मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अटक मटक, सारण चटक!

सविता००१ ·
H अटक मटक, सारण चटक! दोस्तहो, दिवाळीतलं गोग्गोड खाताना मध्येच काही चटकदार हवं असं वाटतंय ना? मग आता मी देतेय दोन पाककृती. आता दिवाळी म्हटलं की कॅलरी, व्यायाम, वजन असले शब्द ऐकले की पापच लागणार बरं का. त्यामुळे या पाककृती दिवाळी पेश्शल आहेत. (म्हणजे थोडक्यात तळलेल्या आहेत) नाहीतरी सध्या तेला-तुपाच्या कढया असतीलच ओट्यावर. तर पहा करून. एक आहे चीझी मिरची वडा आणि दुसरी चीझी मॅट/लहरिया सामोसा. यात पाककृती दोन असल्या, तरीही मी सारण मात्र एकच वापरलं आहे.

नूतन सावंत 06/11/2018 - 11:08
त्या भरलेल्या मिरच्या कसल्या किलर दिसताहेत.व्हेज निर्चीवड झकास आहे,प। मला समोसा आवडला.थफी मूग डाळ किंवा मोडवलेले मूग घातले तर वनमील डिश मबानू ही वापरता येईल.

मस्त मस्त दिसत आहेत ग दोन्ही.. दिवाळी फराळ करता करता उघडला धागा तरी तों पा सु :) स्वाती

अभ्या.. 06/11/2018 - 17:27
दोन्ही भारी आहेत. आंध्रा भजीचं व्हॅल्यु अ‍ॅडिशन आवडलं. मॅट समोशाचं टेक्शचर अप्रतिम. . प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी छानच.

रुपी 09/11/2018 - 04:28
मस्तच! दोन्ही प्रकार जबरदस्त आहेत. मिरची वडा मी पारंपरिक पद्धतीचा करुन पाहिलाय. पण हे समोसे अगदीच नाविन्यपूर्ण दिसत आहेत! असेच सारण भरुन बनवलेला कटोरी चाट सारखा प्रकार मी एकदा खाल्ला होता आणि खूप आवडला होता, त्यामुळे हे समोसेही मस्तच लागत असणार. :)

अनिंद्य 09/11/2018 - 13:01
@ सविता००१ , मिरचीबड्यांबद्दल थोडा प्युरिस्ट आहे म्हणून हे सारण वापरणार नाही कदाचित, पण लहरीया समोसामध्ये एकदम धावेल ! म्हणून मी समोसा गटात :-) मॅट व्हिव समोसा - सारण आणि डिझाईन दोन्ही नाविन्यपूर्ण आहे.  हे गिफ्ट माझ्याकडून !

जुइ 10/11/2018 - 23:24
अफलातून पाकृ आहेत दोन्हीही. सामोसे खायला तुझ्याकडेच यावे लागेल. फोटोही खासचं!

आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे - प्रवासवर्णन

निशाचर ·
H आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे

"आम्हा दोघांची गावं बाजूबाजूच्या दोन खोर्‍यांत आहेत, मधून डोंगररांग जाते. इकडून तिकडे जायचं असेल तर हिवाळ्यात बरं पडतं. केबल कारने डोंगर चढायचा आणि स्की करून उतरायचा. उन्हाळ्यात रस्त्याने जायचं म्हणजे वैताग येतो, कारण बराच वळसा पडतो." नवर्‍याचा ऑस्ट्रियन सहकारी सांगत होता. ही होती माझी ऑस्ट्रियाशी अनेक वर्षांपूर्वी झालेली ओळख. एक देश म्हणून ऑस्ट्रियाबद्दल थोडीफार माहिती होती.

मस्त झालेली दिसतेय भटकंती आणि सगळे फोटोपण छान. एखादा देश नीट पहायचा असेल तर तिकडे जाउन राहणे हाच मस्त पर्याय आहे. ८-१० दिवसात धावपळ करत नुसता भोज्जा करुन येणे काही खरे नाही. पण सर्वानाच ती संधी मिळत नाही. तुम्हाला ती मिळाली आणि ती तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

निशाचर 11/11/2018 - 02:35
एखादा देश नीट पहायचा असेल तर तिकडे जाउन राहणे हाच मस्त पर्याय आहे.
खरं आहे. मीही ऑस्ट्रियाला राहत नाही, पण युरोपात असल्याने सहलीसाठी जाणं सहज शक्य होतं. शिवाय स्वित्झर्लंडएवढी महागाई किंवा पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे आल्प्समध्ये ट्रेकिंगसाठी ऑस्ट्रिया माझा आवडता देश आहे.

अनिंद्य 07/11/2018 - 12:57
@ निशाचर, ग्रोसग्लोक्नर ! क्या बात ! केबलकारचा सुखासीन पर्याय डावलून ट्रेक करण्यासाठी निग्रह, फिटनेस आणि थोडा अवखळपणा लागतो. तुम्ही ते जमवता त्याचे कौतुक वाटते. कभी मेरी तलब कच्चे घड़े पर पार उतरती है कभी महफ़ूज़ कश्ती में सफ़र करने से डरता हूँ लेख आवडला.

जुइ 17/11/2018 - 01:12
आल्प्सचे रसभरीत वर्णन कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नवीन भासते. तुम्ही अगदी ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे. फोटोही अगदी अप्रतिम आहेत.

प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास

शैलेन्द्र ·
H प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास इसवी सन २०१८ची सुरुवात महाराष्ट्रात एका दंगलीने झाली. भीमा कोरेगावला असलेल्या विजयस्तंभाला २०० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात वाद उसळले आणि अर्थातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्याआधीच्या रात्री शनिवारवाड्यासमोर एल्गार परिषद भरली होती. ह्या परिषदेतील भाषणांवर आक्षेप घेणारी तक्रार अक्षय बिक्कड आणि तुषार दामगुडे ह्या दोन तरुणांनी पोलीस ठाण्यात केली होती.

माध्यमांच्या वाटचालीचा सुंदर आढावा ! लोकमत बनविण्यासाठी (आणि लोकांना बनविण्यासाठीही) राजकिय पक्षांनी चालवलेल्या माध्यममोहिमांचेही महत्व काही कमी नाही! :)

तीन वर्षांपूर्वी फेसबुक बँड केलं. ट्विटर वर वाचन मात्र होतो, ते सहा महिने झाले बंद केलंय. बाकी सध्या चलती असलेल्या इतर सोशल प्लॅटफॉर्मवर कधीच नव्हतो. व्हाट्सएपचा उपयोग फक्त आणि फक्त कामापुरता होतो. मोजून 3 ग्रुप मध्ये आहे. आता तर कोणी मला ऍड पण नाही करत. :) बातम्यांसाठी लोकसत्ता, abpमाझा, ndtv वाचतो. पाहत काहीच नाही. (ही नावे थोडी डावीकडे झुकलेली वाटतील. हिंदुत्ववादी विचारांचं, भाजप आणि तत्सम विचारसरणीच्या पक्ष/संघटनांचं आजकाल मला अजीर्ण झालंय. पाच वर्षांपूर्वी मीसुद्धा कट्टर काँग्रेसविरोधी अन भाजप समर्थक होतो, आता थोडा मध्यावर आलोय.) काही वर्षांपूर्वी cnbc आवाज आवर्जून पाहायचो, 2014 पासून तो नकोसा वाटतो. प्रसन्न जोशी आधी रॅशनल वाटायचा, आता तो अर्णब/वागळेंसारखा आक्रस्ताळेपणा करताना दिसतो. अनंत भावे, प्रदीप भिडे यांचे तटस्थ वृत्तनिवेदन आठवते. बाकी अग्रलेख हे संपादकांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच अजेंडा राबवण्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांच्या काळापासून वापरले जातात. फक्त अजेंडा बदलत आलाय. आपले विचार बातम्या व सोशल माध्यमांमुळे एकतर्फी व अंध होऊ नयेत , ही आज सर्वात मोठी गरज आहे.

यशोधरा 07/11/2018 - 09:19
उत्तम लेख. आणि माझ्या घरातील वर्तमानपत्र कित्येकदा घडीही उघडली न जाता तसंच रद्दीत जातं. >> अगदी. वर्तमानपत्र आणि त्यांतील बातम्या आता पक्षपाती होत चालल्या आहेत, त्यामुळे कोणतेच लेख आता निर्भीड नसतात, हे सुद्धा त्यामागचे एक कारण असू शकेल काय?

२०१७ मध्ये, लोकसत्तेत (हो, अद्याप ही मी "लोकसत्ता" वाचतो.काही सदरे उत्तम माहिती देतात.), दर सोमवारी "प्रपोगांडा" ह्या नवाने, रवि आमले, सदर लिहित असत. त्या लेखांची आठवण झाली.... जय गोबेल्स, जय कौटिल्य आणि जय कन्फूशियस....

In reply to by तुषार काळभोर

१. रुपर्ट मुरडॉक आणि २. एकता कपूर एकाने माणसाच्या हातात रिमोट दिला, तर दुसरी मालिका काढत बसली आहे. =========== मालिका बघणार्‍या माणसांचे हळूहळू, ३ माकडात रुपांतर होते. डोळे असून, पुस्तके वाचणार नाहीत. कान असून, विचारवंतांची भाषणे ऐकायला जाणार नाहीत. आणि तोंड असूनही, अनावश्यक रूढी आणि परंपरा बदलायच्या बाबतीत, आवाज उठवणार नाहीत. आणि ह्या तिन्ही गोष्टींनी पकड घेतली की, मग मेंदू नावाचा एक प्रकार आपल्या शरीरात आहे, हे पण विसरून जातात.मग जय व्हॉट्स अप आणि जय फेसबूक.... ========== माझ्या मते तरी, व्हॉटस अप आणि फेसबूक, ही माहितीची तीर्थस्थळे नाहीत. ========== गूगल आणि विकिपेडिया ह्या ज्ञानाच्या गंगा-यमुना आणि सारासार विचारबूद्धी ही सरस्वती.

मित्रहो 07/11/2018 - 21:00
प्रसारमाध्यमांच्या बदलांच्या प्रवासाचा आढावा घेणारा लेख आवडला. माझा वैयक्तीक प्रवास तरुण भारत (नागपूर) आणि लोकमत, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडीया ते द हिंदू असा झाला. दूरदर्शन, NDTV, CNN-IBN असा दूरचित्रवाणीच्या बाबतीत झाला. आता मात्र खरच कंटाळा येतो. चार चार दिवस वृत्तपत्र वाचावेसे वाटत नाही. अग्रलेख वगैरै प्रकरणे नकोशी होतात. कोणी त्यांचा एजंडा आमच्यावर का लादवा. समाज माध्यमे तर अगदी नकोशी झालीत. व्हॉटसअॅप फॉरवर्ड वाचत नाही. हल्ली असे वाटते की पूर्वी या राजकीय चर्चा गदारोळ फक्त वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर चालत होते तेच बरे होते. आता ते व्हॉटसअॅप, फेसबुृक यावर चालतात याचा कंटाळा आला. एक मात्र कळून चुकले माध्यम कोणतेही असू द्या समोरचा तितकेच सत्य दाखवितो जे त्याला दाखवायचे असते. समाज माध्यमात तर बऱ्य़ाचदा धरधाकट खोट सांगितले जाते.

गामा पैलवान 08/11/2018 - 19:06
शैलेन्द्र, रंजक आढावा घेतला आहे. 'मी वर्तमानपत्राचा ग्राहक असल्याने बातमीचा कंटेंट शुद्ध आणि खरा असणं हा माझा हक्क आहे.' या वाक्यावरून 'We are not in the business of telling truth' (कर्ता अज्ञात) हे आठवलं. साहजिकच वृत्तपत्रे हा उद्योग झाला आहे. उद्योगाची गणितं पैशात होतात. सत्य गेलं तेल लावंत. आ.न., -गा.पै.

अनिंद्य 11/11/2018 - 14:04
@ शैलेन्द्र, समाजमाध्यमांचा धावता आढावा घेणारा लेख आवडला. दर्जाची घसरण आहे, विचारांची कर्कश्यता माध्यमात वाढत आहे. पण अंधार नाही. काही काजवे प्रकाशमान आहेत हे चित्र आश्वासक.

सौन्दर्य 12/11/2018 - 09:02
लेख आवडला, चांगलाच माहितीपूर्ण वाटला. कधी कधी वाटतं की whatsapp च्या मागे देखील एखादा करविता असावा. अजूनही मटा on लाईन वाचतो, आक्रस्ताळी टीव्हीवरच्या बातम्या पाहतच नाही.

सुंदर माहितीपूर्ण लेख. माझ्या घरातील वर्तमानपत्र कित्येकदा घडीही उघडली न जाता तसंच रद्दीत जातं. कित्येक घरांतून तर छापील वर्तमानपत्रांची पूर्ण गच्छंती झाली आहे. यामागे, जेवढा संगणकीय माध्यमांचा हात आहे, तेवढाच (किंवा कांकणभर जास्तच) खुद्द वर्तमानपत्रांच्या सतत घसरत असलेल्या विश्वासार्हतेचा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 29/11/2018 - 12:25
मी त्यातला एक आहे.. मी आधी लोकसत्ता, मग मटा , मग सकाळ आणि आता काहीही नको म्हणून पूर्ण वर्तमानपत्र बंद च करून टाकलंय. सध्या कायप्पा वरून पण सुट्टी, फक्त महत्वाचे ग्रुप चालू आहेत. चेपू वर झी त्रागा वाचायला आवर्जून जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 29/11/2018 - 12:29
यामागे, जेवढा संगणकीय माध्यमांचा हात आहे, तेवढाच (किंवा कांकणभर जास्तच) खुद्द वर्तमानपत्रांच्या सतत घसरत असलेल्या विश्वासार्हतेचा आहे. बाडीस एके काली श्री गिरीश कुबेर हे माझे आवडते होते. पण आता ते वाचवत नाहीत इतके एकांगी, द्वेषपूर्ण आणि भंपक लिहितात.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 29/11/2018 - 19:41
खरे डॉक्टर, गिरीश कुबेरांच्या बाबतीत माझीही तुमच्यासारखीच परिस्थिती आहे. भारतातली इंग्रजी पत्रकारिता सुमार दर्जाची (mediocre) आहे. अशा क्षेत्रात अनेक दशके राहूनही कुबेरांनी आपली प्रत सांभाळली होती. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटंत असे. लोकसत्तेची सूत्रं हाती घेतल्यावर हे वर्तमानपत्र लखलखीतरीत्या चमकणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नव्हता. मात्र प्रत्यक्षात नेमकं उलटं घडलं. गिकु स्वत:च सुमार दर्जाचं लिहू लागले. :-( आ.न., -गा.पै.

मराठी_माणूस 29/11/2018 - 13:30
मला वर्तमान पत्र हे टीव्ही पेक्षा जास्त आवडते. टीव्ही वरची वृत्तनिवेदकाची बातम्या वरची मल्लीनाथी, उथळपणा, पुर्वगृहदुषीत असणे खुपते , त्या मानानी वर्तमान पत्रातील(सर्व नव्हे) बातम्यातील मांडणी संयमीत वाटते.

सुंदर आढावा. पुर्वी महाराष्ट्र टाईम्स्/लोकसत्तामधील बातम्या अगदी प्रमाण मानल्या जायच्या. पत्रकारांचा वैचारिक कल समजायचा पण सर्वच जण भान ठेऊन लिहित. उ.दा. गोविंदराव तळवलकर..हे डाव्या, थोडे कॉन्ग्रेसी विचारांचे पण म्हणून त्यानी उघडपणे कधी काँग्रेसचे समर्थन केले असे झाले नाही. समाज माध्यमे आली, कोणीही काहीही लिहु शकतो.. हे झाल्यावर सगळे बदलले."साभार परत" आता ईतिहास झाला.

कंजूस 30/11/2018 - 06:29
आपल्या मराठी संस्थळांबद्दल बोलायचं तर यामध्ये एक मोठा बदल हवा आहे. संस्थळं ड्रुपल या रेडी टेम्प्लेटाचा उपयोग करतात. यावर लिहिण्यासाठी वाचकांना सभासदत्व घ्यावे लागते. फक्त वाचनमात्र लोकांसाठी कुणा एका लेखकाचं लेखन आवडलं तर ते शोधता येत नाही हा मोठा दोष आहे. त्या लेखकाचा लेख जेव्हा अनुक्रमणिकेत दिसेल तेव्हाच वाचता येतो. "यांचे लेखन" च्या लिंकमध्ये युजर नंबर असतो तो बाहेरच्या वाचकांस मिळू शकत नाही. त्या ठिकाणी आइडीनाव कॅापीपेस्ट करून टाकल्यावरही लिंक चालायला हवी.

In reply to by कंजूस

याविषयी तीव्र सहमती. सामान्य वापरकर्त्याच्या दृष्टीने आणखी सुलभीकरण व्हायला हवं. आता महाराष्ट्रात दोन कोटी मराठी मातृभाषा-प्रथमभाषा असलेले लोक नियमित इंटरनेट वापरात असतील. पण त्यांचा सहभाग फेसबुकवर फोटो टाकणे आणि व्हाट्सअप्प फॉरवर्ड करणे एव्हढाच मर्यादित आहे. त्यातील किमान चार-पाच टक्के दहा बारा लाख लोक संस्थळांवर हवेत. सध्या जगभरात मिळून काही हजार लोक मिपा, माबो सारख्या संस्थळांवर असतील. त्यातील काही शे फक्त सक्रीय! अगदी वृत्तपत्र-वृत्तवाहिन्यांच्या संस्थळांवरसुद्धा दोन-तीन लाखांच्या पुढे हजेरी नसेल.

जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे

गुल्लू दादा ·
H जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे ऑगस्ट १९०६. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑयस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली, तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचे काही एक कारण नव्हते. ज्या घरात ती आजारी होती, ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिले जात असे.

बाकी नवनवे रोग (एड्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, झिका, इ) जे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते आणि मागील काही वर्षांत दशकात जगभरात पसरले, ते मानवनिर्मितच असणार असा संशय मला नेहमीच येतो.

छान, आवडले. अनेक, अनेक धन्यवाद. हेपेटायटीस बी बद्दल पण तो मानवनिर्मित असावा असा मला संशय येतो. याची लस दहाबारा वर्षापूर्वी मुंबईच्या बाजारात आली होती. कसलेच वैद्यकीय ज्ञान नसलेला कुणीही माणूस, माजी नगरसेवकापासून कुणीही सोम्यागोम्या या लसीची जाहिरात करीत असे. प्रतिकारशक्ती किती काळ टिकते यावर थातुरमातुर उत्तरे मिळत. जाणकार यावर प्रकाश टाकू शकतील. चित्रवाणी वाहिनीवर - बहुधा डिस्कव्हरी वा हिस्टरी - एक तासाचा चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 12/11/2018 - 18:29
हेपेटायटीस बी बद्दलची माहिती खाली जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकात मिळेल http://www.searo.who.int/india/mediacentre/events/2016/hepatitisb_birth_dose_vaccination_in_india.pdf याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साधारण २०११ मध्ये सरकरने याच्या जाहिराती सार्वजनिक न्यासांवर करायला सुरुवात केली होती. याचे तीन डोस घेतल्यास त्याच्याविरुद्ध निर्माण होणारी प्रतिकारशक्ती सध्यातरी कमीतकमी ३० वर्षे टिकते असे आढळून आले आहे जशी अजून वर्षे जातील तशी माहिती उपलब्ध होत राहील. विषाणूजन्य आजार असल्याने इतर विषाणूजन्य आजारांसारखी (उदा पोलियो) कदाचित आयुष्यभर टिकत असावी. https://www.cdc.gov/hepatitis/hbv/hbvfaq.htm

रोचक विषयावरील रोचक लेख. जैविक अस्त्रे ही संज्ञा जरी नवीन असली तरी, त्यांचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. मूळ अमेरिकन (रेड इंडियन) जमाती इतर जगापासून अनेक सहस्त्र वर्षे वेगळे झालेल्या असल्यामुळे, त्यांच्यात युरोपियन लोकांत सामान्यपणे असलेले रोग नव्हते व अर्थातच त्या रोगांविरुद्धची रोगप्रतिकारक शक्तीही निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे, युरोपियन वसाहतवाद्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या रोगांना मूळ अमेरिकन सहज बळी पडत असत. ही गोष्ट ध्यानात आल्यावर, चलाख वसाहतवाद्यांनी जीवघेण्या रोगांच्या साथी पसरवून अनेक मूळ अमेरिकन जमाती नामशेष केल्या. पारंपारिक शस्त्रे वापरून केलेल्या युद्धापेक्षा हा प्रकार, वसाहतवाद्यांच्या दृष्टीने, कमी स्वमानवहानीचा, कमी खर्चाचा आणि जास्त सोपा होता. ब्युबॉनिक प्लेग, देवी (स्मॉल पॉक्स), कांजिण्या (चिकन पॉक्स), कॉलरा, पडसे (कॉमन कोल्ड), घटसर्प (डिप्थेरिया), फ्ल्यू (इन्फ्लुएन्झा), मलेरिया, गोवर (मिझल्स), स्कारलेट फिवर, लैंगिक संक्रमित रोग (sexually transmitted diseases), हिवताप (टायफॉईड), टायफस, क्षयरोग (ट्युबरक्युलॉसिस), घटसर्प (परट्युसिस किंवा व्हूफिंग कफ), इत्यादी अनेक साथीच्या रोगांचा यासाठी मुद्दाम उपयोग केला गेला... काही वेळेस ते नकळतपणेही पसरले. असे म्हटले जाते की रोगांच्या साथींनी रेड इंडीयन लोकांची जवळ जवळ २५ ते ५०% टक्के लोकसंख्या मृत्युमुखी पडली असावी. युरोपियन आक्रमकांनी या जैविक अस्त्रांचा हेतुपुर्र्सर उपयोग करताना अनेक क्रूर योजना कामी आणल्या... उदा : देवी (स्मॉल पॉक्स) च्या रोग्यांनी वापरलेली ब्लँकेट्स भेट देणे (१७६३ सालचा फोर्ट पिट्चा वेढा, इ) , रोगाने ग्रस्त युरोपियन लोकांना मूळ अमेरिकन लोकांच्या वस्तीवर भेटीस पाठवणे, इ. एका प्रवादाप्रमाणे, कौटिल्याने प्लेगने ग्रस्त उंदीर सोडून अलेक्झांडरच्या सैनिकांमध्ये रोगराई पसरवली होती (खरे खोटे कौटिल्य जाणे).

सुबोध खरे 12/11/2018 - 19:20
आपल्या लेखाचे शीर्षक वाचून हे जैविक रासायनिक आणि आण्विक युद्धातील(Nuclear, Biological, & Chemical Defense) एक भाग असावा असे वाटले होते. आणि जैविक युद्ध हे गरीब देशाचा अणुबॉम्ब असे म्हटले जाते. पण त्याचे परिणाम भयानक अनाकलनीय आणि अतर्क्य असे आहेत. ब्रिटनच्या कोपऱ्यातील एका बेटावर (गृइनार्ड Gruinard Island) जैविक युद्धाची चाचणी म्हणून अँथ्रॅक्स या रोगाच्या जिवाणूच्या बीजाणूंचे फवारे मारले होते. त्यानंतर पुढची ५२ वर्षे हे बेट कोणत्याही सस्तन प्राण्यास वास्तव्य करण्यास अयोग्य झाले होते. यानंतर त्या बेटावरचे जैविक प्रदूषण स्वच्छ केल्यावर ते बेट वास्तव्य करण्यास योग्य म्हणून प्रमाणित केले गेले. हि सुरस आणि भयंकर कथा आपण खाली वाचू शकता. https://en.wikipedia.org/wiki/Gruinard_Island अजून एक भयावह कथा म्हणजे सुरत मध्ये १९९४ साली प्लेगची साथ आली होती त्यावेळेस दोन अमेरिकन "पर्यटक" सुरतेला भेट दिल्यानंतर नाहीसे झाले. लष्कराच्या गुप्तहेर खात्याने त्यांचा माग काढल्यावर असे लक्षात आले कि अमेरिकेतील सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते. आणि ते सुरतेत प्लेगच्या जिवाणूंचे नमुने घेऊन हळूच अमेरिकेत परत गेले. अमेरिका असे विविध देशात होणाऱ्या रोगांचे नमुने गोळा करून तेथे असणाऱ्या जनतेची प्रतिकार शक्ती विरुद्ध हे जिवाणू कसे काम करतात याचे गुप्तपणे संशोधन करत असावेत. म्हणजे भविष्यात त्या देशाच्या प्रतिकार्शक्तीला न जुमानणारे रोग तेथे फैलावता येतील किंवा तशी जैविक शास्त्रे निर्माण करत असावेत असा "कयास" आहे. दुर्दैवाने अशी माहिती तुम्हाला कुठेही जालावर सहजासहजी आढळणार नाही. जैविक अस्त्रे हा एक मानवी इतिहासातील काळा अध्याय आहे असे म्हटले तरी चालेल.

In reply to by सुबोध खरे

रोचक माहीती. अतिरेकी लोकांनी जैविक अस्त्रे वापरल्या चा काही इतिहास आहे का? विषाणू किंवा जिवाणू बाँब तयार करुन त्याद्वारे विध्वंस घडवून आणण्याचा प्रयत्न यापुर्वी झाला आहे का?

लेख आवडला जैविक अस्त्रांच्या निमित्ताने - '२४' नामक मालिकेचे दुसरे पर्व या विषयावर आहे.. काहीशी अतिरंजित पण उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारी अशी मालिका.

पण मनात आणखी प्रश्न उभे राहिले. मेरी मलोनचा काळ हा प्रतिजैविके वापरात येण्यापूर्वीचा आहे. १. काटेकोर वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी असत्या तर बहुधा ती रोगवाहक/रोगवाहिका झाली नसती असे वाटते. नंतरच्या काळात आणखी रोगवाहक का सापडले नसतील? २. नंतर विषमज्वराची लस बाजारात आली, ३. तसेच क्लोरोमायसेटीन नावाने क्लोरम्फेनिकॉल बाजारात आले, त्यानंतर अनेक ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके बाजारात आली. त्यामुळे विषमज्वराने माणसे मरण्याचे प्रमाण नगण्य झाले असावे. मुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते.

In reply to by सुधीर कांदळकर

मुद्दे क्र. २ आणि ३ मुळे नंतरच्या काळात रोगवाहक सापडले नसावेत असे वाटते. रोगवाहक (अशी माणसे की ज्यांच्यामध्ये रोगजंतू असतात, पण त्यांच्यामध्ये रोगाची लक्षणे दिसत नाहीत) तयार होतच नाहीत असे नाही. पण, प्रतिजैवकांच्या सहज उपलब्धतेमुळे रोगाचा परिणामकारक व पूर्ण उपचार सहज साध्य झाला आहे. म्हणून.. १. रुग्णाचे रोगवाहकात रुपांतर होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे (शुन्य झालेले नाही) आणि २. रोगाच्या परिणामकारक उपचारांमुळे, रोगप्रसारावर नियंत्रण येऊन, रोगाच्या साथी येणे खूपच विरळ झाले आहे.

Prajakta२१ 02/05/2020 - 00:19
छान मार्गदर्शन आत्ताची हि साथ पण जैविक युद्धाचा भाग असल्याची शक्यता अनेक जण सांगत आहेत पण पुरावे नसल्यामुळे काहीच करता येत नाहीये चीन मधील एकही बड्या व्यक्तीला हा रोग झाल्याचे ऐकिवात नाहीये ह्यावरून सध्याची साथ जैविक युद्धाचा भाग असे बऱयाच न्यूज चॅनेल्स वर सांगत आहेत ओरडून. २०१९ मध्ये कॅनडातील एका प्रयोगशाळेतून एका चिनी दाम्पत्याला डेपोर्ट करण्यात आले होते त्यांचयाबरोबर अजून हि काही लोक होते असे काहीसे एका चॅनेलवर एक तज्ज्ञ सांगत होते जर असे असेल तर ह्याचा ऍंटीडोट पण असेलच तो खुला झाला तर सगळेच प्रश्न सुटतील

तो माझा सांगाती..

यशोधरा ·
H तो माझा सांगाती.. हिमालय. त्याचं वेड लागतं. प्रत्येक ऋतूगणिक लोभस ते रौद्र अशी वेगवेगळी रूपं धारण करणारं‌, ते एक वेगळं आणि सुंदर असं जग आहे. ज्ञात-अज्ञात शिखरं, वळत वळत, स्वत:भोवती गिरक्या घेत जाणारे रस्ते, घनदाट जंगलं, आपल्या मस्तीत वाहणारे जलप्रवाह, हिरव्यापिवळ्याकरड्या शेतपायर्‍या, बर्फ, पठारं, गुरफटून टाकणारे ढग आणि धुकं, मनात येईल तिथे उगवणारी फुलं, दूर दूर उगवलेली, आजूबाजूच्या निसर्गाशी एकरूप झालेली एकांडी घरं.

नंदन 06/11/2018 - 16:55
लेख. हिमालय हा स्वतः अनुभवण्याचाच प्रकार आहे - पण असोशीने, उत्कटपणे तो अनुभव वाचकापर्यंत पोचवणं; हे उत्तम लेखनाचं मर्म. ते ह्या लेखात साधलं गेलं आहे.
कधीकधी वाटतं, आ़जूबा़जूच्या वातावरणाचा माणसाच्या स्वभावावर काही प्रमाणात प्रभाव पडत असला पाहिजे. भव्य हिमालयाच्या सान्निध्यात येथील सर्वसामान्य स्थानिकांची मनंही मोठी होत असली पाहिजेत. ह्याच कारणासाठी पूर्वीच्या काळी ऋषिमुनी येथील वातावरणात येऊन राहत असतील का? सतत शुद्धाच्या सहवासात राहून माणसाच्या मनावरील राग, लोभ, लोभ, मोह अशांसारख्या भावना, लालसा, वासना यांची पुटं गळून पडत असावीत का? आयुष्य अधिक सोपं होत असावं का आणि आपुला संवाद आपणासी होण्याची सुरुवात होत असावी?
अगदी, अगदी. दिव्यत्वाची जेथ प्रचीती!

अनिंद्य 06/11/2018 - 21:08
@ यशोधरा हिमालयाचं रौद्रभीषण सौंदर्य शब्दात मावणे कठीण, पण तुमचे हे शब्दचित्र फारच सुंदर जुळून आले आहे. शब्द आणि चित्रांचा मणिकांचन योग जणू ! झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया'....... वृक्ष हे मानवाचं शरणस्थान हा दाखला मला विशेष भावला.

हिमालय. त्याचं वेड लागतं.
खरंय! फोटो इतके भारी आहेत, प्रत्यक्ष हिमालयाची भेट वेड लावणारी असणार यात शंका नाही!

नाखु 06/11/2018 - 23:59
अंतर्नाद दाखवत केलेलं लिखाण. मैय्या आपण कधी रक्ततपासणी केली तर लालपेशी,पांढर्या पेशी या चक्क हिमपेशी असतील याची ज्याम खात्री आहे. हिमालय वाचणं, अनुभवून तो पचवणं तरीही मी रिताच आहे हेही विनम्र पणे लक्षात ठेवणं निव्वळ ध्यासदर्दी व्यक्ती चे काम पर्वती पायरी पाशीच थबकलेला नाखु पांढरपेशा

अभ्या.. 07/11/2018 - 00:29
लाडक्याचे वर्णन, तेही तितकेच लाडाने केलेले. मग काय बोलायाचे. जियो.

टर्मीनेटर 07/11/2018 - 10:01
अप्रतिम लेख आणि त्याला सुंदर फोटोंची जोड.
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रवासाची चाकोरी कदाचित आखूनच मिळते जन्माबरोबरच. कोणाची वाट कधी मळलेली, तर कोणाची जरा अधिक रुळलेली, तरी प्रवास हा ठरलेला. तो कोणी चुकवू शकत नाही. कोणी ठरलेल्या इच्छित गंतव्याला सुखेनैव पोहोचणारा आणि कोणाच्या प्राक्तनात गंतव्यच काय, रस्ताही अनभिज्ञ.
हे फार आवडलं...
लाडक्याच्या सौंदर्याची आणखीन एक झलक.

वरुण मोहिते 07/11/2018 - 10:37
फोटो तर छान आहेतच पण लिखाण त्याहून छान आहे. हिमालयाबद्दल च्या सगळ्या भावना उतरल्या आहेत लेखातून. सुंदर.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 08/11/2018 - 09:26
असे का बरं? तुम्ही व्यवस्थित आखणी करून जाऊच शकता हिमालयात. तिथे जायचे म्हणजे शिखरे पादाक्रांत करायची वा ट्रेक करायचे असे नाही. अशा कित्येक जागा आहेत की जिथे तुम्ही आराम करू शकता, आसपास निरुद्देश भटकू शकता... निवांत राहू शकता. कधी जाता सांगा..

चित्रे, विलोभनीय विचार आणि मोहक मांडणी. लाजबाब. कोई दिक्कत नही, निसर्गाचाच भाग बनून ठिय्या द्यायचा - ग्रेट, वाचून माझ्याकडची देखील संपदा वाढली. धन्यवाद.

नूतन सावंत 08/11/2018 - 08:33
यशो, किती भाग्यवान तू आणि तितकेच भाग्यवाण आम्हीही.तुझ्या डोळ्यांनी पाहिलेला हिमालय आम्हाला दिसला, तुझ्या हृदयाच्या तळापर्यंत झिरपलेला हिमालय आमच्याही हृदयाच्या गाभ्यात झिरपून एक आगळेच सुख देऊन गेला.तुझं आतल्या आवाजासह केलेलं हे कथन आणि सोनेपे सुहागा म्हणवणारी प्रकाशचित्रे खिळवून ठेवतात. या सर्व निखळ आनंदासाठी तुला धन्यवाद देऊ इच्छित नाही.

In reply to by नूतन सावंत

यशोधरा 08/11/2018 - 09:29
आपल्या आपल्यात धन्यवाद वगैरेची गरजच नाही :) तुला आवडले, ह्याचाच मला आनंद आहे! प्रकाशचित्रकारांपर्यंत तुझी आणि सर्वांचीच दाद पोहोचवेन नक्की!

हिमालय. त्याचं वेड लागतं. ह्या वाक्यातच सगळं सार आहे.:) तुझा लेख मनाच्या आतपर्यंत पोहोचला. खूप सुंदर! स्वाती

सविता००१ 09/11/2018 - 10:44
लेख आणि फोटो दोन्हीही जबरदस्त. कधी पाहीन कोण जाणे. आतपर्यन्त पाझरत गेला ग हिमालय

शब्दाशब्दातून हिमालयाबद्दलचं प्रेम झिरपत आहे ! हिमालयाच्या प्रेमात न पडणारी व्यक्ती विरळा... त्याहून विरळा असं ते शब्दबद्ध करणे ! फोटो तर सरळ शब्दांच्या स्वप्निल जगात घेऊन जाणारे... डोळे थंड झाले ! वरून ६व्या चित्रातली खोल दरी आणि तिच्या पायथ्यातून वाहणारी नितळ निळ्या ताशीव संगमरवराची नदी अलगद जुन्या आठवणींत घेऊन गेली. अजून काय लिहायचे ?!

In reply to by यशोधरा

हिमालयाच्या पश्चिमेकडील भागात हिमाचलच्या पुढे जायचा योग अजून आला नाही. तो फोटो पाहून, पूर्वेकडील, न्यू जलपायागुडी ते गंगटोक रस्त्याच्या बाजून वाहणार्‍या तीस्ता नदीची आठवण आली... अगदी तश्याच खोल दरीतून वाहणारी तीस्ता, तिच्या काठावर असलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना खूप वेळ साथ देते.

हिमालय. त्याचं वेड लागतं. खरंय....! लेखातील छायाचित्रे खूप सुंदर आणि वर्णनही एक वाचक म्हणून मोहवून टाकणारे आहे, पुन्हा कोई दिक्कत नही वाला माणसांचा अ‍ॅटीट्युड तर खूपच आवडला. बाकी, आपलं हिमालय प्रेम जगजाहीर आहे, दर दहा वाक्यानंतर सहज गप्पात तुमचं हिमालय प्रेम उचंबळून येतं, हेही अनेकांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्याशी होत असलेल्या गुजगोष्टी, मनकी बाते, मुक्तक, आणि तहेदिलसे त्यावर असलेलं प्रेम आणि त्याबद्दलचं मनोगत खूप आवडलं. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात जसा सह्याद्री वेड लावतो तसा उत्तरेकडचा हिमालयही लावतो. मनापासून लिहिलेले असल्याने लेख आवडलाच पण त्याहूनही जास्त प्रकाशचित्रे आवडली. नजरच हटत नव्हती पुढचा लेख वाचण्यासाठी. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा 17/11/2018 - 15:04
प्रकाशचित्रकारांपर्यंत आपलं कौतुक जरूर पोहोचवेन.

जुइ 19/11/2018 - 00:31
समजा, बस वेळेवर आली नाही, तर त्याला पहिलं उत्तर असतं - कोई दिक्कत नहीं, आ जायेगी| मग वाट बघायची किंवा रस्ता चालू लागायचा अथवा शक्य असल्यास दुसरं वाहन बघायचं, पण चिडचिड करायची नाही. कुठे भूस्खलन झालं, उत्तर? कोई दिक्कत नहीं, साफ हो जायेगा| बीआरओवालेही त्यांचं काम इमानेइतबारे करतात, कधी कधी वेळ लागतो.
हे मी सुद्धा अनुभवले आहे. ऐकूनच या लोकांचा लाघवी स्वभाव भावतो आणि त्यांचे हिंदीही कानाला तितकीच गोड वाटते! फोटो आवडले हे वेगळे सांगायला नको.

राघव 01/12/2018 - 12:45
वाह.. त्याचं दर्शनच आल्हाददायक! आपण आपोआपच नतमस्तक होतो त्याच्यासमोर. ते दर्शन परत घडवल्याबद्दल धन्यू!! अवांतर: तो तुझा कॅमेरा बदललास की काय? अतीअवांतरः चला.. ईनो घेऊन यायला पाहिजे राघवा.. काय समजलास? ;-)

चित्रगुप्त 01/12/2018 - 13:59
विलक्षण सुंदर, उत्कट लेखन. लिहीण्याची प्रबळ ऊर्मी आल्यावर ती झिंग ओसरत नाही तोवरच लिहून काढले तरच असे लिहीणे जमते, असे मला वाटते. तुमचा काय अनुभव आहे ?

In reply to by चित्रगुप्त

यशोधरा 01/12/2018 - 14:12
धन्यवाद. मला सहसा एकटाकी लिहायची सवय आहे, सुचते तसे लिहित जाते. क्वचित किरकोळ बदल करते. हे हिमालयाबद्दलचे विचार सतत घोळत असतातच डोक्यात. हे खरं तर लिहायचा बरेच दिवस कंटाळा केला होता.... :)

सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मार्गी ·
H सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वांना नमस्कार. नुकतंच मला जालना येथे झालेल्या योग संमेलनामध्ये 'योग प्रसाराची साधने' ह्या विषयावर बोलण्याचा योग आला. त्यासाठी तयारी करताना व नंतरही अनेक मुद्दे मनात आले. योग असेल किंवा अन्य कोणतीही विद्या, एखादा खेळ किंवा अगदी वेगळे क्षेत्र अशा संदर्भात प्रसारासाठी व सहभागासाठी अनेक साधने किंबहुना तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, ह्या दिशेने विचार केला.

मनापासून आपलं काम करत राहावं, लोकांना वाटलं-पटलं तर प्रेरणा घेतील. काम आणि विचार चांगले असतील तर अजेंडा न राबवताही त्याचा प्रचार प्रसार होईलच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

भुजंगराव 12/11/2018 - 18:43
फार मोठा विचार अगदी साध्या सोप्या भाषेत सांगण्यात आला , अभिनंदन मार्गी जी , न आपल्या HIV जन जागृतीसाठी करत असलेल्या सायकलवरून भ्रमंती ला शुभेच्या

गोरमिंट

आदूबाळ ·
H गोरमिंट काही महिन्यांपूर्वी एका वृद्ध पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ लोकप्रिय झाला होता. "ये बिक गयी है गोरमिंट, अब गोरमिंट में कुछ नहीं है" अशी सुरुवात करून ती महिला 'गोरमिंट'वर यथेच्छ तोंडसुख घेते. जिज्ञासूंनी तो व्हिडिओ आपल्या जबाबदारीवर पाहावा. आपण ज्या काळात राहतो त्याचा महिमा म्हणा, पण या वृद्धेच्या तळतळाटामुळे लोकांचं बेफाम मनोरंजन झालं. 'आन्टी गोरमिंट' म्हणून तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर मीम निघाले.

टर्मीनेटर 06/11/2018 - 10:28
सलामीचा लेख आवडला. फक्त...
अस्मानी सुलतानी संकटांत सरकारशिवाय पर्याय नसतो. मग ते केरळातले पूर असोत किंवा नोटाबंदीचा निर्णय.
ह्यातील केरळातील पुर हे आस्मानी संकट नक्कीच आहे, त्यात दुमत नाही. पण त्याच्या जोडीला नोटाबंदीचा निर्णय हे सुलतानी संकट म्हणून खटकले. त्याबाबतीत देशवासियांत सरळ सरळ दोन गट आहेत. एका गटाला हे संकट होते असे वाटतंय तर दुसऱ्या गटाला तो निर्णय योग्य होता/आहे असे वाटतंय. अर्थात त्याकाळातील आलेल्या अनुभवावरून कोणी कोणत्या गटात जावे हा ज्याचा त्याचा निर्णय! मी दुसऱ्या गटातील असल्याने कदाचित त्या निर्णयाचा सरसकट सुलतानी संकट म्हणून उल्लेख नाही पटला. बाकी लेख छानच आहे, धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

सुबत्तेमुळे सरकारपुरुषाला हद्दपार करता येतं, पण त्याबरोबर सरकारपुरुषाला हद्दपार करण्यामुळेही सुबत्तेची व्याप्ती वाढत राहते!
आणि
तुम्ही सरकारपुरुषाला कितपत हद्दपार केलंय, हे तुमच्या सुबत्तेचं मोजमाप म्हणून वापरता येईल. लक्षात ठेवा, 'सुबत्ता' म्हणजे well being. भौतिक/आर्थिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिकही.
हे लेखाचे सार म्हणता येईल.

पलाश 06/11/2018 - 15:19
शीर्षक औत्सुक्य वाढवणारं आहे. लेख या काहीशा वेगळ्या विषयाची सोपी व सलग मांडणी करतो. आजोबांची पहिली पिढी म्हटली तर मी दुसर्‍या पिढीतील असल्यामुळे सरकारपुरुषाचं दैनंदिन आयुष्यातलं स्थान हळूहळू कमी होताना व खाजगी क्षेत्राचं वाढताना जवळून पाहिलं आहे. "श्रीमंती चाळे/थेरं/खेळ" अशा शब्दांत न परवडणार्‍या गोष्टींवरची टिप्पणीसुद्धा अगदी नेमकी आठवली. :) सुबत्तेची पैशापलिकडे जाऊन केलेली व्याख्या हेही लेख आवडण्याचं एक मोठं कारण आहे. सुबत्तेमुळे सरकारपुरुषाला हद्दपार करता येतं, पण त्याबरोबर सरकारपुरुषाला हद्दपार करण्यामुळेही सुबत्तेची व्याप्ती वाढत राहते! हा मुद्दा यापूर्वी कधीच लक्षात न आलेला व विचार करण्याजोगा वाटला.

कंजूस 07/11/2018 - 05:44
सरकारी सोयी चांगल्या चालल्या की खासगी व्यवसायांस त्यात घुसून नफा मिळवायची दारे बंद होतात. म्हणून त्या हद्दपार करण्यासाठी उपाय केले जातात. काही नेते त्या व्यवस्थेच्या पोटा घुसून आपले पोट भरतात. मग पुढे काय होतं? दोनचारजणांना मलिदा मिळतो आणि सरकारी यंत्रणा तिरडीवर. उदाहरण : राज्य परिवहन पण पण पण सर्व राज्यांत असं नाहीये.

विजुभाऊ 07/11/2018 - 06:35
सरकार हे ज्यांचं त्यावाचून अडू शकतं त्यांच्यासाठी असते. मल्ल्या आणि तत्सम मंडळी याना त्याच्याशी घेणंदेणं नसतं दाऊद वगैरे लोक हे सरकारच्या आधाराने मोठे होतात. आणि नंतर तेच सरकार चालवायला लागतात.

सरकार उत्तम योजना आणते आणि पॉवरफुल लोकांना अधिक पॉवरफुल करते. मी काही पॉवरफुल नाही, त्यामुळे, गोल गरगरीत वाटोळा रुपया, हे सगळ्यात उत्तम सरकार.

अनुप ढेरे 08/11/2018 - 12:36
आदिवासी भागांत सरकारी शाळा काढणं एकवेळ ठीक, पण शहरी भागात 'राइट टु एज्युकेशन'सारखे कायदे राबवून भागण्यासारखं आहे.
या वाक्याशी सहमत नाही. बाकी लेख आवडला.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 08/11/2018 - 19:29
राइट टु एजुकेशन हे प्राथमिक/माध्यमिक शिक्षणांचं राष्ट्रीयीकरण आहे. लेखातच म्हटक्याप्रमाणे,
त्याबरोबर सरकारपुरुषाला हद्दपार करण्यामुळेही सुबत्तेची व्याप्ती वाढत राहते!
या वाक्याशी मी सहमत आहे. आर्टीई ही या विधानाच्या विरुद्ध दिशेचा प्रवास आहे. आरटीईमुळे सरकारी हस्तक्षेप कमी न होता वाढलेला आहे. (त्यातील धर्माधारित भाग बाजुला ठेऊन देखील.) सो शहरी भागात आर्टीई ने भागण्यासारखं आहे याच्याशी सहमत नाही. आरटीई उपयोगी नाही असं मत आहे माझं. आणि सरकारपुरुषाला हद्दपार केल्यास सुबत्ता वाढते या विधानाशी विसंगत आहे.

मित्रहो 08/11/2018 - 18:49
अर्थशास्त्र समजावून सांगण्याची तुमची पद्धत आवडली. बऱ्याच हुकुमशहाच्या काळात, किंवा पूर्वीच्या काही राजांच्या काळात आर्थिक, सामाजिक सुबत्ता होती पण सरकारपुरुष नाहीसा झाला होता असे म्हणता येत नाही.

सर टोबी 08/11/2018 - 21:38
आजही, इंजिनीरिंग, मॅनॅजमेण्ट, सायन्स, आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सरकारी महाविद्यालयांना जी प्रतिष्ठा आहे ती फारच कमी खाजगी क्षेत्रातील संस्थांना आहे. त्या अर्थाने, सरकारपुरुषाचा ऱ्हास होणे नजीकच्या काळात तरी शक्य दिसत नाही. खाजगी म्हणजे गुणवत्ता, खाजगी म्हणजे उत्तरदायित्व असा थोडासा अध्याहृत अर्थ असावा तुमच्या लेखामध्ये. आणि वाहतूक, रस्ते तसेच शिक्षण या बाबतीत तरी असे दिसते कि सेवा आणि वस्तूंच्या खाजगी पुरवठादारांच्या किमती भरमसाठ असतात परंतु गुणवत्ता आणि उत्तरदायित्व या बाबतीत अत्यंत वाईट अनुभव येतो. एखाद्या खराब रस्त्यावरील टोल नाक्यावर एकदा टोल द्यायला नकार देऊन बघा. सरकारपुरुषाचे तुमच्या आयुष्यातील अस्तित्व हि काही घृणास्पद गोष्ट नाहीये. उलट त्याचे अस्तित्व फारसे जोखड न बनता तुमचे जीवन सुसह्य होण्यातच सरकारपुरुषाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा असते.

In reply to by सर टोबी

एका वेगळ्याच विषयाची मांडणी करणारा धागा आवडला, पण वरील प्रतिसाद ही पटला.

In reply to by सर टोबी

चिगो 20/11/2018 - 23:03
सरकारपुरुषाचे तुमच्या आयुष्यातील अस्तित्व हि काही घृणास्पद गोष्ट नाहीये. उलट त्याचे अस्तित्व फारसे जोखड न बनता तुमचे जीवन सुसह्य होण्यातच सरकारपुरुषाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा असते.
सहमत.. सरकारवर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक बाबीकरीता विसंबून असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढ्या हळूहळू सरकारवर अजिबात विसंबून नसण्याच्या परीस्थितीत याव्यात, ह्यातच सरकारचे यश आहे. अश्या लोकांची जागा जास्त गरजू असलेले लोक घेतात, आणि समाजचक्र आणि सरकारचक्र सुरु राहते. उदाहरणार्थ, मी सरकारी शाळा-काॅलेजातून शिकलो, आणि त्याच्याभरोश्यावर आता नोकरी करतोय, ज्यायोगे कदाचित माझ्या मुलांना सरकारी शाळांची गरज पडणार नाही.. (अर्थात ‘व्हॅल्यु फाॅर मनी‘च्या हिशोबानी अजूनही काही सरकारी शाळा ह्या खाजगी शाळांच्या तूलनेत सरसच आहेत, हा मुद्दा अलहिदा..)

कंजूस 09/11/2018 - 04:59
>>सेवा आणि वस्तूंच्या खाजगी पुरवठादारांच्या किमती भरमसाठ असतात परंतु गुणवत्ता आणि उत्तरदायित्व या बाबतीत अत्यंत वाईट अनुभव येतो. >> - राइट.

नंदन 09/11/2018 - 07:27
आवडला, विशेषतः रोचक किश्श्यांपासून सुरुवात करून मग समेवर येणं. फक्त, फार त्रोटक वाटला. ह्या विषयाचे अनेक कंगोरे आहेत - बहुधा वेळेअभावी त्यांचा धांडोळा घेणे राहून गेले असावे. शक्य झाल्यास, विस्ताराने याबद्दल वाचायला आवडेल.

Jayant Naik 10/11/2018 - 12:07
रस्ते बांधणे सरकारला परवडत नाही म्हणून खाजगीकरण आणि टोल आला ..बँका चालवणे जमत नाही म्हणून पुन्हा खाजगीकरण...शिक्षण संस्था ..प्रयोग शाळा ..वाहतूक ..असे अनेक प्रकार . मुळात सरकारने काय करावे आणि आणि काय नाही हे हळू हळूच ठरत जाते. त्यात ब्रिटीश असताना त्यांना सर्व गोष्टीवर नियंत्रण हवे असायचे ..आता तसे नसेल तरी चालते. खरे म्हणजे एखादी गोष्ट ज्याला चांगली चालवायला जमते , म्हणजे ..नफा मिळवत आणि चांगली गुणवत्ता देत ..त्यांनी ती करावी .

सुबोध खरे 22/11/2018 - 10:31
म्हणजे सुबत्तेमुळे सरकारपुरुषाला हद्दपार करता येतं, पण त्याबरोबर सरकारपुरुषाला हद्दपार करण्यामुळेही सुबत्तेची व्याप्ती वाढत राहते! मूळ सरकार म्हणजे कोण? तुम्ही आम्हीच कि सरकार पुरुषाला हद्दपार सुबत्तेने करता येते हा जागतिक दृष्टिकोनातून एक अतिशय संकुचित विचार आहे. वरील सर्व सुविधा हे केक वरील आईसिंग आहे. एक रुग्णालय/ मॉल/ सेवाकेंद्र उभारणीसाठी ज्या प्रचंड पायाभूत सुविधा लागतात त्या खाजगी क्षेत्र उभारूच शकत नाही. उदा. रेल्वे. मुंबईतील एक मर्यादित उदाहरण म्हणजे मेट्रो घ्या. या मेट्रो खालची नुसती जमीन विकत घ्यायची तर अंबानींचे दिवाळे वाजेल. मुबंईसारख्या शहरात जर संपूर्ण व्यापारी दराने जमीन विकत घ्यायची ठरवली तर एकही खाजगी संस्थेला शाळा चालवणे परवडणार नाही. आज नागपूरसारख्या मध्यवर्ती शहरात एक रुग्णालय उभारायचे ठरवले तर त्याला लागणारे सिमेंट लोखंडाच्या काम्बी इ आणण्यासाठी लागणारे रस्ते किंवा रेल्वे हि जर खाजगी क्षेत्रात उभारायची तर ते रुग्णालय अंबानी टाटा ना पण परवडणार नाही. आणि तेथे २५ लाख रुपये भरून एम बी बी एस झालेले डॉक्टर आणि २ कोटी भरून एम डी झालेले डॉक्टर नोकरीस ठेवायचे तर रुग्णालय पहिल्याच वर्षी दिवाळ्यात निघेल. आज तीन पिढ्या सरकारी शाळा कॉलेजात शिकल्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याची किंमत खाजगीकरणातून करणे अशक्य आणि अतर्क्य आहे. युरोप अमेरीकेतील खाजगी मॉडेल हि काही शतकांच्या सरकारी पायाभूत सुविधांच्या पायावर उभी आहेत. काही बाबतींत सरकारपुरुषाशिवाय पर्याय नाही. उदा० संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था राखणं, अर्थव्यवस्था (किमानपक्षी) सुरक्षित ठेवणं. या 'वेल्फेअर सर्व्हिसेस' ही स्पष्टपणे सरकारचीच जबाबदारी आहे. हे विधान म्हणजे सरकारची किंमत नगण्य आहे (GROSS UNDERSTATEMENT) असे सांगणे आहे. अंबानींची संपत्ती ३ लाख ३०हजार कोटी रुपये आहे. पुण्याची जमीन ३३०कोटी चौ फूट आहे. म्हणजेच पुण्याच्या जमिनीचा भाव जर १००० रुपये चौ फुटाला असेल तर अंबानींची संपूर्ण संपत्ती केवळ पुणे शहराची जमीन विकत घेण्यासाठी जाईल. फक्त तीन क्षेत्रे अशी आहेत जेथे खाजगी कंपन्या पायाभूत सुविधा स्वतः उभारून नफा कमावू शकतील. १ ) पेट्रोलियम २) खाण ३) अफूची शेती. (अफगाणिस्तान केवळ अफूच्या शेतीवर श्रीमंत होऊ शकेल. पण तेथील अराजक हे सामान्य माणसाला केवळ अफूतून मिळणारे डॉलर्स हे सामान्य जीवन जगू देत नाहीत.) बाकी सर्व क्षेत्रात सरकारी पायाभूत सुविधा काढून घ्या. सर्व क्षेत्रे एक महिन्यातच दिवाळ्यात निघतील याची १०० टक्के खात्री आहे.

वीज, पाणी, लष्कर, पोलीस, औद्योगिक शांतता, राजकीय स्थिरता याची किंमत पैशात कधीही करता येणार नाही.

भारतापासून इस्रायल पर्यंत संपूर्ण मध्य आशिया, संपूर्ण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथील; कोणताही देश घ्या स्थिती तुमच्या लक्षात येईल जेथे जेथे या गोष्टी नाहीत त्या देशात खाजगी क्षेत्राची काय स्थिती आहे ते पाहून घ्या. इतर देश सोडाच. महाराष्ट्र गुजरात ची तुलना बिहार प. बंगालशी करून पहा केक शिवाय आईसिंग व्यर्थ आहे.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 23/11/2018 - 13:54
रेल्वे खासगी कंपनी उभी करू शकत नाही हे कसं? उमेरिकेत वॅनडरबिल्ट वगैरे लोकांनीच खासगी रेलरोडमधून बक्क्ळ पैसा कमावला. भारतात पब्लिक रेल्वे आहे म्हणजे खासगी रेल्वे होऊच शकत नाही हे बरोबर नाही. वीज देखील खासगी कंपन्या बनवतात, डिस्त्रिब्युटदेखील करतात. पोलीस, सैन्य खासगी नसावं हे पटू शकेल. (तैनाती फौजांची बरीच किंमत मोजली आहे भारताने :) )

In reply to by अनुप ढेरे

नितिन थत्ते 23/11/2018 - 14:24
तेच पण या खाजगी कंपन्यांना पायाभूत गोष्टी सरकार अत्यंत कमी दरात पुरवत असते असे सुबोध खरे यांचे म्हणणे आहे. प बंगाल किंवा गुजरात सरकार टाटा मोटर्सला अत्यंत कमी दराने जमीन देतात, करात भरमसाट सवलती देतात तेव्हा टाटा "मी सामान्यांना एक लाखात गाडी देणार आहे" असे म्हणू शकतात. आणि एक लाखात गाडी तर ते देतच नाहीत शिवाय या सवलती इतर महागड्या गाड्यांसाठीही मिळाव्यात अशी अपेक्षा करतात. https://www.livemint.com/Industry/Zvkxz1yRS10pVUNGbLe9bK/Tata-Motors-wants-Gujarat-to-extend-sops-beyond-the-Nano.html

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 23/11/2018 - 18:52
साहेब व्हॅनडरबिल्ट महाशयांनी Shipping and railroad tycoon Cornelius Vanderbilt (1794-1877) रेल्वे बांधली तेंव्हा अमेरिकेत (युरोपीय लोकांनी तिथल्या रेड इंडियन लोकांना हाकलून दिल्यामुळेकिंवा मारून टाकल्याने) जमीनच जमीन होती अन ती सुद्धा फुकट किंवा कवडीमोलाने. भारतात जमीनीचे भाव आता आभाळाला भिडले आहेत. मुंबई नागपूर द्रुत महामार्गाची सरकारने एका हेक्टरला सरासरी ८७ लाख रुपये दर दिला आहे. कोणत्या खाजगी उद्योजकाला हा दर परवडेल? Government agencies have paid the state’s highest ever compensation to acquire land — an average of ₹87 lakh a hectare, up to five times the market rate. https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-nagpur-expressway-state-pays-farmers-up-to-5-crore-for-land-to-get-project-going/story-JcZQa2F1BGq1w0l66sj94L.html वीज देखील खासगी कंपन्या बनवतात, डिस्त्रिब्युटदेखील करतात. या कंपन्याना जर मनोरे उभारायला जमीन विकत घ्यावी लागली तर त्यांचे दिवाळे वाजेल. ते वीज निर्मिती करतात हि वीज ग्रीडला जोडून देतात आणि जेथे पाहिजे तेथे वीज परत काढून लोकांना वितरित करतात. सरकारच्या खांद्यावर उभे राहून हे लोक उंच आहेत असे दाखवले जाते. भारतासारख्या देशात जेथे अफाट लोकसंख्या आहे आणि जमिनीचे भाव आभाळाला भिडलेले आहेत पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध केल्या नसत्या / नाहीत तर खाजगी कंपन्या काहीही करू शकल्या नसत्या हि वस्तुस्थिती आहे. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

नितिन थत्ते 23/11/2018 - 14:06
+१ कळीचे वाक्य "एक दोन पिढ्यांना सरकारचा आधार मिळाला तर तिसर्‍या पिढीला कदाचित सरकारचा आधार लागणार नाही" हे आहे. त्यातही तिसर्‍या पिढीने हा सरकारचा आधार आपण होऊन सोडणे हे घडले तर नव्या वंचितांना सरकारचा आधार मिळू शकेल.

In reply to by नितिन थत्ते

नाखु 26/11/2018 - 19:02
मदत नसून आपला हक्कच आहे असं सर्व घटकांना,सर्व पक्षांनी वृद्धिंगत लालसेपोटी भिनवत राहणे हेच आपल्या भारतीय राजकारणाचे (मंडलपश्चात) प्रारुप आहे. त्या चरकात नेटपासून थेट पर्यंत सगळेच भरडले जात आहेत. फक्त सुपातले जात्यातल्यांना हसतात इतकेच. सुस्पष्ट उघड्या डोळ्यांनी बघणारा अडाणी वाचकांची पत्रेवाला नाखु

डियर ममा..

डॉ सुहास म्हात्रे ·
H डियर ममा.. डियर ममा, आज बर्‍याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्‍या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्‍या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही! ते राहू दे. तुझा विचार मनात आला की माझं असंच होतं बघ, मनातलं विसरायला होतं.

टर्मीनेटर 06/11/2018 - 17:40
कथा खुप आवडली डॉक्टर साहेब.
ममा, आज हे लिहिताना, 'वादळी दिवसाचा शेवट सुखान्तिकेने झाला' असं म्हणता-म्हणतानाच, श्वास जरासा अडकतोच आहे.
दुसरा भाग लिहायला चांगला स्कोप आहे :)

माझ्या आयुष्यात घडला होता. हॉलमध्ये ठेवायचा शोभेचा टेराकोटा व्हास जवळजवळ तीस वर्षांपूर्वी दिवाळी चार दिवसांवर असतांना सौ. ने मोठ्या हौसेने घरात आणला. व्हास आणल्या दिवशीच ६ वर्षांच्या चि. च्या हातातला चेंडू पडला तो थेट त्या व्हासवर. संध्याकाळी घरी आलो तर दोघांचे चेहरे रडवेले. चि. ला उचलून घेतले. त्यानेच रडत रडत काय झाले ते सांगितले. त्याला आईने मारले तर नव्हतेच पण काही बोललीही नव्हती. व्हास फुटल्यावर आई रडली म्हणून त्याला वाईट वाटले होते. फुटूंदे आपण नवा आणूयात म्हणून तिघे आईसक्रीम खाऊन आलो आणि तो व्हास हवेत विरून गेला. एक अमोल, हृद्य आठवण या भिडणार्‍या कथेतून जागी करून दिलीत. धन्यवाद.

अनिता ठाकूर 09/11/2018 - 11:44
एका स्त्रीच्या मनाची आंदोलनं अगदी नेमकेपणाने दाखवली आहेत. युगुलाच्या शिल्पात पिल्लूसुद्धा समाविष्ट करण्याचा वत्सलपणा दाद देण्याजोगाच ! एक तरल कुटुंबकथा !

Nitin Palkar 10/11/2018 - 19:07
अतिशय तरल कथा. खूप आवडली. अलीकडे ललित वाचनाच्या वाटेला फारसा जात नाही. कारण वाचून झाल्यावर अनेकदा उगाच वाचलं असं वाटतं. असं हळुवार आणि अलवार लिहिलेलं काही वाचलं की खूप बरं वाटतं.

आवाज आवाज...

सरनौबत ·
H आवाज आवाज... दिवाळी म्हटलं की भल्या पहाटे नरकचतुर्दशीला उडवलेल्या 'लक्ष्मी बाँब'चा आवाज कानांत घुमतो. आसपासच्या परिसरात अगदी पहाटेपासून उडणारे फटाके दिवाळी चालू झाल्याची वर्दी देत असतात. गेल्या सहा वर्षांपासून मी मस्कत येथे वास्तव्यास आहे. इकडे एकतर दिवाळीची सुट्टी नाही, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते शुक्रवार-शनिवारच्या वीकांताला. शिवाय इकडे फटाके उडवण्यावर बंदी असल्याने दिवाळीचा म्हणावा तसा 'माहोल' नसतो.

गुल्लू दादा 06/11/2018 - 17:46
आता 'इलेक्ट्रॉनिक स्टार्ट'मुळे स्कूटर्सच्या 'किका'टण्याची जागा अ‍ॅक्टिव्हाच्या 'खाकरण्याने' घेतलीये. हे खूप सही लिहिलंय..;)

जमली आहे. मुंबईत दुचाक्यांचे आवाज जवळजवळ नव्हतेच. मात्र इमारतीतल्या जवळजवळ प्रत्येक घरातून सतत चालू असणार्‍या पंख्यांचे ़खस्स खस्स हवा कपणारे आवाज त्यात चालू-बंद होणारे काही वातानुकूलन यंत्रांचे आणि फ्रीजचे घुसमटलेले आवाज मिसळून एक पार्श्वसंगीत २४ तास चालू असते. या आवाजात गाण्यातले काही स्वर कमी ऐकू येतात. थंडीची लाट आली की हे सारे आवाज गायब झाल्यावर हे आवाज होते हे कळते. लेखातून वाचकांच्याही आवाजांची दुनिया जागविलीत. धन्यवाद

किल्लेदार 08/11/2018 - 12:03
पूर्वी पुण्यातल्या सायकलींची मंजुळ आणि आदबशीर किण-किण कानी पडायची (त्यात अरे मित्रा जरा वाट देतोस का असा भाव असे). आता मात्र मोटरसायकलींचे भसाडे आणि गुर्मी असलेले हॉर्न्स कानावर आदळतात तेव्हा उगाच मस्ती आलेल्या अश्यांच्या कानाखाली एक मोठ्ठा आवाssssssssज काढावासा वाटतो. बाकी लेख चोक्कस !!!

In reply to by किल्लेदार

सरनौबत 11/11/2018 - 10:54
तरी आता विचित्र हॉर्न्स वर बंदी आहे ते बरंय... अनेक शौकीन लोकांनी अतिशय विचित्र आवाजाचे हॉर्न्स लावले होते पूर्वी

मित्रहो 08/11/2018 - 20:04
बरेच आवाज आता नाहीसे झाले आणि नको ते आवाज निर्माण झाले. बोअरवेलचा आवाज भयंकर कंटाळवाणा असतो. लहानपणी आमच्या गावात रस्ते नव्हते. अशा वेळेला गावात ट्रक आल्यावर पोरं ज्या प्रकारे ठेला आला असा आवाज देत होते ते आजही लक्षात आहे. छान लेख

खूप छान लिहिलं आहे. एप्रिल मे मध्ये होलसेल मध्ये धान्य घेऊन ते निवडून, पाखडून, ऊन दाखवून साठवून ठेवायची पद्धत होती. त्या3-4 दिवसातला पाखडण्याचा आवाज, तिखट कुटून घेतानाचा आवाज अजूनही आठवतो. खूप आवडायचा मला तो आवाज. लेख मस्तच जमलाय

In reply to by ज्योति अळवणी

सरनौबत 11/11/2018 - 10:49
धन्यवाद ज्योती. माझं आजोळ पुण्यापासून ५० किमी वर असलेलं भोर... तिकडे बाजारपेठेत मसाले कुटण्याचा 'डंक' होता त्याचा आवाज तुमच्या प्रतिक्रियेमुळे कानांत घुमला

माहितगार 10/11/2018 - 20:54
खुसखुशीत लेख आवडला. काही प्रतिसादातील आवाजांच्या आठवणीही रोचक. या लेखावरुन आठवले माझ्या परदेशीच्या सुरवातीच्या काही महिने रात्री एका आवाजाच्या अबसेन्समुळे झोप लागत नव्हती, तो मिसलेला आवाज रस्त्यावरच्या कुत्र्यांचा होता ! :)

विनिता००२ 13/11/2018 - 15:09
सकाळी सकाळ्ळी आमच्या इथे खालील प्रमाणे आवाज येत असतात :) सगळ्या लेडीजच पण...पुरुषांचे आवाजच नाही येत ;) खाली रहाणारे...वरच्यांना... "ये प्राचीऽ..." प्राची घरात...परत काही वेळाने... "ये प्राचीऽ..." प्राचीची आई गॅलरी.. "काय ओ?" "टाकी भरली वाट्टं!" "हा हा...(घरात बघून...ओऽ नळ बंद कराऽऽऽ" ) जातो बिचारा पळतच खाली...नळ बंद करुन पळतच वर! :) मग समोसेवाला येतो......"स....म्मोसे गर्रमऽ" हा समोसेवाला दिवसातून तीन वेळा येतो. दुपारी बटाटे, कांदे विकणारे टेपो येतात. "कांदेऽ १०० ला पाच किलोऽ"

एमी 20/11/2018 - 11:06
छान लिहिले आहे. > आमच्या लहानपणी क्वचित डुकरांचा आवाज आणि मागून कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं ऐकू यायचं. मग आम्हा पोरांच्या उत्साहाला पारावार राहायचा नाही. डुक्कर पकडणारे लोक कुत्र्यांना डुकरांमागे सोडून दोरीच्या फासात पकडताना बघायला अतिशय थ्रिल वाटायचं. मात्र पकडल्यानंतर तोंड बांधताना डुकरांचं विव्हळणं मात्र ऐकवायचं नाही. > फॅन्ड्री?

तिमा 21/11/2018 - 08:45
मी शांतताप्रिय असल्याने, निवृत्त झाल्यावर, मुंबई सोडून एका शांत ठिकाणी रहायला गेलो. तिथे गेल्यावर हे लक्षांत आले की सर्वच व्हॉल्युम्स आता अर्ध्यावर ठेवावे लागतात. इतकंच काय तर, घरांत बोलतानाही सुरवातीला आपण उगाच मोठ्या आवाजात बोलतोय, हे लक्षांत आले. त्यानंतर, कमी आवाजात बोलण्याची संवय लागली. आजुबाजूच्या निसर्गातले , बारीक सारीक आवाजही स्पष्ट ऐकू यायला लागले! एकुणांत, आयुष्यच काय, मनही शांत झाले.

जेडी 25/11/2018 - 12:25
बागेतले आवाज रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सोनूचा डबा ,तिला शाळेत घालवून सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते . तिथे उभे असणारे हसण्याचे नाटक करत असतात पण बाहेर चालणाऱ्याना त्यांच्या कडून पाहून खूप हसू येते त्यांचे ते कृत्रिम हसे पाहून बाकीचे बाहेरचे खूप हसत असतात . त्यांच्या हसण्याचा आवाज येत राहतो . परवा एक छोटी आपल्या आजोबांबरोबर आलेली होती . आजोबा तिला थोड्या पुढे असणाऱ्या मुलांच्या खेळाच्या जागेकडे नेवु पाहत होती तर ती हट्टुण पुढे पाय उचलत नव्हती . आजोबा म्हणत होते , "झोपाळ्यावर नाही बसायचे तुला बाळ ?" ती," मला हसायला जायचे आहे". मज्जाच वाटली तिचे हे उत्तर ऐकून . आजोबांचे वय लहान होवू पाहत होते आणि तिला मोठे होण्याची घाई लागली होती इथून पुढे खऱ्या अर्थाने चालणाऱ्याच्या पायाचे "झपझप " आवाज ऐकू येवू लागतो कारण हा रस्ता उताराचा आहे . . शूज घालून चालणाऱ्या पेक्षा धावणाऱ्या माणसांच्या शूज चा खूप आवाज येत असतो . आता बाग वळण घेते . त्या कोपऱ्यावर बच्चे कंपनीची जागा आहे . तिथे सी सा , घसरगुंडी , झोपाळे आणि बरीच खेळणी आहेत . मग झोके फिरतानाचा "करकर "आवाज येत असतो आणि त्या बरोबर कोणी मजेने हसत असतो तर कोणी घाबरून "स्सस " असा आवाज काढत असतो . कोणी आनंदाने ओरडत असतो . कोणी छोटी मुलं जबरदस्तीने झुल्यावर बसवली कि हे "भोकाड " पसरून, शिरा ताणून रडत असतात . सी सा वर मुलं खेळत असली कि जोरात एक बाजू टायर वर आपटून "फट फट " असा आवाज येत असतो . घसरगुंड्या -त्यावर पण एक "सुस्स्स " असा आवाज येतो अ. आणि त्या नळयासारख्या घसरगुंडीवरून कोणी आले की त्या नळ्या वाजतात त्याचाही एक आवाज येतो . तो हि आवाज मला शब्दात पकडता आला नाही . पण तो गडगड आवाज म्हणता येयील . तिथून पुढे बागेच्या रस्त्याला चढ लागतो , आणि बागेत हिरवळीवर टाळ्या वाजवत बसलेले बरेच असतात . कोणी प्राणायाम करत असतो . त्यांचा नाकाने जोरजोरात श्वास सोडणे चालू असते . फूस फूस असा आवाज त्याचा येत असतो . तिथून पुढे काही जणांनी ओमकारचा नाद लावलेला असतो . रस्त्यावर चालणारे आता चढाला चालत असतात . मग दमून ते सॉय सॉय आवाज काढत असतात . मधून त्यांचा चपलांचा घासाल्याचा आवाज येत असतो . काहींचा वेग मंदावतो मग संन्त आवाज येत राहतो . तिथून पुढे एक ओहळ आहे . तिथे एक बाकडे आहे . तिथे त्यावर एखादे जोडपे बसलेले असते . इतक्या हळू आवाजात ते कुजबुजत असतात आणि आपल्याच धुंदीत मग्न असतात . घरात काही बोलायला मिळत नसेल म्हणून इथे येवून त्यांची लाडिक गुफ्तगू चालत असेल . पुढे पुढे एक धबधबा येतो . त्याचा धबधब आवाज येत असतो . त्यात बरेच कावळे भिजून पंख फडफडवत असतात , त्यांच्या पंखाचा फडफडण्याचा आवाज येत असतो . मधेच काव काव करत असतात . धबधब्याशेजारी बच्चे कंपनी खूप असतात . त्यांचा त्यात उतरण्याचा प्रयत्न असतो . मग मजेत भिजत खळाळणारे पाणी अडवतात आणि फुर्र करून सोडून देतात . तेच पाणी पुढे छोट्या तलावात साठवलेय , तिथेही ही बच्चे कंपनी पण थोडी मोठी (१२ -१३ वर्षाची ) छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यात हे पाणी भरून पुन्हा खाली सोडतात . त्याचा टप टप आवाज येत राहतो आणि पाण्यावर तरंग उमटतात . मध्येच बाहेरून जाणाऱ्या एखाद्या बसचा आवाज येतो , एखद्या स्कूटरचा . धबधब्याच्या थोडे पुढे म्हाताऱ्या बायकांचा एक अड्डा बसलेला असतो ,अगदी कासटा घातलेल्या ह्या आज्ज्या यायाम , सुना , नातवंडे , पोरं , दुखणी भानी ,डाकदर ह्यावर मनसोक्त गप्पा मारत असतात . जवळच खेळणाऱ्या नातवंडावर लक्ष ठेवून असतात . तिथेच जवळ काही दोरीवर उड्या मारणारे असतात . त्याचाही एक वेगळाच आवाज येत असतो . काही सुगावत्या सूर्याकडे पाहून मंत्र पुटपुटत असतात . मधेच चिमणी चिवचिवत असते . अगदी छोटी चिमणीसारखी दिसणारी चीरचीरत असते . मधुनच कोकीळ कुहूकुहू करत असते . मधेच बसायला असणाऱ्या छपराखाली काही हास्य क्लब वाले हाहू हेहे करत उड्या मारत असतात . अजून खूप सारे पक्षांचे आवाज येतात पण ते मला शब्दात बसवताच येत नाहीत . आता बागेचा राउंड संपतो . बाहेर आल्यावर नारळ वाला खापखाप नारळ फोडून पाणी देत असतो , त्यांचे रेट सांगत असतो. मध्येच एखाद्या लहान मुलाने नारळ मागितलेला असतो. आई बाबा नको म्हणत असतात . मग त्याचे भोकाड पसरलेले असते . पुढे कसले कसले रस विकणारा असतो. तो बाटल्यातून रस ग्लासात ओतत असतो . तो ओतन्याचाही एक आवाज असतोच.

नमकिन 28/12/2018 - 08:46
फोडणी आवाज व पाठोपाठ शिंकांचा, सकाळी/संध्याकाळी. बाळ/बाळंतीण ला आंघोळ घालताना कढवलेल्या तेलाचा. बंब/शेकोटीच्या सरणांचा जळताना. उंदीर मामा कुरतडत असताना. कचरा ढकलगाडी चाकाचा. खराट्याने झाडून स्वच्छ करताना चार. शाळेच्या बस/व्हॅनचा भोंगा. वरच्या मजल्यावर टेबल, खुर्ची, गॅस सिलिंडर ओढताना. पोटातली गुरगर.........

नमकिन 28/12/2018 - 09:09
फोडणी आवाज व पाठोपाठ शिंकांचा, सकाळी/संध्याकाळी. बाळ/बाळंतीण ला आंघोळ घालताना कढवलेल्या तेलाचा. बंब/शेकोटीच्या सरणांचा जळताना. उंदीर मामा कुरतडत असताना. कचरा ढकलगाडी चाकाचा. खराट्याने झाडून स्वच्छ करताना चार. शाळेच्या बस/व्हॅनचा भोंगा. वरच्या मजल्यावर टेबल, खुर्ची, गॅस सिलिंडर ओढताना. पोटातली गुरगर......... सर्व बिछान्यावर पहुडलेल्या अवस्थेत असतानाच ऐकू येतात.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ...

Jayant Naik ·
H प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ... पुरुष जरा मूर्खच असतात की काय कोण जाणे? पण आव काय आणतात, जणू काही साऱ्या जगाचे ज्ञान यांनाच आहे! आणि स्वतःबद्दल किती फाजील आत्मविश्वास? जरा दोन-तीन मुलींनी यांच्याकडे एकदादोनदा हसून पाहिले की हे एकदम आकाशात! अविनाशने मला प्रपोज करावे? मला.. आसावरी देशमुखला? माझे समाजातील स्थान काय? त्याचे काय? माझे बाबा बँकेत एवढे मोठे ऑफिसर! पाषाणला आमचा खूप मोठा बंगला आहे.

नाखु 08/11/2018 - 17:30
आनंदी शेवट असलेल्या कथा वाचतोय असा भास असतानासुद्धा आवडली. याच धर्तीवर शहाणी सकाळ नावाची शन्नांची एक कथा आहे,ती मला प्रचंड आवडते

In reply to by गामा पैलवान

Jayant Naik 09/11/2018 - 08:48
येवढ्या मोठ्या माणसाशी माझी तुलना नको. खरे म्हणजे मी माझ्या पद्धतीने लिहितो . आपल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार .

In reply to by Jayant Naik

शशिकांत ओक 09/11/2018 - 10:10
पुरुष खरेच मूर्ख असतात. पण आम्ही बायकासुद्धा काही पुरुषांपेक्षा कमी नसतो, हेच खरे.
बायकांची वन अपमनशिप भावली...

Ganesh Dwarkanath Mhatre 12/11/2018 - 18:07
कथा खूपच छान आहे सुरुवातीपासून अगदी शेवट प्रयन्त न थांबता वाचली. अविनाश, आसावरीला मुतोड जवाब देईल असे वाटले होते, असो ...कथा आवडली

एमी 18/11/2018 - 16:01
छान. आता पुढचा भाग येऊद्या. सात वर्षांच्या खाजेनंतर: आसावरीची कभी अलविदा ना कहना मधली राणी झालेली असते, मोहनचा ब्रोकबॅक माऊंटन मधला जेक गिलेनहल झालेला असतो वगैरे ;)

Jayant Naik 20/11/2018 - 16:29
सर्व मिपाकरांना माझी कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल आभार. कथेत काही उणे अधिक असणारच . पुढच्या कथेच्या वेळी सुधारणा करायचा जरूर प्रयत्न करेन.

शाम भागवत 05/01/2019 - 14:50
कथा आवडली. मस्तच आहे. कोणीही चुकीच्या मार्गाने जात असता, काही कारणाने योग्य मार्गावर आला की डोळे भरून येतात. मग हा प्रकार गोष्टीत का असेना.

In reply to by शाम भागवत

Jayant Naik 11/01/2019 - 21:43
आपले म्हणणे योग्य आहे ..पण आज काल योग्य मार्गावर चालणे म्हणजे भाबडे पण आहे असे अनेकांना वाटते. मग कथा अपेक्षित शेवटाकडे जाते आहे असा आक्षेप पण होतो. असू द्या. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

चौथा कोनाडा 12/05/2023 - 18:04
छान कथा. आवडली.

💖

टिपिकल प्रेम त्रिकोण, पण लेखन शैली सुंदर असल्याने रंगत गेली. सतत "स्टेटस"चा विचार करणारी आसावरी कशी बदलते याचं छान चित्रण केलंय !