Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95929
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

संबंधित अधिकाऱ्याने मागील सुमारे पावणेदोन वर्षांत एअर इंडियाची सेवा, स्थिती, प्रतिमा, विश्वासार्हता आणि शिस्त सुधारण्यासाठी नक्की काय प्रयत्न केले आणि त्याचा नक्की रिझल्ट काय हे पण विस्तृतपणे सांगा. माणसाचे कर्तृत्व केवळ शिक्षण आणि पदव्यांवर ठरत नसते, तर त्याने त्या शिक्षणाचे आणि पदव्यांचे त्याच्या कामात कशा प्रकारे उपयोजन केले आहे यावर ठरते. एखाद्याच्या केवळ पदव्या भरमसाट आणि रिझल्ट फारसा नसेल तर काहीही उपयोग नाही. शिवाय कॉर्पोरेटमधे पावणेदोन वर्षे हा काही कमी कालावधी नाही.

In reply to by शार्दुल_हातोळकर

ठिक आहे, पण एअर इंडियाच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांना, आमच्यापुढे(शिवसेना नेते), अश्वनी लोहानी यांची औकात काय? असा प्रश्न निर्लज्जपणे विचारणार्‍या शिवसेना नेत्यांचे गुंडगीरी, तोडफोड व खंडणी गोळा करण्याव्यतिरिक्त सामाजिक, राजकिय जीवनात त्यांचे कर्तुत्व काय आहे? निदान त्या अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर हे पद सांभळण्यापुर्वी, गॅरी ट्रुमन यांनी इथे लिहिल्याप्रमाणे काहितरी भरीव काम तरी केले आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

त्याहूनही महत्वाचे म्हणजे कोणाचीही औकात काढणार्‍याला कोणत्या कारणावरून औकात काढली हा प्रश्न विचारायला हवा. सभ्य समाजात तरी ठोस कारण असल्याशिवाय अशी कोणाची औकात काढत नाहीत. तेव्हा अशी औकात काढली जात असेल तर संबंधितांनी त्यामागे काहीतरी अभ्यास, कारणमिमांसा केली असेलच. ती मांडायची जबाबदारी त्यांचीच. ती गोष्ट खरी असेल तर आपण सगळेच त्यांची औकात काढू. हा.का.ना.का.

In reply to by गॅरी ट्रुमन

सभ्य समाजात तरी ठोस कारण असल्याशिवाय अशी कोणाची औकात काढत नाहीत.
साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.
ठिक आहे. मी शाळेत असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात राहायला होतो. तेव्हापासून शिवसेना म्हणजे गुंडगिरी हे समीकरण अगदी पक्के बघितलेले आहे. त्यामुळेच असा क्लास काढला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी म्हणून अजिबात मत व्यक्त केले नाही. मला तुमच्याबद्दल आदर आहेच. पण आधीच राजकारण घाण अशी प्रतिमा, वरून एकमेकांच्या वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या काढण्याने मूळ मुद्दा बाजूला राहून वैयक्तिक चर्चा सुरु होते. त्यात परत अशा चर्चा उडवूनच लावा म्हणणारेही आहेतच. त्यामुळे गैरसमज नसावा.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही विशिष्ट राजकीय पक्षावर टीका करुन केवळ अधिकाऱ्याची भलामण केलीत, म्हणुन मला ती असंतुलित चर्चा वाटली. तुमच्याकडुन वर विचारलेल्या माझ्या प्रश्नाला बगल न देता थेट उत्तराची अपेक्षा आहे. अवांतर - मा. सुरेश प्रभुंनी रेल्वेमधे ज्या सुधारणांची सुरुवात केली आहे, त्याचे थेट जनतेने कौतुक केले आहे. तस्मात एअर इंडियाचे मागील पावणेदोन वर्षांत काही दिसत नाही.

In reply to by शार्दुल_हातोळकर

एअर इंडियाची वाटचाल जो कोणी इथे अ‍ॅनालाईझ करणार असेल त्याने किमान गेल्या १० ते १५ वर्षांची वाटचाल अभ्यासावी ही नम्र विनंती. "एअर इंडियाचे पद्धतशीर खच्चीकरण झाले" हे अनेकदा वाचले आहे, ते नक्की कसे.. हे कळाले तर ज्ञानात भरपूर भर पडेल

नका . सांगतो प्रफुल्ल पटेल आणि किंगफिशर हा संबंध आहे . ह्या साठी मार्केट मध्ये भाव पाडण्यात आले .मग विलीनीकरण झालं . इंडियन एरलाईन्स आणि एअर इंडिया च . कामगार संघटना मजबूत ठेवायच्या होत्या ह्या कारणाने कित्येकदा आवाज उठवून पण एअर इंडिया ची सेवा बदलली नाही . गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल हा संबंध होता . ह्यासाठीच कल्याण नजीक जागा घेतली . मग पनवेल . मग रेंगाळत ठेवणे . असो

श्रीगुरुजी, जितक्या हिरीरीने तुम्ही माज उतरायला सुरुवात झालेली दिसते असं म्हणताय, तितक्याच उत्साहाने जरा गायकवाडांची मूळ तक्रार पण शोधून डकवता का? माध्यमांत कुठेच सापडत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. माध्यमांना फक्त भांडण पेटतं ठेवण्यातच रस आहे. पण तुम्ही सामोपचाराची भूमिका घेत असता. म्हणून तुम्हाला विचारतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

राऊत म्हणतोय म्हणजे थापच असणार. राऊतला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. फालतू बरळणे हा राऊतचा जुना छंद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे तुमचं वैयक्तिम मत आहे! माहितीचा काही स्रोत मिळाला तर चर्चा पुढे सरकेल, थापा काय बरेच लोक मारतात.

In reply to by गामा पैलवान

पैलवान, त्याचं काय आहे काहिंना मुळात हि समस्या का उद्भवली हे समजुन घेण्यात किंवा त्या समस्येचं निवारण करण्यात काडीचाहि इंटरेस्ट नसतो किंवा त्याचं आकलन करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. कस्टमर सर्विस इज ए रुटकॉज ऑफ धिस इशु बट नो वन इज अ‍ॅड्मिटिंग धिस बिग एलिफंट इन दि रुम. सेनेने कधीतरी शेपटावर पाय दिलेला असल्याने संधी मिळेल तेंव्हा स्कोर सेटल करायला हे पुढे असतात; त्यांची बाजुहि समजुन घ्या... ;) तर मुळात "कस्टमर सर्विस" हा प्रकार एयर इंडिया किंवा बहुतांश सरकारी कंपन्यांच्या खिजगणतीतहि नाहि/नसतो. गायकवाडांची तक्रार एखाद्या शहाण्या, मच्युअर्ड माणसाने ऐकुन घेतली असती तर त्यांना तिथेच शांत करता आलं असतं. प्रकरण पुढे चिघळलं, यात चुक कोणाची? सुकुमारची आहेच पण काहि अंशी एयर इंडियाची देखील आहे. आताचे नविन सिएम्डी लोहानी कर्तबगार आहेत असं ऐकुन आहे. गायकवाडांवर बंदि घालण्या व्यतिरीक्त अशा प्रकारचे इशुज भविष्यात होऊ नयेत न्हणुन यांनी काय पावलं उचललेली आहेत? अंतर्गत चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे का? सुकुमार किंवा सगळ्या कस्टमर फेसिंग कर्मचार्यांना योग्य ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केली आहे का? विमान व्यवसाय अत्यंत डायनॅमिक आहे; वारंवार होणारे बदल ग्राहकाला ताबडतोब पोचले जावे, त्याची पर्यायी व्यवस्था गैरसोय न होता करण्यात यावी - या साठी कंपनी बांधील आहे अशी मेटॅलिटी/धोरणं राबवली जाणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील अशी अशा करुया...

In reply to by राजाभाऊ

सगळे आरोप एकतर्फी होत आहे . त्या अधिकार्‍याने जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याचे काय (http://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-bal-thackeray-shiv-s…) सेवा त्रुटीचे अजुन एक उदाहरण http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/choked-toile… प्रवाशांचे काय हाल झाले असतील कल्पना करवत नाही.

In reply to by मराठी_माणूस

या वरच्या लोकसत्ताच्या लिंक मधून, खाली दिलेली, ठळक वाक्य वाचून तर मी हसून हसून मेलो. :)) ‘‘मी प्राध्यापक आहे. माझा स्वभाव विनम्र आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कारात वाढलेला मी कडवा शिवसैनिक आहे.. पण माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. मुद्दाम त्रास दिला गेला. जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’ या चप्पलमार खासदारांने स्वत:ची तुलना चक्क महात्मा गांधींबरोबर केलेय. इतिहासाच्या आजवर वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात 'दक्षिण अफ्रिकेत, महात्मा गांधी यांना ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर, महात्मा गांधी यांनी, त्यांना ट्रेन मधून खाली उतरवणार्‍या ब्रिटीश अधिकार्‍याचे थोबाड २५ वेळा पायातील सँडल/चप्पल यांनी फोडलेले अजिबात वाचले नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

चामडी वाचविण्यासाठी गायकवाड निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा सातत्याने खोटे बोलतोय. लोकसत्तातील बातमीत तो सांगतोय की " दिल्लीत पोचल्यानंतर मी तक्रार नोंदवही मागितली. पण ती दिली गेली नाही.". पण https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 या चित्रफितीत तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय की मी हवाईसुंदरीला तक्रारवही मागितल्यावर तिने ती आणून दिली आणि मी त्यात तक्रार लिहून दिली. लोकसत्तातील बातमीत तो सांगतोय की त्याच्या या गैरवर्तणुकीने माझा संयम संपला आणि मीही त्याला ढकलून दिले.. पण घटना घडली त्याच दिवशी त्याने कॅमेर्‍यासमोर मोठ्या अभिमानाने सांगितले होते की मी कर्मचार्‍याला २५ वेळा चपलेने मारले. लोकसभेत तो सांगतोय की मी विनम्र स्वभावाचा आहे. पण घटना घडल्याच्या दिवसापासून सातत्याने त्याची मग्रुरी आणि माज शब्दाशब्दातून दिसतोय. लोकसभेत गायकवाड सांगतोय की "माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (भारतीय दंडविधानामधील ३०८ कलम) दाखल केलाय. विमानात चढताना शस्त्रे घेऊन जाता येत नाहीत. माझ्याकडे काहीही नव्हते. तर मग मी खुनाचा प्रयत्न कसा काय करू शकतो?". विमानातून ढकलून द्यायला शस्त्राची गरज नसते हे उधोजींना व राऊतला सुद्धा कळेल. मग इतरांना समजणार नाही का? आणि सँडलसुद्धा शस्त्र म्हणून वापरता येतेच की. स्वतःला प्राध्यापक म्हणवणारा आणि सखासदारकीची शपथ घेताना खरे बोलेन अशी शपथ घेणारा हा माणूस धादांत खोटे बोलत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बरोबरे श्रीगुरुजी! चामडी वाचवण्यासाठीच गायकवाड पोलिसांना आणण्याचा हट्ट धरून बसले होते. पण सुकुमारने पोलिसांना न बोलावता गायकवाडांचा माज परस्पर उतरवायचा प्रयत्न केला. आ.न., -गा.पै.

बाकी सगळं जाऊदे... नेते साहेबांच्या भाषणाला मागून ज्याने कोणी मराठीत प्रॉम्प्टिंग केले आहे ते ऐकून मजा आली... =))

श्रीगुरुजी, (कडेलोट झाला म्हणून खाली प्रतिसाद देत आहे)
ते जाऊ देत. भाषांतर कधी टाकताय?
हे तुम्ही व्हाइल लूपमध्ये लिहिलंत तरी माझी काही हरकत नाही. वरचे सगळे प्रतिसाद वाचलेत तर माफीनामा वगैरे किती फोल आहे ते कळेल (अर्थात कळून घ्यायचे असेल तर). माफी शब्द दाखवायचा राहूनच गेला आहे, पण असो! त्यातच आनंद आहे ना, मग ठिकाय!

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या आधीच्या प्रतिसादातून माफी मागितली (जणू काही विमान कंपनीची आणि उद्दाम कर्मचाऱ्यांची) हा दावा फोल ठरलाच आहे. पण तरीही तुमचा हट्टच चालू आहे म्हणून हे भाषांतर. आतातरी स्वतःचा फोल दावा सोडून माफी (आणि तीही विमान कंपनीची) शब्द दाखवाला जाईल हि (व्यर्थ) अपेक्षा. "हे पत्र मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक विमानात अमुक अमुक सीटवर झालेल्या दुर्दैवी प्रकारणाबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी लिहीत आहे. परिस्थिती ज्या थराला पोहोचली त्या थराला ती पोहोचावी असा कोणाचाही हेतू असणं शक्य नव्हतं. अर्थात चालू असलेली कायदेशीर चौकशी खरे काय घडले त्याचा क्रम, जबाबदारी आणि सत्य बाहेर काढेलच, पण तोपर्यंत हि घडलेली घटना भविष्यात परत घडेलच अशा पद्धतीने पाहिली जाऊ नये. माझ्यावर लादण्यात आलेल्या उड्डाणनबंदीमुळे माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडताना अडचणी येत असून त्याचा कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की ही बंदी उठवली जावी आणि चालू असलेल्या कायदेशीर चौकशीला घडलेल्या प्रसंगाची जबाबदारी ठरवु द्यावी."

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे स्वतःच्या मनाने स्वतःला सोयिस्कर असा अर्थ काढून केलेले भाषांतर असून स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढलेला आहे.

गायकवाडने युनायटेड एअरलाइन्सने प्रवास केला तर खरी मजा येईल. दोघात शेवटी कोण सरस ठरेल ते बघणे रोचक ठरेल.