✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 08/26/2016 - 22:21  ·  लेख
लेख
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते. एवढ्या वर्षाअंनंतर ही जाहिराती बघून उलगडा झाला: . "राजेरजवाडे, सरदारदरकदार या लोकात पुष्कळच खप" असलेल्या 'बादशाही याकुती' ची ही जाहिरात वाचा: . "मेंदूचे काम विशेष पडणारे" वकील, कारकून, बॅरिस्टरवगैरेंना उत्तम फायदा देणाऱ्या 'व्हिगोराईन' ची जाहिरात: . "डॉक्टर्स, ग्राजुएट्स, जजीस, मॅजिस्ट्रेट्स, आफिसर्स वगैरेंनी गौरवलेले 'रंजन' मलम मागवण्याबरोबरच अर्ध्या आण्याचे तिकीट पाठवून 'विशेष खुलाश्याचे हँडबिल' देखील मागवण्यास विसरू नका: . "पुष्कळ नामांकित डॉक्टरांनी व सद्गृहस्थानीं सर्वोत्कृष्ट ठरविलेले, दु:खग्रस्तांचा एकच इलाज" असलेले स्वदेशी 'अमृतांजन: . गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः . परंतु अश्या प्रकारच्या "वर्तमानपत्रातील तिखट मीठ लावून फुगवून लिहिलेल्या मोठमोठया जाहिराती" वाचून औषधे मागवून पैश्यापारी पैसा आणि शरीरप्रकृतीही बिघडवून घेणाऱ्या लोकांना डॉ. ग.पां. काळोखे, ए. ए. एम. एस.यांची ही जाहिरात दिलासा देत असेल: . बाह्य भपक्यावर न भुलता "पक्क्या बुंदीपासून यांत्रिक शक्तीने भाजून हस्तस्पर्शाशिवाय दळून ताजी डब्यात भरलेली 'अस्सल काफी' घेण्याचा आग्रह करणारी ही जाहिरात: . "एकदाच लाविले असता जणुकाय ताज्या फुलांचा घमघमाट सुटला आहे" असा भास करवून देणारे 'दिल्ली दरबार हेयर ऑईल : . नाशिकचे सखाराम वामन जोशी 'खलीपाच्या अद्भुत गोष्टी' आणि 'पोलादि अडकित्ते' एकत्रच जाहिरातवतात : .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
साहित्यिक
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
अर्थकारण
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
संदर्भ
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38327 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

ती

पगला गजोधर
Fri, 08/26/2016 - 22:30 नवीन
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?
  • Log in or register to post comments

पृथ्वीवर बसलेली लेडी

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 16:44 नवीन
पृथ्वीवर बसलेल्या लेडीचे चित्र पारशी फॅशनचे कपडे घातलेल्या स्त्रीचे आहे, बघा: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

नाही ती भारतमाता.........

विनोद१८
Sun, 10/21/2018 - 15:04 नवीन
....भारतमाता नाही. ती आहे पृथ्वीवरची "अखंड्भारतमाता".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हे वाचोनी, मौजहीच वाटे भारी!

वामन देशमुख
Fri, 08/26/2016 - 22:32 नवीन
हे वाचोनी, मौजहीच वाटे भारी!
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Fri, 08/26/2016 - 22:33 नवीन
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.
  • Log in or register to post comments

काय गडबड कळत नाही

पैसा
Fri, 08/26/2016 - 23:01 नवीन
माझ्याकडे अंक आहे त्यात एकही जाहिरात नाही. हा अंक पुन्हा कधी प्रिंट झाला होता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आलं लक्षात

पैसा
Fri, 08/26/2016 - 23:21 नवीन
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पहिली बत्तीस पाने काय होती

असंका
Sat, 08/27/2016 - 12:51 नवीन
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो, टाकते ना!

पैसा
Sat, 08/27/2016 - 14:19 नवीन
हळूहळू स्कॅन करून काही पाने टाकते आज उद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अनुक्रमणिका

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 15:30 नवीन
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हसून फुटलो......

माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/26/2016 - 22:35 नवीन
काय त्या जाहिराती.... अलभ्य लाभ ! धाग्याबद्दल आभारी आहे...
  • Log in or register to post comments

सहीच.... वाचून मजा आली.

शि बि आय
Fri, 08/26/2016 - 22:39 नवीन
सहीच.... वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

सहीच.... वाचून मजा आली.

शि बि आय
Fri, 08/26/2016 - 22:40 नवीन
सहीच.... वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

कडक!!

जव्हेरगंज
Fri, 08/26/2016 - 22:48 नवीन
कडक!! अजून काही जुने पुराणे येऊ द्या!!
  • Log in or register to post comments

आहहह, जबरदस्त ठेवा.

अभ्या..
Fri, 08/26/2016 - 23:07 नवीन
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.
  • Log in or register to post comments

तेव्हा लोक खूपच साधे होते हे स्पष्ट दिसतंय...

माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/26/2016 - 23:25 नवीन
अनेकांनी गौरवलेले असे छापले की झाले... साधे सरळ लिखाण... झाली जाहिरात....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हो हो, अमृतांजन ला मात्र पदक

अभ्या..
Fri, 08/26/2016 - 23:33 नवीन
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

पत्र्याचा डबा

भ ट क्या खे ड वा ला
Sat, 08/27/2016 - 15:06 नवीन
सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पत्र्याचा डबा

भ ट क्या खे ड वा ला
Sat, 08/27/2016 - 15:06 नवीन
सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारी ! और आंदो !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/26/2016 - 23:49 नवीन
भारी ! और आंदो !
  • Log in or register to post comments

हे गजकर्ण, डोळ्यांत फूल पडणे

आदूबाळ
Fri, 08/26/2016 - 23:54 नवीन
हे गजकर्ण, डोळ्यांत फूल पडणे वगैरे रोग हल्ली गेले का?
  • Log in or register to post comments

नै हो, नावे बदलली फक्त,

संदीप डांगे
Sat, 08/27/2016 - 00:52 नवीन
नै हो, नावे बदलली फक्त,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

जुने वाचायला मजा येते. किंमत

palambar
Fri, 08/26/2016 - 23:59 नवीन
जुने वाचायला मजा येते. किंमत १० रुपये म्हण्जे तेव्हा फार असेल नाहि.
  • Log in or register to post comments

समोरच्या कोनाड्यात उभी

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 01:08 नवीन
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : Image removed. गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. Image removed. लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: Image removed. जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) Image removed. सुरैय्या आणि नूरजहान: Image removed. लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः Image removed. सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? Image removed. आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! Image removed.Image removed. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

तुषार काळभोर
Sat, 08/27/2016 - 07:29 नवीन
कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं.

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 07:32 नवीन
कुर्ला स्पिनिंग अँड वीव्हिंग कं. असे आहेसे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 07:58 नवीन
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

"पुलगम" आठवले बे!

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/27/2016 - 07:59 नवीन
"पुलगम" आठवले बे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

परफेक्त बापू. पुलगम, गांगजी,

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 08:02 नवीन
परफेक्त बापू. पुलगम, गांगजी, कोल्हापुरे, क्षीरसागर, चिलका हे सगळे सोलापूरची शान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

स्वदेशी मिल होती कुर्ल्याला

बोका-ए-आझम
Sat, 08/27/2016 - 09:22 नवीन
ती हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शिवकरण बिडी बंद झाली, संभाजी

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 08:00 नवीन
शिवकरण बिडी बंद झाली, संभाजी आणि भिकूसा बिडी अजून चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 09:56 नवीन
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अरे वा! १९११ मधला अंक? फारच

रुपी
Sat, 08/27/2016 - 01:26 नवीन
अरे वा! १९११ मधला अंक? फारच छान जपून ठेवला आहे तुमच्या स्नेह्यांनी!
  • Log in or register to post comments

अमृतांजनचा डबा

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 01:39 नवीन
माझ्या लहानपणापासूनचा अमृतांजनचा एक डबा अजून माझ्याकडे आहे: Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्या वडलांकडे असा एक आहे...

असंका
Sat, 08/27/2016 - 12:45 नवीन
माझ्या वडलांकडे असा एक आहे... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बहुतेक दिनानाथ दलाल.

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 12:48 नवीन
बहुतेक दिनानाथ दलाल. एकदम प्लीजंट कॉम्पोझीशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सही असेल का? शोधावं का

असंका
Sat, 08/27/2016 - 12:52 नवीन
सही असेल का? शोधावं का चित्रावर? बघतोच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मला तरी दिसली नाही... :(

असंका
Sat, 08/27/2016 - 12:55 नवीन
मला तरी दिसली नाही... :( पण चित्र खरंच भारी आहे..! नक्कीच आपण म्हणता तेच असतील चित्रकार! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 12:57 नवीन
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

कहर नॉलेज आहे राव तुम्हाला!!

असंका
Sat, 08/27/2016 - 13:03 नवीन
कहर नॉलेज आहे राव तुम्हाला!! पण सॉरी मला असंही काही सापडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 13:15 नवीन
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 13:32 नवीन
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा हा... हे वरचे मी फोटो

असंका
Sat, 08/27/2016 - 14:03 नवीन
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मुळगावकर

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 15:35 नवीन
सीतेच्या हात-पाय मुरडण्याच्या पद्धतीवरून हे चित्र मुळगावकरांचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वाह, मस्तं.

पद्मावति
Sat, 08/27/2016 - 02:02 नवीन
वाह, मस्तं.
  • Log in or register to post comments

वा! आता कशाला उद्याची बात..

मयुरा गुप्ते
Sat, 08/27/2016 - 02:39 नवीन
वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा
  • Log in or register to post comments

खरंच मनोरंजन!

कंजूस
Sat, 08/27/2016 - 05:57 नवीन
खरंच मनोरंजन!
  • Log in or register to post comments

एक से बढकर एक!!!

पिलीयन रायडर
Sat, 08/27/2016 - 06:33 नवीन
एक से बढकर एक!!!
  • Log in or register to post comments

मनोरंजक

सामान्य वाचक
Sat, 08/27/2016 - 07:33 नवीन
आजचे अंक आपण जपून ठेवावेत कि काय ? 3र्या 4थ्या पिढी ला याची मौज वाटेल
  • Log in or register to post comments

मस्त.खजिना :)

यशोधरा
Sat, 08/27/2016 - 07:53 नवीन
मस्त.खजिना :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा