Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95929
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

च्यायला, ते मारणारं चपलेने बडवून गेलं (25 कि काय वेळा वगैरे ) आणि इथं सदाचारी शार्दूलजींनी भाषेचा मुद्दा लावून धरलाय. चपलामर्दनकार यांचा आदराने उल्लेख त्यांना हवा असावा. देव न करो पण सदाचारींचे मुखमंडल जर आदरणीय च.म.का नी रंगवले असते तरीही त्यांनी भाषेचा आग्रह धरला असता का?? लोकांची प्रतिक्रिया जेव्हा सच्ची असते तेव्हा मुद्दा काय हे पहायचे असते हे सदाचारींना कधी कळणार. त्या सडकछाप गायकवाडाने केलं ते कुठल्याही परीस्थीतीत (provoking / injustice असला तरी ही) चुकी चे च आहे.

In reply to by बाजीगर

हे मुद्द्याला सोडून लिहिण्याचं कारण काय? चांगल्या भाषेत लिहिण्याचा आग्रह करण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला? देव न करो तुम्हाला आईवर शिवी दिली असती आणि धक्काबुक्की केली असती तर तुम्ही काय केलं असतं? तुमचा तुमच्या मतांबद्दलचा आग्रह उतू जातोय हे खेदाने नमूद करतो. संपादक मंडळींनी असल्या वैयक्तीक हल्ल्यांकडे लक्ष ठेवावे हि विनंती. शिवाय बाजीगर साहेब आपला सात्विक संताप व्यक्त करण्याचा मार्ग तुम्हाला हवा तो स्वीकारता येतो, दुसऱ्यावर वैयक्तिक टीका करण्याची मुळीच आवश्यकता नाही. तुम्हाला हवी असेल तर वर लिहिलेल्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा तुम्ही वापरू शकताच, संपादक मंडळ समर्थ आहेच.

In reply to by बाजीगर

चाललेय काय आणि लिहिताय काय? म्हणजे मांडायला योग्य मुद्दे नसले की असे हे वैयक्तिक हल्ले सुचतात. विचारांना विचारांनी उत्तर द्यायलासुद्धा तेवढी कुवत असावी लागते. आम्ही तुमच्या पातळीवर उतरुन लढु शकत नाही हे आधीच कबुल करतो. कारण आम्हाला आमची मते थेटपणे आणि स्वच्छ भाषेत मांडायला आवडतात, असे वैयक्तिक हल्ले करुन नाही. आणि मी केवळ स्वच्छ भाषेचा नाही तर निकोप आणि संतुलित चर्चेचाही आग्रह धरला आहे. तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नाही आमच्या भूमिकेवर तुमचे मत मांडण्यासाठी. बरे आगंतुक म्हणुन का असेना मत योग्य भाषेत मांडावे तर तेही नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात तरी कुठुन येणार? आणि आमचे मुखमंडल रंगवुन घेण्याइतकी पातळी आम्ही कधीच सोडत नाही, सबब त्याची चिंता तुम्ही करु नये. शिवाय सदाचारी म्हणवुन घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही. आणि चर्चा वैयक्तिक हल्ले करुन भलतीकडेच भरकटविल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळत असेल तर मग विषयच मिटला.

In reply to by बाजीगर

तुमचा मुद्दा बरोबर आहे पण तिसरं वाक्य अनावश्यक आहे असे नमूद करतो. इतर मिपा सदस्यांबद्दल शक्य होईल तेवढी वैयक्तिक टिप्पणी टाळावी. (मी वरती एका ठिकाणी केली होती पण त्याचा मला नन्तर पश्चाताप झाला.)

In reply to by अत्रे

तुम्ही माननिय बाजीगर यांच्या "च्यायला, ते मारणारं चपलेने बडवून गेलं (25 कि काय वेळा वगैरे ) आणि इथं...." या वाक्यावर "तुमचा मुद्दा बरोबर आहे" असे म्हणुन स्पष्ट सहमती दर्शविलीत. मग प्रश्न हाच उरतो की जर तुमचा या प्रकरणाबद्दल अशाच प्रकारचा दृष्टीकोन होता, तर इथे हा असा विखारी धागा काढायला आलातच कशाला?

In reply to by शार्दुल_हातोळकर

तर इथे हा असा धागा काढायला आलातच कशाला?
यायचे होते म्हणून :) तुम्ही पण आपल्या प्रतिसादांनी धाग्याला हातभार लावलात म्हणून आभार.

वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या उद्दामपणाच्या बातमीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे विश्लेषण करून आधीचा खासदार कसा फालतू आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रतिसादांच्या पायघड्या घालण्यात आल्या, पण या दुसऱ्या खासदारांकडे कसे काय बुवा दुर्लक्ष झाले असेल? यालाच पक्षसापेक्षता म्हणत असतील का? हा असा सिलेक्टिव्ह सात्विक संताप करायला कसे काय जमत असेल बुआ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या उद्दामपणाच्या बातमीकडे दुर्लक्ष झालेले दिसते.
माफ करा. तेवढी बॅण्डविड्थ माझ्याकडे नाही. तुम्ही पाहिजे असल्यास नवीन धागा काढा त्या तिवारीवर आणि जे वाट्टेल ते लिहा.

In reply to by अत्रे

का बुआ? नवीन धागा का काढू मी? आणि नवीन धागा काढण्याचा, तुमच्या प्रतिक्रिया देण्याचा आणि बॅण्डविड्थचा काय संबंध? धागा तुम्ही टाकलेला आहे म्हणून तुम्हाला हव्या त्याच प्रतिक्रिया आणि त्याही तुम्हीच द्याव्यात असा काही नियम आहे का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला पाहिजे ते करा प्रसादराव. (शाब्दिक) गोंधळ घाला. इथे घाला, दुसऱ्या धाग्यात घाला, नका घालू. तुम्हाला पूर्ण अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.
बॅण्डविड्थचा काय संबंध?
मेंटल बॅण्डविड्थ हो! मला हे तिवारी प्रकरण काय आहे ते माहित नाही आणि आत्ता त्यावर वादविवाद करण्यात मी वेळ खर्चू इच्छित नाही. इथे फक्त मी चप्पल आणि प्रवासबंदी यावर काँसंट्रेट केलं आहे. बाकी तुम्हाला जी चर्चा करायची ती करा. ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.

In reply to by अत्रे

ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.
बास, हे समजलं की झालं! बाकी गोंधळ आणि राडा मग तो शाब्दिक का असेना घालण्यात मला काडीचाही रस नाही, तुम्हाला तो आहे हे वर तुम्ही सांगितलेच आहे. त्यामुळे, चालू द्या!

In reply to by श्रीगुरुजी

तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी! तुमच्या ह्या "थोडक्यात" उरकलेल्या प्रतिसादामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. दोन उद्दाम खासदार, एकाबद्दल एवढी आगपाखड आणि दुसऱ्याला पक्षाने समज दिली आहे एवढ्यातच उरकायचे? काय बरे असेल कारण? पक्षाने समज गायकवाडांना पण दिली होती, वरून तो कायद्याने गुन्हा असल्याने गुन्हा पण दाखल आहे. मग या अशा खासदारांवर गुन्हा दाखल होऊन शिक्षा झालीच पाहिजे एवढेच म्हणून न थांबता, त्याची आणि त्याच्या पक्षाची एवढी लांबलचक चिरफाड करण्यामागचे कारण लपून राहू शकते का? आपला पक्षीय द्वेष प्रत्येक ठिकाणीच लागू करणे गरजेचे आहे का? वास्तविक मनोज तिवारीने केलेला उद्दामपणा हा अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा केलेला विनयभंग नाही वाटत का? इथे तर दोन व्यक्तीत शिवीगाळ, धक्काबुक्की वगैरे काहीच झाले नव्हते. वरून एवढ्या लोकांसमोर असे एका खासदाराने महिलेला अपमानित करणे योग्य नाही असे निदर्शनास आणून दिल्यावर आधीच्या उद्दामपणापेक्षा जास्त उद्दामपणाने खासदारांनी "काय झाले , त्या महिलेने आत्महत्या केली का? तिला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला का आहे?" असे विचाराने हे पक्षाने समज देण्याइतके छोटे आहे, हो ना? वास्तविक उत्तर दिले आहे, बॅण्डविड्थ नाही वगैरे मुखवटे आहेत, त्यावर चर्चा वाढली नाही कारण तो शिवसेनेचा नसून भाजप चा खासदार आहे. असा अजेंडायुक्त पक्षसापेक्ष युक्तिवाद करून काय होणार?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

दोन घटनांमध्ये बराच फरक आहे. एका घटनेत सरकारी नोकराला मारहाण करणे, त्याच्या खुनाचा प्रयत्न करणे व विमानोड्डाणाला खोळंबा करणे हे प्रमुख आरोप आहेत. कायदेशीरदृष्ट्या हे गुन्हे आहेत. दुसर्‍या घटनेत खासदाराचा उर्मटपणा व उद्दामपणा आहे व एका महिलेला कडक शब्दात सुनावून तिला खजील करणे आहे. हे कृत्य सुद्धा निषेधार्ह आहे. त्याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. परंतु कायद्यानुसार हा गुन्हा होऊ शकत नाही. "विनयभंग" हा फार भयंकर शब्द आहे. अपमानास्पद बोलणे म्हणजे "विनयभंग" नाही. महिलेला अश्लील शब्द ऐकविणे, तिच्याशी तिच्या इच्छेविना शारिरीक लगट करणे, अश्लील हावभाव इ. गोष्टी "विनयभंग" या गुन्ह्याखाली येतात. केजरीवाल किंवा इतर काही जण ट्विटर व इतर माध्यमातून मोदींबद्दल वाटेल त्या शब्दात टीका करतात. तसे करणे संतापजनक असले तो गुन्हा होऊ शकत नाही. इथेही तसेच झाले आहे. जरी कायदेभंग झालेला दिसत नसला तरी तिवारीचे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही? मनोज तिवारी हे भाजपचे असल्यामुळे त्यांचं वागणं कायदेशीर गुन्हा ठरतो कि नाही हे ठरवायची गरजच पडत नाही ना? शिवाय मनोज तिवारी तसं वागले म्हणजे भाजप हा पक्षच तसला आहे, मुजोर लोकांचा, महिलांचा सन्मान करणे वगैरे माहीतच नाही, त्यांचे नेतेच तसले आहेत तर अजून काय होणार...वगैरे वगैरे आलं नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही? विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते. __________________________________________________________________________________________ कर्मचार्‍याचे व्हर्जन असे आहे. Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight. He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next. “When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,he recalled. Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added. “I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said. “He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added. The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise. - आपण त्या कर्मचार्‍याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे. - गायकवाडांनी त्या कर्मचार्‍याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे. - http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push… The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft. "No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight. Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day. "Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers," Gaikwad had even demanded an apology from Air India. "I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "

In reply to by श्रीगुरुजी

परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी. शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे. "The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी. तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्‍याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्‍याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत. शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे. कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही. "The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder." मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्‍याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही वरच्या सगळ्या लिंक पहा. ती हवाई सुंदरी काय म्हणाली, गायकवाड काय म्हणाले (शब्द न शब्द नीट ऐकावा, हिंदी चॅनेलसारखं नको आपल्याला हवं ते) आणि शिव्या काय/कोणी दिल्या सगळे कळेल. तुमच्याकडे इअरफोन्स अव्हेलेबल असतील ते लावून जरूर पहा. बाकी आधी मटा म्हणजे शिवसेना प्रेम, सॉफ्ट कॉर्नर आणि आता हवा तसा संदर्भ लागला कि तेच खरे बाकी काही नाही हे पाहून मज्जा वाटली.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मटा म्हणजे शिवसेना प्रेम, सॉफ्ट कॉर्नर वगैरे आहेच. परंतु जर फिर्यादी, साक्षीदार व आरोपी एकच गोष्ट सांगत असतील तर ते 'मटा'त आलं किंवा अजून दुसर्‍या वृत्तपत्रात आलं तरी फरक पडत नाही कारण फिर्यादीने जे आरोप केले आहेत त्या गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे व साक्षीदाराने त्याला दुजोरा दिला आहे. जर तसं झालं नसेल तर गायकवाडांनी पुढे येऊन तसं सागावं. परंतु गायकवाड आपले व्हर्जन बदलायला तयार नाहीत. आपण कर्मचार्‍याला चपलेने मारहाण केली व त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साक्षीदाराने वर्ड चुकून लागला - लिंक्स नीट वाचल्या बघितल्या का असे म्हणायचे होते. खासकरून इअरफोन्स लावून नक्की बघा व्हिडीओज सगळे.

म्हणजे काय हे कळलं ह्या धाग्यावर . गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही . काही प्रतिसाद एअर इंडिया च्या सेवेवरून होते . काही प्रतिसाद दोन्ही बाजू तपासून पाहू म्हणून होते. अभ्या तर तिकडचाच आहे त्यामुळे त्याने पाठिंबा आहे लोकांचा त्यांना असे म्हटले,असे म्हटले . पण सरसकट वाट्टेल त्या शब्दात खिल्ली उडवणे , काहीही बोलणे , दर्जाहीन भाषा वापरणे . कठीण आहे . येतो राग लोकांना तर येत असेल बुवा ठीक आहे . पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय . एकंदरीत नेहमीप्रमाणे अजेन्डा कळला.

In reply to by वरुण मोहिते

पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय
इंटरनेट जिंदाबाद मोहितेसाहेब! या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. इंटरनेट अनामिकता ही सर्व नागरिकांसाठी गुंडांनी पुरवलेल्या संरक्षणासारखीच आहे.

In reply to by अत्रे

या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत.
इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी. तुम्ही गुंड वगैरे ठरवून कॉईन केलेला शब्दप्रयोग आहे. आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे? ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याआधीच सजा टोठावायला इंटरनेट किंवा एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही. लाईक्सवरुन सजा द्यायला निघालेत.

In reply to by अभ्या..

आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे?
मी जनरल स्टेटमेंट केले आहे, सर्व गुंड पाळणाऱ्या राजकारण्याविषयी. "यांचे" चरित्र प्रसिद्ध पुढे कधी प्रसिद्ध झाले तर वाचीन.
ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला
सगळं लोकांसमोर ऑलरेडी आलेलं आहे. खासदारसाहेब कारने दिल्लीत पोचतील तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रीतसर जबाब नोंदवावा. कार्यवाही लवकर होण्यास हात भार लावावा. उगाच संसदेचा वेळ वाया घालवू नये. आणि हो माफी मागावी.
एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही
थोडी फार सजा ऑलरेडी मिळालेलीच आहे! उरलेली ही लवकरच मिळो.

In reply to by अत्रे

भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.
मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?

In reply to by अभ्या..

मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?
इंटरनेट हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम आहे. खऱ्या लोकशाहीत लोकं कोणालाही न घाबरता मनातले बोलू शकतात. इंटरनेट वे हे थोडे सोपे जाते. फेसबुकवर लाईक्स ठोकणारे फार दीर्घ विचार करून लाइक करतात असे नाही. पण इतक्या दिवस उद्दाम राजकारणी लोकांबद्दल मनात साठलेला राग या निमित्ताने बाहेर येतो - हे ही नसे थोडके.

In reply to by अभ्या..

तुम्ही त्याला मळमळ म्हणा की अजून काही म्हणा! लोकांना काही फरक पडत नाही. शाब्दिक व्यक्त झालं की मनाला समाधान मिळतं. आणि असे व्यक्त होण्याचे अधिकार फक्त गुंड पाळणाऱ्याकडे नसावेत.

In reply to by अत्रे

या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. हे काहीच्या काहीच आहे राव. तुम्हाला स्वातंत्र्य पण पाहिजे अभिव्यक्तीचे आणि घाबरायचे पण आहे. शिवाय उद्या एखाद्याने ठरवले तर तो आरामात आय्पी ट्रॅक करेल. उगाच बागुलबुवा केला आहे या राजकारण्यांचे गुंड वगैरे. इतके भिउन जगायचे तर अपघात होतात म्हणून रस्त्यावर गाडी चालवणे पण सोडून द्यावे लागेल.

रविण्द्र गायकवाड गाडीने दिल्लीला निघाले आहेत अशी बातमी वाचली.लोकसभेत जर ते व्यवस्थित बोलले वा माफी मागीतली तर विमान कंपन्यांनी त्यांना ताकीद देऊन प्रवासाची परवानगी द्यायला हरकत नाही. रविंद्रांना काही महिने विमानप्रवास सक्तीने चपला व तत्सम हत्यारे(पट्टा वगैरे) काढूनच करण्यात यावा असे ह्यांचे मत! चपला त्या 'चेक-इन' बॅगेजमध्ये जातील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी. हे जे कोणी सुकुमार आहेत , ते निवृत्त झाले होते असे वाचले अन मग त्यांना पुन्हा दुसर्या कंपनी मार्फत घेण्यात आले. त्यांच्या जागी ४ नवयुवकांनाही घेता आले असते का याचा ही विचार व्हावा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

@ माईसाहेब कुरसूंदीकर माईसाहेबांचे "हे" म्हणजे अगदीच "हे" दिसताहेत. ते रवींद्र दुसऱ्याच्या चपलेने नाही का हाणू शकणार? चाकू कात्री इ आयुधे गैरवापर होतील म्हणून सगळ्याच्या सगळ्या प्रवाशांच्या चेक इन बॅगेज मध्ये जातात. सर्वच प्रवाशांना चपला चेक इन बॅगेज मध्ये टाकायला सांगणार का?

Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.


"एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी." नक्की काय वाईट सेवा होती ह्यावर कोणी प्रकाश टाकेल का ? की खासदार आहे म्हणजे कर्मचार्यानी गायकवाडांना "साहेब साहेब' म्हणून हाक मारावी अशी अपेक्षा होती? की साहेबांना सर्वात आधी विमानातून उतरायचा मान मिळाला नाही ? कारण त्या फ्लाईटमधील प्रवाशानी तसे काहीच म्हंटल्याचे दिसत नाही. रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.
तशी सर्व्हिस पण विमानकंपन्यानी देऊ नये (आणि मुख्य म्हणजे एअरईंडीयाचा लौकिक त्यासाठीच आहे) आणि दिली तर ग्राहक एकून घेणार नाहीत हे विमान कंपन्याकडून मान्य करुन घेतीलच म्हणा माई.

कुपन जाऊदे पण एअर इंडिया च्या कित्येक डोमेस्टिक फ्लाईट्स अश्या आहेत कि ज्यात व्यावसायिक श्रेणी ची तिकिटे नाहीत . त्यात काय प्रकार आहे पुढील आसनांच्या दोन रांगा ह्या त्या श्रेणी ला दिल्या जातात . आणि फक्त पडदा असतो मध्ये . आणि काही सीट कंफर्ट . ह्यांनी तिकीट काढल्यावर हे सांगण्यात आलं . म्हणजे माझं कुपन वेस्ट. त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?? म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या टीप -मारहाणीचे समर्थन नाही .

In reply to by वरुण मोहिते

त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?
हे खरे असल्यास ही चूक आहे. वरती मी एअर इंडिया च्या फ्लाइट फीडबॅक फॉर्म ची लिंक दिली आहे. तिथे सामान्य माणसाप्रमाणे तक्रार करता येते. आणि ती न करता मारामारी केल्यामुळे प्रकरण वाढले.

In reply to by वरुण मोहिते

>>म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या बातम्यांनुसार गायकवाडांनी तक्रारवहि मागवलेली पण त्यांना ती नाकारण्यात आली, वर त्या सुकुमारने उद्दामपणे "तू खासदार होगा तो तेरे घरका" वगैरे डायलॉग मारला, आणि तो टिप्पिंङ पॉइंट ठरुन प्रकरण पुढे चिघळलं. मूळात एयर इंडियात कस्टमर सर्विस हा प्रकार म्हणजे आनंदच आहे...

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.
वा! असले गुप्तहेर सेनेकडे आहेत म्हणूनच तर देशात अतिरेकी हल्ले होत नाहीत. http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-raut-ravindra-gaikwad-air-in…

In reply to by अत्रे

ह्यांना द्या राव एखादा विभाग काढून सेपरेट. सकाळ संध्याकाळ सेनेला शिव्या घालायला. लैच कॉमेडी आयटम आहे.

In reply to by अत्रे

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले. या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?

एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.
सेनेचे पुढारी हे असे चौथी 'क' मध्ये असल्यासारखे का बोलतात ते कळयला मार्ग नाही. 'योग्य वेळ' कधी येणार्? डॉनने 'मातोश्री'ला फोन केल्यावर ? आणी राउतांनी माहिती दिलीच नाही तर एयर लाईनने मातोश्रीवर थैल्या पोचवल्या असे समजायचे का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब असा धोतरात धोतराला हात नाही घालू =))

धागा थंडावल्यावर सगळी चर्चा वाचली. हतोळकरांचा प्रसाद यांचे प्रतिसाद आवडले. विमान कर्मचार्यांकडून आधी प्रोवोकेशन झालं आणि खासदारांचे कृत्य हे त्यावर प्रतिक्षिप्त क्रिया होते असे एकंदर चर्चेवरुन वाटते. कायद्यात क्राइम ऑफ पैशनला नेहमीच थोडी कमी शिक्षा असते. उदा. एखाद्याने भावनेच्या भरात खून केला आणि दुसर्याने अगदी प्लान वगैरे करुन खून केला तर पहिल्याला कमी शिक्षा होते. http://www.misalpav.com/comment/reply/39294/929669 http://www.misalpav.com/comment/reply/39294/929697 http://www.misalpav.com/comment/reply/39294/930029 >> हे काही पटले नाही. माझ्या माहितीनुसार सबळ पुरावे 'कोर्टात' साबीत झाल्याखेरीज कोणालाच शिक्षा करता येत नाही. केवळ आरोपीने कबुलीजबाब दिला या एकाच आधारावर तर नाहीच नाही... काहीही काय...


लोकहो, या प्रकरणात काय घडलं याचा माझा अंदाज सांगतो. १. एअर इंडियाने व्यवसायवर्ग नसल्याचं खा.गायकवाड यांना वेळेत कळवलं. खासदारांनी तरीही जायचं ठरवलं. २. चढपत्र (=बोर्डिंग पास) मात्र व्यवसायवर्गच दाखवत होतं. त्यामुळे खासदारांना वाटलं की पहिला बदल रद्द झाला असून व्यवसायवर्ग उपलब्ध आहे. ३. तरीही विमानात केवळ जनतावर्गच आढळला. ४. यावेळेपर्यंत विमानप्रवास सुरू झाला होता. तो चालू असतांना खासदारांनी आपली समस्या कागदावर लिहून काढली आणि हवाई सेविकेकडे सोपवली. प्रवास संपल्यावर खासदारांनी समस्येवर उपाय व स्पष्टीकरण मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवायची विनंती केली. त्यानुसार एअर इंडियाच्या चार लोकांशी बातचीत अगोदरंच झालेली होती. ५. तेव्हढ्यात श्री. सुकुमार नामे कर्मचारी बातचीत करायच्या निमित्ताने आंत घुसला. त्यानं शिवीगाळ चालू केली. ६. शिवीगाळीस प्रत्युत्तर म्हणून खासदारांकडून सुकुमार यांना चपलांचा प्रसाद मिळाला. कोणीतरी खासदारांना हाणून काढूया म्हणून ओरडा केला. त्यानंतरही खासदार तासभर विमानातनं उतरले नाहीत. ७. प्रसारमाध्यमांनी चपलांनी मारलं म्हणून गोंगाट माजवला. खासदारांना शिव्या घातल्यानेच त्यांनी २५ फटके मारले ही बाब इथे स्पष्ट होते : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 असो. हे माझं आकलन आहे. जसजशी तथ्ये उजेडात येतील तसतसा आकलनात बदल घडू शकेल. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी ढिसाळ, खराब व भंगार आहे की खासदारसाहेबांना परत परत त्यांच्याच विमानात जायची हौस आहे. यांना एअर इंडिया ने पुढच्या पब्लिसिटी मध्ये वापरायला हवे. आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!

In reply to by अत्रे

आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!
खि खि खि . . . खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे. स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्‍यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे. हे प्रकरण ते जितके जास्त ताणत राहतील तितकी त्यांची व त्यांच्या पक्षाची बदनामी होत राहील. मूक मोर्चा व्यंगचित्र प्रकरणात उधोजींनी शेवटी सगळा मान, स्वाभिमान, डरकाळ्या, पंजा, वाघनखे, दांडपट्टा वगैरे बाजूला ठेवून माफी मागून प्रकरण संपविले होते. या प्रकरणात तसे केले तर प्रश्न मिटेल.

In reply to by अत्रे

आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!
पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे. या सगळ्यांच्या म्हणण्याचा डोलारा एअर इंडिया म्हणजे एक नंबरची ढिसाळ एअरलाईन आहे आणि तिला तिच्या कारभाराचा जाब विचारायलाच हवा यावर आधारलेला होता. त्यासाठी गायकवाड मोठ्ठे हिरो ठरले होते त्यांचे. पण कुठचे काय. स्वतः गायकवाडांनीच परत एअर इंडियाचेच तिकिट काढून एअर इंडियानेच प्रवास करायचा प्रयत्न करून चांगलेच थोबाड फोडले सगळ्या पेंग्विनसेना समर्थकांचे (**) **: थोबाड फोडणे वगैरे भाषा मी सहसा कधी वापरत नाही. पण काय करणार. मिपावरील पेंग्विनसेना समर्थकांच्या संगतीत राहून माझ्यावरही थोडा परिणाम झाला आहे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

मागे एकदा मी भक्त कोणाला म्हणायचे असा प्रश्न विचारला होता, अर्थात उत्तर थातूरमातूरच मिळाले होते. इथे कोणाला पेंग्विनसेना समर्थक म्हणायचे असे विचारून पाहतो. बाकी भक्त म्हणल्यावर वाईट वाटू शकते, मग दुसर्यांना पेंग्विनसेना समर्थक म्हणणे योग्य असू शकते का? खासकरून अभ्यासू आयडींकडून असे आले की जास्तच बेक्कार वाटते हो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा सांगितले आहे. पण तो केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(

In reply to by मोदक

केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(
जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे. एखादी न पटलेली गोष्ट ज्या प्रमाणात पटलेली नाही त्या प्रमाणावर माझी प्रतिक्रिया असते. जर एखादी गोष्ट थोडीशी पटली नाही तर थोडीशी टिका, अजिबात पटली नाही तर प्रचंड टिका, थोडीशी पटली तर थोडेसे समर्थन आणि पूर्ण पटली तर प्रचंड समर्थन!! ओठात एक पोटात दुसरेच, उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुडी गुडी बोलणे इत्यादी ढोंगे मला जमत नाहीत. तसेच इतरांना माझ्याविषयी काय वाटेल या गोष्टीचाही विचार करायची गरज मला वाटत नाही. या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) :) जर का अडवाणींच्या भाजपला मी मिपावरच भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले असेल (आणि आजही जर अडवाणी पक्षाच्या नेतेपदी आले तर मिपावर माझ्यापेक्षा मोठा भाजपविरोधक बघायला मिळणे कठिण आहे) तर शिवसेनेला पेंग्विनसेना म्हटले तर त्यात मला स्वतःला तरी काही वावगे वाटत नाही. असो. आता या विषयावर आणखी चर्चा करण्यात मला अजिबात स्वारस्य नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी क्लिंटनचा पुर्वीपासुनचा पंखा आहे. मिपावर जी माणसं तटस्थपणे मत देऊ शकतात त्या थोड्या लोकांमध्ये हा आहे. आता झालाय असं की गेल्या काही वर्षांपासुन सामना मध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे त्याने माझ्यासारखे लोक, ज्यांना स्व. बाळासाहेब आणि आता मोदींविषयी प्रचंड प्रेम आहे ते दुखावले जातात आणि अशी प्रकरणे बाहेर आली की त्यावर टोकाचे समर्थन किंवा टोकाचा विरोध पाहायला मिळतो. कोणी माना किंवा न माना, आत्ता लोकसभा व बाकी राज्यांमध्ये जी भाजपाला सत्ता मिळाली आहे ती केवळ मोदींवर असलेल्या विश्वासावर मिळाली आहे. "ये अपनेको नही डुबायेगा" असे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांपासुन कॉर्पोरेट मधील मेजॉरिटी लोक बोलत आहेत. मोदींच्या परदेशातील सभा आजची तरुण पिढी क्रिकेट मॅच पेक्षा आवडीने बघतात. किती पंतप्रधानांच्या नशिबी हे भाग्य आले आहे (लालबहादुर शास्त्री व इंदिरा गांधी वगळता). त्यामुळे भाजपा मधील बाकी लोकं कितीही गोंधळ घालत असली तरी मोदींच्या प्रेमापोटी लोकं त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवसेना इथेच मागे पडतेय असं वाटतं, म्हणुन आत्ता गायकवाडांच्या केस मध्ये पण दुसरी बाजु असु शकते.... एअर इंडिया च्या माणसांनी दादागिरी केली असु शकते ह्याचा विचारही केला जात नाही. राहता राहिला प्रश्न माध्यमांचा. माध्यमं व दाक्षिणात्य माणसांचा शिवसेनेवर आणि आता भाजपावर राग आहेच, त्यामुळे कदाचित ह्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली असावी. मागे एकदा फडणविसांच्या अमेरिका दौर्याच्या वेळी मुख्य सचिव पासपोर्ट विसरल्याने विमान डिले झाले होते, तेव्हा माध्यमांनी सर्व बिल फडणविसांवर फाडले होते. त्यामुळे हे होतच राहणार. असल्या प्रसंगांनी आपली मिपावरची किती रिलेशन तोडायची ह्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

प्रसादराव तुम्ही हिंदी चित्रपट बघितले असतीलच. त्यात अनेकदा असे बघायला मिळते--- गोळी एकाला मारली की अगदी जस्ट इन टाईम दुसरा कोणीतरी मध्ये येऊन ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतो!! तुम्ही त्या गोळी अंगावर घेणार्‍यांसारखे का करत आहात? तुम्ही पेंग्विनसना समर्थक नाही हे तुम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे थोबाड फोडणे वगैरे भाषा तुम्ही कधी वापरलेली नाही. मग तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाहीच. तशी भाषा वापरणारे वेगळे आहेत आणि अशा प्रवृत्तींना (ज्यांना मी पेंग्विनसेना समर्थक म्हणतो) उद्देशूनच तर तो वरील प्रतिसाद होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

ट्रुमनसाहेब, तुम्ही मला म्हणत आहात म्हणून मला वाईट वाटतेय असे अजिबात नाही. मिपावर वावरत असताना, काही आयडी आणि त्यांचे मुद्देसूद अभ्यासू लिखाण हे रोल मॉडेलसारखे पहिले जाते, कमीत कमी मी तरी पाहतोच. तुम्ही त्यापैकी एक आहातच हे उघड आहे. बरेच वेळेस भाजप समर्थनार्थ मांडलेले मुद्दे "भक्त" ह्या संबोधनाखाली दुर्लक्ष केले जातात. तुम्हीही त्याचा अनुभव घेतला असेलच. तसेच "पेंग्विनसेनासमर्थक" ह्या संबोधनाने होऊ नये म्हणून मी माझे मत व्यक्त केले. मला उद्देशून काही म्हटले असेल तरच प्रतिक्रिया द्यावी असे मला वाटत नाही. मला पटले नाही म्हणून मी म्हणालो, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लिहु शकताच. माझा काहीही आक्षेप नसेल.

In reply to by श्रीगुरुजी

निंदेच्या सोयीसाठी आता कुठल्याही थराला जाऊ शकतात, पुरावे आहेत का याला काही? बाकी उघड उघड गोष्टींसाठीही पुरावे मागणारे, आपल्या सोयीच्या गोष्टींवर किती सहज विश्वास ठेवतात हे उघड दिसतंय.