मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भयानक

आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -

शशिकांत ओक ·
मित्रहो, विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा. त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे.

बुधवारची कविता: (दु:ख)

llपुण्याचे पेशवेll ·
स्वतःचे प्रतिसाद उडू नयेत म्हणून प्रयत्न करतात सदस्य माजू नये म्हणून कात्री लावतात तरीही जमले ना की त्यावर बा*वला भां** करतात संमालक माणसे पण इथे कंपूं सुख मिळू देत नाही अथवा उडलेल्या पोस्टमागे त्याना होत नाही दु:ख इथेच सगळी गोची आहे. क्रिप्टीकने पछाडलेले सदस्य चवचालपणा करणारी तरुण पोरे मिभोबळी,पाध्येबळी, डबलबॅरलबळी होणारे गटणे विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे हे सगळे जेव्हा बोर्डावर येत तेव्हा संपादित झालेले असते धुतलेले, बडवलेले, फाट्यावर मारलेले असते जळवणारे असते कोण म्हणे- कंपू वाईट नसतात, संपादकही चलाख असतात

जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

शरदिनी ·
ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला, वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा, ड्रोन ड्रोन ड्रोन प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी वादळवारे प्रतीक कॅत्रिना घोरी महमद कैफ वासना दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम लाटावाटा कोमल भाटा महापुरातील लव्हाळत्राता लायटर फ़ायटर रुधिरवंचिता मेजर्मायनर धेनुवल्लभा विहिरीतेली बॆरलबॆरल वजिरीस्तानी क्वीन घायल ड्रोन ड्रोन ड्रोन

बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव

कानडाऊ योगेशु ·
डरकाळ्या : - बायको ही बायको असते.. एरवी नॉर्मल असली तरी..तुमच्यासाठी सायको असते.. :T साडीचोळी साठी तिची सारखि धावाधाव असते.. तुमच्या तुंटपुंज्या बॅंकबॅलन्समधला.. बायको शिरकाव असते.. ~X( घरामध्ये नववधुसारखी.. ओलांडुनी ती माप येते.. आयुष्यभर पुढे मग.. तुमचेच माप काढत बसते..

<पचन>

विजुभाऊ ·
डीस्क्लेमर : नाही प्रेरणांचा तोटा जमेल तैसा हाणा गोटा पचन तू आणि तुझं पचन.... डीम-लॅम्पच्या प्रकाशात.. हॉटेलच्या जगात गाववर भटकणारा तू... एका हाताला वाफा येत असलेलं जेवण....

<खाज...!>

विजुभाऊ ·
उजळलेला लेख आणि प्रतिसाद डागाळलेले खाज मला लिहायचीच, असे जरी ते ढापलेले ! बघ पोसतो अहंकार...., वैचारीक दीवाळखोरीने पिसा अवतार माझा, मी विचार ठोकलेले ! कसे धागे दोन ओळीचे, हलकेच खाली बुडाले साम्राज्य हे कंपुबाजांचे, अन शेरे मातलेले ! उदासवाणे सख्या गाणे, गातो नव्या आयडीचे सर्व्हर बापुडा केविलवाणा, संपादक कळवळलेले ! असेच दळेन धागे या इथे , पिळेन लोकां आनंदाने व्याकरणाचे नियम पाठ, मी कधीचे उधळलेले ! न चुकता येई खाज मला , धागा पुढे नेण्याची सहमत सहमत होत जाई , मीच माझे लिहिलेले

अमावस्या..

प्राजु ·
काळोख भयाण किरकिर रानात रंगला आगळा खेळ चंद्राला शोधून चांदण्या थकल्या आलीया आवसेची वेळ सळसळ दाटली झाडांच्या पानांत वाराही बेभान झाला घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत गारवा भरून गेला चुरचुरं पाऊल रानांत चाहूल रातीचा नूर हा न्यारा भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी काळोख जागवी सारा चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं पहाट मंगल झाली दिसेल चांदवा आजच्या रातीला अवनी निवांत झाली - प्राजु