
सारण -

आता मैद्यात पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करा. त्यातही चिमूटभर मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स घाला. कढईत तेल तापत ठेवा. प्रत्येक मिरचीत हे सारण घट्ट दाबून भरा. सारण भरलेल्या मिरच्या -

ही मिरची आधी मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवा. ही मिरची बाहेरून खूप गुळगुळीत असते, त्यामुळे परत ती पेस्टमध्ये बुडवून परत बेडच्या चुर्यात घोळवा. तळा आणि टोमॅटो केचपबरोबर खा. नेहमीचंच सारण न भरता दुसरं सारण वापरल्याने याची टेस्ट आणखी छान लागते. मूळ रेसिपी मागे कधीतरी नेटवर पाहिली होती. आता त्यात घरातल्यांच्या आवडीनुसार हवा तसा बदल करून हा मिरची वडा केला आहे. पाहा तुम्हाला कसा वाटतो ते.

पाककृती २ - चीझी मॅट /लहरिया सामोसा साहित्य - सामोशाच्या आवरणासाठी - २०० ग्रॅम मैदा, २ टेबलस्पून तेल, चवीपुरतं मीठ, चिमूटभर ओवा, आवश्यकतेनुसार पाणी. सारणसाठी - वरीलप्रमाणेच, म्हणजे प्रत्येकी १ कांदा, ढब्बू / सिमला मिरची, टोमॅटो, ५० ग्रॅम स्वीट कॉर्न, ८-१० लसणीच्या पाकळ्या, २ हिरच्या मिरच्या,पनीर २ इंच चौकोनी तुकडा, चीज हवे तेवढे, ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स - आवडीनुसार, तळण्यासाठी तेल. कृती - पहिल्यांदा मैद्यात कडकडीत तेलाचे मोहन घाला. हे मिश्रण चमच्याने एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा घालून चांगले एकत्र करून घ्या. मैदा थोडा रवाळ दिसू लागतो आणि मुटका होतो सहज मुठीत घेतला तर. असं झालं म्हणजे आपलं मोहन नीट आहे आणि सामोसा नक्की खुसखुशीत होणार. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवा. वर दिल्याप्रमाणे सारण करून घ्या. आता मॅट सामोसा करताना मैद्याची मोठ्या लिंबाच्या आकाराची गोळी घेऊन तिची लांबट पोळी लाटा. ती मधून कापून मग अधिक + असा आकार होइल असे तिचे दोन भाग एकावर एक ठेवा. मध्ये सारण घाला आणि एका बाजूची घडी त्यावर नीट बसवा. गरज लागली तर पाण्याचं बोट फिरवा, म्हणजे नीट चिकटेल. तशीच दुसरीही बाजू चिकटवा. उरलेल्या दोन बाजूंना सुरीने चिरा पाडा आणि एकदा एका बाजूची पट्टी मध्यभागावर बसवा आणि नंतर दुसर्या बाजूची पट्टी त्यावर आडवी बसवा. अशा तर्हेने त्या सामोशाचं चटईसारखं डिझाइन तयार होईल. हा झाला मॅट सामोसा. मी खाली सर्वसाधारण कल्पना यावी म्हणून एक कोलाज देतेय. आत मॅट सामोसा आणि लहरिया सामोसा दोन्ही कसे केले ते आहे.
लहरिया सामोसा करताना पहिल्यांदा अशीच लांब पोळी लाटून तिचे मधून दोन भाग करायचे. एका भागाला अशाच चिरा द्यायच्या आणि त्यावर दुसरा प्लेन भाग पाण्याने नीट चिकटवायचा. आता नेहमीच्या सामोशासारखा त्याला आकार देऊन सारण भरा आणि चिकटवा. या सामोशाला वरून आडव्या पट्ट्यांचं डिझाइन दिसतं. हा लहरिया सामोसा.
आता हे सामोसे नेहमीप्रमाणेच तेल तापवून घेऊन मग मंद आचेवर सावकाश तळा.
मॅट/लहरिया सामोसा तयार आहे.
अतिशय खुसखुशीत आणि सुंदर सामोसे झाले हे. यात सारण वेगळं असल्याने नेहमीच्या पुदिना चटणी किंवा चिंचगुळाच्या चटणीबरोबर न देता टोमॅटो केचपबरोबरच दिलं मी.
आमच्या घरात तरी मिरची वडा छान झाला की सामोसा यावर दोन तट पडलेत. तुम्ही पाहा आता तुम्हाला कसं वाटतंय ते.

दिवाळी अंक वर्ष
वाचने
20332
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही पाकृ. आवडल्या.
त्या भरलेल्या मिरच्या कसल्या
दोन्ही पाकृ मस्तं आहेत. फोटो
मस्त..
हे सगळं भारी वगैरे आहेच, ते
भारी!!
तोंपासु
मस्त
काय फोटो !!
दोन्ही पा.कृ. मस्त दिसत आहेत...
आहाहा
मस्तच! दोन्ही प्रकार जबरदस्त
@ सविता००१ ,
धन्यवाद
In reply to @ सविता००१ , by अनिंद्य
धन्यवाद
In reply to @ सविता००१ , by अनिंद्य
मस्त पाकृ.
गजब!!
आहाहा....दोन्ही प्रकार केवळ
दोन्ही प्रकार भारी