Skip to main content

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 30/03/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती ,नजरेत कुणा विरक्ती , नजरेत कुणा धोका,नजरेत कुणा मोका, नजरेत कुणा वासना,नजरेत कुणा कामना, नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती. नजरेत कुणा संस्कार,नजरेत कुणा दुत्कार, नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत कुणा लगट ,नजरेत प्रेम प्रगट , नजरेत कुणा व्यथा,नजरेत कुणा कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान.
काव्यरस

वना चे श्लोक

लेखक राजा सोव्नी यांनी गुरुवार, 28/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
।। सदा सर्वदा वनी विचरावे ।। ।। वना जोपासण्या सदा सिद्ध व्हावे ।। ।। वना राखण्या संकल्प जीवी ।।।। ।।वना तोडण्या संकल्प सोडूनी द्यावा ।। ।।वनी वृक्ष वल्ली सदा वाढू द्याव्या ।। ।।मनी वृक्ष वल्ली सदा पुज्य व्हाव्या ।। ।।वनी वनचरे सदा वाढू द्यावी ।। ।।मनी वनचरे सदा आदरावी ।। ।।तना जाळण्या वृक्ष तोडू नकोरे ।। ।।तना जाणण्या देह दान करारे ।। ।।वना सारखा मित्र कोणीही नाही ।। ।। वना वाचुनी दुखः ठाई ठ
काव्यरस

बटाटा

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 20/03/2013 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा उरतो केवळ मी बटाटा उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी सान-थोर सर्वांस भावतो मी गाव-शहर असो पाऊल-वाटा सर्वत्र दिसतो मी बटाटा पार्टी असो वा उपास करती जन माझा तपास गोड अथवा तिखट कुरकुरीत वा चिवट परिस्थिती असो बिकट असतो मी सदैव निकट असा मी बटाटा
काव्यरस

" यु आर लेट .. यु फुल !

लेखक जेनी... यांनी बुधवार, 06/03/2013 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्‍यावर ? :( कितीतरीच उशिर केलास :-/ कितीवेळ एकटीच उभी होते . तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :( एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं . मनाशिच म्हटलं यु आर लेट.. यु फुल !

देहाला चोळुन घेता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 27/01/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
देहाला चोळुन घेता राखेने उदी बनावे धुवून सारी पापे स्वर्गात स्थानही द्यावे घाबर्‍या कोडग्या मनाते दुजे न काही रुचते भस्माच्या पट्टी मागे ते तोंड लपवुनी बसते (कुण्या भाग्यवंताचा) हा तुटता लटका आधार आत्मरुप दिसे भेसुर गलीतगात्र मग होई नरपुंगव तो लाचार, मग तुटती तटतट पाश मनी पडतो स्वच्छ प्रकाश त्या अनंत धेय्या साठी सुरु अंतहीन प्रवास
काव्यरस

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)