Skip to main content

दिवाळी अंक २०१८

ग्राहकहिताय सद्रक्षणाय

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H ग्राहकहिताय सद्रक्षणाय

आमचे पहिले, स्वतःचे घर बुक केले ते ७ जुलै १९८६ला. माझ्या नावावर. तोपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विरारला, पार्ल्याच्या परांजपे बिल्डर्सच्या, सेंट्रल पार्क या प्रोजेक्टमध्ये. अर्थात वन रूम किचन. किंमत कागदोपत्री रुपये ८७,०००/- + आणि ब्लॅकचे रुपये १८०००/- फक्त.

सुषुम्ना

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H सुषुम्ना स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द थुई-थुई पिसारू लागताच भानावर ये. भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ नेटाने टंकत जा पुढे मग दोन रस्ते हाकारू लागतील पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे) दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम) भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर परज पहार सर्जनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला तसू तस

गवत्या

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H गवत्या जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या होत्या आणि त्याखाली घंटांचा, घुंगरांचा ढीग होता.

गुलाब पाक

लेखक जुइ यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H गुलाब पाक दिवाळी पहाट असावी, वातावरणात गुलाबी थंडी असावी. अभ्यंगस्नानाची लगबग चालू आहे. सुगंधी तेल, उटणे आणि साबण यांचा वास घरात दरवळत आहे. जोडीला खास असे अत्तरही आहे. या सर्व सुगंधांबरोबरच काही गोड खायला मिळाले तर काय बहार येईल नाही? तर मग जाऊ या थोडे लांब... तिकडे कच्छ गुजरातमध्ये. अं... गोंधळलात? कच्छमध्ये काय आहे? प्रसिद्ध असे विशाल कच्छचे रण आहे, मिठागरे आहेत, सुबक सुंदर अशी जैन मंदिरे आहेत आणि हो, विसरून कसे चालेल?

घात

लेखक चॅट्सवूड यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H घात "मला वाच...." सोमनाथ एवढंच म्हणू शकला, मग तो खोकू लागला. मला वाच... का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं? सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली. त्याच्या आईने त्याला पाणी दिलं. तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला. खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या. गालफडं बसली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या. केस गळून पडले होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.

जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are

लेखक मीअपर्णा यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are "यंदाचं आपल्या स्कूल डिस्ट्रिक्टचं OBOB बहुतेक रद्द होईल..." जेनी, माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहीत असेलच." "नाही अजून" मी पुटपुटले.

ते आपलेच असतात...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H ते आपलेच असतात... त्यांना माहीत असतात, आपले दुखरे कोपरे! आणि कोपऱ्यातील लपलेले घाव... त्यांना माहीत असतात, आपल्या मनाचे कप्पे! आणि कप्प्यांतील सुकलेले भाव... म्हणून जास्त जखमा करणारे... ते आपलेच असतात! आणि जखमेवर मीठ चोळणारे... ते आपलेच असतात! परक्यांना काय माहित... आपले हळवे कप्पे अन् कोपरे? आपल्या जखमांची खपली काढणारे... ते आपलेच सगे अन् सोयरे! मना तू आपला-परका भेद करू नकोस... आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस... कारण परक्यांसारखे भासणा

क्षण कण कण..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H क्षण कण कण.. काळोखाची चाहूल, एकांडा पक्षी, घरट्याच्या शोधात. बहराशी फटकून, शिशिराच्या आठवणीत, निष्पर्ण चिनार. निजल्या आसमंतात, एकुलती जाग, कोणत्याशा खिडकीत. विस्मृत समाधी, सभोवताल पाचोळा, सुकलेला फुलोरा. आकाशाचा भरवंसा, समुद्राच्या साथीने, गलबताचा प्रवास. एकुलता सोबती, लवलवत्या चितेचा, नि:शब्द नदीकाठ. म्हातारपण थकतं, एकाकी शांतता, आठवणी धुरकट. धडाडते आगगाडी, अंधाराला चिरत, क्षणासाठी उजळत. चकाकत्या इमारती, मोडक्या घरकुलाशी, फटकून, तुटक. विझलेली

क्रॅश लँडिंग

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H क्रॅश लँडिंग त्याचं असं झालं की काही दिवसांपूर्वी हिच्याबरोबर ह्युस्टनच्या एका मॉलमध्ये शॉपिंगला गेलो होतो. हिला काहीच घ्यायचं नव्हतं, निदान घरून निघताना तरी तसं ती म्हणाली होती. मला एखाद दोन शर्ट्स, मिळाल्यास जीन्स वगैरे घ्यायची इच्छा होती. हिला जरी काहीही घ्यायचं नव्हतं, तरी स्त्रियांच्या कपड्यांच्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्यातून तिसऱ्यात भर दुपारच्या उन्हात हिचं फिरणं चाललं होतं आणि माझी फरपट.

मेजर मार्टिनचे युद्ध

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 06/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
H मेजर मार्टिनचे युद्ध

मार्च १९४३च्या पुढेमागे युरोपामधले दुसरे महायुद्ध ऐन भरामध्ये होते आणि अजूनही दोन्ही पक्ष समबल आहेत असे वाटत होते. जर्मनीची सोविएत संघाच्या प्रदेशात मुसंडी ओसरू लागल्याची कोणतीच खूण दिसू लागली नव्हती. त्या फेब्रुवारीमध्ये स्तालिनग्रादच्या लढाईत जर्मन सैन्याला पराभवाला तोंड द्यावे लागले होते, पण मार्चमध्ये तिसर्‍या खार्कोवच्या लढाईमध्ये रेड आर्मीला खार्कोव शहर गमवावे लागले होते.