Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 84392
प्रतिक्रिया 480

प्रतिक्रिया

In reply to by पुष्कर जोशी

हो बरोबर आहे, पण एकदा अनुदान दिलेल्या इंग्रजी शाळा ज्या चर्च शी संबंधित नव्हत्या, त्याम्च अनुदान ही काढल गेल नाहीये. मला नेमकं हेच म्हणायचय

In reply to by साहना

कायच्या काही ! उगाच दिशाभूल करू नका. काँग्रेस सरकारने हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही शाळांना अनुदान दिले होते. पर्रीकर महाशयांनी फक्त हिंदू शाळा कडून ते काढून घेतले आणि ख्रिस्ती शाळांचे जशाच्या तसे ठेवले. हे पाप स्वयंसेवक पर्रीकर महोदयांचे आहे.
संपूर्ण असत्यकथन.
पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi )
या सर्क्युलर खालील मुद्दे आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हिंदू शाळा असा त्याच्यात उल्लेखच नाही. तसेच हिंदू शाळांचे अनुदान काढले व ते इंग्लिश शाळांना दिले असेही कोठेही लिहिलेले नाही. याउलट कोकणी/मराठी माध्यमांच्या शाळांचे अनुदान आहे तसेच सुरू राहील असे अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिले आहे. या सर्क्युलमधील मुद्दे - १) फक्त कोकणी/मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान मिळेल. २) कोकणी/मराठी माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळांना लगेच परवानगी मिळून सुरवातीला १२ लाख व नंतर पुढील ५ वर्षे १ लाख अनुदान मिळेल. ३) जर एखाद्या शाळेत ४० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अंतराचा विचार न करता नवीन कोकणी/मराठी शाळा सुरू करण्यासाठी अनुदानाचे नियम बदलण्यात येतील. ४) सर्व नवीन इंग्लिश्/कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळेल. ५) कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना सरकार प्रोत्साहन देऊन अनुदान देण्यात येईल. ६) ज्या शाळा १० जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमांच्या होत्या व नंतर इंग्लिश माध्यमाकडे वळलेल्या आहेत अशांना अनुदान मिळणे सुरू राहील.

द्वि वा त्रिशतकोत्तरी धाग्याबद्दल आधिच अभिनंदन.... नंतर भेटुच...

In reply to by चंपाबाई

The national flag was first hoisted at the Sangh headquarters on August 15, 1947 and then on January 26, 1950. Chotu Bhaiyya Dhakras, nagar sangh chalak of Mohite Vibhagh and Shriramji Joshi of Dr Hedgewar Smarak Samiti hoisted the flags respectively at the HQ and Smruti Bhawan.

In reply to by श्रीगुरुजी

http://m.timesofindia.com/city/pune/Tri-colour-hoisted-at-RSS-HQ-after-… http://m.firstpost.com/politics/rss-and-tricolour-why-the-modi-governme… गुर्जी हेही खोटेच का ? the national flag was hoisted on previous occasions on august 15, 1947 and on january 26, 1950 and stopped since then, rss sources said. बंद केलेल्या तिरंग्याला पुन्हा २००२ की किती सालात संघवाले पुन्हा सलाम ठोकू लागले .! हे देशप्रेम की पुतनामावशीचे प्रेम ?

In reply to by चंपाबाई

.

In reply to by मोदक

माई मोड ऑन गांधी नेहरुनी इंग्रज काळात लाठ्या खाउन झेंडे लावले ! ' ह्याना ' स्वतंत्र भारतात ५० वर्षे जमले नव्हते ! असे आमचे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

In reply to by मोदक

फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच. प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

"नवीन जिंदाल विरूद्ध भारत सरकार" या केसची माहिती काढून बघता का..? "बाकी आरेसेस वाले खोटारडे आहेत" हे विधान काय किंवा "सगळे डॉक्टर चोर आणि लुटारू आहेत" हे विधान.. दोन्ही बाष्कळच विधाने आहेत. अशा प्रकारच्या सरसकटीकरणाने काही साध्य होत असेल तर सांगा.

In reply to by मोदक

नवीन जिंदाल केसमध्ये कधीही कुठेही झेंडा फडकवण्यवर आडकाठी नाही , हेच कोर्टाने मान्य केले. पण १५ ऑगस्ट , २६ जानेवारीला सारवजनिक ठिकाणे , संस्था इ ठिकाणी झेंडे पूर्वीपासूनच लागत्च होते.

In reply to by मोदक

कुठेही झेंडा लावण्याबद्दलचे "सरकारी" अधिकृत पत्रक येथे पहा http://pib.nic.in/feature/feyr2002/fapr2002/f030420021.html While bringing out the Flag Code of India, 2002 the Government has also ensured that the unrestricted display of the National Flag is consistent with the honour and dignity of the National Flag. हे २००२ मध्ये अधिकृत रित्या अस्तित्वात आले.

In reply to by आनंदी गोपाळ

फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच.
गोपाळराव मूळपदावर आले.

In reply to by आनंदी गोपाळ

प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे. याबद्दल आपली माहिती निश्चितच चुकीची आहे. अर्थात "पहिला दिवस" कधीपासुन सुरु झाला याबाबत आपली व्याख्या वेगळी असेल तर गोष्ट वेगळी. पहिला दिवस = १५ ऑगस्ट १९४७ असे जर म्हणत असाल तर ते मात्र खचितच चुकीचे आहे.

In reply to by मोदक

वामपंथी चष्म्यातून असत्य लेखन करणारे रामचंद्र गुहा सारख्या व्यक्तींच्या लिहिण्याकडे लक्ष्य द्यायचे नसते.

In reply to by विशुमित

विकीपिडीयातील माहिती मिठाची चिमूट घेऊनच वाचावी लागते. बर्‍याचदा माहिती चुकीची, अर्धवट किंवा पक्षपाती असते. वरील लिंकमध्ये काही ढोबळ चुका आहेत. उदा. It drew initial inspiration from European right-wing groups during World War II. संघ ही स्थापनेपासूनच हिंदुत्ववादी विचारांची संघटना होती. संघस्थापनेनंतर तब्बल १४ वर्षानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात संघाला युरोपमधील उजव्या विचारांच्या संघटनांकडून स्फूर्ती मिळाली हे चुकीचे विधान आहे. The RSS was banned once during British rule and then thrice by the post-independence Indian government — first in 1948 when a former RSS member assassinated Mahatma Gandhi; then during the emergency (1975–77); and for a third time after the demolition of Babri Masjid in 1992. हे पण चुकीचे विधान आहे.

In reply to by विशुमित

प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्या दिवशी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत."

In reply to by पगला गजोधर

१९३८ साली तिरंगा हा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून घोषित होता का? कींवा अशोकचक्राच्या ऐवजी चरखा असणारा काँग्रेसचा ध्वज म्हणून माहीत होता? का स्वतंत्रता सेनान्यांचा ध्वज म्हनून माहीत होता? त्याचा सध्या आहे तसा प्रोटॉकॉल वगैरे त्यावेळी नसावे काही.

In reply to by अभ्या..

२२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदू जगत उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"

In reply to by पगला गजोधर

मग त्यांचे हे पक्षांचे पक्षांचे भांडण झाले ध्वज कोणता असावा याबद्दल. कॉग्रेसने पुढे आणलेल्या तिरंग्याला त्यानी केला असेल त्यावेळी विरोध. हा राष्ट्रध्वजाला थोडीच विरोध झाला. (कारण त्यावेळी राष्ट्रध्वज म्हणून नसणारच)

In reply to by अभ्या..

https://books.google.co.in/books?id=rNxGvlOoUvsC&pg=PA50&lpg=PA50&dq=हिंदू+महासभा+17+एप्रिल+1941&source=bl&ots=sZePpJGBNj&sig=-14Q0nbq9HZLTX19jgp5Th55sv8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjIju2wsIrPAhWDKJQKHfbDB_kQ6AEIIzAD#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%2017%20%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%201941&f=false

In reply to by पगला गजोधर

तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा रेटुन नक्की काय मिळवणार आहात? अभ्याने पुर्वीच लिहिले आहे की जेव्हा तिरंगा हा भारताचा झेंडा नव्हताच तेव्हा त्याला विरोध करणे हे देशाच्या झेंड्याला विरोध करणे होउच शकत नाही. भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल खान्ग्रेस आणी संघ यांच्यामध्ये दुमत होते आणि खान्ग्रेस ने आपला मुद्दा रेटुन तिरंगा मान्य करायला लावला किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असे फारतर म्हणता येइल

In reply to by विशुमित

संघाचे वर्तमान प्रसारप्रचार प्रमुख श्री. मनमोहन वैद्य यांची गेल्याच आठवड्यात (हिंदूस्थान टाईम्स चे एक उद्योग-अर्थव्यवस्था आदीवरील जालीय पत्र) लाईव्ह मिंट मधे मुलाखत आली होती. ती मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. पण येथे तिरंग्या संदर्भातील त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे चिकटवत आहे. It is often said that the RSS has reservations about the Indian flag. Is that true? The Indian flag as it was adopted by our Constitution must be respected by all. There have been people from the Sangh who have given up their lives to protect the flag so there is no question of us not accepting the flag. We are not interested in changing it. Was there no objection to the flag when it was adopted? The tricolour flag emerged in political scenario in 1921. It was Gandhiji’s idea to have a flag representing all major communities. Hence a tricolour flag with red (not saffron) at the bottom, green in middle and white at the top representing Hindus, Muslims and Christians. Then itself, lot of people objected, calling it a communal flag. The very idea of identifying each community separately and trying to forge unity among them was termed as communal thinking. They demanded to have a non-communal, national flag. This demand was so strong that All India Congress Working Committee appointed a seven member committee (popularly known as flag committee) to look into the matter. After hearing both the sides, the flag committee came to a unanimous conclusion. The flag committee report published in 931 says, “It was decided that our flag should be artistic, distinct and non-communal. It was decided unanimously that it should be of one single colour. And if there is a colour that is more distinct that another, one that is more acceptable to the Indians as a whole and one that is associated with this ancient country by long tradition it is the saffron kesari colour.” The flag committee recommended a rectangular saffron-colour flag with a blue charkha on top corner. The communalization of the colour saffron has happened post-Independence—particularly post the insertion of the word secular in the Constitution, when the definition of what is communal and what is secular began to get distorted.

पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला.
दुरूस्ती. संघाच्या कार्यकर्त्यांनी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या दादरा, नगर, हवेली या भागांच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे इ. १२५ स्वयंसेवकांनी १९५३ मध्ये दादरा, नगर, हवेली इ. भागांवर सशस्त्र हल्ला करून हा भाग मुक्त केला होता. त्याव्यतिरिक्त संघाने १९३८ मध्ये हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. हे आंदोलन संघानेच सुरु केले होते. वैयक्तिक पातळीवर अनेक संघ स्वयंसेवक स्वातंत्र्यलढ्यात होते.

In reply to by श्रीगुरुजी

हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... अन या गोवा दाद्र्याचं संघवाल्याना भारीच कौतुक असतं !

In reply to by चंपाबाई

हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही
ह ह पु वा झाली माझी... बाई अभ्यास वाढवा हो...!!!

In reply to by अनिरुद्ध प्रभू

आता पुढचा जावईशोध म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सोनिया, राहुल, प्रियांका, रॉबर्ट इ. स्वातंत्र्यसैनिकांनी कठोर कारावास भोगला होता व त्यांच्या प्रयत्नांमुळेच आख्खा भारत स्वतंत्र झाला.

In reply to by श्रीगुरुजी

हो ना ! १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते. त्यापेक्षा हे ऐकायला मिळाले तर नक्कीच चालेल

In reply to by चंपाबाई

....एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते." तुम्ही हे असे मनोरंजक प्रतिसाद देता, म्हणून आजकाल आम्हाला तुमचे कौतूक वाटते....

In reply to by चंपाबाई

त्यापेक्षा,
"युवराजांनी कँडी क्रशची नऊशेवी लेव्हल पार पाडल्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार" जाहीर !!
ही बातमी जास्त मनोरंजक आणि सत्याच्या जवळपास जाणारी असेल नाही का चंपाताई ??

In reply to by चंपाबाई

कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही..
असं कसं म्हंता चंपाताई..त्यांचेच त पांग फेडून राह्यलो 60-70 वर्ष झाले.. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विलीन करावी असे गांधीजींचे म्हणणे होते असं वाचलंय..त्याच काय झालं ते कळलं नाही.. बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??

In reply to by चिनार

बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??
फर्मास बर का चिनार भाउ....

In reply to by चंपाबाई

इतके मनोरंजक प्रतिसाद द्यायला, तुम्हाला कसं, कसं, सुचतं हो... तुमच्या सारख्या व्यासंगी, विद्वान, हजरजबाबी आणि बरेच काही गूण असलेल्या व्यक्तींच्या समावेशामुळे मिपा नक्कीच पहिल्या क्रमांकावर येणार बघा.

In reply to by चंपाबाई

इतक्या वेळा आय.डी. उडून पण आपली कोडगेपणाची चिकाटी अद्द्याप टिक्कुन आहे... हा पण आपला एक विशेष गूण आहेच.

In reply to by चंपाबाई

हा हा हा

In reply to by श्रीगुरुजी

ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून केलेला प्रचार विसरलात का गुरुजी ?? तात्पर्य, माझा संघ मोठ्या नावांचा मोताद नाहीये, नावांनी संघ स्वतःला चिकटवून घ्यावा, संघाला कोणाच्या नावाची गरज नाही (कट्टर कार्यकर्ता) ढेल्या.

In reply to by श्रीगुरुजी

पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना अनंतराव थोपटेनाच मत द्या म्हणून साकडं घातलं होतं. वाटल्यास आपल्या चालत्याबोलत्या राजकीय ज्ञानकोश उर्फ गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन ह्यांच्याकडून फॅक्ट व्हेरिफाय करवून घेऊ शकता आपण

In reply to by फेदरवेट साहेब

>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना याचे काही संदर्भ आहेत का?

कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला
हसून हसून पोट दुखायला लागलं. अजून असेच विनोद येऊ द्यात.

In reply to by श्रीगुरुजी

दुसर्या विश्वयुद्धाचा काळात १5 -२० लक्ष भारतीय लोक ब्रिटीश सैन्यात दाखील झाले. अनेक गोळा बारूद चे कारखाने भारतात लागले. त्यातले अर्ध्याहून अधिक सैन्याला युद्धा नंतर निवृत्त करावे लागणार होते. अश्या परिस्थितीत विश्वयुद्धानंतर देशाला स्वतंत्रता देण्या शिवाय काही गत्यंतर नव्हते. कांग्रेस मुळे ब्रिटिशांना देशाचे दोन तुकडे करता आले एवढेच. सन १९४५ नंतर देशाला स्वतंत्रता देण्याची कार्रवाई ब्रिटिशांनी सुरु नसती केली तर नक्कीच सेन्याने त्यांना हाकलून लावले असते. एखादा जनरल गादीवर बसला असता.

५०

(एक शंका: हा लेख 'चर्चा'त का नाही?) बाकी, संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही. तो आहे हे मान्य. कारण संघाचा स्वयंसेवक असलेला एक लांबचा काका होता माझ्या लहानपणी. शिवाय संघ-प्रमुखांचे विचार वगैरे वाचनात येतात (त्यांच्यावर टीका होते तेव्हा) त्याही अर्थी संघ असावा. पण मला वाटते तो दूर कोठे तरी असतो - मिझोराम, नागालँड, असा, किंवा भूतकाळात गोवा मुक्तिसंग्रामात, नाहीतर कुठे भूकंप वगैरे झाला तर. पण मी जिथे जिथे राहिलो आहे तिथे तिथे काही समस्या निर्माण झाली आणि संघ पुढे आला असे मी अनुभवलेले नाही. स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात. किंवा असे आहे का की ते पडद्यामागून सूत्रे हलवितात पण श्रेय घेत नाहीत म्हणून मला दिसत नाहीत? नाहीतर कदाचित माझा अनुभवच तोकडा असेल.

In reply to by रविकिरण फडके

संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही.
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात.
एक नंबर विचारणा. आमच्याकडेही त्यांची उपस्थिती मैदानावर काठ्या घेऊन हजेरी लावण्यापुरतीच आणि लहानांची बौध्दिके घेण्यापुरतीच दिसते. सामान्य माणसाला कुठले प्रॉब्लेम नसावेत असं त्यांचा समज असावा किंवा "नमामि वत्सले" म्हटल्याबरोबर सगळे प्र्~ओब्लेम छू होतात असं काहीतरी असावं.

In reply to by अंतरा आनंद

माझ्या घरात आणि आसपास संघ आहे, आणि मी तो बर्‍याच वेळेस अनुभवतो. एकदा तळासरीच्या वनवासी कल्याण केंद्राला भेट देऊन या. हे माझ्या माहितीतेल उदाहरण, बाकी माहीत नसलेली अनेक उदाहरणे असतील.

In reply to by रविकिरण फडके

काठ्या घेऊन गुंडाना काय मारणार आहेत ते ? स्त्रियांची छेडछाड रोखण्यासाठी स्त्रियांना च उपदेश देत असतात ना तोकडे कपडे घालू नका, घराबाहेर पडू नका, स्त्री मर्यादा सांभाळा वगैरे वगैरे.. मोठ्या समस्येसाठी गेले 60-70 वर्ष घाशीत आहेत कोठे फरक पडला ?

In reply to by विशुमित

अशा प्रसंगात पलायन करता यावे म्हणुनच तर ते फुलप्यान्टीऐवजी चड्ड्या घालतात , असे मी कुणाकडुन तरी ऐकले.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, उद्या बकरा कुर्बान करणार आहात का ? नाय मंजे एक वाटा आमाला पण द्या..

In reply to by रविकिरण फडके

कोणतीही व्यक्ती वा संघटना काही ठराविक क्षेत्रातच काम करताना दिसते. समाजाच्या सर्व क्षेत्रात तितक्याच तीव्रतेने काम करणे शक्य नसते. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग सेवा, आदिवासींची सेवा या क्षेत्रात काम केले आहे. अण्णा हजारे गावसुधारणा, भ्रष्टाचार विरोध इ. क्षेत्रात काम करतात. नानाजी देशमुख यांनी वनवासी क्षेत्रात काम केले. तसेच संघ हिंदू संघटन, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या प्रसंगी मदतकार्य, जातीयता निर्मूलन, शिक्षण इ. क्षेत्रात काम करतो. अण्णा हजारे किंवा बाबा आमटे या लोकांचा दहशतवात विरोधी कार्यात हातभाग किती किंवा कलाक्षेत्रासाठी यांनी काय केले किंवा महागाईविरोधात त्यांनी काय केले हे प्रश्न जसे चुकीचे ठरतील तसेच संघ बाकीच्या आपले मुख्य कार्यक्षेत्र सोडून इतर क्षेत्रात का नाही हा प्रश्न देखील योग्य ठरणार नाही.

"कलियुग" ही संकल्पना थोतांड आहे, "चमत्कार" या शब्दावर माझा आक्षेप आहे. आणि सतत संघाचे धागे मिपावर येण्यालाही माझा एक मिपाकर म्हणून आक्षेप आहे. ' ' धन्यवाद