✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संघः कलियुगातील एक चमत्कार

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 09/12/2016 - 13:26  ·  लेख
लेख
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
83205 वाचन

💬 प्रतिसाद (480)

प्रतिक्रिया

तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा

मृत्युन्जय
Tue, 09/13/2016 - 15:16 नवीन
तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा रेटुन नक्की काय मिळवणार आहात? अभ्याने पुर्वीच लिहिले आहे की जेव्हा तिरंगा हा भारताचा झेंडा नव्हताच तेव्हा त्याला विरोध करणे हे देशाच्या झेंड्याला विरोध करणे होउच शकत नाही. भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल खान्ग्रेस आणी संघ यांच्यामध्ये दुमत होते आणि खान्ग्रेस ने आपला मुद्दा रेटुन तिरंगा मान्य करायला लावला किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असे फारतर म्हणता येइल
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हो का ?

चंपाबाई
Tue, 09/13/2016 - 16:35 नवीन
मग असेच असेल तर संघाच्या लोकानी तिरंगा वापरणार्‍याना मारहाण का केली ?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

संघ आणि तिरंगा

विकास
Wed, 09/14/2016 - 21:43 नवीन
संघाचे वर्तमान प्रसारप्रचार प्रमुख श्री. मनमोहन वैद्य यांची गेल्याच आठवड्यात (हिंदूस्थान टाईम्स चे एक उद्योग-अर्थव्यवस्था आदीवरील जालीय पत्र) लाईव्ह मिंट मधे मुलाखत आली होती. ती मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. पण येथे तिरंग्या संदर्भातील त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे चिकटवत आहे. It is often said that the RSS has reservations about the Indian flag. Is that true? The Indian flag as it was adopted by our Constitution must be respected by all. There have been people from the Sangh who have given up their lives to protect the flag so there is no question of us not accepting the flag. We are not interested in changing it. Was there no objection to the flag when it was adopted? The tricolour flag emerged in political scenario in 1921. It was Gandhiji’s idea to have a flag representing all major communities. Hence a tricolour flag with red (not saffron) at the bottom, green in middle and white at the top representing Hindus, Muslims and Christians. Then itself, lot of people objected, calling it a communal flag. The very idea of identifying each community separately and trying to forge unity among them was termed as communal thinking. They demanded to have a non-communal, national flag. This demand was so strong that All India Congress Working Committee appointed a seven member committee (popularly known as flag committee) to look into the matter. After hearing both the sides, the flag committee came to a unanimous conclusion. The flag committee report published in 931 says, “It was decided that our flag should be artistic, distinct and non-communal. It was decided unanimously that it should be of one single colour. And if there is a colour that is more distinct that another, one that is more acceptable to the Indians as a whole and one that is associated with this ancient country by long tradition it is the saffron kesari colour.” The flag committee recommended a rectangular saffron-colour flag with a blue charkha on top corner. The communalization of the colour saffron has happened post-Independence—particularly post the insertion of the word secular in the Constitution, when the definition of what is communal and what is secular began to get distorted.
↩ प्रतिसाद: विशुमित

खुप प्रतिसादांचे पोटेंशियल

मोहनराव
Mon, 09/12/2016 - 14:59 नवीन
खुप प्रतिसादांचे पोटेंशियल असलेला धागा...

पण गोवा जेव्हा

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 15:04 नवीन
पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला.
दुरूस्ती. संघाच्या कार्यकर्त्यांनी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या दादरा, नगर, हवेली या भागांच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे इ. १२५ स्वयंसेवकांनी १९५३ मध्ये दादरा, नगर, हवेली इ. भागांवर सशस्त्र हल्ला करून हा भाग मुक्त केला होता. त्याव्यतिरिक्त संघाने १९३८ मध्ये हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. हे आंदोलन संघानेच सुरु केले होते. वैयक्तिक पातळीवर अनेक संघ स्वयंसेवक स्वातंत्र्यलढ्यात होते.

...

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 15:16 नवीन
हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... अन या गोवा दाद्र्याचं संघवाल्याना भारीच कौतुक असतं !
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हाहाहाहा....

अनिरुद्ध प्रभू
Mon, 09/12/2016 - 15:19 नवीन
हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही
ह ह पु वा झाली माझी... बाई अभ्यास वाढवा हो...!!!
↩ प्रतिसाद: चंपाबाई

आता पुढचा जावईशोध म्हणजे

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 15:24 नवीन
आता पुढचा जावईशोध म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सोनिया, राहुल, प्रियांका, रॉबर्ट इ. स्वातंत्र्यसैनिकांनी कठोर कारावास भोगला होता व त्यांच्या प्रयत्नांमुळेच आख्खा भारत स्वतंत्र झाला.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

हहहह्ह्ह

अनिरुद्ध प्रभू
Mon, 09/12/2016 - 15:26 नवीन
वाह!! गुरुजी....... पोट दुखु लागलं आता...
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 15:29 नवीन
हो ना ! १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते. त्यापेक्षा हे ऐकायला मिळाले तर नक्कीच चालेल
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"१९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या.....

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 15:37 नवीन
....एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते." तुम्ही हे असे मनोरंजक प्रतिसाद देता, म्हणून आजकाल आम्हाला तुमचे कौतूक वाटते....
↩ प्रतिसाद: चंपाबाई

त्यापेक्षा,

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:37 नवीन
त्यापेक्षा,
"युवराजांनी कँडी क्रशची नऊशेवी लेव्हल पार पाडल्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार" जाहीर !!
ही बातमी जास्त मनोरंजक आणि सत्याच्या जवळपास जाणारी असेल नाही का चंपाताई ??
↩ प्रतिसाद: चंपाबाई

कॉंंग्रेसने अख्खा देश

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:21 नवीन
कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही..
असं कसं म्हंता चंपाताई..त्यांचेच त पांग फेडून राह्यलो 60-70 वर्ष झाले.. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विलीन करावी असे गांधीजींचे म्हणणे होते असं वाचलंय..त्याच काय झालं ते कळलं नाही.. बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??
↩ प्रतिसाद: चंपाबाई

हहहाअहा

अनिरुद्ध प्रभू
Mon, 09/12/2016 - 15:28 नवीन
बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??
फर्मास बर का चिनार भाउ....
↩ प्रतिसाद: चिनार

कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही...

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 15:34 नवीन
इतके मनोरंजक प्रतिसाद द्यायला, तुम्हाला कसं, कसं, सुचतं हो... तुमच्या सारख्या व्यासंगी, विद्वान, हजरजबाबी आणि बरेच काही गूण असलेल्या व्यक्तींच्या समावेशामुळे मिपा नक्कीच पहिल्या क्रमांकावर येणार बघा.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

...

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 15:40 नवीन
तुमच्या अंगी असलेली गुणग्राहकता पाहून गहिवरुन आले.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कसचे...कसचे.....

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 15:43 नवीन
इतक्या वेळा आय.डी. उडून पण आपली कोडगेपणाची चिकाटी अद्द्याप टिक्कुन आहे... हा पण आपला एक विशेष गूण आहेच.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

इतका लोचटपणा स्वभावात

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 23:24 नवीन
इतका लोचटपणा स्वभावात असण्यासाठी अंगी कमालीचा कोडगेपणा असावा लागतो.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भारताला खर स्वतंत्र केलं ते अमेरिकेने

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/14/2016 - 10:48 नवीन
वाचा - :)
↩ प्रतिसाद: चंपाबाई

हा हा हा

सुखीमाणूस
Wed, 09/14/2016 - 19:06 नवीन
हा हा हा
↩ प्रतिसाद: चंपाबाई

ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा

फेदरवेट साहेब
Mon, 09/12/2016 - 18:46 नवीन
ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून केलेला प्रचार विसरलात का गुरुजी ?? तात्पर्य, माझा संघ मोठ्या नावांचा मोताद नाहीये, नावांनी संघ स्वतःला चिकटवून घ्यावा, संघाला कोणाच्या नावाची गरज नाही (कट्टर कार्यकर्ता) ढेल्या.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पुरंदर्‍यांनी कॉंग्रेसचा

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 23:26 नवीन
पुरंदर्‍यांनी कॉंग्रेसचा प्रचार केला आणि तोही सोनिया गांधींसाठी! ऐकावे ते नवलच!
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

माफ करा गुरुजी, तपशिलात थोडी चूक झाली

फेदरवेट साहेब
Tue, 09/13/2016 - 07:27 नवीन
पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना अनंतराव थोपटेनाच मत द्या म्हणून साकडं घातलं होतं. वाटल्यास आपल्या चालत्याबोलत्या राजकीय ज्ञानकोश उर्फ गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन ह्यांच्याकडून फॅक्ट व्हेरिफाय करवून घेऊ शकता आपण
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अग्गोबै !

चंपाबाई
Tue, 09/13/2016 - 07:48 नवीन
सोनिया - जिजाउ मग शिवाजी कोण ?
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 08:36 नवीन
>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना याचे काही संदर्भ आहेत का?
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

जुनी कात्रणे धुंडाळायला

फेदरवेट साहेब
Tue, 09/13/2016 - 08:41 नवीन
जुनी कात्रणे धुंडाळायला लागतील, बघतो काही सापडते काय ते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कॉंंग्रेसने अख्खा देश

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 15:17 नवीन
कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला
हसून हसून पोट दुखायला लागलं. अजून असेच विनोद येऊ द्यात.

दुसर्या विश्वयुद्धाचा काळात

विवेकपटाईत
Tue, 09/13/2016 - 10:01 नवीन
दुसर्या विश्वयुद्धाचा काळात १5 -२० लक्ष भारतीय लोक ब्रिटीश सैन्यात दाखील झाले. अनेक गोळा बारूद चे कारखाने भारतात लागले. त्यातले अर्ध्याहून अधिक सैन्याला युद्धा नंतर निवृत्त करावे लागणार होते. अश्या परिस्थितीत विश्वयुद्धानंतर देशाला स्वतंत्रता देण्या शिवाय काही गत्यंतर नव्हते. कांग्रेस मुळे ब्रिटिशांना देशाचे दोन तुकडे करता आले एवढेच. सन १९४५ नंतर देशाला स्वतंत्रता देण्याची कार्रवाई ब्रिटिशांनी सुरु नसती केली तर नक्कीच सेन्याने त्यांना हाकलून लावले असते. एखादा जनरल गादीवर बसला असता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

५०

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 15:40 नवीन
५०

चमत्कार खरा!

रविकिरण फडके
Mon, 09/12/2016 - 17:44 नवीन
(एक शंका: हा लेख 'चर्चा'त का नाही?) बाकी, संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही. तो आहे हे मान्य. कारण संघाचा स्वयंसेवक असलेला एक लांबचा काका होता माझ्या लहानपणी. शिवाय संघ-प्रमुखांचे विचार वगैरे वाचनात येतात (त्यांच्यावर टीका होते तेव्हा) त्याही अर्थी संघ असावा. पण मला वाटते तो दूर कोठे तरी असतो - मिझोराम, नागालँड, असा, किंवा भूतकाळात गोवा मुक्तिसंग्रामात, नाहीतर कुठे भूकंप वगैरे झाला तर. पण मी जिथे जिथे राहिलो आहे तिथे तिथे काही समस्या निर्माण झाली आणि संघ पुढे आला असे मी अनुभवलेले नाही. स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात. किंवा असे आहे का की ते पडद्यामागून सूत्रे हलवितात पण श्रेय घेत नाहीत म्हणून मला दिसत नाहीत? नाहीतर कदाचित माझा अनुभवच तोकडा असेल.

संघ हा एक चमत्कार खरा! कारण

अंतरा आनंद
Mon, 09/12/2016 - 18:06 नवीन
संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही.
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात.
एक नंबर विचारणा. आमच्याकडेही त्यांची उपस्थिती मैदानावर काठ्या घेऊन हजेरी लावण्यापुरतीच आणि लहानांची बौध्दिके घेण्यापुरतीच दिसते. सामान्य माणसाला कुठले प्रॉब्लेम नसावेत असं त्यांचा समज असावा किंवा "नमामि वत्सले" म्हटल्याबरोबर सगळे प्र्~ओब्लेम छू होतात असं काहीतरी असावं.
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

माझ्या घरात आणि आसपास संघ आहे

आनन्दा
Tue, 09/13/2016 - 21:00 नवीन
माझ्या घरात आणि आसपास संघ आहे, आणि मी तो बर्‍याच वेळेस अनुभवतो. एकदा तळासरीच्या वनवासी कल्याण केंद्राला भेट देऊन या. हे माझ्या माहितीतेल उदाहरण, बाकी माहीत नसलेली अनेक उदाहरणे असतील.
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

काठ्या घेऊन गुंडाना काय

विशुमित
Mon, 09/12/2016 - 18:14 नवीन
काठ्या घेऊन गुंडाना काय मारणार आहेत ते ? स्त्रियांची छेडछाड रोखण्यासाठी स्त्रियांना च उपदेश देत असतात ना तोकडे कपडे घालू नका, घराबाहेर पडू नका, स्त्री मर्यादा सांभाळा वगैरे वगैरे.. मोठ्या समस्येसाठी गेले 60-70 वर्ष घाशीत आहेत कोठे फरक पडला ?
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

... सहमत

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 19:46 नवीन
अशा प्रसंगात पलायन करता यावे म्हणुनच तर ते फुलप्यान्टीऐवजी चड्ड्या घालतात , असे मी कुणाकडुन तरी ऐकले.
↩ प्रतिसाद: विशुमित

चंपाबाई,

जेपी
Mon, 09/12/2016 - 20:35 नवीन
चंपाबाई, उद्या बकरा कुर्बान करणार आहात का ? नाय मंजे एक वाटा आमाला पण द्या..
↩ प्रतिसाद: चंपाबाई

अशा छेडछाड करणाऱ्या किती गुंडांना आपण मारले आहे

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 14:16 नवीन
याचा कृपया विदा द्यावा.
↩ प्रतिसाद: विशुमित

कोणतीही व्यक्ती वा संघटना

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 23:33 नवीन
कोणतीही व्यक्ती वा संघटना काही ठराविक क्षेत्रातच काम करताना दिसते. समाजाच्या सर्व क्षेत्रात तितक्याच तीव्रतेने काम करणे शक्य नसते. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग सेवा, आदिवासींची सेवा या क्षेत्रात काम केले आहे. अण्णा हजारे गावसुधारणा, भ्रष्टाचार विरोध इ. क्षेत्रात काम करतात. नानाजी देशमुख यांनी वनवासी क्षेत्रात काम केले. तसेच संघ हिंदू संघटन, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या प्रसंगी मदतकार्य, जातीयता निर्मूलन, शिक्षण इ. क्षेत्रात काम करतो. अण्णा हजारे किंवा बाबा आमटे या लोकांचा दहशतवात विरोधी कार्यात हातभाग किती किंवा कलाक्षेत्रासाठी यांनी काय केले किंवा महागाईविरोधात त्यांनी काय केले हे प्रश्न जसे चुकीचे ठरतील तसेच संघ बाकीच्या आपले मुख्य कार्यक्षेत्र सोडून इतर क्षेत्रात का नाही हा प्रश्न देखील योग्य ठरणार नाही.
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

"कलियुग" ही संकल्पना थोतांड

खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 09/12/2016 - 21:01 नवीन
"कलियुग" ही संकल्पना थोतांड आहे, "चमत्कार" या शब्दावर माझा आक्षेप आहे. आणि सतत संघाचे धागे मिपावर येण्यालाही माझा एक मिपाकर म्हणून आक्षेप आहे. ' ' धन्यवाद

माझा ह्यांच्या मिपावर

फेदरवेट साहेब
Mon, 09/12/2016 - 21:11 नवीन
माझा ह्यांच्या मिपावर असण्यालाच आक्षेप आहे! (सरासरी साक्षेपी) ढेल्या
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

काय राव

सुखीमाणूस
Wed, 09/14/2016 - 19:17 नवीन
आता कोठे गेले विचारस्वातंत्र्य? इतकी असहिष्णुता निषेध
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

संघे शक्ति कलौ युगे

श्रीनिवास टिळक
Mon, 09/12/2016 - 22:09 नवीन
'संघे शक्ति कलौ युगे,' असं एक वचन आहे. त्याला अनुसरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. सांप्रत, संघाच्या विविध सेवाभावी संस्थांना जे यश आणि पाठिंबा मिळत आहे त्याच्या मागे हीच शक्ती (चमत्कार नाही)असावी.

..

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 22:25 नवीन
सोंगे शक्ती कलीयुगे ... अशीही एखादी म्हण असावी... सोंग काढणे हीही एक शक्तीशाली कला कलियुगात विकसित झाली आहे.
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

पुरूष असताना बाईचा आयडी

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 23:35 नवीन
पुरूष असताना बाईचा आयडी असल्याचे सोंग घेणे किंवा अनेकवेळा हाकलून लावलेले असताना सुद्धा लोचटपणे पुन्हा पुन्हा इथे घोटाळणे ही कोडगेपणाची शक्तिशाली कला तुमच्यात चांगलीच विकसित झाली आहे.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

नाहीतर काय

रुस्तम
Tue, 09/13/2016 - 00:05 नवीन
लोकांना काय मिळत असं स्त्री पुरुषाचं दुहेरी आयुष्य जगून? काही मानसिक किंवा शारीरिक उणीव?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुमचं खरं नाव रुस्तम आहे काय?

अनुप ढेरे
Tue, 09/13/2016 - 11:15 नवीन
तुमचं खरं नाव रुस्तम आहे काय? किंवा वरील सन्माननीय सदस्याचं नाव गुरुजी आहे काय?
↩ प्रतिसाद: रुस्तम

ओ

रुस्तम
Tue, 09/13/2016 - 18:01 नवीन
ओ ढेरे तुमचा तर डु आयडी नाही ना तो?
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ज्येष्ठ नागरिक असताना

साहना
Tue, 09/13/2016 - 11:37 नवीन
ज्येष्ठ नागरिक असताना शेंबड्या पोराप्रमाणे ढगळ चड्डी घालून हवेत दंड फिरवीत काल्पनिक म्लेंच्छाची डोकी फोडणाऱ्या बाबत आपले काय मत आहे ? उत्तिष्ठ, उपविष करताना "चप्पल प्रमुख" सारख्या उच्च पदावर जबाबदारीचे सोंग आणणाऱ्या बाबत आपले काय मत आहे बरे ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अस काही वाचल की संघ अधिकाधिक

शाम भागवत
Tue, 09/13/2016 - 18:19 नवीन
अस काही वाचल की संघ अधिकाधिक बळकट होतोय, तसेच २०१९ साली मोदी परत निवडून येणार असे वाटायला लागते. :)) २०१४ साली संघ व मोदी विरोध असाच उफाळून आला होता व भाषा तर याहूनही खतरनाक होती. तुम्ही छुपे मोदी समर्थक तर नाही ना? ;-)
↩ प्रतिसाद: साहना

साहेब ,

फेदरवेट साहेब
Tue, 09/13/2016 - 18:53 नवीन
साहेब , उघडा डोळे बघा नीट (किमान) गुजरतेतल्या बातम्या, अत्युच्च पातळीला पोचले की भल्याभल्या संस्कृतींचा ऱ्हास होतो. हे बीजेपी काँग्रेस आप वगैरे यःकिश्चित राजकीय पक्ष आहेत. (केवळ नियतीस इमानदार असलेला कुत्रा) ढेल्या
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:)

शाम भागवत
Tue, 09/13/2016 - 19:08 नवीन
:) तस काही नाही हो. राग व द्वेष यांची मात्रा जरा जास्त वाटली म्हणून अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा उपयोग केला.
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा