दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे. मी internship दरम्यान काहीकाळ ह्या उपक्रमात असायचो , गेल्या ७ वर्षांपासून श्वसनविकार विषयात पदव्युत्तर झाल्यापासून नियमीतपणे (१ला व ३रा शनिवार) रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी आहे...
स्वत:ची जास्त जाहिरात न करता त्याच कार्यक्रमात दिली जाणारी माहिती इथे लेखमालेद्वारे देण्याचा प्रयत्न करतो आहे..
तर मित्रमंडळींनो ह्या भागात दमा किंवा अस्थमाची लक्षणं जाणून घेऊयात
१.खोकला : दम्याबद्दल बोलतांना पहिलं लक्षण दम लागणे हे असलं पाहीजे असं बऱ्याच जणांना वाटत असेल पण तसं नाहीये ; तर रात्री झोपतांना येणारा ,हसल्यावर येणारा, मोठ्यानी बोलल्यावर येणारा , लहान मुलांमध्ये जोरात रडल्यावर येणारा खोकला ..... सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे (पण सर्वच रुग्णांना खोकला असेलच असं नाही ).बहूतांशी कोरडाच खोकला असतो , पण कफ/बेडका म्हणजे ओला खोकला सुध्दा दम्याचं लक्षण आहेच.
२.दम लागणे किंवा धाप लागणे : वेगानी चालतांना , जिना चढतांना , सामान घेऊन किंवा छोट्या बाळाला घेऊन चालतांना नेहमीपेक्षा जास्त दम/धाप लागत असेल तर ; वातावरण बदलानंतर काहीना दम लागतो (बऱ्याच ढगाळ वातावरणात श्वासाचा त्रास होतो , पण सर्वच दमा असणाऱ्यांना त्रास होईल असं अजिबात नाही)... घरात साफसफाई केल्यानंतर , जुनं सामान/कपडे यांच्या सफाईनंतर (जुनी धुळ आणि त्यातील जंतू /house dust mites) यांचा संपर्क आल्यानंतर दम लागत असल्यास हा देखील दमा...
३.श्वासाचा आवाज : शिट्टी सारखा सू-सू आवाज येतो, बरेचदा झोपेत असा आवाज येतो त्यामुळे पेशंटचे नातेवाईक ह्या लक्षणाबद्दल जास्त सांगतात.. छातीतून घरघर आवाज येतो (जणु काही कफ अडकलेला असावा असा )... ह्याचं कारण असं की श्वासनलिका आकसलेल्या असल्या कारणानी त्यातून
बाहेर पडणाऱ्या हवेचा असा आवाज येतो.
४.छातीवर येणारा दबाव किंवा आवळ्ल्यासारखं वाटणं - हे एक common लक्षण, बरेचदा रुग्ण सांगतात की काहीतरी वजनदार वस्तू छातीवर ठेवल्यागत भार जाणवतो म्हणून.
५.सर्दी: दमा असणाऱ्या ६०-७०% रुग्णांमध्ये सर्दी त्रास जाणवत असतो , केवळ सर्दी म्हणून येणारे बरेचसे रुग्ण मुळात दमा असलेलेच असतात , one airway one disease ह्या थिअरी प्रमाणे वारंवार सर्दी होणाऱ्या रुग्णांमध्ये दमा होणाच्यं प्रमाण वाढतं... खास करून ज्यांना ऋतुबदल होतांना सर्दी होते ती अॅलर्जीची सर्दी .... seasonal allergies; पण जे वर्षभर सर्दीमुळे ग्रस्त असतात ते perennial allergy वर्गात मोडणारे ...
६.पोटातले येणे: तान्ह्या मुलांमध्ये आढळणारं लक्षण !! लहान मुलांमध्ये श्वसानाचे स्नायू पूर्णपणे विकसीत न झाल्यामुळे पोटाचे स्नायू श्वास घेण्यासाठी मदत करतात आणि ती आत-बाहेर होणारी हालचाल (हापसल्यासारखं ) पोटातलं आलं असं म्हटल्या जातं आणि खेडेगावातून किंवा छोट्या गावांमधून असा गैरसमज आहे की पोटातलं आलं म्हणजे करणी/भानामती , काळा जादू वगैरे... आणि मग अघोरी उपचार सुरू होतात... तान्ह्या बाळांना पोटाला डागण्या दिल्या गेलेल्या पाहील्या आहेत....
पण ह्या रुग्णांचा योग्य उपचार झाला तर पोटातलं येणं पूर्ण थांबतं !!
ह्या शिवाय दुध पिता न येणं, श्वासाचा आवाज येणं, छातीवर हात ठेवला तरी घरघर जाणवते , बाळाचं वजन योग्यरीतीने वाढत नाही अशी साधीच पण महत्वाची लक्षणे दमा निदान करण्यास उपयुक्त ठरतात...
७.ॲसिडीटी किंवा आम्लपित्त : दमा असणाऱ्या रुग्णांनध्ये ॲसिडीटी चा त्रास खुपच common आहे ... ॲसिडीटी वाढली की दमा वाढतो आणि vice versa... हे लक्षण महत्वाचं आहे कारण दमा असणाऱ्या रुग्णांमध्ये ॲसिडीटी च्या औषधाची मात्रा दुप्पट द्यावी लागू शकते ...
पुढील भागात बघूया ... दम्याची कारणं
Book traversal links for दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम लेख मालिका..
धन्यवाद सर.... _/\_
वाचतोय, पुभाप्र, पुलेशु
पुभाप्र!
जरा दमानं घ्या हो..
छान माहिती
+100 हॅट्स ऑफ टु डॉक..
सुंदर
उत्तम माहिती
+१. असेच म्हणतो.
आभारी आहे...
उत्तम माहिती
तुम्ही प्रश्न विचारणं सुरू
हो, नक्की!
मला नक्की सांग ग!! मी पण
मस्त आयडिया !!
धन्यवाद
एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्
अत्यंत महितीप्रद
खूप सोप्या भाषेत आणि विस्तृत
सोप्या भाषेत सांगणं हे
मस्त लिहिले आहे.
तुम्ही तुमच्या
प्रत्येक वैद्यकशाखा काही
मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा
अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या
))))) लक्षात ठेवा -- इतर
सोप्पा उपाय....
होमिओपॅथी वाले साबुदाण्याच्या
अगम्य औषधांची नावे
दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा
डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा
हा इगो मला कधीच येऊ नये _/\_.
सोपं आहे ओळखायला परंतू या
आवडलं
स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे?
चांगला विषय. छान.
डॉ. वजन जास्त असल्याने
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..
डॉ.दमा अनुवंशीक असतो का?
पुढच्या भागात Pathophysiology
ह्या भागात लक्षणांबद्दल
उपयुक्त लेखमाला... पुढील
चांगला विषय. माहिती देत रहा.
मीही हेच म्हणेन.
वरील पैकी निदान काही लक्षण
ही बऱ्यापैकी common लक्षणं
उत्तम लेख
धन्यवाद....
Doc ,asthma आणि त्यामुळे