Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95929
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजींशी सहमत. शिवसेना ही गुंडांचीच एक टोळी आहे. इथे त्या खासदाराच्या वागण्याचे समर्थन करणारे लोक पाहून जुन्या चर्चांची आठवण आली. http://www.misalpav.com/node/23211 http://www.misalpav.com/node/23207 (अलीकडे गुरुजींशी काही काही बाबतीत सहमत होत असल्याचे मला आश्चर्य वाटत आहे.)

In reply to by अत्रे

टुकार पक्षच कार्यकर्ते ? कुठले कुठले पक्ष आहेत ? लिस्ट द्या माझ्याकडे १० -२० गुंडांची फौज आहे नक्की हा खरं..जस्ट एक चर्चा म्हणून. म्हणजे कुठले पक्ष कुठले कार्यकतें ??

In reply to by अत्रे

तंतरली वाटते धागा लेखकाची. डायरेक्ट बाळासाहेबांचाच धावा चालू केला. माणसाने सोसेल एवढ्याच फुशारक्या माराव्यात.

किती दिवसांपासून असे वाद चालू असतात त्यात बोलताना भाजप समर्थकांनी जी पातळी सोडली लोकांना नावे ठेवताना ती कोणीच सोडली नाही . बाकी एकदा काय झालं माहितीये बजरंग दलामुळे अनेक मुली पळून गेल्या . आपण वरील घटना जी सांगत आहेत पालघर ची त्यात त्यांच्या आक्षेपार्ह कमेंट्स होत्या ते पण चुकीच्या वेळेला . मुलींच्या बाबतीत संघीय भूमिका माहिती असावी अशी अशा करतो . अजून एकदा काय झालं संघामुळे ना एक हॉस्पिटल फोडावे लागले बंगलोर ला. अजून एकदा काय झालं ते तुम्ही सांगा मी सांगत राहतो .

एक विचार त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?

In reply to by मराठी_माणूस

हा सयंत विचार अगदी पटला. त्या अधिकाऱ्यासाठी गायकवाड हे प्रथम त्यांचे ग्राहक होते नंतर खासदार एवढा संकेत पाळला असता तर त्याला २५ जोडे खावे लागले नसते. आणि मोदीजी काय कॉल सेंटर ऑपरेटर आहेत का विमान वाहतूक वाल्यांचे?

In reply to by मराठी_माणूस

त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ? चूक मान्य केली असती??????? त्या कर्मचार्‍याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?

मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाचे कडवे समर्थन कसे करावे, संबंधित मनुष्य खासदार असल्यामुळे या प्रकरणात कायद्याची बूज राखायची जास्त जबाबदारी त्याच्याकडे होती वगैरे प्रश्नांना मनात जराही येऊ न देता वर इतर पक्षांच्या समर्थकांना भक्त कसे म्हणावे हे पेंग्विनसेना समर्थकांकडूनच शिकावे. मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले.

अभ्या / मोहिते / विशुमित प्रतिक्रिया वाचुन गम्मत वाटली भाजप ला फाटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना एक गोष्ट लक्षात नाही का? या खासदारसाहेबांनी एका माणसाला २५ वेळा चपलेने मारले .. वर ही गोष्ट अभिमानाने सांगितली ... ह्या गोष्टीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आहात

In reply to by अमर विश्वास

भाजपचा इथे कसा संबंध जोडला कळले नाही ? उलट भाजप वासियांनाच जास्त जोर चढलेला दिसला आहे. वरून आम्ही गुंडाना घाबरतो म्हणून पदरा आडून ठुसक्या सोडत आहेत. अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ? प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला? सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?

In reply to by विशुमित

प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला? गायकवाडने तर फुशारक्या मारल्या होत्या. निषेध केल्याचे आठवत नाही. एक नंबरचा उद्दाम, बिनडोक माणूस आहे. (माझे नाव सौरभ जोगळेकर असून मी चिंचवडमधे राहतो. मी पेंग्विनसेना, गायकवाड, राष्ट्रवादी, शरद पवार यांचा जाहीर विरोधक आहे. नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचा जाहीर समर्थक आहे. मी गायकवाड बद्दल केलेल्या सगळ्या विधानांची जबाबदारी घेतो. (संपादित) )

In reply to by विशुमित

(संपादित) "सभासदांनी आपल्या भाषेवर ताबा ठेवावा आणि वैयक्तिक शेरे मारणे टाळावेत. संभाषण केवळ मुद्द्यांपुरते सीमीत ठेवावे." --- संपादक मंडळ

In reply to by विशुमित

परत आम्ही २५ वेळा जोड्याने मारल्यावर सहन नाही होयचा अप्पाना..!!>>> ही जाहीर धमकी समजायची का?

In reply to by विशुमित

अप्पा आपली लायकी आणि लेवल समजली...!!
हे आणि
संपादकांनी लक्ष घालावे..
हे ही दोन वाक्ये एकाच दमात कसे लिहू शकता हो?तुमच्या कॉन्फिडन्सचे (की फाजील आत्मविश्वासाचे) खरोखरच कौतुक वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना (लहान तोंडी मोठा घास घेऊन) विनंती करतो की थोडं सबुरीने घ्यावे. उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना? बाकी आपण सगळे सुज्ञ आहोतच! आक्षेपार्ह्य वक्त्यव्य गाळल्याबद्दल संपादकांचे आभार!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना?
सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का?

In reply to by गॅरी ट्रुमन

हो, म्हणूनच सर्व जुन्या जाणत्या असा उल्लेख केला. तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना फक्त तुम्हालाच उद्देशून असा हेतू नव्हता. गैरसंजबद्दल दिलगिरी.

In reply to by गॅरी ट्रुमन

सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का? ==>> अप्पानी आणि मी आमचा प्रश्न सोडवला आहे. संपादकांनी पण त्यांचे काम चोख बजावले आहे. तुम्ही का एवढे टरिला लागले समजले नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

(संपादित) हे वक्तव्य सुद्धा आक्षेपार्ह आहे. ही तर उघडउघड धमकीच आहे. हे वक्तव्या सुद्धा काढून टाकले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सहमत आहे. अशाप्रकारच्या धमक्या मिपावर राहू दिल्या तर मिपा हे सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे या समजाला तडा जाईल.

In reply to by विशुमित

चर्चा चांगली चालली असताना त्यांनी अपशब्द वापरले आणि आम्ही फक्त त्याचे परिणाम काय होतील हे नमूद केले होते. असो... आम्ही आमची पातळी सोडणार नाही, याची ग्वाही देतो..!!

In reply to by विशुमित

मी ड-३०५, डीएसके कुंजबन, पुनावळे, चिंचवड येथे राहतो. माझ्याकडून चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल. दिलगीर आहे. ही दिलगीरी रविंद्र गायकवाड बद्दल केलेल्या विधानासाठी नाही. माझ्या प्रतिसादातील चुकीच्या भाषेसाठी आहे. हे लक्षात घ्यावे. गायकवाड बद्दलची माझी मते ठाम आहेत. माझ्यापुरता विषय संपला. तुम्हाला जे योग्य वाटते ते करावे.

In reply to by विशुमित

विशुमित सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?>>> माझ्या प्रतिसादात परवानगी असा उल्लेख तरी आहे का? बाकी तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार कशालाही / कुणालाही सपोर्ट करा .. काय फरक पडतो ? पण विरोधी मते ऐकायची तयारी ठेवा .. या खासदारसाहेबांच्या वागण्याचे कुठल्याच पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. सर्वप्रथम त्यांनी आपल्या कृत्याची माफी मागितली पाहिजे

In reply to by विशुमित

अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ? गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्‍या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्‍या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे. मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्‍याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदकजी, मोदींचं नाव हे त्या "इतर" प्रकरणांसारखे पोजीटीव्ह स्पिरिट मध्ये घेतले गेले होते असे आपल्याला खरेच वाटते का? "आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे. तिथून ते शिवीगाळ आणि धक्काबुक्कीमुळे वाढतच गेले असावे. याला राजकीय रंग व फक्त सेवा दिली नाही म्हणून चपलेने फोडून काढले असा रंग देणे पटत नाही. त्यांनी मारहाण केली असेल तर त्यांच्यावर मारहाण केल्याबद्दल कायद्यात असते ती शिक्षा व्हायला हवीच, पण त्याच वेळी एका संसद सदस्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि अरेरावी झाली असेल तर ती करणार्यांना सोडले जाऊ नये असे वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे. ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून द्या एक वेळाही) मारले हे कुठल्या चित्रफितीत दिसले? खासदारांनी सांगितले म्हणूनच ते वापरले जातेय ना? मग हे खासदारांनीच सांगितले आहे (त्यांच्या प्रतिक्रियांचे विडिओ बघून घ्या). शिवाय त्या हवाईसुंदरीने साधारण ह्याच लाईनवर सांगितले आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मी कर्मचाऱ्याला २५ वेळा चपलेने मारले, हे खासदारांनी स्वतःबद्दल सांगितले आहे. इतरांनी त्यांच्यावर हे आरोप केलेले नाहीत. त्यामुळे इतरांनी ते सिद्ध करणे अपेक्षित नाही. मात्र हेच खासदार कर्मचारी अमुक बोलला, तमुक बोलला असे सांगत आहेत. ते आरोप त्यांनी सिद्ध करणे अपेक्षित आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परत वाचा. आपल्याला हवे तसे अर्थ व्हिडिओतून निघतात, पेपरमधून निघतात, प्रतिक्रियांमधून निघतात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

इथे मला कोणता अर्थ हवा आहे हा प्रश्नच उद्भवत नाही. आपण अमुक एक पराक्रम गाजविला याची जाहीर कबुली खासदार महाशयांनी दिली आहे. त्यामुळे इतरांनी ते सिद्ध करण्याचा प्रश्नच नाही. त्याचवेळी कर्मचारी काहीतरी वावगे बोलला असा त्यांचा आरोप आहे. त्या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी सबळ पुरावे देणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी. परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी. एक सांगा. त्यांनी कर्मचार्‍याला चपलेने मारले का नाही मारले. त्यांनी मारले हा आरोप त्यांच्यावर इतर कोणीही करत नसून त्यांनी स्वतःहूनच हे सांगितले आहे. या क्षणापर्यंत त्यांनी ते नाकारलेले नाही. त्यांनी कर्मचार्‍याला खरंच मारले होते का हे सिद्ध करण्याची जबाबदारी इतरांवर नाही कारण इतर कोणीही हा आरोप केलेला नाही. त्यांनी स्वतःहूनच कबुली दिल्याने आता त्याच्यात कोणीही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु कर्मचारी बेताल वागला, अपशब्द वापरले हे आरोप त्यांनी कर्मचार्‍यावर केले आहेत. जो दुसर्‍यावर आरोप करतो, त्याच्यावरच ते आरोप सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी असते. ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर ही जबाबदारी नसत. त्याने नुसते आरोप नाकारले तरी ते पुरेसे असते. त्यामुळे खासदार महाशय कर्मचार्‍यावर जे आरोप करीत आहेत, ते सिद्ध करणे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर बंधनकारक आहे. परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात. आपल्याला धक्काबुक्की व शिवागीळ झाली हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी खासदार महाशयांवर आहे. त्याचवेळी विमान कंपनीने आपल्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याची व विमानाला खोळंबा केल्याची केस टाकली आहे त्यात फार काही सिद्ध करण्यासारखे नाही कारण दस्तुरखुद्द खासदार महाशयांनीच कॅमेर्‍यासमोर या गुन्ह्याची जाहीर कबुली दिली आहे व ती कबुली न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईलच. अर्थात शिक्षा टाळण्यासाठी, "मी मारहाण केलीच नव्हती. फुशारक्या व पोकळ बढाया मारणे ही आमच्या पक्षाची व पक्षनेतृत्वाची संस्कृती आहे व त्याला अनुसरूनच मी मारहाण केलेली नसतानाच कॅमेर्‍यासमोर मारहाण केल्याच्या फुशारक्या मारल्या. अशा फुशारक्या मारल्या तर माझा व माझ्या पक्षाचा भाव वाढेल असे मला वाटले." असा खासदार महाशयांनी न्यायालयात स्टँड घेतला तर मात्र मारहाण झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी कर्मचार्‍याची राहील.

In reply to by श्रीगुरुजी

मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम. आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे? कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत का? हवाईसुंदरीने विमान अधिकाऱ्याच्या तोंडून काहीतरी अपमानास्पद गेले आणि मग भांडण सुरु झाले असे सांगितले नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा न्यायालयात होणे गरजेचे आहे. त्याआधीच तुम्हाला शिवसेना आवडत नाही आणि सदर प्रकरणातील खासदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणून लगेच त्यांच्यावर आसूड ओढणे मला तरी पटत नाही. बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम. चुकीची माहिती आहे. कोणत्याही खटल्याची सुनावणी सुरू होताना सर्वात प्रथम न्यायाधीश आरोपीला त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवितात व त्यावर "गिल्टी ऑर नॉट गिल्टी?" असे त्याला विचारतात. जर "नॉट गिल्टी" असा त्याने दावा केला तर पुढील सुनावणी सुरू होतो व फिर्यादीला आरोपीच्या विरूद्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर आरोपीने या प्रश्नावर "गिल्टी" असे पहिल्याच फटक्यात कबूल केले तर खटला पुढे चालविण्याची गरजच नसते. हा खटला भविष्यात कधीकाळी सुरू झाला व खासदार महाशय आपल्या दाव्यावर ठाम राहिले तर एका मिनिटात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा ठोठावली जाईल. "आपण मारहाण केलीच नाही. कर्मचार्‍याला मारहाण केल्याची नुसती फुशारकी मारली." असा त्यांनी न्यायालयात दावा केला तर मात्र आपल्याला मारहाण झाली हे कर्मचार्‍याला सिद्ध करावे लागेल. जोपर्यंत खासदार आपल्या कबुलीला चिकटून आहेत तोपर्यंत पुरावे, साक्षीदार इ. ची गरज नाही. आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे? दोन्ही गोष्टींचा राग आहे. परंतु फुशारक्या मारणे हा कायदेशीर गुन्हा नाही. ही एक मानसिक प्रवृत्ती आहे. परंतु मारहाण करणे हा गुन्हा असल्याने याच गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत का? हवाईसुंदरीने विमान अधिकाऱ्याच्या तोंडून काहीतरी अपमानास्पद गेले आणि मग भांडण सुरु झाले असे सांगितले नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा न्यायालयात होणे गरजेचे आहे. त्याआधीच तुम्हाला शिवसेना आवडत नाही आणि सदर प्रकरणातील खासदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणून लगेच त्यांच्यावर आसूड ओढणे मला तरी पटत नाही.
सदर प्रकरणातील खासदार कोणत्याही पक्षाचे असते तरी मी टीका केलीच असती. हवाईसुंदरीने जे काही सांगितले ते फक्त मटा, लोकसत्ता याच वृत्तपत्रातील आंतरजाल आवृत्तीत दिसले. त्यांच्या छापील आवॄत्तीत त्यांनी हे छापलेले नाही. इतर माध्यमांनी सुद्धा त्या निवेदनाची दखल घेतल्याचे वाचण्यात आले नाही. तिची ओळखही लपविलेली आहे. त्यामुळे ते जे निवेदन होते ते कितपत जेन्युईन आहे याविषयी साशंक आहे. बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते. शिवसेनेवर माझा राग आहेच व मी तो कधीच लपविलेला नाही. परंतु हा राग विनाकारण किंवा अनाठायी नाही हे या व आधीच्या इतर अनेक प्रकारणांवरून सिद्ध झाले आहे. शिवसेनेवर टीका करण्याची संधी शिवसेनेच्याच खासदार महाशयांनी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला नावे का ठेवता हा इतरांना प्रश्न न विचारता शिवसेनेलाच विचारणे योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

क्लॉजेस काढायचे असतील तर खूप निघतात. बाकी ते हवाईसुंदरीचं मटात आल्याचं तुम्ही फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. हि घ्या अजून काही वर्तमानपत्रे - http://www.mid-day.com/articles/air-india-air-hostess-defends-osmanabad… आणि हे पण वाचाच - http://myvoice.opindia.com/2017/03/why-did-english-media-ignore-the-fac…

In reply to by विशुमित

प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला? बापरे. म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्‍यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे. खरं तर त्या कर्मचार्‍याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, अहो काहीतरीच काय म्हणताय! १.
म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्‍यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे.
यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते. २.
खरं तर त्या कर्मचार्‍याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.
खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पण हे पुर्वग्रहदुषित आणि एकांगी विचार असणाऱ्या तथाकथीत तज्ञांना पटणार नाही. कारण मुळातच चर्चा ही निकोप आणि संतुलित असावी हे काही लोकांच्या खिजगिणतीतही नसते.

In reply to by गामा पैलवान

यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते. विमानात मुळात बिझनेस क्लासची आसनेच नसताना केवळ हे महाशय विमानात येणार म्हणून त्यांच्याकरता आयत्यावेळी तशा आसनांची सोय करायची होई का? व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार? जर त्यांना जनता क्लासमधून प्रवास करायची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या विमानातून दिल्लीला न जाता ज्यात व्यवसायवर्गाची सोय आहे असे विमान बघून त्यातून प्रवास करायला हवा होता. ते न करता हे जनता क्लासमध्ये बसून दिल्लीला पोहोचले आणि नंतर मला व्यवसाय वर्ग का दिला नाही म्हणून वादविवाद सुरू केला. जर विमानात व्यवसायवर्गाची आसने असतानासुद्धा यांना ते आसन न देता जनता क्लासमधून प्रवास करायला लावला असेल तर ते नक्कीच चु़कीचे आहे व त्यांची तक्रार योग्य आहे. पण विमानात तशी आसने नसताना सुद्धा हे त्याबद्दल तक्रार कसे करू शकतात. मुंबईत बोरीबंदर स्थानकावरून फास्ट लोकलची घोषणा ऐकूनसुद्धा फास्ट लोकलमध्ये बसून नंतर ती लोकल दादरनंतर थेट अंधेरीलाच थांबली, मला तर माटुंग्याला उतरायचे होते, पण यांनी मुद्दामच लोकल माटुंग्याला थांबवली नाही अशी तक्रार एखाद्याने केली तर ते हास्यास्पद होणार नाही का? किंवा "शुद्ध शाकाहारी भोजन" असा फलक लावलेल्या उपाहारगृहात शाकाहारी थाळी चेपल्यानंतर बिल द्यायची वेळ आल्यावर "माझ्यावर अन्याय झाला. मला मटण वाढलेच नाही. मला तक्रार करायची आहे." अशी भूमिका किती हास्यास्पद होईल. इथेही तसेच झाले आहे. खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती. मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे. त्यामुळे मोदींचे नाव सांगणे अजिबात चुकीचे नाही. खासदार ज्या शाळेत जातात त्या शाळेचे मोदी मुख्याध्यापक आहेत. या महाशयांनी अत्यंत हास्यास्पद कारणावरून विमान अडवून धरले होते व त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे कर्मचार्‍याने योग्य तेच केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पणा आणि भाजप ने योगीची केलेली निवड , भाजप च्या अनेक मारहाणीचे प्रकरण .. नुसतं बीजेपी बिटिंग टाकलं तरी लिंक येतात . ह्यावर विस्तृत लेखाच्या प्रतीक्षेत . उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाच माझं नाव ऍड्रेस अनेक लोकांना माहित आहे . नालायक अमित शहा ला मारलं पाहिजे असं शीर्षक ठेऊ . नेट आहे अभिव्यक्ती आहे . पण मी खऱ्या नावाने लिहितो ना . ते इंटरनेट मुळे लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं नाही . मी बोलतो अमित हरामखोर मग काय ?? भक्त पार्टी ... काय ते पेंग्विन ना मग गो पार्टी म्हणू का भाजप ला ? नाव सुचवा कोणी >>>विनंती आहे

In reply to by वरुण मोहिते

उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाच मी काय म्हणतो मोहिते साहेब.. तुम्ही सतत दुसर्‍याला लेख लिहायला का सांगता..? तुम्हाला एखादा विषय / व्यक्ती / घटना टोचत असेल तर तुम्ही अभ्यास करून लेख लिहा आणि मग जी काय चर्चा व्हायची ती होवूदे. लोकांनी लेख लिहावेत मग मी मते मांडणार ही भूमीका किती दिवस चालणार..?

In reply to by मोदक

भूमिका आपली असते मोदक साहेब . अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे . आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते . मी भाषा सोडून पण बोलत नाही कधी

In reply to by वरुण मोहिते

लेख लिहा लेख लिहा हि भूमिका आपली असते मोदक साहेब . हो असते आणि फक्त तुमच्या बाबतीत, कारण तुम्ही स्वत: दुसर्‍याला तशी आवाहने करता म्हणून. अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे . हे नक्की काय लिहिले आहे ते मला कळाले नाही. प्रतिसादांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भूमीकेसाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी लेख लिहावा असे पूर्वी / आत्ता सुचवले आहे. आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते . तेच. जे काही टोचत असेल त्यासाठीच सांगतोय. लेख लिहा आणि मग टोचणे बंद होते का ते बघा. तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टींवरपण दुसर्‍याने इलाज शोधावा अशी अपेक्षा आहे का..? मी भाषा सोडून पण बोलत नाही कधी हे मी बोललो नाहीये. त्यामुळे पास.

In reply to by मोदक

१)कितीशी आवाहने केली आहेत कळेल का ??का लिहा लिहा म्हणून मागे पडलोय . काही विषय आवडतात त्यावर लिहा कोणाला बोलो असें त्यात काय आवाहन झाले का ?? २)प्रतिसादांसाठी म्हणजे एकांगी लिखाण राजकीय धोरणांचे असे लेख मी लिहणार नाही बोलो .जसा हा लेख . ३)इलाज कोणी शोधून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली का?? मी फक्त दुट्टपी भूमिकेबद्दल बोलो .बाकी आम्हाला काही टोचत नाही ,इंजेक्शन सोडून:)))

In reply to by मोदक

वरच्या प्रस्तावाला आमचे अनुमोदक :) रेफरन्स साठी एक पुस्तक सुचवतो - गुजरात फाइल्स ( https://www.amazon.in/Gujarat-Files-Rana-Ayyub-ebook/dp/B01FWD9F2I) फुकट पण मिळेल इबुक ऑनलाइन शोधल्यास.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे कर्मचार्‍याने योग्य तेच केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का? नाही. कर्मचार्‍याने असे केले आहे हे सिद्ध झालेले नाही किंवा मी हे केले अशा फुशारक्या कर्मचार्‍याने मारलेल्या नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

एखाद्याने उद्या मी या देशाचा पंतप्रधान आहे म्हणून फुशारक्या मारल्या तर तुम्ही मानालच ना? सिद्ध हे कोर्टात होत असते आणि ते व्हायची वाट बघायची तुमची इच्छा दिसत नाही. त्याआधीच त्याने काय केले हे स्वतःला हवे तसे गृहीत धरून चांगले केले असे उघड समर्थन तुम्ही करत आहात.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, आपण समजतो त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत. १.
व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार?
मग 'जे' वर्गाचं चढपत्र (=बोर्डिंग पास ) कशाला छापलं? प्रवाशांना योग्य माहिती का दिली गेली नाही? ही सुविधा न पुरवल्याने गायकवाडांना तक्रार करावीशी वाटली असेल असं मानण्यास जागा आहे. २.
मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे.
हा विश्वास मोदींनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी पीडितांची तातडीने दखल घेतल्याने कमावला आहे. मात्र प्रस्तुत प्रसंगात मोदींचं नाव घेणारा पीडित नाही. आ.न., -गा.पै.

मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक संपला वाटतं. नाही, अजून मुंबई एअरपोर्टवर काही राडा झालेला नाही म्हणून विचारलं :D

In reply to by अत्रे

राडा व्हावा हीच 'श्रीं'ची इच्छा दिसतंय. लांबून मजा बघायला बरं. नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत याचे भान विसरले आहेत बहुदा.

In reply to by विशुमित

नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत याचे भान विसरले आहेत बहुदा.
मिपावरच्या कमेंट वाचून कोणी माथेफिरू सैनिक हल्ले करणार असेल, तर त्याला लगेच कोठडीत पाठवण्यात येईल :) ही २८ मार्च बातमी वाचा - http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-…
मुंबई विमानतळावर राडा करण्याचा गर्भित इशारा शिवसेनेने दिल्याचे समजते.
एअरपोर्ट युनिअन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत म्हणून राड्याबदल बोलण्याची हिम्मत झाली असावी. एकदा चोप बसला आणि कामावरून काढून टाकले कि बसतील बोंबलत!

In reply to by किसन शिंदे

काय करू सांगा मला! यापूर्वीच्या आयुष्यात एखाद्या राजकारण्याला इतक्या लवकर शिक्षा झाल्याचे कधी पहिलेच नव्हते. म्हणून माझा आनंद अनिवार झाला आहे. आणि आपण सामान्य नागरिकांकडे चीड व्यक्त करण्यासाठी शब्द सोडून दुसरे काय आहे? आपण काही नेतेलोकांसारखे चपलेने बडवू शकत नाही इतरांना. आणि बडवले तरी लगेच अटक होते.