उजळलेला लेख आणि प्रतिसाद डागाळलेले
खाज मला लिहायचीच, असे जरी ते ढापलेले !
बघ पोसतो अहंकार...., वैचारीक दीवाळखोरीने
पिसा अवतार माझा, मी विचार ठोकलेले !
कसे धागे दोन ओळीचे, हलकेच खाली बुडाले
साम्राज्य हे कंपुबाजांचे, अन शेरे मातलेले !
उदासवाणे सख्या गाणे, गातो नव्या आयडीचे
सर्व्हर बापुडा केविलवाणा, संपादक कळवळलेले !
असेच दळेन धागे या इथे , पिळेन लोकां आनंदाने
व्याकरणाचे नियम पाठ, मी कधीचे उधळलेले !
न चुकता येई खाज मला , धागा पुढे नेण्याची
सहमत सहमत होत जाई , मीच माझे लिहिलेले