ..

जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!

लेखक कांदा लिंबू यांनी शनिवार, 30/03/2024 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स! तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं. दरवर्षी ३० मार्च रोजी जागतिक इडली दिन साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला. तांदूळ आणि उडीदडाळ यांची इडली पचायला हलकी असते. इडलीसोबत शेंगदाणे, दाळवं यांची चटणी ही तेलंगणात लोकप्रिय आहे. आंध्रातही तेच. तामिळनाडूत मात्र इडलीसोबत खोबऱ्याची चटणी हवी.

गुलाबी फेसाळते

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 25/05/2021 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
0 गुलाबी फेसाळते .. आता बबली रोज वाईन का म्हणून विचारू नका पुढे वाचा तर यु ट्यूब कर भाटूपा यांतीळ बबु ( भाडीपा चा अनघोळ ना करणारा दाढी वाला आणि पौला वाहिनी दाखवल्याप्रमाणे हे पेय बनवले आहे ) साहित्य : रोज सिरप , व्हॅनिला आईस्क्रीम / सोडा कृती: १ ) वाईन ग्लास किंवा ब्रँडी च्या गॉब्लेट अथवा कोणत्याही गोलाकार पेल्यात १ ती स्पून रोज सिरप घालावे आणि गोल गोल फिरवून ते चित्रतात दाखवल्याप्रमाणे पसरावे .. २) आईस्क्रीम चा गोळा अलगद सोडावा ३) सोडा ( जरा बदाबदा ) ओतावा ...

आज बेत काय करावा?

लेखक निनाद यांनी शनिवार, 10/10/2020 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
रोज जेवणाचा बेत काय करावा हा प्रश्न रोजच्या रोज आ वासून समोर उभा असतो. खिचडी, पिठले आणि बटाट्याची भाजी असे तेच ते खाऊनही कंटाळा येतो. अनेकदा फक्त वेगळे काहीतरी हवे असते जे आपण बर्‍याच दिवसात केलेले नसते. पण ते नवीन सहज सुचतही नाही. पण कुणीतरी सुचवले तर मात्र नवीन गोष्टी करायला उत्साह येतो. म्हणून अशा जेवणाच्या बेतासाठी हा धागा आहे. आता यात पिझ्झा मागवला. आज आम्लेट पाव ते आज जेवायला वरणभात, शेपुची भाजी आणि पोळी असे ही असू शकते. अनेकदा वरणभातासारख्या पदार्थात अनेक वेगळे प्रकार असतात. जसे कुकरचा वरण भात वेगळा लागतो तर भाताचे पाणी काढून केलेला फडफडीत भात वेगळा लागतो.