तो माझा सांगाती..
हिमालय. त्याचं वेड लागतं.
प्रत्येक ऋतूगणिक लोभस ते रौद्र अशी वेगवेगळी रूपं धारण करणारं, ते एक वेगळं आणि सुंदर असं जग आहे. ज्ञात-अज्ञात शिखरं, वळत वळत, स्वत:भोवती गिरक्या घेत जाणारे रस्ते, घनदाट जंगलं, आपल्या मस्तीत वाहणारे जलप्रवाह, हिरव्यापिवळ्याकरड्या शेतपायर्या, बर्फ, पठारं, गुरफटून टाकणारे ढग आणि धुकं, मनात येईल तिथे उगवणारी फुलं, दूर दूर उगवलेली, आजूबाजूच्या निसर्गाशी एकरूप झालेली एकांडी घरं.