✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते पंधरा लाख !

स
सुधीर मुतालीक यांनी
Mon, 06/04/2018 - 16:14  ·  लेख
लेख
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65339 वाचन

💬 प्रतिसाद (264)

प्रतिक्रिया

मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/07/2018 - 13:53 नवीन
मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी राजांची कारकीर्द वयाच्या सोळाव्या वर्षी चाली झाली असं मानलं तर मोदीची कारकीर्द काही २०१४ ला चालू झालेली नाही ना ? मग मोदीला चार वर्षे मिळाली असे म्हणण्यात काय अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जरा संदर्भ..

चिगो
Fri, 06/08/2018 - 16:07 नवीन
आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे.
जरा संदर्भ देता का ह्या माहितीचा? सवाल नोकरीचा आहे, म्हणुन विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

Civil services marks may not be sole criteria for cadre allocati

गामा पैलवान
Fri, 06/08/2018 - 20:29 नवीन
https://www.hindustantimes.com/india-news/govt-plans-allocation-of-services-to-upsc-qualifiers-after-foundation-course/story-0vtZgvTPPkPX0S6OqfNTNP.html -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

जास्त काही बोलत नाही..

चिगो
Wed, 06/20/2018 - 12:44 नवीन
सरकारच्या नितींबद्दल अभिप्राय देतांना सरकारी नोकरावर जी बंधनं असतात, त्यांच्यामुळे फार काही बोलत नाही. पण जर खरोखरीच हा निर्णय अंमलात आला, तर पारदर्शी आणि Merit-based recruitment/ selection जो सद्यस्थितीतील नागरी सेवा परीक्षांचा पाया आहे, त्याचे प्रचंड खच्चीकरण करणारा असेल. ह्या विषयावर इंतरनेटवर भरपूर चर्चा-चर्वण उपलब्ध आहे. ह्या लिंकमधेपण बघू शकता. काही गोष्टी ज्या राजनितीपासून दूर असायला हव्यात, त्यात नागरी अधिकारी प्रकर्षाने असावेत, असे माझे मत आहे. मी जरी सरकारसाठी काम करत असलो तरी मी नेत्यांसाठी काम करत नाही. सरकार आणि पार्टी ह्यातील फरक सगळ्याच पार्ट्यांना, त्यांच्या पदाधिकार्‍यांना आणि समर्थकांना कळालाच पाहीजे, else we are moving towards the Spoils system, which is not the best thing to have in such such a diverse nation as India. बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भारत देश , पन्तप्रधान पद व मोदी

चौकटराजा
Tue, 06/05/2018 - 17:51 नवीन
१. भारत देश हा सन्घराज्य ( संघाचे राज्य नव्हे ! नाहीतर..... ) प्रकारचा देश आहे. यात प्रधानमम्त्री हा आपण नागरिक समजतो तेवढा तो सामर्थ्यवान पदावर बसलेला मानव नव्हे . २.सबब सर्व यश वा अपयश याचा धनी ना प्रधान मंत्री , ना मुख्यमंत्री , ना राज्यपाल . ३. राजकीय पदाच्या या मर्यादा माहित असून , भारताची प्रसासनं व्यवस्था सडलेली आहे हे माहित असून मोदी यानी अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे ... तरीही इतर प्रधान मन्त्र्यापेक्षा त्यांच्याकडे निर्णय क्षमता व भाषा चातुर्य व लोकांची भाषा बोलण्याचे कसब असल्याने त्याना २०१९ मध्ये पुरते निश्प्रभ करणे कठिण आहे .
  • Log in or register to post comments

अतिरेकी आशावाद निर्माण

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 18:40 नवीन
अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे लोक चमत्कारालाच नमस्कार करतात हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. हा आशावाद निर्माण केला नसता तर भाजपचे सरकार आलेच नसते हि पण वस्तुस्थिती.

लोकांना स्वतः काहीही करायचे नसते

( नोटबंदी नंतर किती लोक प्रामाणिकपणे कर भरू लागले आणि किती लोक कायद्याच्या बडग्यामुळे कर भरू लागले हा अभ्यास-कुणी केला तर-- सुरस आणि चमत्कृती पूर्ण असेल)

पण आपल्यासाठी बलिदान देणारा हुतात्मा मात्र हवा असतो.

असा हुतात्मा जो स्वतः साठी काहीच मागत नाही आणि ज्याला आगा पिच्छा काहीच नाही तो श्री मोदींच्या रूपाने मिळाला. तेंव्हा आता मी काहीच करणार नाही जे काही करायचे ते

"श्री मोदींनीच"

केले पाहिजे. अन्यथा मोदी काय करतात? फेकू आहेत. त्यांना पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत अशा क्षुद्र तर्हेच्या टीका लोक सहजा सहजी करताना आढळतात. तोंडाला येतील अशी वक्तव्ये याच धाग्यावर दिसत आहेत. कायद्याची किंवा प्रक्रियेची कोणतीही माहिती किंवा ज्ञान नसताना मुक्ताफळे उधळायचे फक्त येते आम्हाला.

पटापट लोकांना बेड्या ठोकायच्या? कशा ठोकायच्या हो?

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या २ जी घोटाळ्यातील( जेथे सकृतदर्शनी स्पष्ट पुरावा आहे) आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत तर जेथे सरकारला "फक्त माहिती" आहे अशा केसेस मध्ये कसे काय पटापट बेड्या ठोकणार हो. नट चुडामणी "श्री संजय दत्त" यांच्या कडे "१९९३" मध्ये ए के ५६ हि रायफल सापडली इतका स्पष्ट आणि सबळ पुरावा असूनही आणि टाडा कायदा लावूनही त्यांना शेवटी २१ वर्षांनी २०१४ मध्ये तुरुंगवास झाला. ते बाहेर २०१६ मध्ये आले आणि आता त्यांच्या सत चरित्रावर सिनेमा हि निघाला. तो भरपूर चालेलही. अशी आमची सदगुणी जनता. आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ मोदींसारखा निस्वार्थी नेता असावा अशी आमची लायकीच नाही हेच खरं. काय बोलायचं?
  • Log in or register to post comments

बाकी सगळे ठीक आहे पण

विशुमित
Tue, 06/05/2018 - 19:20 नवीन
बाकी सगळे ठीक आहे पण निस्वार्थी वगैरे जरा जास्तच वाटले. लोकांची लायकी काढणं हे तर आणखी अतीच. सं.मं. कृपया खरे ना थोडी समज द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

समज कशाला

ट्रेड मार्क
Tue, 06/05/2018 - 20:18 नवीन
समज कशाला कारवाईच करायला सांगा. असे कसे मोदींच्या बाजूने बोलतात? मोदी कसे निस्वार्थी असतील? एवढे सतत परदेशात मजा मारायला जातात, एकटे एवढ्या मोठ्या आलिशान निवासात राहतात, आलिशान गाड्यांमधून हिंडतात, मग कसले निस्वार्थी? साधी निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासनं पण पाळत नाहीत. प्रत्येकी १५ लाख देण्याचं वचन दिलं होतं, आमच्या घरात ६ लोक असल्याने ९० लाख मिळणार म्हणून मी एक घर घेऊन टाकलं. पैसे तर नाहीच मिळाले वर नोटबंदी आणि रेरा सारखा कायदा करून घराच्या किमती कमी करून टाकल्या. किती नुकसान झालं माझं म्हणून सांगू. अजून कुठल्यातरी अडाणी माणसाला माझ्याच घरातला आहे असं सांगून जास्तीचे १५ लाख मिळवून कोट्याधीश व्हायचं स्वप्न होतं माझं, तर यांनी आधार सक्तीची घोषणा करून टाकली. अश्या कितीतरी स्वप्नांचा चुराडा करून टाकला या माणसाने आणि म्हणे निस्वार्थी! स्वस्ताई आणू म्हणून म्हणाले होते, पण पेट्रोलचे भाव बघा. इथे आठवड्यातून एकदा चांगल्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जाणं, दोन आठवड्यातून एकदा मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा आणि विकांताला मित्रांबरोबर पार्टी या सगळ्याला गाडी घेऊन जाणं परवडेनासे झाले आहे. पेट्रोलवर एवढा कर लावून सगळे पैसे स्वतःच्या खिश्यात भरत आहेत. जागतिक बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून काय झालं? सबसिडी का देत नाहीत? दुसरीकडे म्हणे भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आमच्या दारावर भाजी घेऊन येणारा भाजीवाला अजूनही चढ्या भावानेच भाजी विकतोय. त्याला का नाही हे सरकार नियंत्रणात आणत? वर "अशी आमची लायकीच नाही हेच खरं" असं लोकांना उद्देशून म्हणतात? कसं बरं सहन करावं आम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

छान . हं !

manguu@mail.com
Tue, 06/05/2018 - 20:39 नवीन
घराच्या किमती कमी झाल्या म्हणे . कुठे हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

बरं, तुम्ही म्हणताय तर

ट्रेड मार्क
Tue, 06/05/2018 - 21:57 नवीन
बरं, तुम्ही म्हणताय तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या. मग अगदी वृत्तपत्रांनी अशी बातमी दिली असेल तरीही. बातमीत सांगितलेल्या उर्वरित दोन गोष्टी मुद्दाम लिहिल्या नव्हत्या कारण मग चर्चेची दिशा बदलून जाते. उगाच तुमच्या भावना दुखवायला नको, नाहीतर कारवाई व्हायची. आणि हो तुम्हाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील तर माफ करा बरंका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

छान

manguu@mail.com
Tue, 06/05/2018 - 22:10 नवीन
विविध वेबसाईटॉवर घरांच्या किमतीचे ग्राफ असतात, ते कुठेही फार मोठा फॉल दाखवत नाहीत. अमुक एक फ्लॅट पूर्वी 10 लाखाला होता , आता 9 लाख आहे , असे कुठे असेल तर सांगा दिल्लीतील किमती 6 वर्ष ढासळत आहेत , असे त्या बातमीतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

लोकांची लायकी काढणं

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 20:50 नवीन
लोकांची लायकी काढणं कुठे हो आणि कुणाची लायकी काढली? समज द्या कि पण व्यवस्थित, चूक काय आहे ते दाखवून. हे उगाच "त्याने मला मारलं" म्हणून रडारड करून काय फायदा? माझी चूक असेल तर मी क्षमा मागायला अजिबात लाजत नाही किंवा "इगो" सुद्धा होत नाही. जाता जाता-- ते तुम्हाला काय काय "सगळं ठीक" वाटतंय ते पण सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

छान

manguu@mail.com
Tue, 06/05/2018 - 20:06 नवीन
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर आहे

ट्रेड मार्क
Tue, 06/05/2018 - 22:05 नवीन
स्वस्त्री कशाला सोडायची? थरूर, दिग्विजय सिंग ईई चा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. बादवे, जमलं तर मोदींनी घेतलेले कुठले निर्णय देशविरोधी होते/ आहेत याची यादी कारणमीमांसेसहीत द्या. ही अगदी सरळ साधी मागणी आहे, उगाच झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो

प्रसाद गोडबोले
Tue, 06/05/2018 - 22:12 नवीन
बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो , आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी ! ;) #पिकल्या_पानाचा_देठ_कि_हो_हिरवा अवांतरः वरील प्रतिसाद उपरोधिक नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मलाही आदर आहे

manguu@mail.com
Tue, 06/05/2018 - 22:17 नवीन
तिवारीपैकी सध्या काँग्रेस कोण अन भाजपा कोण ? बाप की बेटा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हे बरीक खरं

ट्रेड मार्क
Tue, 06/05/2018 - 22:32 नवीन
आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी मला वाटतं यात व्यक्तीपेक्षा पैसा आणि पॉवर याचा संबंध जास्त असावा. अर्थात व्यक्तीही स्त्रीलंपट असावी लागतेच. पण आजकालच्या जगात हे भूषणावह मानलं जातं, हेही खरं आहे. अजून मुसळी पॉवर, वायग्रा किंवा तत्सम कंपन्या या लोकांना ब्रँड ऍम्बॅसॅडर म्हणून कसे नेमत नाहीत? गमतीची गोष्ट अशी की अगदी फोटोसहीत बातम्या आल्या तरी भोळ्याभाबड्या जनमानसावर वाईट परिणाम होईल किंवा आपले राजकारणी कुठला आदर्श ठेवत आहेत यावर पुरोगामी जनता चकार शब्द काढत नाही. अतिअवांतरः वर राजकारणी असा शब्द आला असला तरी हा प्रतिसाद राजकारणाशी संबंधित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

छान

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 12:38 नवीन
स्वस्त्री सोडली , परस्त्री भोगली , 1 की 2 , ह्याचा अन कर्तृत्वाचा शून्य संबंध असतो. उदा . महान भारतरत्न गायक , ह्यांचे 2 विवाह झाले होते , ते व्यसनही करायचे म्हणे , पण गायकीत त्यांची जागा कुणालाही घेता आली नाही त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हायला

सुबोध खरे
Wed, 06/06/2018 - 12:44 नवीन
हायला स्वस्त्रीबद्दल उल्लेख पहिल्यांदा कुणी केला आणि तेच आता उलट बोलत आहेत. आपण xx खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं बढिया है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

छान

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 13:05 नवीन
हुतात्मा , आगापिछा नसलेला इ उल्लेख तुम्हीच आधी केलेत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो पण

सुबोध खरे
Wed, 06/06/2018 - 13:19 नवीन
हो पण मी एकदा एक बोलायचं आणि मग थोड्यावेळाने "ह्याच्या चरचा करू नयेत" असे घुमजाव करत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

हुतात्मे , त्यागी समाजाचे

सुबोध खरे
Wed, 06/06/2018 - 13:28 नवीन
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. मुळात माझा प्रतिसाद तुम्हाला नव्हताच तो होता चौरा साहेबांस तुम्ही उगाच

"मध्ये तोंड"

घातलंय. त्यात

टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद

अशा तर्हेची अनावश्यक टिप्पणी यानंतर "मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले" हे बोलणे तुम्हीच काढले आणि यानंतर त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत हा तुमचाच प्रतिसाद आहे. मागे पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला लिहिले होते कि या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली तरी ती आपल्याच बोटावर राहते पण तुम्ही काही सुधारायचे नाव घेत नाही. असो. जाता जाता --

यालाच

मी पिचक्या टाकणे म्हणतो. त्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे बढिया है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 00:38 नवीन
आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ संजय दत्तला निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आणि सलमान खानने मोदीजींबरोबर पतंग उडवल्यानंतर त्याच्या केसाचेही निकाल बाइज्जत बरी आले ! तुमचे काँग्रेस पुराण चालू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोदी हा विषय बाजूला ठेवून मी

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 20:45 नवीन
मोदी हा विषय बाजूला ठेवून मी काय प्रतिसाद दिलाय तो पहा. कायद्याची प्रक्रिया कशी असते हे किती लोकांना माहिती आहे. "पटापट बेड्या ठोकायच्या" तर हुकूमशाहीच आणावी लागेल. सध्या कोणालाही अटक केली तर त्याला मूलभूत कायद्या अंतर्गत २४ तासात न्यायालयात उभे करावे लागते. (आणीबाणी किंवा युद्ध घोषित केले असेल तरच हा मूलभूत कायदा लागू होत नाही.) त्यात सकृतदर्शनी सबळ पुरावा असेल आणि गुन्हा अजामीनपात्र असेल तरच न्यायालयीन कोठडी मिळते. दुर्दैवाने आर्थिक गुन्हे या सदरात मोडत नाहीत. त्यातून समजा एखादा आरोपी विदेशात पळून जाणार असेल तर त्याचा पासपोर्ट जमा करायला सांगतात. जामीन मिळाल्यानंतर विवक्षित कालावधीत आरोपपत्र दाखल करावे लागते अन्यथा टाइम बार झाल्याने खटला मोडीत निघतो. केवळ अमली पदार्थ आणि दहशतवाद यासारखे गुन्हे असतील तर जामीन मिळत नाही. हि कायद्याची प्रक्रिया माहिती नसल्याने बहुसंख्य सामान्य लोक चुकीचे आरोप करतात आणि काही लोकांना आपलेच म्हणणे खरे करायचे असल्याने प्रक्रिया माहिती असली तरी त्याबद्दल न बोलता केवळ टीका करायची म्हणून आरोप करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपली कायदा अंमल बजावणी यंत्रणा अनुत्पादक कामात लावण्यात काय अर्थ आहे? केवळ विरोधकांना त्रास देण्यापेक्षा हीच प्रणालि सबळ पुरावा असलेल्या केसेस चा पाठपुरावा करण्यासाठी वापरली तर त्याचा राष्ट्राला फायदा होईल. याला व्यवस्थापकीय भाषेत optimization of resources म्हणतात. मूळ सरकारी यंत्रणा स्वतःच इतकी भ्रष्टाचाराने पोखरली आहे कि तिला कामाला लावून काम करून घेणे हेच किती कठीण आहे. श्री मल्ल्या याना अटक होणार आहे हि "आतील बातमी" त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी याचे उत्तर तुम्हाला सापडले तर समजून येईल. अर्थात हे समजून घ्यायची इच्छा असेल तरच. अन्यथा आमच्या काळ्या गाईला पांढरे वासरू झाले आहे तर मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे इ इ शिमगा चालू द्या.
  • Log in or register to post comments

आता कुठे सरकार जाग झालय !

डँबिस००७
Tue, 06/05/2018 - 20:59 नवीन
आता ४८ महीन्यात केलेल्या कामाचा लेखा जोखा हे सरकार द्यायला लागलय ! अश्याने पुढे येऊ घातलेल्या खिचडी सरकारवर संकट ओढावलय ! दहा वर्षे राज्य करुन जनतेला काही सांगण्यासाठी नसलेल्या त्या पक्षाला जनतेपुढे तोंड ऊघडता येणार नाही !! मा श्री मोदीजींचा जनाधार दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे येणार्या १० वर्षांत इतर कोणाचाही पर्याय जनतेला नकोय !! आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे !
  • Log in or register to post comments

आता येणार्या काळात कॉंग्रेस

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 21:14 नवीन
आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे ! साहेब, इतकं सोपं असतं तर लालूप्रसाद २३ वर्षानि आणि संजय दत्त २१ वर्षांनी तुरुंगात का गेले असते? सरकारला प्रथम त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात खटला दाखल करावा लागेल मग क्रमाक्रमाने खटले उभे राहतील आणि त्याचा निकाल लागेल. यात सुद्धा खालचे कोर्ट वरचे कोर्ट उच्च आणि मग सर्वोच्च न्यायालय असे होऊन शेवटी निकाल लागेल. या गोष्टी दोन चार वर्षात होत नाहीत हि न्यायालयाची शोकांतिका आहे. अंती सत्याचा विजय होतो पण तेवढ्या कालावधीत सत्याचा अंत होऊ नये असेच वाटते इतका न्यायालयीन विलंब आहे सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

खरे सा. ,

डँबिस००७
Tue, 06/05/2018 - 21:41 नवीन
खरे सा. , २३ वर्षांनी जेल मध्ये जाणार्या लालु प्रसाद यांना हा कोर्टाचा निर्णय सुद्धा त्यांच्या विरुद्ध सरकारची साजिश अस वाटतय अस त्यांनी जाहीर रित्या सांगितलय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो का ?

manguu@mail.com
Tue, 06/05/2018 - 21:41 नवीन
वाजपेयींच्या काळात संसदेत स्फोट झाला. शिक्षा 10-12 वर्षानी काँग्रेस काळात झाली. दरवेळी लालूचेच उदाहरण का हो ? तुमचे उदाहरण द्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोगा खान

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 22:24 नवीन
मोगा खान आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही हे आपण परत परत सिद्ध का करून देताय? वर म्हटल्याप्रमाणे दहशतवाद आणि अमली पदार्थ याचे कायदे वेगळे आहेत त्यांची न्यायालये वेगळी आहेत. हे गुन्हे जामीन पात्र नाहीत. आर्थिक गुन्हे असे नाहीत. केवळ विरोधासाठी पचकायची सवय सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा

सुबोध खरे
Tue, 06/05/2018 - 22:26 नवीन
देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा सर्वात गहन आणि गंभीर असा गुन्हा मानला जातो म्हणू न त्याची श8कशा ही जन्मठेप किंवा मरेपर्यंत फाशी अशी आहे. आर्थिक गुन्हा हा तसा नाही हेही समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

### मोदीनी स्वस्त्री सोडली.

डँबिस००७
Tue, 06/05/2018 - 21:29 नवीन
### मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. ------ मा. श्री मोदीजींचे सर्व निर्णय व देश हिताचेच होते व आहेत !! --- टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. ## हिंदु लोक, हिन्दु विचारपद्धतीतुनच प्रतिसाद देतात ! हिंदु असुन सुद्धा मोगलाई विचार बाळगणारे तुमच्यासारखे कमीच !!
  • Log in or register to post comments

!!!!!

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 00:44 नवीन
हिंदू असून मोघल म्हणजे ? बाबरानंतरचे उरलेले सगळे मोघल हिंदुस्तानीच की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

अय्या खर की काय ??

डँबिस००७
Wed, 06/06/2018 - 01:00 नवीन
अय्या खर की काय ?? मग त्या मोगलांनी वेगळ्या देशाची पक्षी पाकिस्तानची मागणी का म्हणुन केली म्हणे ? ते स्वतःला हिंदु सोडाच तर अरबी मीर कासिमचे वंसजच समजतात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

कायच्या काय !

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 01:04 नवीन
पाकिस्तान मागणारे मोघल होते का ? शेवटचा मोघल बादशहा बहाद्दूरशहा , त्याचे 1857 च्या देशभक्त यादीत नाव आहे. जिनांचे आजोबा हिंदू की पारशी काहीतरी होते ना ? उगाच पाकिस्तानासाठीही मोघलांना मध्ये का आणताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

याला फिरवाफिरवी म्हणतात

ट्रेड मार्क
Wed, 06/06/2018 - 01:00 नवीन
विषय "हिंदू" लोक, विचारपद्धतीचा चाललाय आणि तुम्ही प्रतिसाद देताना हिंदुस्तानी करून टाकलं. बादवे, तुमच्या बाबराच्या वंशजांना "आम्ही हिंदुस्थानी आहोत" असं जाहीरपणे म्हणायला सांगा, बघू किती जण तयार होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

चर्चा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 06/06/2018 - 10:50 नवीन
चर्चेचा विषय होता- ते पंधरा लाख" आणी ती चर्चा फ्लॅटच्या किंमती , संजय दत्त-जीना असा प्रवास करीत मोघलांपर्यंत आली.
  • Log in or register to post comments

आदरणीय माई

नाखु
Wed, 06/06/2018 - 11:47 नवीन
प्रतिसाद पायरी-पायरीने आणि विषय जिना -जिन्याने (दरमजली) उतरत जातात हेच या धाग्यांच मर्मफलित आहे. अखिल मिपा "झोपलात काय,जागे व्हा"या नियमित वाचक संघाचे रोचक निरीक्षण .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

धन्यवाद माई

सोमनाथ खांदवे
Wed, 06/06/2018 - 22:28 नवीन
चर्चेचा विषय पुन्हा मूळपदावर आणल्या बद्दल धन्यवाद . पण मजा आली . लालू ,ममता ,मायावती व गतिमंद पप्पू , केजरीवाल च्या विचाराने प्रेरीत झालेले लोक या प्रगतशील भारतात भरपूर आहेत हे पाहून आश्चर्य वाटले . बापजादे चें आयुष्य काबाडकष्ट करण्यात , दारिद्रीपणात गेले व आपण स्वतः स्ट्रुगल करून पायावर उभे राहण्यात हयात घालवली तरी यांचे काँग्रेस प्रेम काही कमी होत नाही आणि मोदींच्या गेल्या चार वर्षातील कामगिरी ला गवताच्या ढिगाऱ्यातून सुई सारखे शोधत बसणाऱ्या माणसांना माझा दंडवत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

इथे आहेत होय ताज्या घडामोडी!!

पिलीयन रायडर
Wed, 06/06/2018 - 21:28 नवीन
इथे आहेत होय ताज्या घडामोडी!! किती दिवस झाले म्हणे महत्वाच्या सूचनेला!?
  • Log in or register to post comments

मिपासन्यास

ट्रेड मार्क
Wed, 06/06/2018 - 21:44 नवीन
संपादक मंडळाच्या नोटिशीनंतर गुरुजी आणि अरुण जोशींसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी मिपासन्यास घेतल्याने ताज्या घडामोडी एकदम शिळ्या झाल्या आहेत. महत्वाच्या निवडणूका पुढच्या १०-११ महिन्यात लाईन लावून आहेत आणि गॅरी ट्रुमन, अरुण जोशी, गुरुजी यासारखे सदस्य गायबलेत. निवडणुकात काही मजा येणार नाही असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ते १५ लाख सोडाच आता ५ कोटी

डँबिस००७
Wed, 06/06/2018 - 22:49 नवीन
ते १५ लाख सोडाच आता ५ कोटी कमवायची संधी ह्या सरकारने आम जनतेला उपल ब्ध करुन दिलेली आहे. २०१४ नंतर देशात खास करुन मिपावर सुद्धा रु १५ लाख सरकार कधी देणार म्हणुन वाटेवर डोळे लावुन बसलेल्या काही फुकट्या लोकांनासाठी तर ही सुवर्ण संधीच चालुन आलेली आहे. १५ लाख नाही तर तब्बल ५ कोटी मिळणार !! पण एक आहे की हे ५ कोटी मिळवण्यासाठी , त्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध पुरावे सरकारला द्यायला लागणार !! बुड हलवल्याशिवाय घबाड मिळणार नाही !! I-T Dept's new scheme: Inform govt about tax evasion, get rewards up to Rs 5 crore !! त्या निमित्याने मोदी सरकारचा हा आणखी एक "मास्टर स्ट्रोक" अस म्हणायला हरकत नाही !! काँग्रेसच्या नेत्यांचे धाबे दणाणुन जाणार, त्यांचेच चेले चपेटे आता धनदांडग्या विरुद्ध पुरावे सरकारला देणार, सरकारचा खजिना आता परत भरणार !! सरकार जनतेच्या कल्याणासाठी त्यापुढे अंबरनाथ, कर्जत , कसार्यापर्यंत जायला तयार आहे फक्त जनतेची साथ हवी आहे.
  • Log in or register to post comments

एकाच व्यक्तीविरुध्द अनेक

मार्मिक गोडसे
Wed, 06/06/2018 - 23:59 नवीन
एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? काही म्हणा पण कल्पना मस्त आहे, आता काय खबऱ्यांच पीकच येणार देशात. ज्या यंत्रणेचे हे काम आहे ते मस्त टेबलावर पाय ठेवून झोपा काढणार.
  • Log in or register to post comments

खरंच की

ट्रेड मार्क
गुरुवार, 06/07/2018 - 00:35 नवीन
इतका महत्वाचा प्रश्न कसा काय कोणाच्याच लक्षात आला नाही? बघा हे लोक नुसताच ढोल बडवत बसलेत, काही कामाचे नाहीत. यंत्रणेचं ठीक आहे हो त्यांच्या कामात काही बदल नाही, पण मोदींचं काय? त्यांनी नको का अश्या प्रश्नांचा विचार करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

खबरे

manguu@mail.com
गुरुवार, 06/07/2018 - 03:39 नवीन
खबरेंना बक्षीस द्यायची स्कीम आधीपासूनच आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

खबऱ्याना फक्त फौजदारी

मार्मिक गोडसे
गुरुवार, 06/07/2018 - 09:00 नवीन
खबऱ्याना फक्त फौजदारी प्रकरणासाठी बक्षीस मिळते , दिवाणीसाठी मिळते की नाही हे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

आदरणीय महामहीम

नाखु
गुरुवार, 06/07/2018 - 09:26 नवीन
मोगा अनुदान, शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? अर्थात मोदीविरोध हा आणि हाच एककलमी कार्यक्रम असेल तर काहीच विधायक दिसणार नाही शिक्कामोर्तब झालेला नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात

मार्मिक गोडसे
गुरुवार, 06/07/2018 - 12:12 नवीन
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? मागील सरकारने असे प्रकार टाळण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता,परंतू सुप्रीम कोर्टाने त्याविरोधी निकाल दिला होता. आता तर आधार शिवाय पानही हलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात

पुंबा
गुरुवार, 06/07/2018 - 12:24 नवीन
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय?
तुम्ही चूक आहात नाखु. ही स्किम २०१३ पासूनच सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शिष्यवृत्ती डिबीटी मध्ये आणल्या जात होत्या. २०१४ पासून ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली हे मात्र खरे.
Central Sector Scheme of Scholarship for College and University Students The Scheme is in operational since 2008. The objective of the scheme is to provide financial assistance to the meritorious students having family income of less than Rs.6 lakh per annum, to meet a part of their day-to-day expenses while pursuing higher studies. Annual target is 82000 scholarships per year (41000 for boys and 41000 for girls) which has been divided amongst the State Education Boards based on the State’s population in the age group of 18-25 years. Students who are above 80th percentile of successful candidates in the relevant stream from a particular Board of Examination in class XII and pursuing regular course and not availing benefit of any other scholarships, are eligible to apply under this Scheme. The rate of scholarship is Rs. 10,000/- per annum for the first three years and Rs. 20,000/- per annum for the fourth and fifth year. The Central Sector Scheme of Scholarship for College and University Students is covered under the Direct Benefit Transfer (DBT) w.e.f. 1.1.2013 wherein the scholarship is being disbursed directly into the bank account of the beneficiaries.
वरील माहिती विद्यापिठस्तरावरील शिष्यवृत्तीसंदर्भातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काय आहे ती सांगा पाहू

सुबोध खरे
गुरुवार, 06/07/2018 - 09:26 नवीन
काय आहे ती सांगा पाहू डिटेलवारीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 06/07/2018 - 11:13 नवीन
उत्तम योजना आहे आय.कर खात्याची. एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? हे ईतके सोपे नसणार रे मार्मिका. नुसती वॉट्स-अ‍ॅपी /फेसबूकी कुजबुज चालणार नाही.
giving actionable information on evasion of tax on assets in India.
घोडे येथे अडणार आहे असे ह्यांचे मत. उदाहरण द्यायचे तर दाउद ईब्राहिम- त्याची मोठ्या प्रमाणावर मुंबईत संपत्ती आहे. ती कोठे आहे हे संबधित सरकारला, अधिकार्याना,स्थानिकांना ठाऊक असते. दाउदने किंवा त्याच्या लोकांनी कधी जास्त आवाज केला किंवा हप्ता दिला नाही तर मग धाड टाकली जाते व नंतर प्रकरण मिटवले जाते. संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/give-i-t-tip-off-on-black-money-get-up-to-rs-5-crore-reward/articleshow/64421729.cms
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा