मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नको वाटतो ना? असा पावसाळा!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा नको वाटतो ना? असा पावसाळा! नभी दाटल्या आसवांचा उमाळा सुन्या जीवनाचाच हा ठोकताळा! असे वाटते पावसाचे बरसणे जुन्या आठवांना नव्याने उगाळा! कितीही दुरुस्त्या करा लाख वेळा झिरपतो मनाच्या तळाचाच गाळा! कधीही कुठेही कसाही बरसतो रुजावा कसा अन् कुठे मग जिव्हाळा? —सत्यजित

वाचन 5535 वाचनखूण प्रतिक्रिया 6