Skip to main content

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

वाचने 92558
प्रतिक्रिया 382

प्रतिक्रिया

३०० नको का? आता काय दुसरा धागा येणार नाय. निदान ३०० तरी करा! शिका कायतरी पुणेकरांकडून.

In reply to by पैसा

अरे कोन म्हंतो करनार नाय, केल्याशिवाय रहानार नाय आरे आव्वाssssssssज कुनाचा ...... (ज़रा बसलाय या कमळीच्या नादात) -उपगट प्रमुक सानपाडा शाका क्रमांक २५६

उद्या सानपाडा हून येईन . अंतर फारच कमी आहे . तरी ही कोणाला वाटेत "उचलायचे" असेल तर सांगा .. - हेमंत वाघे

आत्ता पर्यंत खालील आयडींनी नक्की येतोय असे कळवले आहे...यापैकी कोणी टांग दिल्यास पुढला कट्टा त्यांना पाँसर करावा लागेल...यादीत कोणाचे नाव नसल्यास इथे कळवा मिपाकर बोका-ए-आझम (आयोजक) विपा (NMSA च्या आत घेउन जाणारे संयोजक) मी प्रचेतस सतिश गावडे "सर" गणामास्तर नाखु"न" अंकल डॉ.सुबोध खरे माझीही शँपेन किसन शिंदे संदीप डांगे अत्रन्गि पाउस पक्षी मंदार भालेराव पिंगू सुश मय अदि मारवा प्रणवजोशी हेमन्त वाघे अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता कुटुंबे मुक्त विहारि आणि सौ. मुवि स्वीट टॉकर आणि स्वीट टॉकरीणबाई माम्लेदारचा पन्खा आणि सौ. माम्लेदारचा पन्खा निलापी आणि बेटर हाफ जमल्यास उशीरा येणारे गॅरी ट्रुमन सुनील

In reply to by टवाळ कार्टा

अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता
=)) =)) अजया ताई, बघताय नं?

In reply to by प्रचेतस

आमाले कित्ती मज्जा येत होती तुमी हाये मनून....!

In reply to by बोका-ए-आझम

वाह भारी एकदम कट्टा एकदम बोभाटा -कट्टा होणार म्हणजे , आम्ही पण येतोय फुल गॅंग घेऊन , टकाच्या घरच कार्य असल्यावानी (वर टाकलीत नाव)

घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;) @ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.

घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;) @ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.

In reply to by एस

तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर, अर्थात तुमची इच्छा असेल तर! :)

In reply to by किसन शिंदे

:-) (बादवे, मला सर वगैरे नका म्हणू. आयम वोन्लि एकवीस वर्षे ओल्ड! ;-) तरूण, तडफदार इ. इ. )

In reply to by अत्रुप्त आत्मा

@कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ››› अशेच म्हन्तो. !

In reply to by अत्रुप्त आत्मा

पांडू आला असता तर तुम्हीही आला असता अशेच म्हन्तो.

In reply to by प्रचेतस

गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही आले अस्ते अशेच म्हन्तो.

In reply to by प्रचेतस

आलो असतो कट्ट्यास जर नसत्या दुसर्या उचापती. वदले मनापासून टकाश्री रावास छत्रपती ! महाकट्ट्यास भरघोस शुभेच्छा... अखिल मिपा पुणे महानगर मित्रमंडळ आणि नाखुन परिवार

In reply to by टवाळ कार्टा

बहुतेक येणार नाही असं लिहिलंय. घाटात जाम पाऊस असेल. तिथे टाइमपास करत बसू उगाच :)

In reply to by प्रचेतस

खंडाळ्याच्या घाटातील आगोबा.. पावसाळी आगोबा. भिजलेला आगोबा. थंड धुंद आगोबा. आगोबा उर्फ ... =)) असो! ;)

उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स बंद-- //Mega Block on 3.7.2016 KURLA-VASHI UP AND DN HARBOUR LINES FROM 11.30 AM TO 3.30 PM. Dn Harbour line services to Panvel/Belapur/Vashi leaving Chhatrapati Shivaji Terminus from 10.41 am to 3.25 pm and Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Terminus leaving Panvel from 10.29 am to 2.57 pm will remain suspended. However special local trains will run o­n Chhatrapati Shivaji Terminus - Kurla and Vashi - Panvel sections during the block period. ///

In reply to by त्रिवेणी

अरे काय राव तुमचे शॉर्ट फॉर्म.... एवढा चांगला टोमॅटो भात त्याचा टोबा केलासा. खावासा वाटायला नको??

मज्जाय बाबा लोकांची ! कट्ट्याला हजेरी लावणार्‍यांची जंगी यादी झालीय. खा लेको, खा टोभा, मटारची उसळ, शिक्रण ! मजा करा ! कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा ! सचित्र वृत्तांत जरूर टाका :)

आज सोनियाचा दिनु! मला उगाच शाळेत 26 जानेवारी ला किंवा 15 ऑगस्टला फुलांची रांगोळी काढून मोठ्या भोंग्यावर लावलेली उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई आठवली!!

मी, गणामास्तर आणि आपल्या साऱ्यांचे लाडके दर्पणसुंदरीहृदयसम्राट, पुरातन मंदिरे आणि लेणी अभ्यासक कातरवेळ फेम प्रचेतस सर पुण्याहून क्षमस्व चिंचवड वरून निघालो आहोत.

बुवा अले नाहीत त्याला कार्न पांदू नाही येणार म्ह॑णून नाही तर .............. संसार मंदिरी या आनंद नाचतो गं ह्य गाने हाय !

टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!

In reply to by टवाळ कार्टा

मी तिथल्या लोकांमध्ये नाही म्हणालो, तिथल्या तिथे म्हणालो. त्या भालेरावांना गाठ की! ते पण लग्नोत्सुक आहेत. शोध म्हणजे सापडेल एखादी अस्मिता. (पहा फ़क्त झी मराठी वर)

टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!

पाटील फाटका वर सुरक्षा रक्षकाला कै सांगायचे ? आपला फोन क्रमांक मिळेल का ?