✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274212 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

फोटोशॉप...???

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 18:56 नवीन
फोटोशॉप...???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

असे लांबट तंतुमय जिन्नस

चित्रगुप्त
Wed, 10/21/2015 - 20:59 नवीन
असे लांबट तंतुमय जिन्नस गेल्या वर्षी आणि या वर्षी जूसिंगचे सुरूवातीचे 5-6 दिवस निघाले. जालावर शोध घेता तसले पोटातील कृमी असतात असे कळले. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसे जूसिंग केल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. उगाच तर्कटे लढवण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

इथे काही लोकांना असेही वाटेल

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 22:01 नवीन
इथे काही लोकांना असेही वाटेल की तुम्ही त्या ज्युसिंगवाल्याचे एजेंट आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इंटरेस्टिंग

पैसा
Wed, 10/21/2015 - 22:21 नवीन
इंटरेस्टिंग. मी २२ वर्षांपूर्वी सिद्ध समाधी योग शिकले तेव्हा त्यात कित्येक महिने कच्चे खाऊन राहिल्याचे आठवते. तेव्हा वजन प्रमाणात राहून अ‍ॅक्टिव्हिटीज चालू होत्या आणि अ‍ॅलर्टनेस, चपळता वाढली होती. मात्र तेव्हा नुसते रस घेऊन नव्हे तर माझ्या खाण्यात मोड आलेली कडधान्ये हा प्रमुख घटक होता. थोडे ड्राय फ्रुट्स, सर्व प्रकारच्या कच्च्या भाज्या व फळे (कधीतरी बदल म्हणून रस) गोडी आणण्यापुरता मध, लिबू असा आहार होता. चहा कॉफी बंद केली होती. वाटलेच तर थोडा वरण भात, किंवा कच्चे पोहे खात असे. दूधही बंद केले होते. नंतर मुलांसाठी आणि स्वतःसाठी वेगळे जेवण करणे कठीण होऊ लागले तसे ते बंद झाले. पण अजून कधी संधी मिळाली तर पुन्हा असे कच्चे खाऊन आरामात राहू शकेन. निव्वळ रसावर रहाण्यापेक्षा असे कच्चे खाऊन सहज रहाता येते. त्यात प्रोटीन्स मिळतात, फायबर मिळते. दात खराब होत नाहीत. वगैरे वगैरे. पण ज्यांना असे कांदा लसूण मिरची काही नसलेले खाणे चालत असेल त्यांना ठीक आहे. बाकीच्यांसाठी जरा अवघड आहे. एकूण प्रतिसादांमधे डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

सध्या मी हे सर्व कसे घडून आले

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/22/2015 - 10:02 नवीन
सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
मग चित्रगुप्त साहेब आपल्याला या प्रदीर्घ चर्चेनंतर काय समजलं? मला डॉ मनोज भाटवडेकर या मानसोपचार तज्ञाची एका पुनर्जन्माची कथा या स्वानुभवावर असलेल्या पुस्तकाची आठवण झाली
  • Log in or register to post comments

हे कसे घडून आले.

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 17:05 नवीन
घाटपांडे साहेब, आम्ही उभयतांनी हा जो प्रयोग केला, तो "मुलगा एवढे म्हणतो आहे, तर करून बघूया" म्हणून. आम्हाला त्यावेळी त्यातून असे सुपरिणाम कायमचे लाभतील, याची सुतराम कल्पना नव्हती. उलट हे एक नवीनच काहीतरी अमेरिकन फॅड आहे, असे वाटले होते. त्यामुळे डायेटिशियन, डॉक्टर वा अन्य विद्वान मंडळींचे या बद्दल काय मत आहे असा कोणताही उहापोह न करता, संपूर्ण समर्पण भावनेने ते केले. नंतर इतर लोकांशी चर्चा करताना त्यांना आमच्यात झालेला बदल तर उघडच दिसून येत होता, परंतु आम्ही सांगत असलेले पटत नव्हते (माझा अगदी लहानपणापासूनचा खास, अतिविद्वान प्रोफेसर मित्र, लठ्ठ्पणा, पोटाचे विकार वगैरे भोगत असूनही अजूनही त्याला मी हे पटवून देऊ शकलेलो नाही). तेंव्हा मला हे सर्व कसे घडून आले असावे हे जाणून घ्यावेसे वाटले. अर्थात या विषयाचा आवाका फार मोठा आहे, आणि त्यात शरीरशास्त्र, आहारशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पोषणशास्त्र, वगैरेंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असे सर्व इंग्रजीतून वाचण्याचा मला कंटाळा असल्याने ते लांबणीवर पडत आहे. सध्या मी सुचवतो, की आपण (आणि सर्व जिज्ञासू वाचकांनी) खालील काही व्हिडियो अवश्य बघावेत. माझे समाधान होईल इतपत अभ्यास झाल्यावर मी स्वतंत्र धागा काढेन. How the Body Reacts to a Juice Cleanse with Joe Cross https://www.youtube.com/watch?v=7JtjFNy59t4 Fat Sick and Nearly Dead -- भाग १ https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8 Fat Sick & Nearly Dead 2 (2014) HD -- भाग २. https://www.youtube.com/watch?v=7kLSs4OhS0o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

बराय

स्टुपिड
गुरुवार, 10/22/2015 - 15:43 नवीन
आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.
  • Log in or register to post comments

अनुषंगिक परिणाम

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 16:41 नवीन
आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.
वजन कमी होणे हा एक अनुषंगिक परिणाम आहे. मुख्य फायदा पचनसंस्था कमालीची स्वच्छ होऊन त्यायोगे अनेक प्रकारच्या सध्या असलेल्या व भविष्यकालीन समस्या उद्भवण्यापासून बचाव हा आहे. आपल्याला कल्पना नसली, तरी आतड्यात कृमी आणि न पचलेले अन्न, जुनी घाण वगैरे असते, जे नाना व्याधींना जन्म देत असते. ते सर्व नष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्टुपिड

अशा थेरेपीने

मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/22/2015 - 16:48 नवीन
@स्टुपिड , अगदी बरोबर बोललात. आपल्या सारख्यांच्या अंगावर ना चरबी ना किडे ठेवायला जागा,त्यामुळे असली थेरेपी आपल्या कामाची नाही. एक शंका, अशा थेरेपीने आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?
  • Log in or register to post comments

अन्न पचवणारे जीव

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 17:12 नवीन
आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?
चांगली शंका विचारलीत. माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही. दही, ताक घेणे हे यासाठी उत्तम असे ऐकले आहे. याविषयी जास्त माहिती मिळाली, तर अवश्य लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

नको असलेले पाहुणे

चित्रगुप्त
गुरुवार, 10/22/2015 - 17:17 नवीन
गंमत म्हणून लिहीतो आहे, परंतु कदाचित असेही असू शकते: किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

किडकिडीत असणारे लोक जे काही

शलभ
Fri, 10/23/2015 - 14:12 नवीन
किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

गंमत म्हणून

मार्मिक गोडसे
Fri, 10/23/2015 - 15:35 नवीन
गंमत म्हणून ठिक आहे. परंतू ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्‍या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? शरीराचे शोषण थांबल्यामुळे ते तर वाढायला हवे.
माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही.
हे जिवाणू साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि तुम्ही तुमची विष्ठा प्रयोगशाळेत तपासलीही नव्हती. मग तुम्हाला कसे समजले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

किडकिडीत व्यक्तीने रसाहार

चित्रगुप्त
Fri, 10/23/2015 - 17:07 नवीन
किडकिडीत व्यक्तीने रसाहार केल्याचे उदाहरण मी बघितलेले नाही . माझ्या मुलाच्या पोटातून मोठा टेपवर्म निघाला . कृमी अनेक प्रकारचे असतात . मोठेही असतात . ते चारपाच दिवस सोडून एरवी कधीच तसले काही निघालेले नाही. शरीरशुद्धी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने रसाहार केला पाहिजे असे वाटते . मला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या . दोन्ही आवश्यक होत्या . रसाहाराने आतडी साफ झाली की योग्य आहार घेऊन वजन वाढवाढवता येईल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

फारच प्रेरणादायी उपक्रमाची

पाषाणभेद
गुरुवार, 10/22/2015 - 23:01 नवीन
फारच प्रेरणादायी उपक्रमाची माहीती दिलीत. धन्यवाद चित्रगुप्तजी.
  • Log in or register to post comments

फेस्बुक वर एक निती संजीव

पुष्करिणी
Fri, 10/23/2015 - 02:51 नवीन
फेस्बुक वर एक निती संजीव म्ह्णून आहेत त्यांचा डाएट ( डीटॉक्स) प्लॅन खूप प्रसिद्ध आहे सध्या. त्यांचा प्लॅन फॉलो करून बरेच जणं वजन कमी करण्यात यशस्वी झाले आहेत.
  • Log in or register to post comments

नीति संजीव यांच्या उपक्रमात

चित्रगुप्त
Fri, 10/23/2015 - 10:25 नवीन
नीति संजीव यांच्या उपक्रमात काय करायचे असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

Breakfast – GREEN JUICE

सुबोध खरे
Fri, 10/23/2015 - 12:05 नवीन
Breakfast – GREEN JUICE Mid Day Snacks - NUTS, RAW SEEDS, FRUITS Lunch – SALAD Mid Evening Snacks – FRUITS Dinner – SALAD WITH BOILED PULSES Water – PLENTY AND MORE Apple Cider Vinegar – ONCE A DAY (2 teaspoon organic ACV diluted in a glass of water 15 mins before any one meal) Exercise –½ HOUR WALKING (anything over and above this will accelerate the weight loss like crazy!) Sunlight - 10-15 minutes of direct sunlight everyday preferably between 9-12 noon (for the vitamin D requirement of the body) Ingredients: GREEN JUICE : Half bunch Spinach, Half bunch Coriander Leaf (with part of the stem), Handful mint leaf, 1 full cucumber, 1 full tomato, Juice from 1 big lemon, ½ inch piece ginger, 2 cloves garlic Blend everything in the blender instead of putting it into a juicer, because it will lose all its fiber in a juicer or if it is strained. It would be 1-2 glasses in quantity and look like a thick smoothie... Do have the complete juice as soon as it's prepared. Nuts : Regular mixed nuts – Walnut, Almond, Cashew, Peanut, Pista, etc.- salted ones are fine too - 2 handfuls of mixed nuts a day Raw Seeds : Mix of Chia seeds, Flax seeds, Sesame seeds, Pumpkin seeds, Hemp seeds, Sunflower seeds, etc. - 2 Tablespoons of mixed seeds a day... Fruits : Absolutely any fruit your heart desires! All fruits are perfect, including high carb ones like banana, mango, etc. Salad (prepared for few days): 2-3 medium carrots, 2 medium beetroots, ½ small red cabbage, 2-3 celery sticks, red green and yellow capsicum(1 each), olives... (You can also try other raw vegan salads with dressings... this is the recipe I had during detox...) Boiled Pulses : White or black chana, kidney beans, black eyed peas, etc. I chose only one pulse for a day and pressure cook ½ cup in turmeric powder and a pinch of salt. You could also garnish it with onion, tomato and spices like pepper, cumin, etc. or fresh grated coconut हा आहार त्यांनी सुचवलेला आहे. यात फळं भाज्या आणि कडधान्ये आहेत. यात वावगं काहीच नाही. मूळ मुद्दा येतो तो घेणार्याच्या इच्छा शक्तीचा. सर्वात मोठा प्रश्न येथेच आहे. तीन दिवस असा आहार घेतल्यावर बहुसंख्य लोकांना पिझ्झा, जिलबी, रसमलई, मटण कबाबची स्वप्नं पडायला लागतात. चौथ्या दिवशी त्या गोष्टी जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसू लागतात आणि पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो. आणि मग येरे माझ्या मागल्या होते. माझे स्वतःचे उदाहरण देतो. काहीच कारण नसताना मी एकदा ठरवले कि आपण पूर्ण फलाहार करावा. म्हणून सकाळपासून मी फक्त केळी डाळिंब संत्रं सफरचंद आणि अननस अशी फक्त फळं खात होतो. संध्याकाळ पर्यंत मला बिस्किटं पोळी भाकरी केक यांचे स्वाद आठवू लागले.शीख कबाब चिकन बिर्याणी सारखे पदार्थ तर नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटू लागले. दुसर्या दिवशी सकाळी मी झक्क पैकी एक भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाल्ला. हे फक्त एकाच दिवसात घडले.( माझ्या अंगावर एक दिवसापेक्षा जास्त टिकाव लागेल इतकी चरबीच नाही. आजकालच्या स्मार्ट फोन सारखे एक दिवसात ब्याटरी डाऊन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पाचव्या सहाव्या दिवशी पाय

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 10/28/2015 - 13:44 नवीन
पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो. >> एक्झाक्टली. न पेक्षा रोजच्याच आहारात थोडे बदल करून ३ वेळा जेवणाऐवजी पोर्शन साइझ लहान करून ४ ते ५ वेळा जेवलो आणि व्यायाम रेग्युलर ठेवला तर सब ठीक रहेगा. याने पाय घसरण्याची वेळ फार कमी येते आणि एकदा ८ १० दिवसांमध्ये सवय लागली की जास्त टेन्शन राहत नाही . डाएटिंग इज चेंजिंग युअर लाइफ़स्टाइल (टूवर्ड हेल्थ) का काय ते म्हणतात तेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रसाहार हा

विटेकर
Fri, 10/23/2015 - 11:28 नवीन
रसाहार हा अतिशय सुन्दर उपाय आहे ! गेल्या १० आठवड्यात मी १० किलो वजन कमी केले आहे , दर आठवड्याला एकदा रसाहार करुन ! freedon from diabetes या संस्थेच्या डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शानाखाली मी माझा मधुमेह रिवर्स ( होय , रिवर्स) केला आहे , गेले दोन महिने एकही गोळी / औषध खात नाही ! पर्यायी औषध नाही , फक्त आहाराचे तंत्र जमवून ! जी टी टी टेस्ट ओके आली की लेख लिहिनच ! उत्सुक लोकांनी freedon from diabetes / डॉ. प्रमोद त्रिपाठी गुगलून पहावे !
  • Log in or register to post comments

आणि

विटेकर
Fri, 10/23/2015 - 11:29 नवीन
हे सारे इथे , भारतात . पुण्यात राहून , सुट्टी न घेता , भारतभर कंपनीच्या कामासाठी भटकत असताना ही शक्य झाले !
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त साहेब

विटेकर
Fri, 10/23/2015 - 11:36 नवीन
तुमचा ज्युसर कोणता आहे ? सेन्त्रीफ्युगल ज्युसर असेल तर काही पोषक द्रव्ये नाश होऊ शक्तात उष्णतेमुळे ! ज्युसर स्लो हवा , आणि दाबून ( बारिक तुकडे करून फिरवून नव्हे ) रस काढणारा हवा, स्लो असल्यामुळे गरम होत नाही आणि सारी पोषक मूल्ये अबाधित राहतात असा माझा अनुभव आहे ! शक्यतो रसाहारासाठी मिक्सर वापरू नये, पण ज्युसर नाही म्हणून रसाहार विनाकारण पुढे पुढे ढकलू नये ! समथिन्ग इज बेटर द्यान अजिबात नथिन्ग ! मिक्सर वापरल्यास रस गाळूनच प्यावा .. अजिबात तंतू / मगज असू नयेत.
  • Log in or register to post comments

ज्यूसर

चित्रगुप्त
Fri, 10/23/2015 - 21:04 नवीन
Image removed. सध्या तरी सेंट्रिफ्युगलच आहे, परंतु आता नवा घेतेवेळी पूर्ण माहिती मिळवून घेईन. जेंव्हा आपण फक्त जूसिंगवर असतो, तेंव्हा त्यात अजिबात तंतू नसावेत. याचे कारण जो क्रॉस यांनी चांगले सांगितले आहे. @ विटेकर साहेबः तुम्ही आठवड्यातून एक दिवस जूस घेता, तेंव्हा इतर दिवशी आहार काय काय, किती असतो ? कोल्ड प्रेस जूसरने काढलेला रस गाळावा लागतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

एका आयुर्वेदीक माणसाला

द-बाहुबली
Fri, 10/23/2015 - 12:53 नवीन
एका आयुर्वेदीक माणसाला विचारले तो म्हटला हे एक प्रकारचे लंघनच आहे, पौष्टीक लंघन. सलग ३ पेक्षा जास्त दिवस करु नकोस. हे चालु असताना विशेषतः नेहमीचे व्यायाम अजिबात करु नकोस. ३ दिवस नंतर आहार हळु हळु वाढ अन्यथा पोट अजुन सुटेल. सगळा गोंधळ झालाय माहितीचा डोक्यात.
  • Log in or register to post comments

एकन्दरीत पाहता आधी मनाचाच

कवितानागेश
Fri, 10/23/2015 - 15:06 नवीन
एकन्दरीत पाहता आधी मनाचाच निग्रह महत्त्वाचा, हे दिसतय मग सगळे उपाय लागू होतील. कधी जमणार कुणास ठाऊक? (गुलाबजाम खात प्रतिसाद देणारी ) आळशी माउ ;-);-)
  • Log in or register to post comments

चित्रगुप्तजी तुमची स्टोरी फेक आहे

बाजीगर
Sat, 10/24/2015 - 06:43 नवीन
जे तुम्ही लिहिलयं तसं व्हावं अशी तुमची ईच्छा असावी.ती फिल्म पाहून/ तसं लेख वाचून तुम्हाला तसं व्हावं अस वाटलं असेल,पण तसं होणं शक्य नाही.पॅथालाॅजीक रिपोर्ट दाखवा.आंतरजाल वरचे फोटो दाखवून असेच झाले होते म्हणने ठीक नाही.
  • Log in or register to post comments

क्यूं भई... फेमस होणा चाहते

तर्राट जोकर
Sat, 10/24/2015 - 09:57 नवीन
क्यूं भई... फेमस होणा चाहते हो? ३० सेकंड्स ऑफ फेम..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

स्वानुभव

चित्रगुप्त
Sat, 10/24/2015 - 10:46 नवीन
बाजीगरपंत, इथे मी काही सिद्ध करण्यासाठी आलेलो नाही , ज्याला करायचे असेल त्याने करून बघावे, नसेल त्याने सोडून द्यावे . मी जे काल्पनिक लिखाण करतो, त्यात तसे स्पष्ट सांगतो. आपल्याला झाला तसा लाभ इतरांना व्हावा या कळकळीतून हे लिखाण केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

ह्या थेरेपीनंतर किडकिडीत

मार्मिक गोडसे
Sat, 10/24/2015 - 11:05 नवीन
ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्‍या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? असा माझा प्रश्न होता.
हे जिवाणू (अन्न पचवणार्‍या बॅक्टिरिआ) साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत
ह्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात ज्या तुम्ही केल्या नाहीत. ठिक आहे.
माझ्या मुलाच्या पोटातून मोठा टेपवर्म निघाला
हे गंभीर आहे. मांस व्यवस्थीत न शिजवता खाल्याने टेपवर्मचे इन्फेक्शन होते. टेपवर्मचा मोठा तुकडा विष्ठेत आढळला ह्याचा अर्थ तो संपुर्ण बाहेर पडला असा होत नाही. त्याचा तोंडाचा भाग शरिरात असु शकतो व त्याच्या तुटलेल्या शरिराची पुन्हा वाढ होत असते. टेपवर्मची अंडी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यामुळे विष्ठा प्रयोगशाळेत तपासणे हे योग्य राहील.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रगुप्त
Sat, 10/24/2015 - 12:26 नवीन
धन्यवाद . मुलाला सांगतो तसे.
  • Log in or register to post comments

मेंदूत टेपवर्म

मार्मिक गोडसे
Fri, 11/06/2015 - 10:00 नवीन
मेंदूत टेपवर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मेन्दुत टेपवर्म बर्याच वेळेस

सुबोध खरे
Fri, 11/06/2015 - 11:16 नवीन
मेन्दुत टेपवर्म बर्याच वेळेस दिसुन येतो. फिट्स येण्याचे ते एक मह्त्त्वाचे कारण आहे. https://en.wikipedia.org/wiki/Cysticercosis https://en.wikipedia.org/wiki/Neurocysticercosis वर दिलेलं जरा जास्त सनसनाटी आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मोठ्या आतड्यातील, लहान

जयन्त बा शिम्पि
Sun, 10/25/2015 - 03:50 नवीन
मोठ्या आतड्यातील, लहान आतड्यातील मळ बाहेर काढण्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे " लघू शंख प्रक्षालन " . विषेशतः बध्ह्कोष्टता व मलावरोध याचा ज्यांना त्रास होतो त्यांचेसाठी सोपी आहे. ज्यांना अधिक माहिती हवी त्यांनी व्यनि करावा.
  • Log in or register to post comments

लघू शंख प्रक्षालन -- याबद्दल

चित्रगुप्त
Sun, 10/25/2015 - 07:21 नवीन
लघू शंख प्रक्षालन -- याबद्दल माहिती कृपया इथे धाग्यावर दिली तर उत्तमच .
  • Log in or register to post comments

लघू शंख प्रक्षालन

मार्मिक गोडसे
Sun, 10/25/2015 - 10:23 नवीन
लघू शंख प्रक्षालन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ही घ्या माहिती.

श्रीकृष्ण सामंत
Sun, 10/25/2015 - 07:53 नवीन
ज्यूस नको,ज्युसर नको,रंगीबेरंगी फळं नको,रंगीबेरंगी भाज्या नको. कुणाला आपल्यापासून त्रास नाही.कुणाचे आपल्यावर उपकार नाहीत.आमचाच आम्ही पितो तुमचा काय जातां? फक्त सकाळी उठल्यावर मोरारजी देसाई करायचे ते करावं.आणि शंभर (१००) वर्ष जगावं. टीप-मी मात्र हा प्रयोग केलेला नाही.मी रोज घेतो ब्राम्हणी जेवण-वरण,भात,तूप,लिंबाची फोड,थोडं मीठ आणि एक कुठचीही भाजी हा आहार घेऊन अजून ८२ वर्षाचा तरूण आहे.वजन आटोक्यात आहे. Morarji Desai (29 February 1896 – 10 April 1995) Advocate of urine therapy In 1978, Prime Minister Morarji Desai, a longtime practitioner of "urine therapy," spoke to Dan Rather on 60 Minutes about the benefits of drinking urine.[17][18] https://en.wikipedia.org/wiki/Urine_therapy--- युरीन थेरपीबद्द्ल
  • Log in or register to post comments

शरीर शुद्धीसाठी स्वच्छ कापड

पाषाणभेद
Sun, 10/25/2015 - 19:30 नवीन
शरीर शुद्धीसाठी स्वच्छ कापड गिळतात या क्रियेला काय म्हणतात?
  • Log in or register to post comments

धौती - नवरात्री वगैरे

चित्रगुप्त
Sun, 10/25/2015 - 20:26 नवीन
धौती क्रिया ?? या प्रकारे बाहेरून घातलेले कापड वगैरे अन्ननलिका आणि पोटात कोठ्यापर्यंत पोहोचत असावे. संपूर्ण पचनसंस्थेची, लहान आणि मोठ्या आतड्याची स्वच्छता होते का? मूळव्याधीसारखे विकार दूर होतात का? रसाहारात बहुतांश पाणी आणि जरूरीपुरती पोषकद्रव्ये घेऊन पचनसंस्थेला विश्रांती/अवसर मिळत असल्याने ती कित्येक वर्षांचे पेंडिंग काम - अर्थात आतड्यात साचून राहिलेली घाण बाहेर काढते, त्याने अनेक प्रकारच्या व्याधि दूर होऊन शरीर निरामय होते. अन्नाचा 'सुकाळ' आणि 'दुष्काळ' या दोन वेगवेगळ्या परिस्थितीत शरीर वेगवेगळ्या रीतीने काम करत असते. इथे आपण तात्पुरता कृत्रीम दुष्काळ निर्मित करत आहोत, असे समजू शकतो. यामुळे शरीरात जागोजागी साठलेली चरबी उपयोगात घेतली जाऊन वजनही कमी होते. नवरात्रीत काही लोक नऊ दिवस केवळ लिंबूपाणी घेऊन असतात. असे कोणी मिपावर आहेत का ? त्याचा काय परिणाम शरीरावर दिसून येतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वस्त्र धौती म्हणतात. शिवाय

रेवती
Sun, 10/25/2015 - 21:59 नवीन
वस्त्र धौती म्हणतात. शिवाय वासंतिक वमन शिबीर असते. त्याचे वर्णन ऐकून मला मळमळायला लागते. पण तो उपचार म्हणून चांगला असावा. मी करून पाहिलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वाढलेले पोट

चित्रगुप्त
Tue, 10/27/2015 - 16:54 नवीन
वाढलेल्या पोटाबद्दल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडियो: (हा शवविच्छेदनाचा व्हिडियो आहे. सुरुवातीला बघताना कसेसेच वाटले, परंतु चिकाटीने बघितला). Where does abdominal fat accumulate? (Dissection) https://www.youtube.com/watch?v=Bav_IBsuXEM&index=1&list=PL4UUvGPFS01mkTUZnD4M3AAhDW3cxdJqD या चरबीचा होणारा दुष्परिणामः https://www.youtube.com/watch?v=8ij3k50-C28&index=4&list=PL4UUvGPFS01mkTUZnD4M3AAhDW3cxdJqD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शवविच्छेदनाचा व्हिडिओ बघितला

रेवती
Fri, 10/30/2015 - 00:28 नवीन
शवविच्छेदनाचा व्हिडिओ बघितला जाईल असे वाटत नाही पण दुसरा पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हल्ली अनेक आयुर्वेदिक औषधे मिळतात .

सिरुसेरि
Sat, 11/07/2015 - 12:45 नवीन
हल्ली अनेक आयुर्वेदिक औषधे मिळतात - उदाहरणार्थ - कायम चुर्ण , धौती योग इत्यादी . हि आयुर्वेदिक औषधे शरीरातील जंतु बाहेर काढण्यासाठी परिणामकारक ठरु शकतात ?
  • Log in or register to post comments

साहेब

सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 11:38 नवीन
साहेब आपल्या पोटात असलेल्या जंतांच्या तोंडात आकडे (हुक) असतात. ज्याने ते आपल्या आतड्याला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे गंधर्वहरितकी किंवा कायम चूर्ण सारखी रेचके जंतांना आतड्याबाहेर काढू शकत नाहीत. अलबेंडाझॉल सारखी औषधे मानवी शरीरात शोषली जात नाहीत. पण ती जंतांनी खालीही कि त्यांना लकवा मारतो(paralysis). त्यामुळे ते आतड्याना पकडून राहू शकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी शौचाचे वाटे पडून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

एखाद्या फुग्याप्रमाणे फुगलेले पोट

वामन देशमुख
Sat, 11/07/2015 - 13:09 नवीन
माझाही अनुभवही सांगतो. वय ३८ वर्षे, पुरुष, अथलेटिक शरीर. खाण्या-पिण्याची आवड आहे. २० वर्षांपासून तंबाखू खातो. मी आठवड्यातून किमान चार दिवस, ६-८ किमी पायी चालतो आणि हलका व्यायाम करतो. मागच्या वर्ष-दीडवर्षापासून माझे पोट सुटायला सुरुवात झालीय. हे थोडे विचित्र वाटेल, पण माझ्या पोटावर फारशी चरबी नाहीय आणि माझे पोट एखाद्या फुग्याप्रमाणे फुगलेले वाटते आणि त्या तुलनेत हातपाय बारीक होत आहेत असे वाटते आणि जाणवते. माझी मुळची ३१ इंच कंबर आता ३३ इंच झालीय आणि जुन्या प्यांटी घालता येत नाहीत. माझी मेहनत, व्यायाम, सराव चालणे, पळणे, जॉगिंग इ. करण्याची तयारी आहे आणि करतही आलेलो आहे. पण अश्यात थोडा उत्साह कमी झाला आहे असे वाटते. सारखे फुगलेल्या पोटाकडेच लक्ष लागून राहते. आणि मूळ पातळ पोट परत आणण्यासाठी काय करावे लागेल असे वाटत राहते. विस्कळीत प्रतीसादाबद्धल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात

मोदक
Wed, 11/02/2016 - 18:47 नवीन
दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात ज्युसींगचा एक अयशस्वी प्रयोग केला. दिवसाच्या सुरूवातीला लिंबू पाणी, नंतर एक ग्लास गाजर ज्यूस. दुपारी जेवणाच्या वेळी एक ग्लास गाजर ज्यूस आणि एक ग्लास बीटचे ज्यूस. दुपारी पाणी. संध्याकाळी एक मोठा बाऊल भरून पाया सूप सारखे एक मटण सूप. रात्री २ ग्लास टोमॅटो ज्यूस. पुन्हा भूक लागली म्हणून थोडा दहीभात. (बहुदा घन पदार्थाची भूक लागली असावी) दुसर्‍या दिवशी कसेबसे ज्यूस वर दिवस ढकलला पण संध्याकाळी अन्नाची जबरदस्त इच्छा झाली. इतकी की तोंडाला पाणी सुटू लागले आणि कानात अक्षरशः कोंबड्यांचे पक पक आवाज येवू लागले. ..मग ज्यूसिंगला बासनात गुंडाळले आणि एक चिकन बिर्याणी उडवली. :( आता पुढील प्रयोग आणखी थोडा सावधगिरीने आणि नेटाने करेन.
  • Log in or register to post comments

ज्यूसिंग च्या प्रयोगाबद्दल सहमत.

राघवेंद्र
Wed, 11/02/2016 - 19:21 नवीन
मोदक भाऊ ( दादा), ज्यूसिंग च्या प्रयोगाबद्दल सहमत. सकाळी ज्यूस घेतले, दुपारी सलाड आणि संध्याकाळ पर्यंत गाडी नॉर्मल जेवण्यावर घसरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दादा म्हणू नका हो.. ते

मोदक
Wed, 11/02/2016 - 19:25 नवीन
दादा म्हणू नका हो.. ते सायकलवाले सगळे जण दादा म्हणून मजा घेतात. :( मी सायकलवरून कासारसाई धरणावर जात असलो म्हणून लगेच काय दादा म्हणायचे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

=))

पिलीयन रायडर
Wed, 11/02/2016 - 23:54 नवीन
=)) दादा..जमत नाही तय भानगडीत कशाला पडता... दादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एक्च वादा

नाखु
Fri, 11/04/2016 - 10:35 नवीन
मोदक दादा. अता दाद कुठे मागू मी मधला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एकदम जूसिंग न करता

चित्रगुप्त
गुरुवार, 11/03/2016 - 00:52 नवीन
एकदम पूर्ण जूसिंगवर घसरण्यापेक्षा आधी फक्त एकदा वा दोनदा जूस पिणे सुरु करावे, शिवाय नारळपाणी, लिंबूपाणीही एक दोनदा घ्यावे. बाकी आहार रोजचाच घ्यावा. नंतर आहाराचे प्रमाण थोडे कमी करत जूसचे वाढवावे. जूसची गोडी आणि सवय लागल्यावर पाच-सात दिवस (सुट्टी घेता आली तर उत्तमच) संपूर्ण जूसिंग करावे, म्हणीजे बरे. या लेखात टाकलेले फोटो (विशेषतः पोटातील घाण आणि तंतुमय पदार्थ) मी घेतलेले नसून साधारणपणे त्याप्रकारचे जे फोटो जालावर मिळाले, ते टाकले आहेत, कारण प्रत्यक्ष जूसिंग करताना पुढे त्यातून एवढा अद्भुत फायदा मिळेल याची सुतराम कल्पना नव्हती, त्यामुळे फोटो घेण्याचे सुचलेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा