Skip to main content

भयानक

(टोळभैरवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 07/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही
काव्यरस

पंचाक्षरी आकांत

लेखक शरदिनी यांनी रविवार, 04/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
करालदाढा पुलकित पेढा चतुरचर्‍हाटी चंचलमूढा गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी सर्जनदर्जन भजनगुंजनी का सृष्टीच्या भग्नमंथनी तगमग लगबग मूढचिंतनी तिरकस हलकट कृद्धधरित्री गडणी सजणी गडणीसजणी नयनवल्लरी सहजचिल्लरी पुनःपुन्हा ती उडनतश्तरी लखलख चकमक मंददर्शनी कांता करी आकांत आननी शरणमंजिरी विदुरप्रस्तरी धृष्टद्युम्नी चरितविलासी ललाटज्वलिता दारूणपलिता शिशिरवंचना टाहो फुटता पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन
काव्यरस

(टुर्र)

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 01/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले.
काव्यरस

(( ती - सहा ओळीत ))

लेखक दशानन यांनी मंगळवार, 25/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा
मी आल्यावर तु पळतो का रे? वासाने व्याकूळ होउन सांग तू गुदमरतो का रे ? टनांने वाढला देह काय करावे. वजन कसे घटवावे कुणास पुसावे मी पडल्यावर उचलशील कसा रे ?

(सारे कसे सुने सुने वाटते)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 25/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सारे कसे सुने सुने वाटते तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु || प्रतिसाद येता, अन वाढता वाचने कुरघोडी लेखन बहरतसे || १ || नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन बोल खरडीत माझ्या गूंजते || २ || खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||
काव्यरस

(सहज चोळले..)

लेखक ज्ञानेश... यांनी मंगळवार, 18/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले" -------------------------------- सहज चोळले मी पाठीला जाता जाता क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :( किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही, मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =(( मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|: लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले.. कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B 'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता..
काव्यरस

विझलेला विद्वंश

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
विझलेल्या निखार्‍यात्...अर्धविजली आग गाभुळलेल्या वटवाघळाला....अवचित येते जाग राखेतून निसटता.... फिनिक्स शिथील होतो लोंबकळतानाच गतप्राण पादत्राण होतो.
काव्यरस

तेच तेच परत परत

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 06/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या.. ------------- काम माझ करत करत मी घासतो मरत मरत वर्षे जाती सरत सरत तेच तेच परत परत
काव्यरस

(कट्ट्यानंतरचे कवित्व)

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 30/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... लालभडक मिसळीने केली आतड्यांची विकल चिरफाड मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी तासभर 'बसून' काढले भरताड घामाघूम शरीर ओथंबली मने धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म म्हणायलाच सपत्नीक तिच्या शिव्या अगणित पँक पूंक फुर्र ढूम :)

एक उसासा.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 29/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिजिनल विडम्बन : पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?
काव्यरस