मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

वाचने 92344 वाचनखूण प्रतिक्रिया 382

कंजूस Sun, 07/03/2016 - 19:37
फोटो- २ ) ओळखपरेड ३ ) ओळखपरेड ४ ) निघण्याअगोदर ५ ) निघण्याअगोदर ६ ) छत्री धरलेली चि० निलापी ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड-

जव्हेरगंज Sun, 07/03/2016 - 20:31
+१ आता कुठे कट्ट्याची भव्यता लक्षात आली!!!! लैच भारी!!!

शि बि आय Sun, 07/03/2016 - 23:35
कट्टाला खूपच धमाल आली. एवढ्या पावसात बर्याच लांबून लांबून हजेरी लावल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आभार. तसेच कट्टा ठरवणारे बोका भाऊ आणि कट्टयासाठी ठिकाण ठरणारे श्री व सौ पाटील यांना धन्यवाद.