Skip to main content

अभय-काव्य

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

हायकूचा पहिला प्रयत्न !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 23/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
एक पक्षी अंधारात बरसणाऱ्या जलधारात घरट्यात एकटाच . . . . झाडावरचं एक फूल उमलून कोमेजलेलं झाडाच्याच पायाशी ...... पाहतो शून्यात मी आजकाल नेहमी विश्व निर्मिती तिथूनच ! जुळवले शब्द काही अर्थ उमगलाच नाही तरीही अर्थपूर्ण !

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

परीक्षा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 09/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास

अण्णारती- विरहखंड भाग १

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
येई हो अण्णा रे माझे माऊली ये । कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।। आलिया गेलिया कोणी धाडी निरोप । कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।। काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला । घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।। अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी । अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

तुझ्या अंतरीची (चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 06/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद

सावरकरांचे मनोगत

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 10/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा, मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा, घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून, मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !! प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला, मी किंचित केले भार कमी खांद्याला, नसता हे जीवन व्यर्थ मानले असते, तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!
काव्यरस

ये तू मैदानात : शेतकरी गीत

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात

दृष्टीकोन

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 18/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य सोपं असत.. तुझ्यासाठी अवघड का करू? मला नाही बदलायच; तुझ्याकडून अपेक्षा का ठेऊ? तो तसा... ही अशी... तक्रारीचा सुर नको... आपल मत आपल्यापाशी... त्याची कुठे चर्चा नको! सर्वांचच् आयुष्य सुंदर असत... प्रत्येकजण आपल्यापुरत जगत असत; एकमेकांशिवाय अडत नसत.. म्हणूनच.. अध्यात-मध्यात पडायच नसत!!!
काव्यरस