मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१८

राधा पुन्हा निघाली..

कलम ·
H राधा पुन्हा निघाली.. आयुष्य खर्च झाले कर्मास न्याय द्याया कर्तव्यपूर्ती केली वचनांसवे दिलेल्या दृष्टी अधू तरीही नजरेत आस वाहे कान्हा तुझ्याचसाठी देहात प्राण आहे शरीरात त्राण नाही, गात्रे शिथिल झाली कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली.. कानांत रोज घुमती ते बासुरीचे सूर स्वप्नांत पाहते ती मनमोहना स्वरूप स्वर्गीय रासलीला धुंदीत आज वाहे पटलावरी स्मृतींच्या अजुनी जिवंत आहे क्षण ते पुन्हा जगाया, इच्छा अगम्य झाली कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली.. ही द्व

११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

हेमंतकुमार ·
H ११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात.

संपादकीय : लिबर्ते

आदूबाळ ·
H मराठीत आज ‘वाचायला’ म्हणाल तर चिक्कार लेखन उपलब्ध आहे. त्यासाठी मायबोली, मिपा, ऐसी यांसारख्या संस्थळांकडेच जायला हवं असं नाही, तर फेसबुकवरही बरंच चांगलं मराठी लेखन अस्तित्वात आहे. याचं श्रेय कोणाला द्यावं हा जरा वादाचा विषय आहे.