Skip to main content

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs… कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 311129
प्रतिक्रिया 1112

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

लोकांनी समांतर अर्थव्यवस्थेसारखी समांतर चलन व्यवस्था याच नोटा वापरुन राबविली तर खरी मजा ये़ईल..... :-) दुर्गम भागात हे सहज शक्य आहे.... सिरियसली हघेहेवेसांन.

एटीएम आजपासून चालू होणार होती ती चालू झालीच नाही बहुधा ! ठाणे ते भांडूप मधील एलबीएस मार्गावरील यच्चयावत एटीएम बंद होती. बँकांमधे प्रचंड गर्दी होती. एसबीआय, सिंडीकेट, बरोडा, पीएनबी, आयसीआय आणी एचडीएफसी सारख्या बँकांमधे प्रचंड गर्दी होती. तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या बँकांमधे कमी गर्दी होती. कुणाला अर्जंट पैसे बदलून हवे असतील आणी गर्दी टाळायची असेल तर कमी प्रसिद्ध बँकेत जावे असा सल्ला देत आहे. काही बँकामधे ४००० हजार ऐवजी फक्त ५०० रुपयेच बदलून देत होते. एनकेजीएसबी, महाराष्ट्र ग्रामिण (मुंबई शाखा), शरद बँक, बसीन कॅथीलिक सारख्या नावे न ऐकलेल्या बँकांमधे तुलनेने कमी गर्दी होती. त्यात सरकारी बँकांतील कर्मचार्‍यांचा एकंदरीत अंग चोरुन काम करण्याच्या क्षमतेमुळे / सवयीमुळे (अपवाद क्षमस्व) तिथली गर्दी लवकर हटत नव्हती. उद्या पोस्टाची काय स्थिती आहे ते बघीतले पाहिजे. झेरॉक्स सेंटरवर चांगली गर्दी होती आणि त्यांचा धंदा एकदम तेजीत आला आहे. उद्या २ रुपयाची कॉपी ३ रुपयाला मिळायला लागली तर नवल नाही. आज ऑफीस साफ करायला येणार्‍या बाईंनी चक्क पाचशेची नोट स्वीकारुन उरलेले सुटे रुपये परत दिले. किराणा दुकानदाराने देखील ५०० रुपये स्वीकारुन १५० रुपयाचे सामान दिले आणि ३५० रुपये परत केले. एकंदरीत आज ५५० रुपयाचे सुटे पैसे बघून मिपाच्या भाषेत काय म्हणतात ते ड्वाळे पाणावले. उद्या / परवा पर्यंत एटीएम्स चालू झाली नाही किंवा बँकांतील गर्दी हटली नाही तर मग मुलाच्या पिग्गी बँकेवर दरोडा घालतो.

In reply to by धर्मराजमुटके

खबरदार हां त्याच्या पिग्गीला हात लावलात तर..... (रागवण्याची स्मायली.) मी असे म्हटले हे सांगा हं त्याला.... :-)

In reply to by धर्मराजमुटके

मी २ दिवस विना पैशाचे काढले. काल २० रुपये होते तेही संपून गेले होते. मग आज घरातलं दूध संपलं तेव्हा जाऊन बँकेत रांग लावली. ३ तास रांगेत एक जर्नल पेपर आणि एका पुस्तकाची काही प्रकरणं वाचून काढली. माझ्यासमोर एक भाऊ-बहीण उभे होते त्यांनी एकूण ६० हजार व ८० हजार कॅश २ अकाऊंट्स मधे भरली व ३५०० रुपये बदलून घेतले. मी एटीएम विसरून गेले होते आणि नेमकं एटीएम चालू होतं चक्क. आज बर्‍याच लोकांना त्या गुलाबी नोटा मिळाल्या आणि मी बदलण्यासाठी खूप कमी कॅश नेल्याचं मलाच समाधान वाटलं. ती २००० रुपयाची नोट काय कामाची? पुढच्या आठवड्यात पुण्यातले सर्व दुकानदार सुट्ट्या पैशांना घट्ट कवटाळून बसतील असं वाटतंय. बँकेचे अन्य व्यवहार चालू आहेत का? मला एका दूरच्या शाखेत काही अर्जंट कामानिमित्त जायचं आहे. पण इतर कामं सुरू असल्याचं आज या बँकेत तरी दिसलं नाही.

In reply to by पिशी अबोली

तुमच्याकडे ATM कार्ड आहे म्हणजे तेच डेबीट कार्ड म्हणूनही एखाद्या बझारमध्ये चालले असते. टोन्ड मिल्क किंवा नेहमीचे दूध मिळाले असते. अगदीच शेवटचा व थोडा अनधिकृत मार्ग म्हणजे अनेक दुकानदार डेबीट कार्ड स्वाईप करून आपल्याला रोख रक्कम परत देतात. यात ते बहुदा ५% पैसे कापून घेतात. (फक्त ATM आहे आणि डेबीट कार्ड नाही असे कार्ड अस्तित्वात असेल तर माझा प्रतिसाद गैरलागू समजावा)

In reply to by मोदक

डेबिट कार्डच्या आणि ऑनलाइन व्यवहारांच्या भरवश्यावरच मी निवांत होते. पण इथे आसपास डेबिट कार्ड कुणी घेत नाही. आता वापरायचं झालंच तर उबरवरून दूर जाऊन पेटीएमने पेमेंट करून डेबिट कार्ड वापरून आणता आलं असतं. पण त्यापेक्षा रांगेत उभं राहणं सोयीचं आहे. :P असो, माझा मुद्दा हा होता की पैसे नसल्यामुळे अगदी काही आकांत येतो असं वाटलं नाही मला. कुठून ना कुठून कशाचीतरी सोय प्रत्येकजण करतोच. आणि रांगांबद्दल कुणी तशी तक्रार करत नव्हतं. रांगा लागतच आहेत. पण ते गृहीत धरलंय सर्वांनीच.

In reply to by पिशी अबोली

चेक क्लिअरिंग वगैरे चालू आहे. फक्त एवढेच की हजर असलेले सगळे कर्मचारी नोटा बदलून देणे, डिपॉझिट विथड्रावल या कामात अडकले आहेत त्यामुळे दुसर्‍या कामाना वेळ देऊ शकत नाहीत.

In reply to by प्रसाद_१९८२

खात्यात पैसे असताना चेक रिटर्न करता येत नाही (If the cheque is otherwise in order). अर्थात चेक दुसर्‍या माणसाने दिलेला आहे हे गृहीत धरत आहे. स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यावर दहा हजाराची लिमिट घतली आहे सध्या. मात्र त्याविरोधात लोक भांडू शकतात.

In reply to by प्रसाद_१९८२

एका दिवसाला रु१०,००० विथड्रॉवल लिमीट आहे आणि एका आठवड्याला रु२०,००० आहे. दोन दिवस, प्रत्येकी रु १०,००० असे, रु२०,००० काढू शकता.

या धाग्यातले अनेक प्रतिसाद अत्यंत माहीतीपुर्ण व अनेक नविन बाबींची ओळख करुन देणारे आहेत. एकंदरीत मोदी सरकारने उचललेले हे पुढचे पाऊल आहे. अत्यंत धाडसी निर्णय अत्यंत सुनियोजित अगोदर जनधन नंतर इनकम डिक्लरेशन स्कीम्स इ. मोंदींचे या निर्णयासाठी जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. आता यापुढील टप्पे ही योग्य रीतीने अमलात आणले जावोत ही सदिच्छा आज प्रामाणिक माणसाच्या चेहर्‍यावर अनेक वर्षानंतर एक स्मित दिसत आहे. आज त्याला आपण प्रामाणिक आहोत याचाही काही फायदा असतो हा दिलासा मिळतोय. अत्यंत श्रेष्ठ निर्णय !!!!

राही, माझ्याकडे सुद्धा दोन बाया कामाला आहेत. त्यांना जी बचत करावीशी वाटली, त्यासाठी मी त्यांना, बँकेत बचत खाते, स्वतः फॉर्म भरुन, माझी ओळख दाखवून उघडून दिलेत.सुरवातीला एक दोन वेळा सौ.ला त्यांचेबरोबर, बॅंकेत पाठविले. आता त्या स्वतःहुन बॅंकेत जाऊन व्यवहार करीतात. सुरक्षित बचत.त्याचप्रमाणे , आमच्या सोसायटीत , सफाई कामगारांना, कुणीतरी , गावाकडे पैसे पाठविण्यासाठी, फसविले होते.अक्षरशः तीन हजार रुपये पाठविण्यासाठी, पाचशे रुपये ऊकळले होते. मी त्यांना, रुपये वीस हजार सुद्धा, फक्त ५ रु.१२ पैशात , बॅंकेतील NEFT योजनेद्वारा पाठविता येतात, हे सोदाहरण दाखवून दिले. त्यांचेही त्याच बॅंकेत,बचत खाते उघडून दिले.आता ते स्वतंत्रपणे व्यवस्थित बॅंक व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सरकारमान्य ' राजमार्ग ' हाच चांगला मार्ग असतो , हे मला तरी पटलेले आहे.

कंप्लीट! ;)

सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच डोळे पाणावले. ऑफिसच्या कामा निमित्त ५-६ दिवसांपासून लखनौ मध्ये आहे. २ दिवसात काही घटना पाहिला मिळाल्या १) सामान्य लोकांकडून दुकानदार रु.१००० च्या नोटेच्या बदल्यात रु.६०० सुट्टे पैसे देत होते. लोक सुद्धा ते मान्य करत होते. कारण ब्यांक आणि पोस्ट ऑफिसमध्ये इतकी प्रचंड गर्दी आहे की कामगार लोक एक दिवसाचा खडा नाही करू शकत. किती तरी लोकांकडे ATM च कार्ड नाहीये. २) गल्ल्यां गल्ल्यांमध्ये २-3 जणांचं टोळकं रु.१०० च्या २०-2५ हजारच्या नोटा घेऊन बसले आहेत जे सामान्य लोकांना रु.१००० नोटे मागे ७००-८०० आणि आणि रु.५०० मागे ३०० देत आहेत (आवर्जून सामान्य म्हणतोय कारण त्यातील आमच्या फॅक्टरी मधील कामगार आहेत) ३)मला अकाउंट्स वाल्याने रु. ५०० च्या ५ नोटा बदलून दिल्या. त्याने कशी रिस्क घेतली हे विचारलं तर म्हणाला "Don't Worry Be Happy Sir" 4) चौथी घटना माझ्या घरातील आहे. आमचे एक खूप जवळचे नातेवाईक नगरसेवक आहेत (राष्ट्रवादीचे नाहीत). त्यांना मी मागच्या महिन्यामध्ये रु.२,००,००० नवीन घर खरीदी करण्यासाठी कमी पडत होते म्हणून परत देण्याच्या बोलीने मागितले होते पण येणाऱ्या निवडणुकेचे कारण देऊन काही तरी व्यवस्था करता आली तर देतो म्हणून आश्वासन दिले. काल संध्याकाळी ते रु.२००००० घेऊन घरी आले होते. ते त्यांनी आमच्या बंधूंकडे दिले. बंधूंना अंदाज आला होता की १००० आणि ५०० च असणार आणि त्या होत्या सुद्धा. बंधूंना म्हणाले शेती उत्पन्न दाखवून बँकेत भर आणि जेव्हा माघारी द्यायचेत तेव्हा दे. बंधू काही बोलण्याच्या आधीच फॉर्च्युनरला किक मारली आणि बुंगाट. (बंधू फ़ोन करून माझा सल्ला विचारात होते ) या घटना वरून माझ्या काही शंका होत्या जाणकारांनी कृपया सोडवाव्यात- ---१ & २ मध्ये काळा पैश्याच्या स्रोत बंद होयचा सोडून त्यामुळे दलाली करणारे सामान्य लोकांची आणखी पिळवणूक करत आहेत. -- ३ मध्ये मला ऑफिस मधल्या अकाउंटंट ने ५ नोटा बदलून दिल्या अश्या त्याने किती जणांना बदलून दिल्या असतील. मालक लोंकांचे काय गणित असेल? हे तर विचारायलाच नको. --- ४ मध्ये रु. २००००० घरात आहेत. बंधूंना जाम टेन्शन आलाय पण याच नातेवाईकांनी गावात आणखी ३-४ जणांना असे पैसे दिले आहेत याची कुणकुण लागली आहे.आणि ते सर्व जण शेती उत्पन्न दाखवणार आहेत. आमच्याकडे सुद्धा पर्याय आहे शेती उत्पन्न दाखवण्याचा, देश भक्ती दाखवू की बहती गंगा मे हात धुवू? (मिपाकर सल्ला सगळे इमानदारीचाच देणार त्यात काही वाद नाही) --

In reply to by विशुमित

४. नगरसेवकांची रीतसर तक्रार करा पोलिसांमध्ये. २०००० पेक्षा जासत रोखीचे व्यवहार करणे आणी शिवाय " शेती उत्पन्न दाखवणे " हे दोन्ही गुन्हे आहेत. आपल्याल अडचणीचे भासत असल्यास. आम्हाला नाव पत्ता द्या. आम्ही गुन्हा दाखल करवतो (अर्थात विटनेस म्हणून तुमचेही नाव पत्ता लागेल ही गोष्ट वेगळी). बाकी लखनऊ मध्ये कायदा व्यवस्था पार कोलमडली आहे हे सिद्द्ध होते. आमच्याइकडे पुण्यात किमान इतके उघड उघड असले प्रकार होत नाही आहेत. तिकडे बारामतीत काय चालले आहे माहिती नाही.

सामान्य लोकांकडून दुकानदार रु.१००० च्या नोटेच्या बदल्यात रु.६०० सुट्टे पैसे देत होते. ये बात कुछ हजम नही हुई. सामान्य माणूस लखनौ मध्ये ४०० रुपयांसाठी नक्कीच बँकेच्या रांगेत उभा राहील. असामान्य लोकांची गोष्टच वेगळी

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब- मी खरंच माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि मला सुद्धा बदलून हव्या होत्या ५०० च्या नोटा पण माझी खरंच छाती नाही झाली ४०० चा लॉस सोसण्याचा. माझी सोय अकाउंटंट ने केली तो भाग निराळा आहे.

In reply to by संदीप डांगे

मुंबईमध्ये आमच्या इकडे (असं ऐकून आहे की-) पाचशेला शंभर कट असा हिशेब आहे. मथुरेलाही हाच दर आहे बहुतेक (पर सेंट २० म्हणजे प्रत्येकी शंभराला वीस रुपये)

In reply to by अन्नू

आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा उठत आहेत. बरेच लोक मिठाची पोती च्या पोती घेऊन जात आहे. सगळा गोंधळ चालू आहे... इंडिया टीव्ही वर पाहू शकता आता..

In reply to by विशुमित

गेल्यावेळी लखनौमध्ये राहिलो होतो लय पिडलं त्या लखनौ नं- एका हॉटेलवाल्याला पैसे देऊन ठरवला. शाकाहारी दे म्हणून सांगितलं तर त्याचं नुसतंच आपलं रोजचं- बटाट्याची भाजी- बटाट्याची आमची- बटाट्याचा रस्सा असं सुरु झालं. कंटाळून एकदा जेवणात काहीतरी वेगळं कर म्हणून सांगितलं तर त्या दिवशी बहाद्दरानं बटाट्याचा पुलाव करुन आणला! :( त्यात एके दिवशी सुट्टीला आमचे सिनिअर सर- 'तुंम्हाला मस्त चिकन घेऊन देतो' म्हणून आंम्हाला तिथल्या मोठ्या बाजारात घेऊन गेले. मला वाटलं आज तरी झणझणीत नॉनवेज खायला भेटेल, पण नंतर समजलं चिकन म्हणजे तिथलं सुप्रसिद्ध कापड होतं ते! :(

In reply to by अन्नू

मला तर पहिल्यांदा वाटलं चिकन पासून कपडे बनतात की काय? आलू ने तर बेजार झालो आहे. उद्या निघतोय माघारी..

In reply to by विशुमित

आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा उठत आहेत >>>>>> तुमची बातमी भेटली. आता ती बातमी मुंबईतपण पसरु लागली आहे. लोकांकडून सुट्टे पैसे उकळण्यासाठी काढलेली ती शक्कल आहे ;) https://www.youtube.com/watch?v=5rahtSkjWbc

In reply to by संदीप डांगे

बंधू काही बोलण्याच्या आधीच फॉर्च्युनरला किक मारली आणि बुंगाट.
ज्जे बात किक वाली फॉर्च्युनर ;)

काहि गोष्टी नक्की झाल्या आहेत... १) काळा पैसा अनेक रुपाने फिरतो, जमिनीत, सोन्यात मुरतो वगैरे कितीही खरं असलं तरी अल्टीमेटली करन्सी नावाचा पेपर कोणाच्या तरी हाती स्थिरावतो. त्याची व्हॅल्यु शुण्य होण्यापासुन रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची सफेदी शाबीत करा. फुल्लस्टॉप. येनेकेण प्रकारेण तो पैसा पांढरा झाला म्हणजे यानंतर किमान पहिल्या व्यवहारात त्याचा पांढरा पैसा म्हणुनच उपयोग होणार. त्यावरची आजवर जमलेली काजळी दूर झाली. प्रदुषीत वातावरणातली घाण फिल्टर करायला तो पैसा सज्ज झाला. २) या प्रयोगातुन सरकार दरबारी प्रचंड माहिती नव्याने जमा झाली. आधुनीक अर्थव्यवस्थेत असे नोट रद्द करायचे उपाय, त्याचा काळ्या पैशावर होणारा परिणाम, जनतेची प्रतिक्रीया, राजकीय उलथापालथी, गुप्त आणि उघड शत्रुंवर पडणारी टाच, एकुणच जनतेचा काळ्या-पाढर्‍या पैशाकडे बघण्याचा दृष्टीकोन, करन्सी व्यतिरीक्त इतर संपत्ती मार्गांप्रती जनतेची अपेक्षा (आणि उपेक्षा), राज्यकर्त्यांची निर्णयक्षमता वापरायची तयारी बघुन जनतेचा राजकारणाप्रति वाढलेला-घसरलेला विश्वास/अविश्वास... एक ना दोन, हजारो बाबी एकसाथ टच केल्या या नोटबंदीने ... केवळ टच नाहि तर किंबहुना धक्का/हादरे बसले काहि बाबतीत. त्याचे परिणाम सर्वत्र होतील. ३) मिपाकर सर्वज्ञ आहेत हे परत शाबीत झालं :)

In reply to by अर्धवटराव

आमच्या इथेही उच्चविद्याविभूषीत अगदी सनदी लेखापाल शेखी मिरवतायत की गावकडे (त्यांचे व्यापारी बंधू) नोकराकरवी रोज किमान ४ हजार बदली करून घेऊ शकतात आणि ३० डिसेंबर पर्यंत ७-८ ला़ख (काळ्याचे पांढरे) करू शकतात. त्या अनुषंगाने कालच एक बातमी वाचली एका व्यक्तीने जर नोटा बदलून घेतल्या आणि तो वारंवार (वेगवेगळ्या बँकामधून) घेतल्याचे निदर्शनास आले तर नक्की त्यांच्या (बँकेच्या/आयकर खात्याच्या) रडारवर येणारच .आणि तो ससेमिरा नंतर चालू होईल. सोनारांकडची होणारी उलाढाल आणि रेल्वे बुकींगच्या माध्यमातून करणार्या "रंगसफेदी"वर ही लक्ष आहे.(आणि हा हनी ट्रॅप आहे हे नक्की,सोनारांनी तब्बल ४-५ महिने संप करून सरकारच्या करांचा (आठमुठेपणाने) विरोध हे मिपाकर विसरले असतील पण सरकार विसरले नाही हे नक्की. संघटीत क्षेत्रातील काळ्या पैशापेक्षा (अंबानी-बिर्ला-अदानी) अंसघटीत क्षेत्रात काळा पैसा जास्त किमान तितका तर नक्की असावा. आम्च्याच भागात गुढग्याला बाशींग बांधलेल्या (भावी) नगरसेवकांकडेच किमान २०-२५ कोटी रोकड रक्कम आहे (अर्थात बे हिशेबी).ज्याम्चा लग्न संमरंभ पंचक्रोशीत गाजला (ओवाळनी करणार्यां सुवासनींना ३० स्कूटी जावयाला जग्वार्)किती असेल त्याचा अंदाज लावावा. पिंचि आणि पुण्यातला निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेर आले होते त्यांचे काय होईल ते पाहणे रोचक ठरेल. कालच बँकेत लोकांचा आततायीपणा,आठमुठेपणा आणि बँक कर्मचार्यांची भोंगळ व्य्वस्था पाहून आलेला आणि निव्वळ त्यामुळेच (तब्बल तीन साडे तीन तास खर्ची टाकलेला) नाखु पांढरपेशा आततायीपणा,पुर्ण माहीती न वाचताच, एकाचे वेळी चार चारजणांचे फोर्म घेउन आलेले. काही म्हाभाग तिथेच पुर्ती करण्याचा अट्टाहास करीत होते. आठमुठेपणा शंभरच्याच नोटापाहेजेत बदलून दोन हजाराच्या घेणार नाही भोंगळ व्य्वस्था कुणाचा पाय्पोस कुणाला नाही, अतिरिक्त कौंटर नाहीत, शाखा व्य्वस्थापकाला मिळालेल्या (बदली करिता ) अंदाज नाही. किमान टोकन देऊन उरलेल्या लोकांना उद्या या सांगायचे सौजन्य+तरतूद नाही.

म्हणे सगळी तयारी का नाही केली ? ईतकी गुप्तता का पाळली गेली ? च्यायला पोलिस स्टेशनातुन पोलिस टीम घेऊन, दारुच्या अड्यावर धाड टाकायला जायच्या अगोदर दारुच्या अड्याच्या मालकाला कळवलेल असायच की आता धाड पडणार आहे, सामसुम करुन ठेव !! हे मी बोलतोय १९८० - १९९० सालच जेंव्हा मोबाईल फोन नव्हते !! आता तर व्हॉटसअ‍ॅप वरच संदेश मिळाला असता गुप्तता पाळली नसती तर !!

In reply to by डँबिस००७

गुप्तता : १. योजनेची माहिती देण्याच्या कॅबिनेट मिटिंगला मंत्र्यांना मोबाईल आणू दिले नाही. २. त्यांनंतर मोदी राष्ट्रपतींना माहिती देण्यासाठी गेले व नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्र्यांना मिटिंगरूममध्ये बसवून ठेवले होते.

लगेच पैसे बदलून घेण्याची एवढी घाई का करत आहेत? जरूर असेल तर पाहिजे तेवढे पैसे काढावेत पण अगदी यानंतर पैसे मिळणारच नाहीत वा बदलून मिळणारच नाहीत असं समजून एवढे हातघाईवर का येत आहेत? वर विशुमित साहेब म्हणतायेत की सामान्य माणसं ४०० रुपयांचा तोटा सहन करून १००० च्या नोटा बदलून घेत होती. पण मग ते बँकेत का जात नव्हते? एखाद्याला तुम्ही विचारलंत का की एवढा तोटा सहन करून त्या दुकानदाराकडूनच बदलायचं कारण काय? कामावर खाडा करू शकत नाहीत हे मान्य पण मग त्या दिवसाचे जे पैसे मिळतील ते १०० च्या नोटांमध्ये मिळतील ना? तुमच्या फॅक्टरीतल्या कामगारांना कोणीच सांगितलं नाही का की ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळतील? बँका शनिवार व रविवारी पण चालू राहणार आहेत. काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे खर्चाला सुद्धा पैसे नाहीत किंवा जे आहेत ते ५००/ १००० च्या नोटांमध्ये आहेत. मला तर हेच कळलं नाही की लोकांकडे अजिबात सुट्टे पैसे कसे नाहीत. मी एक महिना भारतात आलो होतो तर जाताना १०/२०/५०/१०० च्या खूप प्रमाणात नोटा होत्या माझ्याकडे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापराने हे दोन्ही पर्याय असताना लोक फक्त ५०० ची नोट कोणी घेत नाही म्हणून उपासमार झाली असं म्हणतात हे कसे काय? तुमच्याकडे अगदीच पैसे नाहीत, सगळी कार्ड ब्लॉक झाली असं समजलं तरी तुमचा नेहमीचा किराणामालवाला, हॉटेलवाला, बेकरीवाला तुम्हाला २ दिवसाचं क्रेडिट देत नाही? काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही. एकूण संधीचा जमेल तसा जमेल तितका फायदा घेण्याची भारतीय मानसिकता बदलायला पाहिजे पण त्याला अजून काही दशकं तरी जायला लागतील असं वाटतंय.

In reply to by ट्रेड मार्क

काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही. हे झाले तर विचारवंत कसे म्हणवून घेणार..? मार्ग काढायचेच तर अनेक मार्ग निघू शकतात, पण मोदी सरकारने घेतलेला निर्णय आहे तर मग फोडा फाटे; करा टीका. बर्र.. यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर मिळाले की असहिष्णुता वाढली म्हणून बोंब ठोकायची आणि दुर्लक्ष केले गेले तर मुद्दे नाहीत म्हणून प्रत्युत्तर आले नाही असली मखलाशी. काँग्रेसच्या रामराज्यात यांचे आवाज नक्की कशा कशाने बंद केले गेले हा ही एक संशोधनाचा मुद्दा आहे.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही काय वाटेल ते करा पण मी चोऱ्या करणारच असे म्हंटले तर विषयच संपला. मग १०० मोदीसुद्धा काही करू शकणार नाहीत. काल मी गावात गेले होते तेव्हा येता जाता किमान १०-१५ ATM पहिली. कुठेही २०-२५ लोकांपेक्षा मोठी रांग दिसली नाही.

गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे विनोदी मध्यांतर जरूर आहे. नवीन २००० रुपयांच्या नोटेत हाय-टेक चिप बसवली आहे अश्या अनेक वावड्या माध्यमांत पसरल्या आहेत. खुद्द अर्थमंत्र्यांनी त्याचा इन्कार केल्यावरही कायप्पाकर चूप बसायला तयार नाहीत. चिपची अनेक अतिशयोक्तीपूर्ण वैशिष्ट्ये वाचून वैतागलेल्या काहींनी त्यांच्यावर वरताण करून वचपा घ्यायला सुरुवात केली. त्या संग्रहातले हे दोन हिरे... एक 2000 के नोट में ये फीचर्स होंगे। 1. GPS वाली चिप होगी। 2. सायरन होगा। 3. फ्रंट कैमरा होगा। 4. AMOLED डिस्प्ले। 5. और रिश्वत लेने पर गांधी जी खुद बहार निकल के मारेंगे। दोन नवीन नोटां मधले काही खास वैशिष्ट्य - कान फाडून ऐका -नवीन नोटा ह्या तिच्या प्रत्येक मालकाचं नाव आणि हाताचे ठसे संकलित करून ठेवणार आहेत. -नवीन नोटा पावसाळ्यात आपोआप वॉटर प्रूफ होतील. -नवीन नोटांचा सिरीयल नंबर डायल केल्यास त्या नोट वर फोन करता येणार. -नवीन नोटेवर असलेला लाल किल्ला दिवाळीत आपोआप लायटिंग लावल्या सारखा चमकणार. -नवीन नोट स्वतः उडत उडत बँकेत जाऊ शकेल. -कंटाळा आल्यास तुम्ही नवीन नोटांमध्ये गाणे देखील ऐकू शकतात. -नोटेचा गैरवापर झाल्यास गांधीजी तुमच्यावर ओरडू शकतात अशी सोय आहे. -लॉकर मध्ये नोटा ठेवताना स्वीच ऑफ करून ठेवाव्या लागतील ह्याची नागरिकांनी दाखल घ्यावी. आता पुन्हा जर कोणी म्हणाले ना की नवीन नोटांमध्ये न्यानो चिप आहे तर त्याला त्या नोटेवरच्या मंगळ यानात बसवून मंगळावर पाठवण्यात येईल...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या कल्पकतेचा फायदा देशाने करून घेतला पाहिजे . या जिनियस ला गडकरींच्या जागी नेमा . गंगा कावेरी प्रकल्य पूर्ण होईल. बाकी भारतात इनोदी लोक्सना तोटा नाही.

सोन्यावरुन आठवलं. साधारण मार्च एप्रिल मध्ये सोनारांचा संप झाला होता. तेव्हा त्यांच्यावर बरेच नियम लादण्यात आले होते. संपाला कुणी दाद दिली नाही तर तात्पुरती दुकानं सुरु झाली होती. पुढे त्याचं काय झालं? आज सोनार बॅक डेटेड पावत्या करु नयेत म्हणुन तेव्हा काही नवे नियम आणले होते का? जर ते नियम लागु नसतील आणि बॅकडेटेड पावत्या घेऊन लोक सोन्यात पैसे गुंतवत असतील तर इतकं करुन काय फायदा झाला?

In reply to by पिलीयन रायडर

आज सोनार बॅक डेटेड पावत्या करु नयेत म्हणुन तेव्हा काही नवे नियम आणले होते का? जर ते नियम लागु नसतील आणि बॅकडेटेड पावत्या घेऊन लोक सोन्यात पैसे गुंतवत असतील तर इतकं करुन काय फायदा झाला?
फक्त सोनारांचे व्यवहार बंद ठेवणे योग्य झाले असते. बाकीचे व्यवहार चालू ठेवले असते तरी चालले असते. निदान लोकांना नवीन चलन घ्यायला बँकेकडे धावावे तरी लागले नसते.

In reply to by मार्मिक गोडसे

सोनारांनी दुप्पट भावाने सोने विकले तर आहे पण हा पैसा पचवणे बरेच अवघड जाणार आहे त्यांना. आयकर खात्याने धाडी टाकायला चालू केले आहेच.

माझे वैयक्तीक अनुभव : १) पेट्रोल डेबीट कार्ड ने टाकले २) दुध भाज्या किराणा तुर्तास तरी डिमार्ट मधून डेबिट कार्ड ने घेतले ३) चेक देवून एका शेतकऱ्याकडून बियाणे घेतले (सांगण्याचा मुद्दा हा की त्याचे पण बँकेत खाते आहे) मला वाटते की जिवनावश्यक वस्तुु मिळवण तितकास अवघड नाही

In reply to by महेश श्री देशमुख

चेकबुक आणि डेबिट कार्ड वापरणारे आणि त्याहूनही स्वीकारणारे अजून फार कमी लोक आहेत. लहान शहरात/गावात तर अगदीच कमी. मी दिल्लीजवळील फरिदाबादमधे रहातो. इथे भाजी, दूध, किराणा, हार्ड्वेयर, विजेचे सामान, शिंपी, कपड्याची दुकाने, खेळणी, धान्य, हलवाई, वगैरेंचे शेकडो दुकानदार आहेत, त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्यांकडे कार्ड वापरण्याचे यंत्र आहे. भाजीसाठी मॉलमधे वा रिलायन्स फ्रेश आदिमधे फारच कमी लोक जातात, आणि तिथे मंडईसारखी ताजी भाजी मिळत नाही. मुळात डेबिट कार्ड नावाची वस्तूच अनेक ग्राहकांना ठाऊक नाही, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

गैरफायद्याच्या वाईट सवईं बदलण्यासाठीही जनतेवर जरासा दबाव टाकावाच लागतो. Old habits die hard हे बर्‍याचदा फायदेशीपणामुळे नाही तर अंगी बाणलेल्या सवईमुळे असते :)

अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच वर्षांपासून पडला आहे तो म्हणजे बनावट नोटा ओळखण्याची यंत्रणा सरकार जागोजागी का उपलब्ध करून देत नाही? पेट्रोल पंप, बँकांच्या सर्व शाखा, एटीम केंद्रे इत्यादी ठिकाणी अशी यंत्रे ठेवली पाहिजेत आणि सर्वसामान्यांना त्यांचा वापर निःशुल्क करू दिला पाहिजे. म्हणजे व्यवहारात येणाऱ्या बनावट नोटा जास्त लवकर उघडकीस येऊ शकतील.

In reply to by एस

ग्राहकाला कळून फायदा नाही, तो ती इतरत्र खपवायला बघेल. बँकेत कशी, ती जप्त होते आणि जादा भरणा करायला लावला जातो. दुकानदार फक्त नाकारून परत करतील. नोट फिरत राहील.

In reply to by खेडूत

हीच समस्या आहे. हजार रुपयाची खोटी नोट आपल्याच खिशात आली तर आपल्यालाच विनाकारण फटका बसतो. खोटी नोट त्याचे मूल्य न घालवता बदलून देणे सरकारचे काम नाही आहे का?

In reply to by संदीप डांगे

आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत जमा करून पांढरे करण्यासाठी तयार असणारे, खोटे पैसे सरकारकडून खरे करून द्यायला उभे राहातीलच!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खोटे पैसे सरकारकडून खरे करून द्यायला उभे राहातीलच!
मग ह्या नोटाबंदीला काहीच अर्थ उरत नाही.

In reply to by खेडूत

ग्राहकांकडे बनावट नोट येण्यापूर्वीच ते त्या नोटेच्या वैधतेबद्दल अशा यंत्रांच्या साहाय्याने खात्री करून घेऊ शकतील. आजच्या पद्धतीत ग्राहकांकडे नोटा आल्यानंतर जेव्हा ते बँकेसारख्या ठिकाणी भरणा करायला जातात तेव्हाच त्यांना त्या बनावट असल्याचे समजते. साहजिकच त्यांना भुर्दंड पडतो. असा भुर्दंड या यंत्रणेच्या मदतीने टाळता येऊ शकतो.

In reply to by एस

जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे आहे तोवर करता येईल अशी व्यवस्था. पण बनावट नोटा देशकंटक बँकेच्या मार्गाने नक्कीचं आणत नाहीत. ते थेट वितरणव्यवस्थेमधे हा पैसा आणतात.

काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे प्रश्न वाचून "ब्रेड नै मिळत तर केक का खात नै तुम्ही लोक?" हा सुप्रसिद्ध प्रश्न आठवला!

In reply to by संदीप डांगे

ही अशी वाक्ये हवेत आरोप करायला चांगली असतात, पण यामुळे साध्य काहीच होत नाही. त्यापेक्षा तुम्हाला विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही?

In reply to by मोदक

देतो कि, चार दिवस थांबा तर... तूर्तास, एका ने बँकेतून एका फटक्यात 9 हजाराच्या नोटा दहा मिनिटात आणल्या, म्हणाला माझी 25 लाख अमाउंट बँकेत आहे, मॅनेजर नाही देणार तर काय करील... बाकी तुम्ही अंदाज लावा और भी है, जस्ट वेट सर!

In reply to by संदीप डांगे

२५ लाखाला बॅंक हिंग लावुन विचारत नाही. विश्वास ठेवा माझ्यावर तुमच्या मित्राने तुम्हाला चुना लावलाय. बाकी १० मिनिटात ८००० माझ्या ऑफिसमधल्या प्युन ने पण आणले. फार काही अवघड नाही त्यात

In reply to by मृत्युन्जय

जर दुसऱ्या व्यक्तीचं authorization letter, आयडी इत्यादी असेल, तर ते अधिकचे 4 हजार पण अधिकृतपणे मिळू शकतात ना? का एका व्यक्तीला 4 हजार असा नियम आहे?

In reply to by पिशी अबोली

बॅंकेवर अवलंबुन आहे. काही बँका फार ताठर भूमिका घेतात. बर्‍याच बँका बदलुन देतात. ओळख असेल तर प्रश्नच नाही.

In reply to by मृत्युन्जय

बाकी १० मिनिटात ८००० माझ्या ऑफिसमधल्या प्युन ने पण आणले. ^^^ पंतप्रधान साहेब बोलले, फक्त चार हजाराच्या नोटा बदलून मिळतील म्हणून, तुमचा पिऊन मला 20 हजाराच्या नोटा बदलून आणून देईल काय एका फटक्यात? नोटा बदलून बरंका, खात्यातील नको!

In reply to by संदीप डांगे

चार हजाराच्या नोटा एका बँकेत बदलुन मिळतात साहेब. दोन बॅंकातुन बदलुन आणल्या त्याने. बँकांची नावे आणि पत्ते हवेत का? मी तुमच्या सारखा हवेत गोळीबार नाही करत डांगे. खरे काय ते सांगितले. बाकी माझ्या ऑफिसचा असा कोणाचीही कामे करत नाही. धन्यवाद. त्याला माझ्या ऑफिसतर्फेच पगार मिळतो. ऑफिस माझ्या मालकीचे असले असते तर दोस्तीखात्यात त्याला कामाला लावले असते. पण ते पडले दुसर्‍याचे. त्यामुळे (२५ लाख बँकेत ठेवलेत म्हणुन)( दहा मिनिटात ९००० काढुन आणाणार्‍या तुमच्या मित्राला सांगा की.

In reply to by मृत्युन्जय

अरे वा! बरीच माहिती दिसते आपल्याला! तीही मला प्रत्यक्ष माहित असल्यापेक्षा, गोळीबार कोण करतंय आता? असो. तुम्हाला डिफेन्ड करायचेच असेल तर बरेच अन्य जास्त महत्वाचे प्रश्न विचारलेत जिज्ञासूंनी, त्यांना आधी शंकासमाधान होत असेल तर बघा. तुम्हाला बरीच माहिती आहे म्हणून म्हटलं, नैतर म्हणाल मी सगळे प्रतिसाद वाचत बसत नाही,वेळ नाही, मला माहित नाही कोण काय लिहितय ते! आम्ही आहोतच पेश्शलमध्ये, थोडा धीरज रखीये!

In reply to by संदीप डांगे

तीही मला प्रत्यक्ष माहित असल्यापेक्षा, म्हणजे तुम्हीच एक सर्वज्ञ की काय? लोकांना थोडेफार कळते डांगे. आता आम्ही नसु तुमच्य एवढे हुषार. पण चार पावसाळे पाहिलेत आम्ही पण आणि याच देशात राहतो त्यामुळे कळणारच की. त्यात तुम्हाला अजुन शंका कुशंका असतील तर अजुन डिटेल्स देउ शकतो की. बाकी सगळे प्रतिसाद मी वाचतच नाही. शेवटच्या पानावर जे दिसले ते वाचले. तुम्हाला काही स्पेसिफिक शंका असतील तर इथेच विचारा, यथाशक्ती उत्तरे देइन (अर्थात मी काही अर्थतज्ञ नाही पण तरी जेवढे वाचले / ऐकले/ पाहिले / समजावुन घेतले आहे त्यावरुन उत्तरे देउ शकतो. )

In reply to by मृत्युन्जय

माझ्या बाबतीतल्या घटना माहित असण्याइतके तुम्ही छातीठोक सर्वज्ञ विरळाच म्हणायचे, असो. अजून काही पावसाळ्याचे थेम्ब उरले असतील तर तेही शिंपडा बापडे, तेवढीच माझ्या ज्ञानात भर... :)

In reply to by संदीप डांगे

तुमच्या नाही तुम्हाला छातीठोकपणे अकाउंत मध्ये २५ लाख आहे म्हनुन ९००० मिळाले असे सांगणार्‍यांबद्दल होते ते. तुमच्याबाबतीत तो केवळ कार्यकारण भाव होता. आजच्या पुरते तुमच्यासाठी एवढे थेंब पुरेसे.