Skip to main content

gajhal

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 21/02/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस पुरणारे अत्तर असते प्रेम तसे मग बाकी खडतर असते सुटकेचा आयास निरर्थक असतो कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते आपण अपुली सांभाळावी दुनिया सूख जरासे दु:ख निरंतर असते आकाशाला हातच पोचत नाही नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते प्रश्न तुला मी तोच कितीदा केला तुझे आपले एकच उत्तर असते कुठून कोठेतरी जायचे नुसते.. प्रेम शेवटी एक अधांतर असते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

काटा

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 01/01/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
Rose Gif GIFs - Find & Share - Love You Swthrt सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा न उगवताच कशी मावळते चांदणी किनार्यास न भेटताच परततात लाटा सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही फ
काव्यरस

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 23/12/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
चार शब्दांचा सहारा होत नाही तेवढ्यावरती गुजारा होत नाही खूप काही लागते जगण्यास येथे प्रेम काही ऊनवारा होत नाही गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण चांदतार्यांचा नजारा होत नाही जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन रोज आताशा इशारा होत नाही टाळले मजला बरे केलेस तूही (दु:ख दु:खावर उतारा होत नाही) मी मनाला शिस्त आहे लावलेली फारसा आता पसारा होत नाही डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

<<< आवडून घेतलेलं काही... >>>

लेखक प्यारे१ यांनी रविवार, 18/10/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/33278 हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती >>> सजदे में आज भी झुकते है सर बस, मौला बदल गया देखो... आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं. >>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे.... आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो (हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी) >>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता.... आहे वैताग भरपूर आयुष्या

प्रतिसाद, वाद वगैरे....

लेखक दमामि यांनी मंगळवार, 06/10/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका… अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ? कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ? नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का? सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का? डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे.
काव्यरस

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 16/07/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस